Story : मैत्र ! भाग ३


मैत्र ! भाग ३ 


कैक वर्षांचा काळ गंधाली च्या नजरे समोरून तरळत होता . आनंद, दुख , ताण -तणाव , स्वप्ने , कला , अश्या किती तरी गोष्टीचे क्षण त्यांनी वाटून घेतले होते .  पण आता तो सगळा भूतकाळ होता , गंधालीचा हि आणि अजयचा हि आणि मुख्य म्हणजे सोनालीचा हि .   सोनाली तिला  आवडली होतीच , अगदी पहिल्यांदा अजय नि तिची ओळख करून दिले तेव्हाच . आता मात्र एका विशेष मायेने ती सोनाली कडे पाहत होती , सहनुभिती नाही पण , एका चांगल्या मुलीचे आयुष्य  आणि ती ज्या   साथीची - मैत्रीची प्रतीक्षा करत आहे , त्या साठी  करायचा हे गांधालीने  ठरवले होते . एका चांगल्या व्यक्तीच्या  धूळधाण , आपल्याच जवळच्या एका व्यक्तींने केली आहे हे तिच्या मनात डाचत होते , आपण कदाचित   तिला वाटत होते आणि अजयशी संबध तोडून हि , गंधाली च्या मनावरचे ओझे अजून उतरले नव्हते . ठरल्या प्रमाणे , अभिच्या  क्लिनिक मध्ये ती पोचली , अगदी वेळेत . सोनाली हि आली होतीच . 
"सोनाली , तू मला अभिजितच म्हण आणि आज मी  संधी देणार आहे . म्हणजे अगदी सुरवाती पासून सांग किंवा मुद्देसूद सांग असे काही नाही . अनायासे गंधाली  हि आहे , तेव्हा तू , तुझ्या  मनात जे आहे ते बोल . मग अगदी निरथर्क आहे असे वाटले तरी . असे समज कि आपण  गप्पा मारतोय . ,प्रोब्लेम  शल्य असाच काही बोलले पाहिजे असे नाही . ठीक आहे "- अभी 
"हो डॉक्ट … , म्हणजे अजय . मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचे आहे ते .  अलीकडे माझा फार कमी लोकांशी संपर्क येतो ,  तश्या गप्पा होतच नाहीत म्हणा , झालीच तर चर्चा होते नुसती , प्रत्येक गोष्टीची . मला त्याचाच कंटाळा आला आहे . सहनुभितीने पाहणाऱ्या नजर जाळतात मला . मी बिचारी नाहीये आणि जे काही  आयुष्यात त्यात माझी काय चूक होती , म्हणून मला हे सहन  मला कळत नाहीये. आपली चूक नसताना , आपण का भोगायचे ? आपली स्वप्ने का विसारायाची ? माझ्या आयुष्याचा एक तर्फी निर्णय , घेणारा तो कोण ? आणि मी का  ऐकला त्याचा निर्णय ? मी तेव्हाच गंधाली  सारखी , तडक फडक का नाही  वागले ? का नाही मी त्याला  झिडकारले , त्याच क्षणी ? त्याने मला आयुष्यातून बाहेर करण्या ऐवजी , मीच  त्याला माझ्या आयुष्यातून  बाहेर फेकायला हवे होते !!! यातले त्यावेळी मी काहीच करू शकले नाही . म्हणजे प्रतिकार विरोध , चिडचिड सगळे केले . आमचे नाते टिकावे म्हणून सगळे प्रयत्न केले ,  मला जमतील ते . पण नाही जमले मला काहीच .  कड्यावरून कोसळून हि मी मधेच अडकली आहे ,  न वर जाता येतेय , न खाली पडलीये मी . निर्झर वरून सुंदर दिसतो आणि खालून त्यामध्ये मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटता येतो , पण मध्ये अडकले कि त्या पाण्याच्या  प्रवाहाचा वरून येणार आघात सहन करणे किती कठीण  आहे . मी अजय वर प्रेम केले होते , पण मी त्याचा तिटकारा नाही करू शकले , नाही करू  शकत आणि म्हणूनच मी  अधांतरी आहे .  अभी, गंधाली  ला बरच  काही ठावूक आहे , पण तुम्हाला सांगायला हवे . हे सगळे वर पडलेले  प्रश्न आहेत न , तेच त्रास देतात हो मला , माझ्या डोक्यात  सतत घोटाळत राहतात . अजून हि भूतकाळ विसरावासा नाही वाटत ,  बदलावासा वाटतो . मा माझे आयुष्य अजय सोबतच जगायचे होते .   त्याने केलेल्या विश्वासघाता  नंतर हि , मी त्याच्या तिटकारा करू शकत नाही , याचा मला खूप राग येतो . तो आपल्या नव्या आयुष्यात कुठे तरी सुखी आहे , आणि मी हि अशी . याचा पण मला त्रास होतोय . तुम्हाला मी स्वार्थी वाटेन  , पण मग मी आहे . तो सुखी असला तरी , मी त्याच्या सुखात , संकटात कशातच आता वाटेकरी नाही , याचे मला आजही वाईट  वाटते . मी अति विचार करतीये का , तेही कळत नाही. काळ हेच उत्तम औषध असे म्हणून मी इतके दिवस गप्प होते पण माझ्या   बाबतीत उलटच घडतंय, मी अजुंच या सगळ्या गोंधळात अडकत चालली आहे आणि माझ्या नकळत मी अश्या एका वळणावर  आले कि …. मला थोडे पाणी मिळेल ?"
"हो , हे घे . पाणी पी . आणि सोनाली ठ्म्बवसे वाटेल तेव्हा थांब . एकदम ओझे हलके झाले न तरी त्रास होतो मग . तुला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे  माझ्या कडे कोणताही पुस्तक किंवा औषध नाहीये . पण आपल्याला काही  प्रश्नाची उकल नक्कीच होईल आपल्या या प्रवासात , "- अजय नि गांधली कडे पहिले . ती कमालीची अस्वस्थ होती , डोळे अश्रुनी डबडबले होते , मोठ्या धीराने तिने ते रोखले होते , अजयच्या लक्षात आले . 
"गंधाली, जर बाहेर जावून , राजूला सांग ३ चहा पाठवायला आणि त्याला विचार काही  महत्वाचे निरोप असले तर , मी त्याला आता डिस्टर्ब करू नको असे सांगितले होते न "
गंधालीनि  खांद्यावर हात थोपटला आणि " आलेच " असे म्हणून ती बाहेर पडली 
"अजय , तुम्ही लकी आहात . गंधाली  खूप मोकळ्या आणि स्वच्छ मनाची मुलगी आहे , तिच्या प्रेमात पडणे अगदी स्वाभाविक आहे , पण शेवट पर्यंत तिला साथ द्या . अजय नि जसा माझा विश्वास घात केला आहे न , त्या पेक्षा कैक पटींनी तिच्या मैत्रीच्या विश्वासाला तडा गेला आहे . आपल्याला मैत्री कधीच तितकी महत्वाची नाही वाटत न , आपण जसे मोठे होत , जातो , प्रेमात ,पडतो  संसारात पडतो आणि मैत्री मग मागे पडते . त्यामुळे , नवरा - बायको आणि प्रियकर - प्रेयसी यातला संघर्ष  आपण मोठा मानतो . मैत्रीतला नाही . गंधाली ला आता काय वाटतय, हे तुंम्ही , मी बघू शकतो , पण आपल्याला ते जाणवेलच असे नाही . एकाच सांगते तिच्या साठी कमीटमेंट फार महत्वाची आहे . अजय नि ज्या छुपे पणांनी  आणि खोटे बोलून माझ्या वर वर केले न ते तिला खूप लागले आहे .  तर कधी असे वाटले नव्हते या एका प्रसंगातून मी सावरू शकणार नाही .  असे प्रसंग कित्येक लोकांच्या बाबतीत घडतात कि , मग ते  सगळे  थोडी न तुमच्या कडे  धाव घेतात ? अलीहे असे संबंध कडच्या काळातच   तसे    हि फार नवीन असे  नाहीच आणि तसे तर   आपल्या पुराण  काळातही असे एकतर्फी  पणे  नाती तोडून पायदळी  उदाहरण हि काय कमी नाहीत . पण आपले काय झालाय न , कि आपण सगळ्या घटनेतले केवळ नाट्य बघतो , त्याचे मानवी मनावर होणारे परिणाम किंवा भावनिक आघात , या बद्दल विवेचन फार अभावानेच मिळेल न !!!  मला हि या सगळ्या तून बाहेर पडायचं . हि भावनिक  आंदोलने थांबवून , मला स्थिर  व्हायची इच्छा  आहे , मार्ग दाखवणारे आणि काही काळ तरी या मार्गावर माझ्या सोबत चालणारे कुणीतरी हवाय मला . मी फार बोलतीय का ?  "    सोनाली बोलायची थांबली, 
" नाही , अग  असा काहीच नाही . आणि तुझे आणि गंधाली  चे हि मैत्रीचे संबध आहेत , याचाही तुला नक्की फायदा होईल , तू मोकळे पणाने  बोलू शकतेस , अगदी असे समज कि मी  तुझा डॉक्टर नाहीये . आणि मी आहे न तुला मार्ग दाखवायला , तुझ्या घराचे आहेत . "
गंधाली हि मगाशीच परत आता आली होती , त्यामुळे संभाषणाचा काही भाग तिच्या कानावर हि पडत होताच , ती सोनालीचा हात धरून म्हणाली 
" सोनाली , तुला या वाटेवर जी सोबत लागेल न ती मी करेन . अगदी प्रामाणिक पणे , आणि  मला खरच असे वाटतय कि तुला एक चांगले आयुष्य जगण्याचा अधिकार नक्की आहे . तो कुणीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे  काढून घेवू शकत नाही . मी आहे इतकाच सांगते . अभी तज्ञ  म्हणून जे काही योग्य वाटेल ते करेलच . पण मी या मैत्रीत आता कधीच मागे हटणार नाही , इतके सांगते . मला जर उशीर च झाला आहे , पण असू दे . अजून हि आपल्या पुढे सगळे आयुष्य पडलय . आणि  तू ते भरभरून जगावस असे वाटते मला , खरच मनपासून "
अभी नि आज संभाषणात विशेष भाग घेतला न्हवता , प्रथम सोनालीला मोकळे करणे गरजेचे होते . तिच्या मनात काय  सुरु आहे , याची कल्पना असली तरी , ते खूप काळ तिने दाबून ठेवले आहे याची  त्याला कल्पना होती . आणि खर तर गंधाली  असल्याने सोनालीला किती बोलू आणि किती नको असे वाटले असेल हेही त्याला जणवत होते . आणि खर तर गंधालीच्या मनात हि खूप काही साठले होताच कि . ती दवडलेली वाफ आता मोकळी झाली तर या दोन्ही मुली यातून मोकळ्या होतील  जाणवले होते . गंधालीच्या मनावर हि कसले तरी ओझे आहे या प्रकरणात  याचा त्याला अंदाज आला होता . खर तर हि केस ,   त्याच्या साठी वेगळीच होती .  कदाचित त्याला काही विशेष करावे लागेल असे हि न्हवते . पण जबाबदारी मात्र जास्त होती  . सोनालीला हि अति श्रम आणि मानसिक तणाव येणार नाही याची त्याला काळजी घ्यायची होतीच . म्हणून तो बोलला 
" सोनाली , आज आपण थांबू यात . आठवड्यातून ३ वेळा आपण इथे भेटू . तुला सांगितल्या प्रमाणे  तुझे आई बाबा जर एकदा येवून गेले तर मला बरे पडेल . मला त्यांच्याशी हि काही बोलायचे आहे . आणि एक गोष्ट , तू आणि गंधाली  अधून मधून बाहेरही भेटत जा  . पुढच्या वेळी आपण जर तुझ्या दिन्क्रम्वर पण बोलू . मला असे वाटतय कि , रोजचे  तुझे व्यावसायिक काम , घरातली कामे , या   सोबतच तू तुअश्य आवडी निवडीचा हि विचार जरूर कर . मला वाटते , कि तू तुझे वाचन आणि चित्रकला परत सुरु कर . जसे जमेल तसे . भेटूच परवा दिवशी "
"हो , मी येयीन परवा . जमले तर आई बाबा उद्या  येतील , राजू दादांकडून कडून वेळ घेवून. मी निघते आता "
"अभी मी जर आलेच , सोनाली ला बाहेर पोचवून "
सोनाली आणि गांधली बाहेर पडल्या , संध्याकाळचे ७. ३० वाजले होते . गंधाली  क्लिनिक मध्ये थांबणार होती , ती आणि अभी  , त्याच्या घरी जाणार होते .  बोलायला वेळ हि मिळाला असता आणि घरच्यांना हि भेटणे झाले असते . 
"सोनाली  , तुला उद्या वेळ असेल तर , माझ्या ऑफिस मध्ये ये ना . मी तुला माझे ऑफिस हि दाखवेन आणि  आमचा कारखाना पण . येशील का उद्या , थोडा वेळ काढून ये , आपण डोसा आणि कॉफी पार्टी करू नंतर "
"हो चालेल मला , पण तुला वेळ असेल न , म्हणजे उगाच माझ्या मुळे "
"ए , असे काही नाहीये . मला  पण आवडेल कि कुणी तरी माझे कौतुक केले कि . ये तू बिनधास , ४ वाजता जमेल ?"
"हो , येते . निघू आता "
"हो , चल बाय. . सावकाश जा "
अभी  नि थोडे स्वतःचे काम संपवले आणि ते दोघे निघाले . 
"घरीच जायच का एकदम ?"
"हो म्हणजे काय ? जावू यात कि ? आणि कुठे जायचे मग ?"
"असच भटकू कि जर वेळ ."
"नको , तुझ्या  घरी सगळे जेवायला थांबले असतील . आणि मला हि नंतर उशिरा होतो मग घरी जायला "
"ठीक आहे , चल मग"
अभी  घरी येवून हि , बरेच दिवास झाले  होते . दोन्ही कडचे आई बाबा आता लग्नाच्या तारखेच्या मागे होते आणि  त्यांची तयारी केव्हाच सुरु झाली होती . अभीच्या आई नि सुद्धा घरात काय काय नवीन आणलय , ते अगदी हौसेने गंधाली  ला दाखवत होत्या . गंधाली  पण सारे बघत होती, मधेच काही जुजबी प्रश्न हि विचारात होती . मनात बराच काही सुरु असताना हि तिने वेळ सावरून घेतली , आणि ती समरस होवून सगळ्या संभाषणात भाग घेत होती . जेवण झाल्यावर ,    अभी तिला सोडायला निघाला . घरापाशी आल्यावर , गंधाली  नि त्याला थांबवले ,
"अभी , घरात चल  न "
"आता ?  बर चल "
गंधाली नि दारावरची बेल दाबली , आई नि दर उघडले . 
" या , अलभ्य लाभ . आज आम्हाला दर्शन . नाही तरी गंधाली  ला सोडून खालच्या खाली पळतोस तू "
"हो , होते तसे खरे , पण आलो आज वर . काय म्हणताय ?"
"काही नाही , सुरु आहे नेहमीच , घर , काम हेच . तारीख कधी काढायची ते सांग ?"
"लवकरच"- अभी ऐवजी गंधाली  कडून उत्तर ऐकून दोघे हि आश्चर्य चकित झाले  
"आई , मला थोडे अभिशी बोलायचे आहे , म्हणजे सोनाली आज क्लिनिक  मध्ये आली होती न "
" हो  तुम्ही जा , तुझ्या खोलीत बोलत बसा . कोफी हवी असेल तर मला हक मार हा बेटा "
अभी आणि गंधाली  आत गेले 
"काय वाटतय तुला अभी ? सोनाली बरी होईल न ? तिला बर व्हावेच लागेल . तुला कळतंय न किती महत्वाचे आहे हे सगळे "
"हो हो , कळतंय मला . आणि ऐक सोनाली तशी बरी आहे . नॉर्मल आहे , काम करते , रोजचे रुटीन सुरु आहे तिचे . आणि तिच्या मनात हे जे काही अजय बद्दल चे विचार येत आहेत न , ते येणे स्वाभाविक आहे . खर सांगू तुला , प्रत्येकाचे मन , स्वभाव वेगवेगळे असतात , म्हणून एकाच घटनेबद्दल प्रत्येक जन वेगवेगळ्या पद्धतीने  प्रतिक्रिया देत असतो . सोनाली अजून हि तिच्या भूतकाळात अडकली आहे , तिला अजय बद्दल नक्की काय वाटतय हे तिला  माहिती आहे , पण ती ते मान्य करत  नाहीये  तिच्यावरचे मोठे ओझे आहे . सर्व सामान्य लोकांच्या प्रतिक्रियांना पाहता पाहता , तिला असे वाटतंय कि तिला अजय चा  तिरस्कार वाटायला पाहिजे , पण तसे ती करू शकत नाहीये .   तिच्या मनात त्याच्या बद्दलच्या भावनेचा ओलावा अजून आहे .  आणि त्यात चूक बरोबर असे काही नसते अग "
"अस कस म्हणतोस तू  अभी . अजय नि तिला एक प्रकारे फसवले आहे . तिची पर्वा  न करता ,  किती बेदरकारपणे तो सोडून गेला . अभी , ते फक्त प्रेमात न्हवते , जवळ पास एक वर्षाचा संसार  होता त्यांचा . तो सुद्धा , सोनालीनि हिम्मत दाखवली आणि उभा केला .  तिने प्रत्येक वेळा सावरलाय त्याला , केवळ प्रेम खातर . अपमान हि सोसलेत , पण त्याची झळ  प्रेमाला नाही  लागू दिली . आणि याने काय केले तर ऐन वेळी माघार घेतली . मी , माझे , माझी माणसे , माझे भवितव्य असे म्हणून , सगळे कवटाळून बसला , सोनालीला सोडून . ती  कशी काय अजूनही त्याच्या वर प्रेम करू शकते , ती त्याला माफ कशी करू शकते ? . तुझे म्हणणे मला नाही पटत "? म्हणजे संबध तोडणे , इथ पर्यंत  आहे . पण तिरस्कार म्हणजे , मी टोकाचा तिरस्कार आणि  द्वेष म्हणतोय हा मी . "
"हे बघ , उगाच मला शब्दात पकडू नको . तो काही माझा गुन्हेगार नाहीये , पण त्याचे  वागणे चुकीचे होते आणि त्याची शिक्षा सोनाली ला  होती मिळत होती म्हणूनच मी , मला जे शक्य होते ते  शासन त्याला केले . मला नाही फरक पडत आता , त्याचे  काहीही बरे वाईट झाले तरी . खरच , ती वाटच मी बंद केली आहे आता "
"मग सोनाली साठी का इतकी धडपड करतीयेस . ती काय तुझी इतकी चांगली मैत्रीण हि न्हवती , आणि जर माणुसकी बद्दल म्हणशील तर असे खूप लोक असतात कि ज्यांना गरज आहे . इथे इतकी पोट तिडीक का ?"
"तू काय मला आरोपीच्या  पिंजऱ्यात   उभे केले आहेस का ?
"नाही नाही , गैर समाज नको. बर चल स्पष्टच  बोलतो . हे बघ अजय तुला इतका इतका जवळचा होता म्हणूनच तू इतकी कठोर वागलीस . दुसरी गोष्ट , जरी तू त्याच्याशी संबंध तोडले  तरी सुद्धा तुझी रुखरुख कमी झालेली नाहीये , कारण तुझ्या न  बोलण्याने , कदाचित त्यालाही विशेष फरक पडत नाहीये आता हेही जाणवले आहे तुला . बरोबर "
"हो , हे खरे आहे अभी  . पण त्याला सोनालीच्या जाण्या मुळे  सुद्धा फरक पडला नाहीये , तिथे माझा जाण्याने काय पडणार . आणि संबध तोडण्यामागे हे कारण न्हवतेच. मला फक्त असा मुलगा माझा मित्र आणि ते ओं जवळचा मित्र म्हणून नको होता . "
"   मला असे वाटतय कि सोनालीला मदत करून , तुला त्या मैत्रीच्या  ऋणातून मुक्त व्हायचे आहे. अजय नि केलेल्या चुकीचे प्रायश्चित्त , तू घेतीयेस , स्वताच्या समाधाना साठी , त्या कोणे एके काळाच्या नात्यासाठी . हे तर मान्य कर कि सोनाली अजय कडून दुखावली गेली आहे म्हणून हे सगळे तू इतके सिरीयसली  करतीयेस न  "
 "हो अभी हो . मी नाते तोडले तरी   मैत्रीची ती नाळ अजून पूर्णपणे तुटली नाहीये . तो माझा जवळचा मित्र  होता  आणि त्यांनी जर एखादी चूक केली तर  कर्त्यव्य आहे कि त्याला त्याची चूक दाखवणे आणि  त्याचे  परिपत्य हि करणे . काय चुकीचे आहे त्यात . मला हि  मैत्रीचे ओझे झालाय आता . सोनालीला मदत करून , मी स्वताला च मदत करणार आहे , का माहितीये ?"
 "का ? मला तेच ऐकायचे आहे कि इतके ओझे का आहे तुझ्या  मनावर ? आणि इतकी  का नाही देवू शकलीस ?"
"कारण , ऐक…. मी  क्कुनाशीच नाही बोलले हे .  कदाचित  मूर्खपणाचे वाटेल . पण या सगळ्यातून मी सोनालीला वाचवू शकत होते . अजय ला मी तिच्या  पेक्षा जास्त चांगले ओळखत होते , इतकाच नव्हे , तर ज्या काही कारणासाठी मी त्याच्या सारख्या मुलाचा कधीच  आयुष्याचा साथीदार म्हणून विचार केला नसता , ती सगळी कारणे  सोनालीला लागू पडत होती . जीवापाड प्रेम करण्याचा आणि नाते जोडण्याचा आणि कमीटमेंट  नावच्या शब्दाचा आमच्या दोघींचा एकच पिंड होता . तू कदाचित शास्त्रीय दृष्टया मान्य करणार , नाहीस पण  पण त्यांचा या नात्याबद्दल  मला नेहमीच एक निगेटिव  सिकस्थ  सेन्स  होता . काय माहित अगदी सुरवाती पासूनच अजय  हिला साथ देणार नाही असे मला वाटत राहिले . अर्थात सुरवातीला माझ्या कडे काही ठोस  करणे न्हवती , पण नंतरच्या काही काळात ती मला   सापडली. आजही मला टेली पथि नि असे वाटतंय कि अजय लौकिक अर्थाने सुखी असेल हि कदाचित , पण सोनालीनि त्याला एकदा माफ करावे या साठी तो मनात तडफडत असेल नक्की . स्वकेंद्रित होता तो पर्यंत ठीक होते , पण स्वार्थलोलुप झाला तो नंतर  . मला सगळे दिसत होते पण मी अलिप्त राहिले आणि हेच चुकले माझे "
"म्हणजे ?"
"जर मी सोनालीला वेळीच सावध केले असते तर ?"
"म्हणजे नक्की काय केले असतेस ?"
"तिला कल्पना द्यायला हवी वेळोवेळी . तशी एक दोन वेळा त्यांच्या सुरवातीच्या काळात  मी दिली सुद्धा होती . सोनालीच काय पण तिच्या आई बबन हि मी एकदा बोलता  बोलता  सांगितले होते कि तुम्ही अजय घरी   सांगेल याची वाट बघू नका . तुम्ही एकदा त्याच्या आई बाबांशी स्वताच बोला . ओळख करून घ्या . कारण अजयच्या घरी जरी कल्पना आली तरी काकू काकू त्याकडे दुर्लक्ष करून ,, ऐन वेळी अजय ला मनवतील याची मला खात्री वाटत होती . कारण विजू दादांनी नाटकचे वेड  घेतले होते मनावर , त्यामुळे त्यांचे घरी येणे- जाणे  तसे कमीच झाले होते .  नंतर विजू दादांनी  आपल्याच पसंतीच्या मुलीशी लग्न हि केले . सध्या ते परदेशी आहेत , तिकडे त्यांचे शिक्षण आणि काम सुरु आहे . सांगयचे काय तर सगळ्या आशा अजय वर केंद्रित होत्या त्यच्या घरच्यांचा . अर्थात माझे हि वय लहानच होते तेव्हा आणि मी शिक्षण साठी बाहेर गावी असल्यान्रे , अधून मधूनच जायचे . तशी कल्पना दिली होती मी , पण जर घाबरतच "
"घाबरत आणि तू ? तू हाताचे राखून बोलणारी नाहीयेस "
"हो , पण तेव्हा जर जपूनच बोललो , गैर समज नको म्हणून .  सोनालीला असे वाटायला नको कि  तिला अजय बद्दल सांगून तणाव निर्माण करतीये . किती झाले तरी  खूप क्लोज होतो  आणि उगाच तिला असे नको वाटायला कि मी आणि अजय , …."
"कळतंय मला , तुला काय म्हणायचे ते . नुसती मैत्री आहे असे म्हंटले तरी , कुणाल काय वाटेल सांगता येत नाही . पण तुला जे शक्य होते ते तू केलेस कि .  आणि त्यांचे नाते नाही टिकले लग्न नंतर त्याला तू थोडी न  जबाबदार आहेस . हे बघ , तू सोनालीला जरूर मदत कर आणि लक्षात ठेव तेव्हाही तुझा हेतू चांगला होता आणि आताही आहे . " 
" खरय अभी , मी जर स्वत : मोकळी होईन तर , सोनालीला जास्त मदत करू शकेन . तुला अजून हि काही घटना क्रम मला सांगायचा आहे . तज्ञ म्हणून नाही , पण माझ्या मनातले तुझ्या जवळ बोलावे म्हणून . पण आता उशीर झालाय . परत बोलू आणि मला परवा नाही जमणार क्लिनिक मध्ये यायला . मी उद्या भेटेन सोनालीला , काही सूचना ?"
"नाही , सूचना वगैरे काही . निवांत भेट . जे काय बोलायचे ते बोल आणि भूतकाला बद्दल नसेल बोलायाच्चे तुम्हाला तर नाकाही बोलू . तू काहीच ठरवू नकोस , जे घडेल ते घडेल . बर निघू मी . काळजी घे . आणि विचार नको आता . झोप शांत पणे "
"हो , सावकाश जा … आणि thanx , का ते विचारू नकोस :)"
अभी  गेला . गंधालीला खूप बरे वाटत होते कि तिचा जोडीदार ऐकून घेणार आणि समजून घेणारा होता , त्याचे क्षेत्र जरी तेच असले तरी , व्यक्तिगत माणूस वेगळा वागू शकतो , पण अभी … ती स्वताशीच हसली आणि झोपायला गेली . उद्या  पटापट कामे आवरायची होती , संध्याकाळची आणि सोनालीची ती  आतुरतेने वाट पाहत होती 
क्रमश: 

- — ©शीतल जोशी

Comments

Popular posts from this blog

Our visit to an experimental School- Prayog Bhumi

खिडकीतला पाऊस आणि मी !!!!(Poem/Kavita/Mukta Chhand)

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी