एक गोष्ट त्यांची पण: भाग ६
भाग ६
आकाशला भारतात येवून खरा तर एखादा दिवसच झाला होता. त्याला मात्र आपण किती तरी दिवस इथेच आहोत असे वाटत होते. क्षणभर हि पिच्छा न सोडणारे विचार आणि भूतकाळ. त्याला वाटले कि आपण तिकडे दूर एकटे होते पण तरी मन इतके बेचैन नाही झाले कधी आणि आता आपल्या माणसांमध्ये आलोय तर!! पण असच असते बहुतेक. मी किती हि वरून दाखवले कि मी शांत आहे तरी खळबळ आहेच कि मनात . लहानपणी असे कधी सुद्धा वाटले नाही कि असे काही प्रश्न आपल्या समोर उभे राहतील, ज्यांची उत्तरे मिळून सुद्धा, न मिळाल्यासारखी आणि नवे प्रश्नच उभे करणारी. सगळ छान चालले होते कि, सुखवस्तू कुटुंब , उत्तम शिक्षण , सुशिक्षित आई वडील आणि एक गोड बहिण , आणि काय हवे. आणि अनु शी लग्न ठरले तेव्हा पण, एक सुशिक्षित, हसमुख आणि घरच्यांना आपलीशी वाटणारी आयुष्याची साथीदार. सारे काही अगदी "परफेक्ट". पण मला परफेक्ट असे कधीच काही नको होते मला बस समाधानी आणि सगळ्यांना जोडून ठेवणारे आयुष्य हवे होते. मला कधी वळणाचे, घाटाचे रस्ते ,मानवलेच नाहीत; मग आयुष्य तरी कसे मानवेल. त्याला वाटले आपण पाचवर्षा मध्ये एकदा जरी येवून गेलो असतो , तर मन मोकळे झाले असते. आत्ता म्हणजे असे आहे कि आभाळ भरून आलाय , आकाशाला काळ्या मेघांनी झाकून टाकलाय आणि पाऊस बरसावा असे वाटतय आणि तो तर तर काही मनावर घेत नाहीये.
मनानी थकलेला माणूस झोपेच्या आहारी जातो खरा,
पण मन जागच राहते . आकाशाला लवकर जाग
आली आणि आपले आवरून तो खाली आला. सकाळी एक चक्कर मारून यावी असा त्याचा विचार होता त्याला काय वाटले कुणास ठावूक पण त्याची पावले आपोआपच हॉस्पिटल कडे वळली. त्याच्या लक्षात आले कि निमिष आणि इराचे घर हे हॉस्पिटल पासून जवळ आहे, आणि त्याच्या आणि आपल्या आई बाबांना पण तसे काही दूर नाही.
"आकाश…. "
आपल्याला कोण हक मारताय असे त्याला वाटले आणि त्याने वळून पाहिले. अरे विनीता मावशी .
"काय रे , आकाश , ओळख लागतीये का माझी ?"
"काय ग मावशी, तुला विसरून कसे चालेल मला. खाल्ल्या दही-वड्यांना आणि औषधान तरी जगले पाहिजे मला. पण एक सांगू, मी गेलो न तेव्हा जेवढी तरुण होतीस त्या पेक्षा जास्त तरुण वाटत आहेस खरी "
"कंठ फुटला म्हणायचं तुला. तू पाठवलेला ipod वापरते बघ मी . हे बघ रोज सकाळी फिरायला येताना छान उपयोग होतो मला. आणि काय रे माझी खेचतोस काय तरुण दिसते म्हणून. कसा आहेस तू ? आता असे कर माझ्या बरोबर घरीच चल, सकाळचा नाश्ता सोबतच करू , काल चुकला आहेस तू "
"अग
पण, निमिष आणि इरा माझी वाट बघतील आणि कदाचित आज आई पण भेटेल"
"म्हणजे,
तू घरी गेलाच नाहीयेस ?"
"नाही. ग निमिष पण एकटाच आहे, आणी लग्न घरात माझी विश्रांती पण नसती झाली न म्हणून "
"हं, लक्षात येतेय रे माझ्या एक काम कर, तू त्यांना फोन करून माझ्या घरीच बोलव, नाही तर तू नाश्ता कर आणी मग जा त्यांच्या सोबत बाहेर "
"बर, मी कळवतो त्यांना. तसे मला तुझ्या सोबत पण खूप गप्पा मारायच्या आहेत "
आकाश मागच्या वेळी विनीतामावशी कडे आला होता तेव्हा अनु त्याच्या सोबत होती. मावशीने जेवायला बोलावले होते. खर तर तिने सगळ्यांना बोलावले होते , पण आई - बाबा नाही म्हणाले , म्हणजे त्यांना जमत नव्हते . मग इरा पण नाही म्हणाली, घरी आजी जवळ थांबते असे म्हणाली आणी नाही आली. विनीतामावशी खर तर आईची सहकारीच नव्हे, तर खूप जवळची मैत्रीण. तिला एक मुलगी होती , पण ती लहानपणीच दगावली. मावशीने अगदी स्वतच्या मुलांसारखे प्रेम केले आपल्यावर . खर तर तिची मुलगी असती तरी तिनी आपल्यावर तितकाच प्रेम केले असते , तिचा स्वभावच मायाळू . इरा वर तर विशेष जीव तिचा . मी परदेशी गेलो तेव्हा म्हणाली होती
"आकाश, जायचे तर जा तुला , पण वर्ष भारत परत ये . मला , इराला आणी तुझ्या आई बाबा न पण तू हवा आहेस. तुझे मन शांत झाले कि ये. आणी फक्त इतकाच लक्षात ठेव कि माणूस परिस्थिती प्रमाणे वागतो. काही लोकांना थोडा जास्त स्वार्थ असतो, काही लोकांना कमी . पण म्हणून एकदम कुणालाच दोषी ठरवू नकोस . इराची काळजी मी आणी आई घेवूच . तू जा निवांत "
"ये रे आकाश"
आकाश भानावर आला
"हे काय, काका कुठे आहेत? "
"बाहेरगावी गेले आहेत, येतील २ दिवसात. मी गेले नाही. तुझी आई म्हणाली कि थांब, तेवढाच आधार "
"हो ते पण आहेच. तुझ्या इतके जवळच तिला कुणीच नाही"
"हो रे. पण खर सांगू इरा खूप समंजस आहे. तिने तुझ्या आईला खूप सावरलाय आणी बाबांना पण आणि हॉस्पिटल पण छान सांभाळते. कधी कधी तर तिचा कामाचा उरक आणी मन लावून काम करणे पहिले कि तुझ्या आजीची आणी काकाची आठवण येते मला. म्हणजे तुझे आई बाबा आणी मी असे एकत्र जितके करायचो न तितके हि एकटे करते जबाबदारिनी. सगळ्या सहकार्यांशी अगदी छान वागते . गर्व जसा नाहीच तिला. खर तर दुर्गम भागात जावून काम करायचे होते तिला पण नाही जावू शकली , पण आमचे कॅम्पस घायचे काम तिने सुरु ठेवलाय आणी वाढवले पण आहे. पैसे , प्रसिद्धी , यश या सगळ्याचे काही वाटत नाही तिला "
"मावशी हे मी का तुला सांगायला पाहिजे कि रक्तातच आहे तिच्या ते . खर सांगू मी गेल्या ५ वर्षात तुम्हा सगळ्यांशी बोलत होतो; आई, बाबा आणि इरा माझ्या जाण्यामुळे अधिक जवळ येत असले तर बरच आहे, हा विचार करून परत यायचाही टाळत होतो पण इकडे खर काय घडले होते काय माहित. "
"सुरवातीला त्रास झाला सगळ्यांनाच. तुझी आई तर , फारच अस्वस्थ होती. इरा , तिला नक्की काय झाले ते कळतच नव्हते न, तुझे आणि अनुचे असे काय बिनसले ते . तू तिला इतकाच सांगितलेस कि तुला परदेशी जायचं आणि तिला जायचे नाहीये , आणि त्यामुळे तुम्ही वेगळे होत आहात. तिला सुरवातीला पटतच नव्हते मग हळू हळू आम्ही तिला समजावले . तू पण तिच्याशी बोलतच होतास . मग हळू हळू ठीक झाले सगळे . "
"हो मला माहितीये , ती लग्नासाठी पण तयार नव्हती. म्हणून निमिषनि पण तिला लवकर विचारले नाही , थांबला तो. मग मीच बोललो तिच्याशी. खर सांगू का , मी जेव्हा गेलो तेव्हा फार काही ठरवले न्हवते स्वत:बद्दल "
"मग, आता ठरवले कि नाही ? आई तुझी विचारेल कि नाही माहिती नाही , पण मीच विचारते तुला हक्काने . "
"लग्नाबद्दल म्हणत असशील , तर खर सांगू का. पाच वर्ष पूर्वी काहीच ठरवले नव्हते. म्हणजे एक अनुभव कटू आला म्हणून ते नातच नाकारणे नाही पटत मला. मी ज्या वातावरणात , देशात वाढलो तिथे असलेले लग्न संस्थेचे आणि आयुष्याच्या जोडीदाराचे असलेले नाते मला माहितीय आणि मान्य सुद्धा आहे . आपल्या सुख दुखाच्या वाटेवर साथ देणारे कुणी तरी हवाच असते कि ग आपल्याला . मनमुराद एकटे जगायला पण एक पिंड लागतो आणि कदाचित माझा तो नव्हता . पहिले एक वर्षे असाच गेले , सेट होण्यात. मग हळू हळू मी रमलो अग . मी लग्न मुद्दामून टाळले नाही , पण फारसे कुणी आयष्यात डोकावले नाही आणि कुणी आले हि नाही तसे कि लग्न करावे "
"खरे आहे. आपण नाती लादून नाही घेवू शकत स्वतावर. आणि तुझी तयारी दिसली नाही म्हणून आई नि पण काही लक्ष नाही घातले तुझ्या "
"मावशी, पण आई नि कधी मोकळे पणाने मला विचारले सुद्धा नाही . मी एक दोन वेळा सुरवातीला म्हणालो सुद्धा कि तुम्ही कुणीतरी इकडे येवून जा . पण तेव्हा ते माझ्या वर थोडेसे चिडले होते. आईला तर असे वाटत होती कि तिला आणि अनुला जणू मी गुन्हेगार ठरवले आहे आणि हाच माझा अपराध आहे. मग त दरी वाढतच गेली, इच्छा नसताना. तरी इरा होती म्हणून एवढे तरी संबध राहिले नाही का "
"हो , पण इरा मुळेच हि दरी निर्माण झाली न आकाश ?"
"मावशी तू सुद्धा ?"
"नाही आकाश , मी सुद्धा असे म्हणू नकोस. जसा तू तशीच ती , माझ्या कडेच कधीच भेद भाव नव्हता . पण तुला असे नाही का वाटत कि थोडा पजेसिव आणि थोडा हळवा आहेस इरा बद्दल . म्हणजे अनु आणि तुझ्या आई च्या काही काही गोष्टी न पटण्यासारख्या होत्या. खर तर अनु ला इराची वाटणी नको होती , पण सुरवातीला असे नव्हते. तुझ्या आई सोबत सगळ्या गप्पा गोष्टी, बोलणी झाल्यावर तिच्या पण हे लक्षात आले कि , तुझ्या आई ला ती सहज तयार करू शकते, या गोष्टी साठी . म्हणजे ते घर इराचे राहिलाच असते, तिला प्रेम हि मिळाले असते . पण खास करून हॉस्पिटलमध्ये अनुला , तिच्या वरचढ कुणी नको होते आणि इरा निष्णात डॉक्टर होणार हे आरश्याइतके स्वच्छ होते . तुझ्या आईला हि असे वाटले कि आपल्या या वारशाची हक्कदार अनुच. खर तर तू , पण तू नाकरलास म्हणून तुझी बायको. इराच्या बाबतीत तुझ्या आई बाबांनी सगळी कर्तव्ये पार पडलीच असती, पण कदाचित कुठे तरी हि मुलगी आहे, लग्न झाले कि काय माहित कुठे जाईल किंवा तिला दुर्गम भागात काम करायचे होते , तुमचा तो वारसा इरानि चालवावा असे आई ला वाटत असेल कदाचित "
"तिला असे वाटत होते कि तिची तीव्र इच्छा होती तशी ?"
"आकाश, तुझ्या आई बद्दल तू असा विचार कसा करू शकतोस , इराची पण आई आहेच कि ती . पण मुला बद्दल कदाचित थोडी जास्त माया, किंवा मोह वाटत असेल तिला . मुलगा आपल्या जवळ राहावा म्हणून सुनेला असे अडकवून ठेवायचे होते तिला इतकाच "
"तुला पण असे वाटतय का ग कि माझे जर अतीच झाले ? आणि तू म्हणालीस न कि मी हळवा आहे , आहेच मी पण सगळ्यांच्या बाबतीत आहे न , खर सांग मावशी कळायला लागल्यापासून , कधी तरी तुला मुल नाही याची हौस मौज मारू दिली का ग मी? मग तुझ्या बाबतीत मी हळवा झालो तर चालते कि तुला आणि आईला . मग इरा तर बहिण आहे माझी आणि मी possessive नाही तिच्या बद्दल पण protective नक्कीच आहे बद्दल . आणि अग सगळ्या गोष्टी मागे काही करणे असतात, परिस्थिती असते . आई बाबा तसे कायम व्यस्त होते , आजी कर्तृत्वान खरी, पण आम्हा मुलासाठी तिनी वेळ दिला . आईला हॉस्पिटल मधेच काम करायला आवडायचे, पण बाबा आणि आजी साठी तिला कॅम्पस आणि बाकी सामाजिक कार्यात भाग घायला लागायचा. इरा कुटुंबात आली आणि मला खूप आनंद झाला , इवलीशी छोटीशी इरा , तिच्या सोबत माझा वेळ मस्त जायचा. मला मित्र होते , पण तरी घरातला एकटेपणा मात्र इरा नीच दूर केला आणि मला हळू हळू आवडायला लागले तिची बारीक सारीक जबाबदारी घायला. शाळेत सुद्धा मी तिच्या बालवाडीच्या वर्गात हळूच डोकावून यायचो आणि तिला सुद्धा प्रत्येक बाबतीत मी हवाच असायचो. आणि मग वयाच्या एका अश्या टप्प्यावर , जेव्हा मी धड मोठा पण नव्हतो आणि छोटा पण, अश्या काही गोष्टी घडल्या कि मला इरा बद्दल जास्तच काळजी आणि
जबाबदरी वाटायला लागली मला. काही काही माणसांशी आपले ऋणानुबंध परमेश्वरानीच जोडून दिलेले असतात. सगळ्याच भावा-बहिणीचे नाते आमच्या सारखे असतील असे नाही; पण म्हणून आमचे नाते नाकारता कसे येयील. माझी फक्त इतकीच अपेक्षा होती कि इरा कोणत्याच बाबतीत डावलली जावू नये . माझ्या जोडीदाराने, माझ्या गुण दोष सकट आणि माझ्या बहिणीसह माझा स्वीकार करावा . समजा इराचे आई वडील हयात नसते तर , हीच जबाबदारी घेतली नसती का ग ?"
"पटतय मला आकाश. कदाचित पाच वर्षापूर्वी जे घडले ते चांगल्यासाठीच असेल . आणि तेव्हा तुझे पण वय काय फार मोठे नव्हते. आम्ही मोठ्या लोकांनी जरा समजून घायला हवे होते. तुला २ वर्षात परत आणायला हवे होते आणि इरा ला पण या आधी लग्ना बद्दल विचारायाले हवे होते. नात्यामध्ये दुरावा येत राहतो कारण सगळेच आपल्या भूमिकेव ठाम राहतात . पण खर सांगू आकाश तुला , आम्हा मोठ्या माणसाना , पालकांना तुम्ही मुलांनी पण माफ करायला शिकले पाहिजे. आम्ही पण माणूसच आहोत . आम्हाला पण चुका करण्याची मुभा आहेच कि आणि आमच्या पिढीला , हि जी तू स्पेस नावाची concept आहे न , ती वयाच्या चाळीशी नंतर मिळाली आहे रे , त्यामुळे सुद्धा कदाचित आमचे असे झाले असेल कि आमच्या सुप्त इच्छा , महत्वाकांक्षा , त्या वयात उफाळून आल्या . ज्या गोष्टी तरुण असताना आम्ही नाकारू शकलो नाही त्याचा उद्रेक असेल बहुधा . आई बाबांना एक संधी दे आणि जर कधी चुकले असतील तर समजून घे इराचा जसा पालक आहेस न , तसाच त्यांचा हो. त्यांना त्याची गरज आहे आणि खर सांगू इरा हि जबादारी घेतीय , तिला काही अंशी मुक्त कर "
"मावशी...."
"हो आकाश, ऐक माझे , आमंत्रणाची वाट नको बघू. घरी जा. आणि किती पण अवघड वाटले तरी तसाच जा आणि राहा, पाच वर्ष पूर्वी सारखा . समज काही घडलेच नाही . तू नॉर्मल वागलास न कि सगळेच तसेच वागतील आणि पाहुणे आणि समाजाची तमा तू कधी पासून बाळगायला लागलास . लग्न मोडताना सुद्धा तू पर्वा केली नाही मग आता का ? का? आणि इरा साठी सुद्धा जा "
"तू म्हणतीयेस ते पटतंय मला. मी निमिष सोबत बोलतो, त्याचे आई बाबा पण यायचे आहेत राहायला आणि बरे झालो बोललो आपण. मला आता खूप मोकळे वाटतय . म्हणजे आई भेटेल न आता त्याचा ताण खूप कमी झालाय बघ आणि नाश्ता पण मस्त झालाय "
" हो रे, मला पण बरे वाटले बघ तू आलास आणि एक विचार कर , जर कुणी चांगली मुलगी , मैत्रीण असेल आणि आवडत असेल तर नक्की विचार कर . म्हणजे लग्न सर्व काही आणि आयुष्य तेच असे मी मानत नाही. पण शक्य असेल आणि मना सारखे जोडीदार मिळाला तर हे नाते पण स्वीकार , त्यात हि मझा आहे यार "
"मावशी, तुझे शेवटचे वाक्य सांगून गेले हा कि तू अलीकडेच परत तुज आहे तुजपाशी पारायण केलेस "
" आता कसे , माझा मुलगा वाटतोस , बरोब्बर ओळखलस तू :)"
"चल मी पळतो आता "
आकाश मावशीच्या घरातून निघाला. असे वाटले कि भरलेले आभाळ मोकळे झालाय , आकाश निरभ्र झालाय आणि सर पडून घेल्याने मृदगंध दरवळतोय. मनाची ती प्रसन्नता घेवून आकाशनि पुढचे पाऊल टाकायचे ठरवले
बेल वाजली , दार उघडले , आई नि … आई आणि निमिषाच्या घरात. आश्चर्याचा धक्काच होता , म्हणजे आई भेटली कि काय बोलायचे हे तो ठरवत होता आणि अनपेक्षित पणे तीच समोर .
"दादू , काय रे झाले का लाड करून घेवून. मावशीनी खूप कौतुकानी खायला घातले असेल "
"हो ग ", असे म्हणून आकाश आई कडे वळला, मावशीचे शब्द त्याच्या कानात घुमत होते
"आई , चहा करतेस. चहा पिवून , मी आवरतो मग लगेच बाहेर पडू "
"हो करते"- आई इतकच बोलली
"आई, मला पण आणि आले आणि चहाची पात घालून कर "- इरा
"पाहिलेस आकाश, तुझी बहिण आता मला चहा कसा करायचे ते सांगतीये आणि ते पण का , तुझ्या साठी ,तुला हवे तसा. मला आहे ठावूक ताई साहेब "- आई
"काय ग आई "
"बर, इरा , निमिष आणि आई तुम्ही तिघे इथे आहात तर मला काही तरी सांगायचे आहे तुम्हाला "
"काय?"-
इरा, निमिष आणि आई, तिघेहि एकदम बोलले आणि तेही काळजीच्या सुरात
बाप रे आता काय सांगेल? मी इथे आले म्हणून हा परत तर जाणार नाही न निघून , पण आपणहून बोलला आणि इरा साठी आलाय तर …आईच्या मनात भरभर प्रश्न येत गेले .
दादू आईशी बोलेल आपणहून असे वाटले नव्हते, पण नोर्मल वाटला मग वाढला पूर्वीची शांतता होती का ती ? असे इराला वाटले, आणि निमिष त्याला खर तर काही सुचतच नव्हते
आकाशनि पुढे बोलणे सुरु केले
"अरे मी काय न्यायाधीश आहे आणि शिक्षा सुनावणार आहे का?, असे चेहरे बनवायला. निमिष पण सॉरी मित्रा... "
"का रे ?"
" अरे काही नाही, मी उद्या सकाळी जायचे म्हणतोय "
"कुठे, अजून लग्नाला चांगले ८-१० दिवस आहेत कि आकाश आणि त्या साठी आलास न तू ?"- आई
"दादू ?"
"अरे पूर्ण ऐका तरी. आई मी उद्या सकाळी आवरून येतोत आपल्या घरी . दुपारी जेवयालो येतोय मी. मी तिकडे असेन तर मला जास्त मदत करता येयील आणि इराची पण धावपळ कमी होईल. आणि निमिषचे आई बाबा उद्या संध्यकाळ पर्यंत येत आहेत, म्हणजे त्याला पण कंपनी आहे आता . "
"आता काय बोलू मी, राहा म्हणालो तर , काकू कम सासूबाई चिडणार आणि होणारी बायको सुद्धा . आणि जा म्हणालो तर मित्र म्हणेल गरज सरो मित्र मरो "
"मला ठावूक आहे निमिष कि तुला त्रास होईल मी इथे न राहल्याने. म्हणजे इरा मला भेटायच्या निम्मित्ताने जास्त येवू शकणार नाही न "
"नको! तसे पण अति तिथे माती. लग्नाआधीच भांडण नको, तू आपला तिकडेच राहा "- निमिष
"ठरले तर मग. आई उद्या प्लीज गाडी पाठव सामान खूप आहे "
"हो पाठवेन,
हवे असेल तर बाबा पण येतील "
इरा खुशीत होती. तिला आपल्या भावाचे खूप कौतुक वाटले . किती छान सांभाळून घेतले त्याने , आता आई पण आनंदात आहे . दाखवणार नाही ती, स्वभावाच नाही तिचा . मी हट्टाला पेटले म्हणून इथे तरी आली .
"चला , मुलानो पटपट बाहेर पडू यात. निमिष तुझ्या आई बाबा न पण डायरेक्ट दुकानातच बोलाव . उरकून टाकू खरेदी. आणि निमिष तू आणि तुझा मित्र दोघांनी आज आटपा काय ते "
संथ पाणी वाहते झाले होते, अर्थात आरश्याइतके स्वछ नक्कीच नाही . आई आकाशच्या निर्णयबद्दल काहीच बोलली नाही. आकाशाला खरेदी करायला सुचवून, एक प्रकारे त्याच्या येण्याचे स्वागत केलेच होते तिने, पण घरी येण्याबद्दल ती मौनच होती. पण येवू नको असे हि नाही म्हणाली.
इरा खुशीत होती, आई गप्प होती, निमिष थोडा confuse होता कि आकाशाला जमेल का तिथे राहायला आणि आकाश,…… सगळ्या भावना मिसळून गेल्या होत्या , घरची ओढ , इरा सोबत त्या घरात राहण्यातली गम्मत , आई बाबा कसे स्वीकारतील आपले येणे, याचा थोडा तणाव , पण तरी त्याला छान वाटत होते . परीक्षे मध्ये पेपर चांगले गेले कि कसे निवांत वाटते, पण निकालाची हुरहूर राहतच न ते काही तरी
सगळे काही छान होईल, असे मनात ठेवूनच सगळे बाहेर पडले. पाच वर्षे म्हणजे एक पिढी नि काळ पुढे सरकला. वाटेत हॉस्पिटल लागले, आई म्हणाली दोन मिनटात येते, मग इरा पण सोबत गेली. आकाश नि सहज पहिले बाहेर तर मोफत उपचार विभागाचे नामकरण झाले होते, इरानी आजी आणि काकाच्या नावाने हा विभाग परत पुनर्जीवित केला होता. काकाची एक हलकीशी स्मृती त्याचे डोळे पाणावून गेली आणि आजीच्या मायेन डोळ्या दाटून आले , इतके कि त्याला मिटून घ्यावे लागले. तो स्वताशी म्हणाला, इरा नि तुमची स्मृती अशी जपली आणि मी … मी, तुमची स्मृती जपेन आयुष्यभर , माझ्या पद्धतीने
kramsh:
Comments
Post a Comment