प्रेमात रुसलेला तो आणि निशिगंध !!!(poem/kavita)

प्रेमात रुसलेला तो  आणि निशिगंध 



निशिगंध दरवळेल, माझ्या अस्तित्वाची जाणीव होईल 

पावसात चिंब ओला होशील, माझे पाणावलेले डोळे दिसतील

आकाशातून चंद्र खुणावेल, अन चांदण्याची शीतलता तुला आठवेल
 
कोसळणारा निर्झर पाहशील माझ्या मनमुक्त जगण्याचे क्षण भेटतील

सागर किनाऱ्यावर लाटा झेलत थांबला असशील, 

माझ्या आठवणीची अमृत धारा बरसल्याचा भास होईल
रात्री कूस बदलून डोळे मिटशील, 

पापण्यावर हळुवार रुंजी घालणारे माझे स्वप्न कसे दूर करशील
स्वप्नामधून अलगद डोळे उघडतील अन तुझा असे तू कितीसा उरशील
आता माझ्यावर रागावून गेलास तरी कुठे जाशील
आयुष्याचा प्रत्येक पावलांवर, मला तुझ्या सोबत पाहशील 

-शीतल जोशी

Comments