मैत्र : भाग ४


भाग -४ 


गंधाली  झोपली तरी, अभी अजून जागाच  होता. त्याच्या व्यवसायामुळे, अनेक प्रकारच्या समस्या त्याने पहिल्या  होत्या, माणसांची हि वेगवेगळ्या पद्धतीने ओळख होत होती. पण या   वेळी जर वेगळे होते.  त्याच्या अत्यंत प्रिय व्यक्तीच्या  जीवनाशी हि   हे सगळे निगडीत   होते . या सगळ्यातून, सोनाली सावरली तर आणि तरच गंधालीला समाधान मिळाले असते. किती हि व्यवसायिक तत्वे पाळायची म्हंटले, तरी तसे करणे आता  अवघड होते. त्याच्याच मनात खूप विचारांचा गदारोळ झाला होता. गंधाली  आणि अजयची मैत्री , इतकी जीवापाड, तरीही गंधालीने त्याला एका क्षणात दूर केले, म्हणजे हिच्या कडे  चुकीला माफी नाहीच कि काय? एकीकडे इतका जीव लावणारी, स्वताला   झोकून देणारी गंधाली आणि तितकीच कठोर पण . समजा  भविष्यात जर कधी, माझ्या कडून … नकळतच चूक झाली तर ,… तरी सुद्धा हि माफ नाही  का करणार ? एक संधी पण नाही देणार का हि ? काहीच सुचत नाहीये . गंधाली  या सगळ्या  घटनेमध्ये स्वताकडे इतका दोष का घेतीय ? केवळ ती अजयची चांगली मैत्रीण होती ;म्हणून ती हे सगळे टाळू शकली असते असे  थोडे  ना आहे. शेवटी - नवरा बायकोचे नाते, त्या दोघाशिवाय आणि कुणी समजून घेवू नाही शकत. कदाचित, अजय तिला इतका जवळचा असेल कि, त्याच्या चुकीच प्रायश्चित्त म्हणून  ती सोनालीला इतकी मदत करतीये. असे हि मैत्रीचे ऋण असू शकते का ? असे असेल तर  , मग गंधाली  किती हि कठोर वागली अजयशी , तरी त्याच्या  बद्दलचा भावनिक ओलावा अजून आहे तिच्या मनात.  
कधी कधी असे हि वाटते कि, अजयचे खरच सोनाली  वर प्रेम  होते कि, तो ठरवून प्रेमात पडला. म्हणजे घरातले प्रेशर, ताण या सगळ्यातून सुटका म्हणून. आणि ज्या काळात ते जास्त जवळ आले, तेव्हा गंधाली  पण नेमकी दूर होती, त्यामुळे त्याला त्या  प्रेमाची, आधाराची प्रकर्षाने गरज होती आणि सोनाली सारखी साधी, प्रेमळ मुलगी त्याच्या आयुष्यात होती, म्हणून…।   हा नात्यांचा गुंता झालाय. अजयचा स्वभाव, त्याचे घराचे वातावरण सगळे माहित असल्यानेच  गंधालीला. असे वाटत असेल का कि ती सोनाली ला वेळीच या सगळ्यातून बाहेर काढू शकली असती कि आणि काही?  बास, हे आणि असेच विचार. ते करत करतच अभी झोपला. 
आजचा दिवस, सगळ्यांसाठीच खास होता. सोनाली तर एकदम उत्साहात होती, खूप दिवसांनी तिला बाहेर जावसे वाटत होते. गंधालीच्या वागण्यात सहनुभितीचा लवलेश हि नव्हता, उलट खूप आपलेपणा  होता. खर तर सोनालीला हेच हवे होते. तिचे  आई बाबा तिच्या पाठीशी खंबीर पणे  उभे होतेच, पण त्या मायेला, काळजीची किनार होती , जे  गंधालीच्या  वागण्यात  नव्हते.  सोनालीला  सगळे व्यवस्थित होणारा आहे, असा विश्वास निर्माण होत होता. गंधालीने  ज्या प्रकारे, अजयला दूर केले होते आणि आज पर्यंत आपला निर्णय टिकवला होता त्याचे तिला खूप बरे वाटत होते. कसले तरी समाधान वाटत होते. अजयला  ओरडून संगवसे वाटत होते कि, तुझी सगळ्यात जवळची व्यक्ती आज माझ्यासोबत उभी  आहे, ते पण माझ्या साठी केवळ. तू माझ्या प्रेमाकडे पाठ फिरवलीस, आणि तुझ्याकडे तुझ्या निखळ निरागस मैत्रीने. मी तुझ्या प्रेमाला  पारखी झाले, पण तू मात्र पोरका झालास. आम्ही सगळेच जण, मी , तुझे आई बाबा, तुझी आत्ताची ….  सगळेच, तुझ्याशी नात्याने जोडले तरी, त्या नात्यांना अपेक्षा  होत्या, स्वार्थ होता. पण गंधाली , तिचे आणि त्याचे नाते, वेगळच होते. कोणत्याही अपेक्षा न ठेवता, कसलाही स्वार्थ नसताना जवळ आलेल्या दोन व्यक्ती. मैत्री तर होतीच, पण त्याही पेक्षा असे एक काही होते त्यांना जोडून ठेवणारे जे कदाचित कोणत्याच नात्याच्या  व्याखेत बसले नसते. केवळ स्त्री - पुरुष, म्हणून त्याला प्रेम म्हणणे हे त्यांच्या मैत्रीवर अन्याय करण्या सारखाच होते. कधी कधी, वय , लिंग , स्वभाव याच्या पलीकडे हि जावून मैत्री असते, जी नशिबाने मिळते लोकांना. मी जेव्हा अजयच्या आयुष्यात होते, तेव्हा मी ठरवले होते कि हि मैत्री टिकवायची. अजयला किती अमुल्य ठेवा मिळाला हे आहे, याची जाणीव मला होती. अशी मैत्री माझ्या आयुष्यात का नाही , असे वाटून मला हेवा वाटायचा त्यांचा. पण सगळीच गणिते चुकली. पण अजयनि मला तर गमावलच, पण गंधालीलासुद्धा. आज त्याला याची किंमत नसली तरी त्याला कधी  तरी कळेल. कदाचित त्याला  हे जाणवत असेल…  आज ती माझ्या बाजूने , माझ्या साठी उभी आहे, अजय जे समाधान मला आज मिळतंय न , तेच मला माझ्या आयुष्याचा आधार देणार आहे. तू हरलास अजय , तू हरलास. तुझी अत्यंत महत्वाची ठेव, आज माझ्याकडे आहे. कदाचित तुझ्या सारख्या व्यवहारी माणसाला, काय कळणार म्हणा. 
सोनालीला काय वाटले काय माहित, तिने अभिला  फोन केला 
"हेलो, डॉक्टर अभी, मी सोनाली बोलतीये. मला तुम्हाला भेटायचे आहे. मी येवू का तिकडे ?"
"असे कर न, लंचच्या  वेळेतच ये, मी मागवतो इथेच. म्हणजे   जेवण पण होईल आणि बोलणे पण"
"चालेल. आयडिया आवडली. वेळ नसताना पण तुम्ही मला वेळ दिलात. मी  येते"
अभीला हि सोनालीशी बोलायचे होतच. काही गोष्टी सोनाली कडूनच कळू शकल्या असत्या. त्याला एकदा वाटले कि गंधालीला पण बोलवावे, पण नकोच. तरी त्याने  गंधालीला  फोन केलाच, सांगायला कि सोनाली येणार आहे. गंधालीला न सांगताच कळते, तिनी फक्त  लंचला काय मागवायचे, एवढे सांगून फोन ठेवला, उद्देश इतकाच कि सोनाली चांगल्या मूड मध्ये बोलेल अभीशी आणि मग संध्याकाळी आपल्या सोबत. 
     
ठरल्या प्रमाणे सोनाली आली. 
"ये सोनाली.  बैस. जेवण आलच आहे, सुरवात करू यात आपण  "
"हो , आणि thanks , वेळ दिल्या बद्दल. मला काय माहित असे वाटले कि आता मी जे बोलू शकेंन ते अडचीत उद्या पर्व नाही बोलू शकणार, आणि मला संध्याकाळी गंधाली  सोबत छान वेळ घालवायचा आहे, मनात काही किल्मिष न ठेवता तिच्या सोबत वेळ घालवायचा आहे. आणि मला असे पण वाटतय कि तिनी मला मदत जरूर करावी, पण ।पन तिला  त्याचा मानसिक त्रास होवू नये आणि त्याची काळजी तुला आय मीन तुम्हाला   लागेल "
"ह, तू काय म्हणतीयेस ते समजतंय मला, आणि तू मला अरे तुरे   केलेस तरी हरकत नाही बर का ?"
"अभी, जेवत जेवत बोलू या, वाह मेनू मस्तच  आहे, माझ्या आवडीचा आहे, गंधाली  ने सांगितला का ? "
"हो. बरोबर ओळखलस"
"खर सांगू का, सुरवातीला आमची फक्त ओळख होती. म्हणजे तेव्हा मी आणि अजय हि फक्त मित्रच होतो एकमेकांचे. हुशार, स्मार्ट, नेमके बोलणारा, असा होता अजय, कुणीही त्याच्या प्रेमात पडणे अगदी सहजशक्य होते. पण तो माझ्या प्रेमात कसा काय पडला, काय माहित? त्याचे असे मित्र मैत्रिणी होते त्याला, पण सर्वात जवळची अशी गंधालीच होती. आता मागे वळून बघताना असे वाटते कि , गंधाली शिक्षणासाठी बाहेर गेली, आणि त्याला एका चांगल्या मित्राची जी गरज होती , एक पोकळी झाली ती भरून काढायला कुणीतरी हवे होते आणि कदाचित म्हणून, म्हणून आम्ही जास्त चांगले मित्र होवू शकलो. म्हणजे माझ्यात आणि गंधाली  मध्ये साम्य आहे असे अजिबात नाही , तिची त्याच्या आयुष्यात जी जागा आहे किंवा होती, ती कुणी हि घेवू शकेल असे मला आजही वाटत नाही. पण त्याला जो मैत्रीचा ओलावा हवा होता, तो कदाचित माझ्या सहवासात मिळत होता. पण आमचे नाते त्यांच्या नात्यासारखे निर्लेप नव्हते. आम्ही एकमेकांकडे आकर्षित झालो, एकमेकांकडून अपेक्षा करू लागलो, आणि नात्याला प्रेमाचे नाव देवून टाकले. काय माहित खर प्रेम काय असते ते, त्यावेळी मात्र आम्हाला वाटले कि आम्ही प्रेमात आहोत. एकमेकांसोबत मोठे होण्याची स्वप्ने आम्ही पाहत होतो, आयुष्य सोबत जगावे असे वाटले, म्हणजे प्रेम अशी माझी सरळ सोपी व्याख्या होती. अजयची स्वताची अशी आयुष्यात काय स्वप्ने आहेत, त्याच्या घरच्यांची त्याच्याकडून असलेल्या काय अपेक्षा आहेत, त्याच्या माझ्या कुटुंब व्यवस्थेत, राहणीमान यात असलेला फरक  याचा फारसा विचार मी नाही केला आणि त्याने हि काही विचार नाही केला. विचार करून प्रेम थोडीच करता येत? असा त्यावेळी वाटायचे आम्हाला. आपण एकत्र असू तर, एकमेकांना सांभाळून घेवू आणि पुढे जावू याच्यावर माझा ठाम विश्वास होता आणि अजयही मला कधीच साशंक नाही वाटला या बाबतीत. अर्थात, गंधाली ला यातले विशेष काही माहिती नव्हते सुरवातीला. कारण ती घरी आली असली कि, अजय तिच्यासोबत असायचा, तिला भेटायला जायचा. मी पण कधी कधी असायचे. त्या दोघांच्या मैत्रीचा वेळ मी कधीच काधूब घेतला नाही. अजयच्या व्यक्तिमत्वावर, तिचा बऱ्यापैकी  पगडा आहे असे मला नेहमी वाटायचे. तिचा मनमोकळा स्वभाव, तत्वनिष्ठ विचार, स्वताला झोकून देण्याची वृत्ती, सहज साधे पणा,  हे सगळे  आवडायचे त्याला. कदाचित म्हणुनच त्या काळात अजय त्याच्या मूळ  स्वभाव पेक्षा थोडा वेगळा वागत होता. म्हणजे तो वाईट होता कि चांगला अशी परिमाणे मला लावायची नाहीयेत, पण गंधाली  मुळे, नात्यांचा अर्थ त्याला कळायला लागला होता, एखाद्यावर निस्वार्थी पणे , कसलीही अपेक्षा न धरता,  जीव लावता येतो हे गंधाली ने त्याला दाखवून दिले होते, काहीही न बोलता. छान मैत्री होती त्यांची आणि म्हणूनच मी ठरवले होते कि शेवट पर्यंत हि मैत्री मी जपेन. त्यांना त्यांची स्पेस कायम देईन. "
"मग गंधाली ला कसे कळले तुमच्या बद्दल?"
"अरे, तिला अंदाज आलाच होता; पण तिनी अजयला कधीच नाही विचरले. एकदा मला सहज भेटली अशीच वाटेत, मला म्हणाली चल  जर टीपी  करू, चाट, भेल असे काही तरी खावू आणि गप्पा मारू. इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर अर्थातच अजय बद्दल बोलणे सुरु झाले, आणि काय माहित पहिल्या १० मी, मधेच मला सरळ विचारले कि तुम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडला आहात का? खर तर विचारणार नव्हते, पण राहवले नाही. मग मी हो म्हणाले. मस्त हसली मग, मला म्हणाली चांगला मुलगा आहे अजय, हुशार आहे. पण विचार पक्का असेल तर लपवू नका, घरी सांगून टाका. तसाही अजून एखाद्या वर्षात सी ए पण पूर्ण होईल तुमचे. मला इतके पण म्हणाली कि करियर वर लक्ष दे, तू अजय पेक्षा जास्त हुशार आहेस, याचा विसर पडू देवू नकोस. तुझे  हे लक्षात ठेवणच तुमच्या नात्याला पुढे घेवून जावू शकेल. पण काय माहित, ती परत परत हेच सांगत होती कि मी माझ्या आईवडिलांना  सांगावे आणि अजय पाशी हि तसाच आग्रह धरावा"
"सोनाली, तुला माहितीये न ती तशी स्पष्ट आहे आणि आता तुला लक्षात येत असेल कि ती असे का म्हणत होती, कदाचित, तुमच्या दोघान पैकी कुणाच्या हि घराचा विरोध असेल तर, तुम्हाला सुरवाती पासून त्याची कल्पना यावी म्हणून असेल. अजयच्या घरचे वातावरण हि कदाचित तिला चांगल्या पद्धतीने माहिती होते, म्हणून असेल कदाचित …"
"खरे आहे . अजयच्या मोठ्या भावाने त्याच्या मनाप्रमाणे करियर निवडले आणि आयुष्याचा जोडीदार हि, त्यामुळे जायच्या घराचे वातावरण तसे बदलले होते. सगळ्या अपेक्षा अजय कडून होत्या. त्याने सी ए  होवून घरातला व्यवसाय  सांभाळावा आणि घरच्यांच्या इतरही इच्छांचा  मन राखावा अशी सगळ्यांची अपेक्षा होती. तो एक उत्तम चित्रकार असून हि,  त्याच्या घरी , विशेषत: त्याच्या आईनी हि काळजी घेतली होती, कि चित्रकला हि केवळ त्याची आवड आणि छंद या पुरतीच मर्यादित राहावी. मला मात्र खूप वेळा जाणवायचे, कि तो हुशार आहे, सी ए होवू शकतो, पण त्याचे खरे करियर ते नाहीये. मी तर ठरवले सुद्धा होते कि, लग्न झाले न आणि सेट झालो थोडे कि अर्थार्जन आपण करायचे आणि अजय ला त्याची चित्रकला करू द्यायची. मी हे गुपित फक्त  गंधालीला  सांगितले होते, मला आठवतंय, तिनी माझा हात घट्ट धरला आणि म्हणाली, तुला कळायला लागलाय तो. पण एक लक्षात ठेव, तुला नेहमी खंबीर पणे  निर्णय  घावे लागतील. निर्णय आणि त्याची जबाबदारी हे दोन्ही  घेणे जमणार नाही त्याला, म्हणजे त्याच्या स्वभावात नाही ते, त्या बाबतीत मात्र तो हाताचा राखून आहे. मलाही हे ठावूक होते डॉक्टर , पण ज्या काही गोष्टींकडे मी प्रेमाखातर मी दुर्लक्ष करत होते, त्याचे काही गोष्टींची जाणीव, मला या मुलीनी किती तरी वेळा करून दिली होती. अजयची खरी मैत्रीण होती ती, आणि आता तर मला असे वाटतय कि खर तर माझीच मैत्रीण होती ती. तिच्या या सगळ्या गोष्टीना काही संदर्भ होते. मालाचा कदाचित कळले नसावेत. "
"जास्त विचार नको करू सोनाली. काही घटना घडतात, सुसंगत - विसंगत. त्यातून बाहेर पडून पुढे जाता आले पाहिजे. मानवी मन आणि नातेसंबध याबद्दल आग काही ठोकताळे नसतात, दोन आणि  दोन  चार, असे गणित नाही मांडता येत आणि मांडायचे पण नसते. अग, गंधाली केवळ तुला अजयच्या स्वभावाची कल्पना देत होती, जेणे करून तुमच्या नात्यामध्ये काय तडजोडी करायच्या ते तुला कळेल. आणि कदाचित ती अजयला हि सांगत असेल असाच काही. तू आता खूप उलट सुलट विचार नको करू "
"कळतंय मला. तुमचे हि बरोबर आहे. जे घडायचे ते घडून गेले आहे. मला माहितीये तुमच्याकडे आता जास्त वेळ नाहीये. पण अजून १५ मिनिट हवीयेत मला. खर तर मला हे तुम्हाला सांगायचे आहे कि, मला न गंधाली  भेटल्या पासून बरे वाटतंय, इतक्या वर्षात असे कधीच नाही वाटले. खर तर मला अजयचा राग हि येत होता; पण त्याच्या बद्दलचे प्रेम पूर्णपणे मनातून जातही नव्हते अश्या कात्रीत असतानाच, मला आज कसलातरी असुरी आनंद  होतंय. अजयच्या आयुष्यात असलेली सगळ्यात महत्वाची व्यक्ती आणि  त्याचे सगळ्यात मौल्यवान असलेले नाते, आज त्याचा जवळ नाही तर माझ्या बाजूनि उभे आहे. ते पण त्याच्या विरोधात. मला माहितीये, कि आज त्याला कदाचित त्याचे काहीही वाटत नसले तरी, मनाच्या एक कोपऱ्यात गंधाली  आणि त्याची मैत्री कायम असेल, त्याने काय गमावले आहे त्याची जाणीव त्याला नक्की आहे. त्याला आयुष्याचा जोडीदार, जरी मिळाला  असला तरी त्यामुळे माझी जागा कदाचित भरून निघेल; पण तिची नाही. डॉक्टर , असे म्हणतात न कि ज्याच्या वर आपले प्रेम असते, त्याच्या बद्दल असा विचार करू नये, पण मला मात्र……. म्हणजे मी वाईट आहे का ? गोंधळ उडाला आहे सगळा"
"सोनाली, शांत हो. आपल्याला एखादी गोष्ट वाटणे, मनात काही विचार येणे, हे स्वाभाविक आहे. चांगले वाईट अश्या फुटपट्ट्या  लगेच लावू नको त्याला. गंधाली सोबत तुला छान वाटते आहे न. मग बाकी सारे विसरून, तू हि नव्याने सुरु झालेली मैत्री स्वीकार. अजय तुमचा भूतकाळ होता. तो आज या नात्यामध्ये आणू  नकोस. याच काय पण पुढच्या कोणत्याच नात्यामध्ये आणू  नकोस. मला मान्य आहे कि काही काळ तुम्ही एकमेकांवर खूप प्रेम केलेही असेल; पण आज जी माणसे  तुझ्यावर जीव लावत आहेत, त्यांना हि तुला न्याय द्यावाच लागेल. तुझ्या मनात असेलेले प्रेम, माया तू जेव्हा या बाकीच्या नात्यात देशील ना, तेव्हा अजय बद्दलच्या सगळ्या चांगल्या वाईट भावनाचा  निचरा होईल अपोआप . आणि त्याच्या साठी जे करायचे ते तू योग्य वेळी केले आहेस, प्रेयसी , बायको म्हणून आणि मैत्रीण म्हणून हि. त्याच्या कलेसाठी, तू स्वतामधला कलाकार बाजूला ठेवायला निघाली होतीस ना . लक्षात ठेव, आपले प्रेम सिद्ध करायला काही करावे लागत नाही, सिद्ध करायला लावते ते कसले प्रेम. तुला त्याच्या बद्दल ज्या ज्या वेळी जे जे  वाटले ते ते प्रामाणिक होते. प्रेम , राग … आणि एक सांगू तू आणि गंधाली  त्याचा राग करता द्वेष नाही. काळजी करू नको , तू चांगली  व्यक्ती आहेस. आराम कर आणि संध्याकाळी बघ तुझी मैत्रीण कसे काम करते ते. जेणे दस्त फाडून टाका, नवीन  कागदावर, नवीन रेखाटन. आज थांबू आपण इथे. परवा दिवशी भेटूच. औषधे घेत राहा"
"हो डॉक्टर. आणि धन्यवाद, वेळ आणि जेवण दोन्ही साठी. आता छान वाटतय. कमीत कमी घराबाहेर पडावे असे वाटतंय हे हि काय कमी नाही"
सोनाली निघून गेली. बराच काही बोलून गेली. अभी ला माहित होते कि अजून हि बराच सांगण्या सारखे तिच्या कडे आहे. पण खर तर, अजय नि तिच्या फारकत घेतली हेच काय त्यातले गमक. कशी घेतली, नेमके काय झाले, हे हि महत्वाचे आहेच. पण आता तरी तिला हळू हळू नॉर्मल वर आणणे महत्वाचे आहे. आणि खर तर गंधाली  ची यात खूप मदत होतीये, वेगवेगळ्या कारणांनी  या डोंघी हि अजय कडून दुखावल्या गेल्या आहेत. सोनालीच्या सांगण्यावरून, आता लक्षात येतेय कि अजयशी नाते तोडणे गंधाली  साठी हि किती अवघड होते. असे वाटेल कि , मैत्री  तशी हि टिकली नाही तर काय बिघडते.  आपापल्या  संसारात रमले कि सारेच मित्र मैत्रिणी कायम एकत्र राहतील असे कुठे आहे . काही विसरतात, काही धुमकेतू सारखे आणि काही नवीन जोडले जातात कि. पण गंधाली, सोनाली भेटल्या पासून इतकी बेचैन  का आहे, ते आता कळतंय मला. पानिताक्या जवळच्या मित्राला तिने एखादी संधी दिली नसेल का त्याची हि बाजू मांडायला? त्याची हि काही करणे होती का? सोनाली आणि अजयनि , जे नाते गडबडीने जोडले ते तितक्याच गडबडीत तोडले  कि काय? याची उत्तरे कुणाकडे असतील? गंधाली  कडे, सोनाली कडे कि अजय कडे?
स्वताच्या शेवटच्या शक्यतेवर, अभिलाच धक्का बसला. अजयला भेटणे शक्यच नव्हते आणि गंधाली  आहे म्हणून आपण इतक्या व्यक्तिगत पातळीवर  विचार करतोय. अभीनि मनातले विचार दूर सारून, परत कमाल सुरवात केली.  आज तरी गंधाली  सोबत भेट शक्य नव्हते. त्यामुळे आता आजच्या पुरता हा विषय थांबवावा असे अभिला वाटले. पण तरीही त्याला असे हि वाटत होते कि नक्की काय करणे होती अजयकडे, सोनालीशी फारकत  घेताना ? गंधालीने  हि कारणे विचारली असतील का अजयला ? आणि विचारली असतील तर तिला अयोग्य वाटली म्हणून … मला माहित असलेली गंधाली  आणि अजयची मैत्रीण गंधाली  या दोघी वेगवेगळ्या आहेत का ? या घटने नंतर गंधाली  बदललेली आहे का ? एकदा विश्वासाला तडा गेला कि, परत नव्या व्यक्तीवरसुद्धा विश्वास टाकणे अवगःद असते, मग गंधाली आपल्यावर विश्वास ठेवेल का अगदी सहजतेने ? म्हणजे तिने विश्वास दाखवलं आहे, पण  माझी जबाबदारी आता जास्त वाढलीये तो सार्थ ठरवायची. अजयची जागा कदाचित कुणीच भरून काढणार नाही, पण माझ्या नात्यातला मैत्रीचा भाग जर अधिक जपला तर तिला पोचलेलि झळ  थोडी तरी कमी होईल!!!! माझ्या आणि तिच्या मैत्रीचा एक नवा अध्याय मी सुरु करेन . 

सोनाली  ठरल्याप्रमाणे, गंधालीच्या ऑफिस  पाहायला गेली. गंधालीनि आपली कामे उरकली होती. सगळा कारखाना तिने स्वत: फिरून, सोनालीला दाखवला आणि सोनालीनि पण सगळे व्यवस्थित पहिले. गंधालीनि, तिची अभिच्या वडिलांशी पण ओळख करून दिली.  त्यांचे इतरही व्यवसाय होते आणि गप्पा मस्तच रंगल्या विविध विषयावर!!!! पण शेवट सगळ्यात गोड झाला, अभिच्या वडिलांना एका चांगल्या सी ए ची गरज होतीच, त्यांच्या एक नव्या प्रकल्पासाठी आणि सोनाली ला चक्क त्यांनी, जॉईन  होण्यसाठी सांगितले. गंधाली  जरी या नव्या प्रकल्पाचा भाग नसली, तरी तिने सोनालीला हे स्वीकारायची गळ घातलीच. आणि तिनी सोनालीला हे सांगितले कि, सोनाली  ह्या जागे साठी पात्र आहे म्हणूनच तिला हे ऑफर केले आहे. अर्थात सोनाली सारखी पहिल्याचा प्रयत्नात, उत्तम पणे  यशस्वी होणारी आणि अनुभव असलेलि व्यक्ती या सगळ्या साठी पात्र होतीच. खरा तर गंधाली ला असे वाटत होते कि ती बाहेर पडेल,  कामात रमेल तर ती या सगळ्यातून लवकर रिकव्हर  होईल.  सोनालीला नाही म्हणण्याचे काही कराच नव्हते, कारण तशीही ती घरातूनच काम करत होती, त्यामुळे १ महिन्यात ती इकडे जॉईन  करू शकत होती  आणि तिला हि एक positive बदलाची गरज होतीच 
गांधालिनी मैत्रीखातर हि एक  केली असालि तरी, ती केवळ तिचे नाव सुचवण्या पुरतीच होती, कारण अभीचे बाबा व्यावसायिक होते, त्यामुळे त्यांनी गप्पा मारता मारताच सोनालीची मुलाखत घेतली होती आणि ती योग्य वाटली म्हणूनच तिला या संबंधी  विचारणा केली. सोनाली साठी एक नवे आयुष्य सुरु झाले होते हे मात्र नक्की. गंधाली आणि तिच्या मैत्रीची एक  सुरवात झाली होती. ज्या मैत्रीच्या आधारावर अजय खंबीरपणे कित्येक वर्षे उभा होता, तीच मैत्री आज सोनालीला  सावरत होती.   सोनाली आनंदांत घरी परतली आणि गंधाली समाधानात. रात्री हि बातमी अभीपर्यंत हि पोचली. सोनालीच्या ह्या केस मध्ये त्याला डॉक्टर म्हणून आपल्याला दुय्यम भूमिका आहे, ह्याची त्याला पूर्ण कल्पना  होती. दोन दुखावल्या गेलेल्या या मुलींचा या पुढचा प्रवास हा एकमेकांना सावरणारा असेल याची त्याला खात्री होती आणि  त्यात लागेल ती मदत तज्ञ म्हणून आणि मित्र म्हणून सुद्धा तो करणार होता. सुखाची रात्र उगवली होती , हो उगवली होती. 

दिवस सुरु झाला, गंधाली अभी आणि सोनाली सगळ्यांचाच. आज सोनालीचे आई बाबा अभिकडे येणार होते. अनेक गोष्टी नव्याने उलगडणार होत्या. अभिलाही त्यांना अनेक प्रश्न विचारायचे होते, त्यांच्या दृष्टीकोनातून. 
"नमस्कार डॉक्टर अभी…"
"नमस्कार, आपण मला अभी म्हणालात तरी चालेल. एक तर मला ते आवडते आणि आपल्याला बोलताना पण मोकळेपणा  वाटेल. काहीही हाताचे न राखता, तुम्ही मला सारे सांगला हि अपेक्षा आहे. यांनी मला आणि त्यामुळे सोनालीला मदत होणार आहे. "
"हो नक्की, आम्हालाही आमची मुलगी परत हवीये. तिचे निर्णय चुकले म्हणून आम्ही तिला वाऱ्यावर नाही सोडू शकत. सोनाली आमची मुलगी आहे म्हणून नाही सांगत, पब्न ती खरच एक हुशार आणि चांगली मुलगी आहे. आता जे ती आयुष्य जागतिये, त्यापेक्षा अधिक चांगल्या आयुष्यावर तिचा अधिकार आहे असे आम्हाला वाटते. म्हणूनच आम्ही तुमच्याकडे यायचे ठरवले. आता वाटतय कि जर उशीरच झाला. म्हणजे  सुरवातीचे १-१.५ वर्षे, ती अस्वस्थ होती, पण या सगळ्यातून ती बाहेर   येयील असे आम्हाला वाटले. म्हणजे त्या काळात तिला जो व्हायाचा तो त्रास झालाच, होणारच होता. आम्हालाही कळत होते, पण सोनाली काम करत होती, झगडत होती, आलेल्या परिस्थितीला शरण न जाता, ती संघर्ष करत होती. आनंदात राहण्याचा प्रयत्नही करत होती. पण मग हळूहळू ती कोशात गेली, तिला कशामधेच  रस वाटेना. तिच्या आवडीनिवडी, उत्साह, आनंद सगळच उणे होते तिच्या आयुष्यातून. उदास असायची, विशेष बाहेर यायची नाही. ती म्हणाली नोकरी सोडते आणि घरून काम करते. आम्ही त्याला संमती दिली. आम्हाला वाटले को होवू दे पोरीच्या मनासारखे. कंटाळलि असेल कदाचित, आणि घरी असेल तर आम्हालाही तिच्या मनाचा वेध घेत येयील. तिला हि जर बदलाची गरज होतिच. तिने चित्रकले साठी क्लास हि लावायचे ठरवले होते. आम्हालाही बरे वाटले. पण खरे सांगू का, आता वाटते कि आमचे चुकलच, ती हळू हळू स्वताला एका कोशात मिटवून घेतीये हे आम्ही विसरलो. ती कणखर आहे, हे गृहीत धरले. माया - प्रेम , आधार देत गेलो , काळजी केली पण कदचीत घेतली नाही. खरच, लक्षात नाही आलो हो. उशीर झाला खरा."
"हे बघा, असा विचार नका करो . कधी कधी या गोष्टी  घडतात, slow poisoning म्हणा हवे तर. दोष नका घेवू. उलट मला तुमचे कौतिक वाटतंय. तुम्ही तुअम्च्य मुलीच्या पाठीशी उभे राहिलात याचे.  तिचा निर्णय  मनाविरुद्ध होता , चुकला तरी तुम्ही जबाबदारी टाळली नाहीत आणि उशीर नाही झालाय अजिबात. तुम्ही योग्य वेळेला यीग्या निर्णय घेतला आहे. मानसोपचार तज्ञाकडे येणाच्या  तुमचं निर्णयाचे मी स्वागतच करतो. आज हि लोक असे करायला बिचकतात, गैरसमजामुळे. पण सोनाली साठी तुम्ही हे केलेत आणि खरे सांगू विश्वास ठेवा, आनंदी समाधानी होण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, आणि जर त्या साठी हे पाऊल  उचलावे लागले तर त्यात काही गैर नाही. आज तुम्ही सुद्धा माझ्या शी कदाचित एक त्रयस्थ म्हणून मोकळे  बोलू शकता. माझ्या कडे कसले पूर्व ग्रह नाहीत, मी कसलीही मत बनवणार नाही, याचा फायदा करून घेवून तुम्ही बोला "
"धन्यवाद, सोनाली आमची एकुलती एक मुलगी. आम्ही दोघे हि सुशिक्षित आहोत, नोकरीही करायचो. मध्यम वर्गीय कुटुंबात असतात,  तेच राहणीमान होते आमचे. एकंदरीत सोनालीचे बालपण हे सुखवस्तू होते. खूप श्रीमंत नसलो तरी आम्ही आनंदी आणि समाधानी होतो. सध्या सोप्या जगण्याची  जपत आम्ही सोनालीला मोठे केले. लहानपणापासूनच, ती हुशार होती. गणित आणि चित्रकला यामध्ये तिचे विशेष प्राविण्य होते. सोनालीची आई सी ए आहे, पण ती  कुटुंबाला वेळ देत येयील इतकीच कामे ती घेत असे, "
"हो, आणि हा माझा स्वताच निर्णय होता", सोनालीची आई सांगत होती, " म्हणजे सोनालीच्या बाबांची नोकरी बदलीची होती आणि मला  लग्नाच्या  वेळेस हि याची कल्पना होती. पण उलट मी असा विचार केला कि,  ज्या शहरात  सोनालीच्या बाबांची बदली होईल तिथे मी नोकरी करेन किंवा स्वताचे ऑफिस सुरु करेन, म्हणजे शिक्षणाचा हि उपयोग सुरु राहील. मी सध्या सुद्धा काम करतीये आणि सोनालीला म्हणूनच घरून काम करणे हि सोपे जातंय. सोनाली झाली आणि मग मी माझा व्याप थोडा कमी केला. काम सुरु होतेच, पण आमच्या दोघानाही तिच्यासोबत वेळ घालवायला आवडायचं, तास आम्ही ठरवलंच होते कि, हे आनंदाचे क्षण आपण उपभोगायचे. खर तर काम करत राहिलो असतो तर  अजून पैसा मिळाला असताही, पण  जेवढा मिळत होता त्यातही आमच्या गरज भागात होत्या आणि खर तर सोनाली   झाल्यावर , आम्हाला तो वेळहि मिळाला  आम्हाला, म्हणजे सोनाली जशी ११ वि ला गेली, तशी मी पूर्णवेळ काम करू लागले. सोनालीचे बालपण कसे होते त्याची कल्पना आलीच असेल. ती खूप छान चित्र काढायची, त्यामुळे तिने तेही करियर निवडले असते तरी आम्हाला चालले असते;पण तिला सी ए व्हायची इच्छा  होती. सोनाली तशी खूप बोलकी नाही, पण ओळख झाली कि मग ती मोकळी होते. ती  खूप भावूक, भावना प्रधान आहे. ह्यांची बदली व्हायची न, तेव्हा तिला ते शहर, घर , तिथली माणसे , तिची शाळा हे सगळे सोडताना तिला खूप वाईट वाटायचे; पण एक गोष्ट होती कि, नव्या ठिकाणी ती परत सगळे नवे विश्वास निर्माण करायची. पण हेही सांगावसे  वाटते कि तिने जुने ऋणानुबंध हि टिकवून ठेवले. अजूनही अनेक लोक आमच्याशी संपर्कात आहेत आणि यात तिचा खूप वाटा  आहे. तुम्हाल वाटत असेल कि, मी हे सगळे का सांगत आहे ? "
"नाही , असे काही नाही. तुम्ही सांगा न मला, व्यवस्थित सांगा. आपल्याकडे वेळ आहे हि आहे. आणि या सगळ्याची मला मदत होईल . सोनालीची मानसिकता कळली तर मला हि तिच्याशी बोलताना मदतच होईल"
  "तर, मी हे सगळे सांगत होते, कारण सोनाली किती भावनिक आहे हे मला सांगायचे होते. आई म्हणून नाही, पण एकूणच माझी मुलगी माणूस म्हणून कशी आहे, हे आज मागे वळून पाहताना मला जाणवत आहे. 
 तिने एकदा आपले मानले कि मानले, तिला भूतकाळ कधीच मागे टाकता आला नाही, तिने तो पकडून ठेवला; पण जोपर्यंत तो भूतकाळ आनंदी आठवणीचा होता, आम्हाला तिच्या या स्वभावाचे कौतुक वाटायचे, पण आता ….'
"मला तुम्ही सांगू शकाल का, अजय आणि तिची ओळख आणि नात्याबद्दल सांगू शकाल , अगदी सुरवाती पासून ते आता पर्यंत "
" हो सांगते. सोनाली ११वि ला असताना आम्ही त्या शहरात आलो, जिथे अजय राहत होता. त्याचे सगळे शिक्षण त्याच शहरात झाले होते. तसे छोटे शहर  होते ते, अजयचे वडील पण सी ए होते, त्या शहरात त्याचे बराच नाव होते,  यांचा व्याप मोठा होता, आजूबाजूच्या गावात आणि शहरात हि त्यांचे clients होते. तशी माझी त्यांची ओळख सी ए म्हणून एक दोन वेळा झाली होती. मी त्यांच्याच एक मित्राच्या फर्म मध्ये जॉईन केले होते, पार्टनर म्हणून. पण अर्थात विशेष काही ओळख नव्हती. पण एकंदरीत त्यांचे कुटुंब बरीच वर्षे त्या शहरात होते आणि उच्चभ्रू लोकांपैकी ते होते. अर्थात त्यांचे स्वताचे राहणीमान तसे साधे वाटले मला. सोनाली आणि अजयची ओळख कॉलेज  मध्ये झाली, त्यांचे क्लास हि एकाच होते. अजय हि सी ए करत होता. सोनालीला  आणि त्याला हि १० विला चांगले मार्क पडले होते, ती या शहरात नवी होती, सहज ओळख झाली आणि मैत्री हि. मुला मुलीनी मित्र असावे यात आम्हाला हरकत घेण्यासारखे  काहीच नव्हते. जुजबी ओळख, मैत्रीमध्ये रुपांतरीत झाली. दोघेही तसे स्वभावाने अंतरमुख. पण  खरे. अजय हि आमच्याकडे कधी तरी येत असे आणि सोनालीहि अधून मधून त्याच्याकडे जात असे, पण मला आठवतंय त्याप्रमाणे हे तसे १२ वि नंतरचे.  नंतरच्या वर्षामध्ये त्यांचे मुख्य ध्येय आणि अभ्यास सी ए हेच होते, चित्रकला हि त्यांच्यात एक अशी गोष्ट होती, जी त्यांना जोडून अधिक जवळ आणत होती. मला आठवतय कि कधी कधी अजय आमच्या कडे यायचा केवळ, कॅनवास वर रंग  खुलवयाला. अशी हि काही चित्र होती जी त्यांनी एकत्रपणे काढली होती. एखादे दुसरे असेल अजूनही माझ्या कडे, अर्थात ते सोनाली दिसणार नाही याची काळजी आम्ही घेत होतो. सोनाली आणि अजय मध्ये प्रेमाचे नाते आहे हे आम्हाला  विशेष लक्षात नाही आले. कारण तसे हि ते क्लास, अभ्यास इतकाच भेटत असत आणि सोनाली हि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून होती. ती साधारण शेवटच्या वर्षाला  असेल, तेव्हाच तिनी मला सांगितले कि, अजय नि तिला विचारले आहे. अर्थात नंतर मला हे कळले कि, त्या आधी एखादे वर्षे ते रिलेशन मध्ये होते. तिने सांगितले, तेव्हा मी तिला सांगितले कि यावर आपण नंतर बोलू, हे एवढे वर्ष होवू दे, महत्वाचे आहे. सी ए  हा  एकच बाकी राहील तुझा. मला वाटते आता थोडे बाजूला ठेवावे हे तुम्ही "
"मग, तिचे काय म्हणणे होते यावर ?आणि नेमकी हीच वेळ तिनी का निवडली? म्हणजे आधी एक वर्षापासून जर ते रिलेशन मध्ये होते तर, अजूनही थोडा वेळ का नाही थांबले?"
"बरोबर प्रश्न  विचारलात तुम्ही अभी. मी सांगतो, आम्हाला हे सोनालिनी येवून सांगितले, कारण गंधाली. हो तीच. ती अजयची जवळची  मैत्रीण होती. गोड मुलगी. ती शिकायला दुसऱ्या जवळच्या शहरात होती. अधून मधून येत असे तिच्या घरी. अर्थात तुम्हाला माहीतच आहे म्हणा गंधाली. गंधाली ला या रिलेशन बद्दल कधी कळले माहित नाही; पण ती सतत सोनाली आणि अजयच्या मागे लागली कि त्यांनी हे आपापल्या घरी सांगावे. तशी गांधली आधी हि २-४ वेळा आमच्या कडे येवून गेली होती. अत्यंत मोकळी आणि स्पष्ट. कदाचित म्हणूनच तिला हे आवडले नव्हते या दोघांनी आम्हाला काहीच सांगितले नाही आहे याबद्दल. आम्हाला वाटले कि सोनाली अगदी सुरवातीलाच आम्हाला सांगतीये. म्हणजे कदाचित अजयला ती आवडली असेल आणि तिला सुद्धा तो आवडत असेल, आणि या वयात हे असे वाटणे स्वाभाविक आहे. पण ते इतके गुंतले आहेत, त्यांनी त्यांचे नाते पक्के केले आहे याची कल्पनाच नव्हती आम्हाला. आम्हीही हेच गृहीत धरले कि सोनालीला आमचे पटले आहे. एवढे वर्ष पार पडू दे मग शांतपणे बोलू आपण. म्हणजे अजय चांगला मुलगा होता, पण तरी हि चांगले जोडीदार होण्यासाठी केवळ चांगली मैत्रीच लागते असे तर नाही ना. अजून हि  मुले लहान आहेत, तेव्हा या नात्याच्या शक्यता सोनालीला सांगाव्यात आणि मग तिने निर्णय  घ्यावा. पण हि पोर इतकी  अडकली आहे  त्याच्या प्रेमात हे आम्हाला माहित नव्हते आणि ती हि गप्प राहिली , ती नॉर्मल वागत होती; म्हणून मग आम्ही हि हा विषय तिथेच थांबवला. तिच्यावर  विश्वास ठेवला. अर्थात आमच्या हे नंतर लक्षात कि आले कि त्या आधीचे वर्ष सुद्धा ती नॉर्मलच वागत होती कि घरात. खर तर मुलांची काय चूक? आम्हीच चुकलो असे वाटतय मला. आम्ही तिला विचारायला हवे होते कि तिला काय वाटतंय त्याच्याबद्दल ? तिला आणि काही बोलायचे आहे का ? तिनी शिक्षण आधी पूर्ण करावे आणि मग या बद्दल आमच्याशी बोलावी हि आमची अपेक्षा आम्ही लादली तिच्यावर. आम्ही कधीच काही जबरदस्ती नाही केली तिच्यावर, तिलाही हे ठावूक होते. पण तरी तिनी हे सगळे सांगायला हवे होते तेव्हा. त्यामुळे , जे घडले ते बदलल असते असे नाही.पन आमचे तेवढाच समाधान कि पालक म्हणून आपण कमी नाही पडलो"
"असे काही नसतो हो, काका. तुम्हीच सांगा मला, त्यांचे वय तसाच होते. आई वडील किती हि मन मोकळे असले तरी, पटकन मित्र मैत्रिणीच जवळचे वाटतात नाही का ? पण तरी हि तुम्ही खूप समंजस पालक आहात असाच मी म्हणेन. अजयनि त्याच्या घरी कधी सांगितले हे ? त्याच्या आई  वडिलांशी तुमचे बोलणे झाले का कधी या विषयी ? आणि गंधाली  या सगळ्यात किती इन्वोल्व  होती, ती कधी बोलली होती का तुमच्या सोबत?. आजचा  वेळ तुमच्यासाठी राखून ठेवला आहे, त्यामुळे माझ्या खूप   प्रश्नाची उत्तरे मिळतील आणि कदाचित तुमच्या  मनातले हि काही प्रश्न  सुटतील. "
"खरतर हे  सगळे खूप वेळ घेणारे आहे. पण आम्ही सुद्धा इतक्या वर्षात इतके सारे कुणाशीच बोललो नाही आहे. मी आई म्हणून,  असे मला कित्येक दिवस वाटत होते. पण जे घडायचे ते घडून तर गेले. आज्यांनी त्याच्या घरी याची काहीच कल्पना दिली नव्हती. अर्थात त्याच्या घरी काही वेगळ्याच घटनांचे  पडसाद त्या  काळात उमटत होते. त्याच्या मोठ्या भावाने स्वतचे करियर तर निवडलेच,त्याला नाटकाची ,  क्षेत्राची आवड होती. आणि त्यातले पुढचे शिक्षण  घ्यायला तो लंडनला गेला, इथे राहिलो तर कदाचित सतत अडथळा येयील असे त्याला वाटले असावे. गेला तिकडे आणि संधीचे सोने केले त्यांनी. त्यांनी नंतर त्याचे त्याच क्षेत्रांमधले तांत्रिक  शिक्षण घेतले आणि आवड आणि शिक्षण याची   मोट  बांधली. घर्तले वातावरण जर त्याच्या बाजूनी होतंय असे वाटे पर्यंतच, त्याने त्याच्या प्रेयसी  बद्दल घरी सांगितले. अगदी स्पष्ट , मला आठवतंय कि गंधालीच एकदा म्हणाली होती कि त्याने पहिले घरी सांगितले होते , घरी मान्य नाही म्हंटल्याव, त्यांनी तिकडेच लग्न केले. या सगळ्यामुळे , कदाचित अजय या मनस्थिती मध्ये नसावा कि त्याने हे घरी सांगावे. घरातल्या सगळ्या अपेक्षा आता त्याच्याकडून होत्या  आणि आम्ही सुद्धा हे गृहीत धरले होते कि सोनालीनि अजून तिचा होकार कळवला नाहीये त्याला. गंधाली, मात्र त्यांचा पिच्छा  पुरवत होती, असे सोनाली कडूनच कळाले. ती तर सोनालीला हि सांगत होती कि अजयला, सरळ सांग  कि आधी तू तुझ्या घरी सांग. मला असे वाटतय कि तिला साधारण सगळ्याचा अंदाज असावा. कारण यांचे वर्षे संपत असतना  ती एकदा घरी आली. सोनाली घरी नव्हती. पण दुरून आली होती, उन्हाची म्हणून मीच तिला म्हणाले कि बस थोड्या वेळ. मग गप्पा सुरु झाल्या, आणि बोलताना मी सहज विचारले कि अजय काय म्हणतोय, भेटलीस कि नाही. असे करत विषय अजय बद्दल आला आणि ती म्हणाली कि अजय नाही भेटलाय अजून, त्याच्या आजोबांच्या गावी गेलाय. आणि मग तिनीच विषय काढला. मला म्हणाली कि काकू सोनालीचा काय प्लान आहे आता, ती काही बोलली का तुम्हाला? खर तर स्पष्टच विचारते कि अजय बद्दल तिला काय वाटतय हे तिनी तुम्हाला सांगितले आहे ना!!!. मी म्हणाले कि हो, तिनी सांगितले आहे. तिचे असे म्हणणे होती कि आम्ही अजयला सांगावे कि त्याने त्याच्या आई बाबाना याची कल्पना द्यावी. मी म्हणाले तिला कि आग अजून कशात काही नाही आणि मग …. "
"मग, गंधाली काय म्हणाली पुढे ?"
"ती जास्त बोलली नाही, पण इतकाच म्हणाली, गैरसमज नका करून घेवू , पण मला वाटते कि ते दोघे खूप गुंतले आहेत आणि आता माघारी फिरणार नाहीत. अजयच्या घरी माझे लहानपणा पासून संबंध आहेत. त्याच्या आईला हि लपवालपवी आवडणार नाही. उगाच काही वेगळे वळण नको लागायला. अजय चांगला मुलगा आहे; पण वेगेल वातावरण आहे त्याच्या घरी. त्याच्या कडून खूप अपेक्षा आहेत, त्यांच्या. एक तर त्याने आयुष्यभर याच शहरात राहावे, त्यांचा व्यवसाय  सांभाळावे हे तर आहेच; पण थोडे पारंपारिक वातावरण आहे घरी. तेव्हा सारे काही रीतसर झालेलेच आवडेल त्यांना. आणि सोनालीला हि कायमपणे इथेच  राहावे लागेल. एवढ्या साठी तुम्हाला सांगते कि त्या दोघांना हे सारे सांगून झालाय ; पण … इथे राहायचे म्हणजे, करियर सुद्धा इथेच करावे लागेल तिला, ते पण घरच्यांचा अपेक्षा सांभाळून. दुसरे म्हणजे असे आहे, थोडे वेगळे वातावरण अश्यासाठी कि एकदम शिस्तबद्ध आयुष्य, घराणे , परंपरा याचे फारच भान आहे त्यांना. व्यवहारदक्ष आहेत, अगदी अजयसुद्धा. आणि सगळ्यात महत्वाचे सोनाली, अजय पेक्षा हुशा, तल्लख आहे. कदाचित ती त्यांचा व्यवसाय अधिक भरभराटीला आणेलहि; पण ते अजयला आणि त्याच्या आई ला कितपत मानवेल हे माहित नाही. गंधाली  खूप वेळ बोलत होती , एखद्या मोठ्या माणसासारखे तिचे विचार ऐकून मी हि चक्रावले. एकीकडे ती अजयला आणि त्याच्या घरच्यांना चांगले म्हणत होती ; पण सोनालीचे तिथे कितपत जमेल किंवा जमायचे तर किती तडजोडी कराव्या लागतील याचा अंदाज तिला आला होता. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, अजयच्या घराचे लोक हे नाते  स्वीकारातिल कि नाही, याचा हि तिला अंदाज होताच. मला म्हणाली कि अजय माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे आणि सोनाली हि मला खूप आवडते; म्हणूनच त्यांनी डोळस पणे  जगावे असे मला वाटतय. असे काहीही घडू नये ज्यातून दोघांना केवळ आणि केवळ मनस्ताप मिळेल. जर अजयनि, आताच घरी कल्पना दिली तर तुम्ही लोकही आपसात बोलू शकाल आणि गोष्टी मार्गाला लागतील. अभी, खरे सांगू का, इतक्या मोठ्या घरात मुलगी द्यायला माझाही जीव दडपला होता, गांधलीचा शब्द न शब्द खरा आणि प्रामाणिक होता. अजय आणि सोनाली बद्दलची तळमळ  मला त्यातून जाणवली. अजय खरच भाग्यवान होता कि त्याला अशी मैत्रीण होती, जी त्याला ओळखत होती, काय चांगले काय वाईट  याचे भान तिला होते. ती अजयच्या आईला हे सारे सांगू शकली असती, पण वातावरण पाहता, आपण हे केले तर गोष्टी बिन्सातील म्हणून तिने माझ्याकडे यायचे धाडस आणि शहाणपण दाखवले होते. राग मानू नका, पण इतकी  समजूतदार मुलगी समोर असताना अजयच्या घरच्यांनीआणि अजयनि  हिच विचार केला नसेल का ? असे क्षणभर वाटले मला आणि मग माझ्या नंतर लक्षात आले कि, हि मुलगी त्यांना झेपणारी नाहीच आहे मुळी आणि एकीकडे असेही वाटले कि माझी मुलगी तरी स्वीकारतील का ते ? पण अगदी क्षणभरच ह, असे वाटले मला कारण तिचे मन इतके  स्वच्छ होते न कि, जाता जाता मला तिने २ गोष्टी सांगितल्या , एक तर अजयच्या आईला अजयने त्यांचे सारे ऐकावे असे वाटतंय आणि तिला तोलामोलाचे स्थळ हवे आहे आणि सून, कदाचित मुलाच्या वरचढ असेल तर तिला फारसे आवडणार नाही; पण अजय वर तिचे खूप प्रेम आहे, आणि तिला स्पष्ट बोललेले आवडते. त्यामुळे वेळेवर जर तिला गोष्टी कळल्या, तर ती योग्य तऱ्हेने  हे सारे स्वीकारेल आणि एकदा का तिने स्वीकारले, मग काळजी करण्याचे काही कारण नाही इतके करेल ती या दोघांचे. पण मी सोनालीशी  बोलवे, तिला कराव्या लागणाऱ्या तडजोडी बद्दल कल्पना द्यावी, अजयला घरी सांगायला भाग पडावे आणि जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर आम्ही पण त्याचसोबत बोलून घ्यावे. "
"खर सांगू का, डॉक्टर म्हणून किंवा अभी म्हणून, पण गंधालीला वाटतंय कि ती थोडे हातचे राखून बोलली. म्हणजे तिचा मला असे म्हणत होती "
"नाही हो, त्या पोरींने तिच्या वयाला साजेसे किंवा त्यापेक्षा अधिकच  समंजसपणा  दाखवला होता. मला इतके सुद्धा म्हणाला, कि माझा यात काही स्वार्थ नाही, मी आणि अजय केवळ मित्र आहोत. पण सोनाली आणि त्यांनी जर एकत्र यायचे  ठरवले तर ते सुखाचे होवो. तो दुखवला गेला तर मला खूप वाईट तर वाटेलच, पण त्याच्यामुळे, माझ्या मित्रामुळे , सोनाली सारखी मुलगी दुखावली गेली तर मला अधिक वाईट वाटेल. तिला सांगा कि तिनी काहीहि गिल्ट  बाळगू नये. आई वडील म्हणून आम्हीही थोडे कमी पडलोच कि. " 
 " मी सांगेन तिला . मग तुम्ही अजयच्या आई वडिलांना कधी भेटलात?"
"सोनाली सी ए झाल्या नंतर. गांधालीची माझे बोलणे त्यानंतर साधारण ७-८महिन्यांनी. अजयला अजून एक ग्रुप द्यावा लागणार होता, पण सोनाली सी ए झाली होती. मधल्या काळात आम्ही एक दोन वेळा अजाशी आणि तिच्याशी बोललो होतो. अजय म्हणाली कि मी परीक्षा झाल्यावर सांगेन घरी, तोपर्यंत आम्ही भेटणार नाही विशेष, अभ्यासाचे दिवस पण होते. मग आम्ही पण थांबलो.पण त्याने नंतर हि घरी काही सांगितले नाही आणि परीक्षा संपली म्हणून यांच्या गाठी भेटी वाढत होत्या. सोनालीला  जॉब  मिळाला तर ती शहर सोडायलाही तयार नव्हती. मग आम्हाला सिरियस वाटले, मुले सतत सहवासात राहणार, तर आता आपण पालक म्हणून यात लक्ष घालावे म्हणून आम्ही अजयला सांगितले कि आम्हाला त्याच्या आई बाबांना  भेटायचे आहे. त्याने घरी याची कल्पना द्यावी . त्याचा काळात त्याचा दादासुद्धा येवून गेला, त्याच्या घर्तले वातावरण तसे बरे असावे. आम्ही जाणारच असा फोर्स केल्यावर त्याने त्याच दिवशी सकाळी आईला सांगितले. मी फोन केला, तेव्हा व्यवस्थित बोलल्या आणि या  म्हणल्या; पण मुले नकोन आपणच बोलू असे त्यांचे म्हणणे होते. आम्ही पण मान्य केले. भेटलो आम्ही. इकडचे तिकडचे जास्त न बोलता , मी त्यांना सरळच विचारली कि अजयनि  पूर्ण कल्पना दिली आहे का त्यांना. तर त्या म्हणल्या आजच सकाळी सांगितले कि, त्याला सोनाली आवडते आणि तिच्याशी लग्न करायची इच्छा  आहे. आम्ही  मुळे बहुधा त्यांचा असा समाज झाला कि आम्हाला खूप आधी पासून माहित होते आणि आम्ही त्यांना काही सांगितले नाही , जणू आम्ही मान्यच केले होते. मी त्यांना कल्पना दिली कि, सुरवातीला सोनालिनी सांगितले तेव्हा आम्ही आमच्या मुलीला सांगितली होते कि आता काही नाही , आधी शिक्षण मग बोलू आणि आता रिझल्ट  लागल्यावर आम्ही अजयला सांगितले कि तू  आधी घरी सांग मग आम्ही मोठे लोक बोलू काय ते. त्यांचे असे म्हणणे होते कि, अजयचे अजून सी ए पूर्ण झाले नाहीये, तोपर्यंत आम्ही काही विचार नाही करणार आहोत. आम्ही अजय सोबत बोलू, तुम्ही तुअम्च्य मुलीला समजावा. "
"समजावा म्हणजे ?"
"म्हणजे हेच कि सध्या तरी हो किंवा नाही असे काहीच नाहीये "
"अहो पण, म्हणजे अजयनि हे का नाही सांगितले कि तो गेली ३ वर्षे तिच्या सोबत रिलेशन  मध्ये आहे"
"खरे आहे, आम्हालाही सोनालिनी उशीरच सांगितले होते, पण ते किती सेरीयास आहेत, याची कल्पना आम्हाला होती. मी त्याच्या आईला  सांगायचा  प्रयत्न केला कि मुलांनी एकमेकांना पसंत केले आहे आणि ते खूप गुंतले आहेत. त्यांना लग्न म्हणजे प्रेम नव्हे फक्त तर काही तडजोडी हि कराव्या लागतील, याची जाणीव करून देणे आणि त्यांच्या नात्याला अर्थ देणे एवढच आपण करू यात. पण त्यांनी विशेष लक्ष दिले नाही. त्या म्हणल्या कि सोनालीला आम्ही ओळखतो, चांगली हुशार आहे ती; पण म्हणून मी आता अजयच्या लग्नाचा विचार नाही केलाय, त्याने इतक्या लवकर लग्न करावे असे आम्हाला नाही वाटत.मी त्यांना इतकाच म्हणत होते कि लग्न कुठे लगेच करायचे आहे , पण तुमचा आणि आमचा एक विचार असेल तर मुलांना आपण या मध्ये पुढे जावू  देवू. आम्हाला हि आमच्या मुलीची काळजी आहेच कि; पण त्यांचा साधारण विरोध आहे हे माझ्या लक्षात आले. कारण काही असले तरी विरोध वाटला मला "
"मग , बोलणी फिस्कटली तर?"
"अगदीच असे काही नाही, एक आठवड्याहून आपणहून फोन केला. मग भेटलो आम्ही आमच्या घरीच. मग म्हणाल्या मुलांचीच इच्छा  आहे तर, आम्ही पण मोडता नाही घालणार. त्या दिवशी सकाळी अजयनि  सांगितले आणि दुपारी आम्ही आलो त्यामुळे जरा विचार करायला वेळ नाही मिळाला आणि  असे हि म्हणाल्या कि मुलांनी इतक्या उशिरा कल्पना दिली त्यामुळे मी दुखावले  गेले.
 मला त्यावेळी गंधालीचे म्हणणे पटले कि, त्यांना स्पष्ट बोललेले आवडते. अजयचे शिक्षण होई पर्यंत, सोनालीने जो जॉब  मिळाला आहे तो करावा म्हणजे पुढे तिलाही फायदा होईल असे त्यांचे म्हणणे होते. खर तर , तिने त्यांचे ऑफिस जॉईन करावे; पण मुले सतत संपर्कात राहतील,आणि उगाच …. "
"हो कळतंय मला, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते "- अभी 
"म्हणूनच,  आम्हाला हि असे वाटले कि वर्षभर तरी सोनालीने जॉब  करावा. मला हि तिने लगेच संसार , मुले बाळे यात पडावे असे वाटता नव्हते, दुसरी गोष्ट  म्हणजे अजयचे शिक्षण पूर्ण  व्हायचे होते, तेव्हा त्याच्यासाठी  हि हे सगळे अनुकूलच होते  आणि सोनाली नि  नोकरी साठी शहर सोडले. अर्थात,  बाजूनी निर्धास्त होते कि, अजयचे आई वडील या नात्याला मान्य करत आहेत. कधी न कधी सोनालिनी आपला जोडीदार निवडला असताच, तिच्या निवडी वर विश्वास ठेवावा  होती. अधून मधून अजयच्या घरी संपर्क होत असे; पण  ३-४ महिन्यात , सोनालीच्या बाबांची बदली झाली आणि मग आम्ही शहर सोडले. आता सोनाली ,  एकीकडे आणि अजय आणि त्याच्या घराचे एकीकडे. मी  जाताना अजयच्या घरी भेटून आले. अजयची परीक्षा झाली, निकाल लागला कि भेटू असे ठरले . "
"म्हणजे थोडक्यात, लग्न संमतीने झाले तर"
"नाही  डॉक्टर , ती एक  गोष्ट आहे. पण मी थोडक्यात सांगेन. सोनाली जिथे  शहर, अजयच्या च घरापासून तसे जवळ होते. अजय तिला भेटायला अधून मधून येत असे. अर्थात हे आम्हाला सोनालीच सांगायची. सतत  मागे लागायला नको म्हणून, आम्हीही विशेष   त्याच्या घरच्यांचा. पण अजय बहुधा घरी कल्पना न देत येत असावा. त्याची परीक्षा झाली आणि निकाल सुद्धा लागला. पण काही घरगुती अडचण आहे असे सांगत पुढचे ४-५ महिने  त्यांनी पुढे ढकलले. २-३ वेळा सोनाली म्हणाली, कि अजय ला सध्या जमत नाही, खूप काम आहे, म्हणून विशेष  होत. पण मला साधारण कामाची कल्पना असल्याने, मला हि ते  खरे वाटले. आणि एक दिवस , सोनाली घरी आली १०-१५ दिवस सुट्टी घेवून. उदास वाटली. दुसऱ्या  दिवशी विचारले तर, रडायला लागली. अजयनि तिला लग्नासाठी नकार कळवला होता आणि ते पण फोनवर, प्रत्यक्ष न भेटता. कारण इतकाच कि त्याला नाही वाटत आहे कि ते अनुकूल आहेत. कदाचित जे वाटले ते आकर्षण असेल आणि प्रेम नसेल, आणि आता  त्याची इच्छा नाहीये लग्न करायची तिच्याशी. आम्हाला काय  करावे तेच समजेना. आमच्या साठी खूप अनपेक्षित काही तरी घडत होते, काही ठोस कारण नसताना असा कसा नकार कळवू शकतो अजय . मी आणि सोनालीच्या बाबांनी ठरवले कि उद्या आपण अजयच्या आई बाबांशी फोन वर बोलू. कदाचित मुलांची काही किरकोळ भांडणे झाली असतील आणि कुणीच माघार न घेतल्याने … आम्हाला शेवटी सोनालीची काळजी होतीच."
"मग , तुम्ही अजयाला पण का नाही विचारलात या बद्दल"
"डॉक्टर, मी त्याच्या आईशी बोलण्या आधी, त्यांचाच फोन आला. अजयनि त्यांना सांगितले म्हणे कि हे लग्न त्याला मान्य नाहीये. मी कारण विचारले तर त्यांनी परत तीच कारणे दिली, आणि आमची माफी मागितली. असे हि म्हणाल्या, कि मुलासाठीच आम्ही तयार झालो, पण आता त्यालाच जर मान्य नाही , तर मग आम्ही तर काय बोलणर? तसे म्हणे आम्ही त्याला २-३ वेळा समजावले, परत विचार कर असे म्हंटले; पण त्याचा हा विचार पक्का झालाय, तेव्हा आपण इथेच थांबू यात. दोन्ही मुलांच्या दृष्टीने हेच योग्य आहे. "
"सोनाली, फार अपसेट असेल न तेव्हा"-डॉक्टर अभी 
"हो, खूपच. पण १०-१५ दिवस , राहिली आम्ही समजावले तिला. काही काही ऋणानुबंध  असतात असे सांगितले, तिला जड जात होते पण मान्य करण्याशिवाय पर्याय नव्हता. तिनी अजयला भेटायचा प्रयत्न करू नये, असेही आम्ही सांगितले."
"म्हणजे, ब्रेक अप झाले होते, माफ करा पण तुम्ही अजयच्या आई वडिलांना प्रत्यक्ष जावून का नाही भेटलात?"
"त्यांनी आपणहून फोन  केला म्हणजे त्य्नही झाल्या गोष्टीची खंत आहे असे आम्हाला वाटले. आणि केवळ अजयसाठी ते तयार झाले होते. तोच नाही म्हणाला तर मग काय ? आणि त्यांचे बोलणे स्पष्ट होते, त्यांनी समंजस पण दाखवत माफी हि मागितली, मग विषय कशाला वाढवा. आमच्या समोर मुख्य आवाहन होते, सोनालीला यातून बाहेर काढण्याचे. तिने आमच्या सोबत राहावे व आई सोबत practice करावी असे आमचे मत होते. पण सोनाली म्हणाली कि तिचा जॉब उत्तम आहे आणि अजून १ वर्षे तरी तिला करायचा आहे. तिच्या आई नि तिच्या सोबत रहायची तयारी दाखवली; पण मग सोनालीच्या इच्छे  नुसार असे ठरले कि तिने होस्टेल  सोडावे आणि तिच्या  मैत्रिणीसोबत घर भाड्यानी घ्यावे, म्हणजे मग अधून मधून सोनालीची आई किंवा आम्ही दोघे तिथे जावून राहू शकू. "
"या काळात, गंधालीचा काही संपर्क होता ?"
"सोनालीशी तिचे एकदा फोन वर बोलणे झाले होते. गंधाली  शिकत होती, आणि तिचे आई वडील तिच्या भावाकडे परदेशी गेले असल्याने, ती तिच्या गावी हि येत नसे. अजय सोबत हि फोन वरच बोलणे होते असे तिचे. ब्रेक अप चे कळल्यावर तिनी सोनालीला फोन केला होता, बराच वेळ बोलली असे सोनाली म्हणाली.  खर तर ती सोनालीला फोन करेल असे अपेक्षित नव्हते कारण ती अजयची मैत्रीण होती. तिनी सोनालीला तेच सांगितले कि जे झाले ते झाले, इच्छा  असेल तर एकदा अजयला जाब नक्की विचार, पण परत  अडकू नकोस. ती तयारी असेल तरच अजयला विचार कि त्यांनी असे का केले ? आणि तू तुझे आयुष्य सुरु कर, नवीन , अजय शिवाय. तुझ्या आयुष्यात अजय ४-५ वर्षे असेल; पण बाकी सगळे लोक त्या आधी पासून आहेत, त्यांचा आधार घे आणि पुढे जा. "
"आजही, ती तेच सांगत आहे "- अभी 
"होय, पण आम्हाला कहरच कौतिक वाटले तिचे, सोनाली ला फोने करून तिने, अजयची मैत्रीण म्हणून नाही तर सोनालीची हितचिंतक म्हणून सल्ला दिला. मला वाटते कि तिला  अंदाज असावा कि, अजयची कारणे  वरवरची आहेत, कदाचित त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी असेल किंवा   जोडीदाराच्या त्याला कल्पना बदलल्या आहेत, आणि त्याच्या आई- वडिलांना तसाही नाईलाज म्हणून हे नाते स्वीकारावे लागत होते. पण जर कधी अजय, सोनालीला भेटलाच तर तिनी काय करावे ते तिने सांगितले होते आणि तेच सोनालिनी ऐकले नाही"
"म्हणजे ?"
"या ब्रेक अप नंतर ६ महिन्यातच, दोघांनी लग्न केले. "
"तुम्ही विरोध नाही केलात ?"
"विरोध करायला, आम्हाला कळायला तरी हवे ना !!!"
"?"
"त्यांनी कुणाला न सांगता लग्न केले. ब्रेक अप नंतर, सोनाली स्वतंत्र घर घेवून राहत होती, मी सुरवातीला १५-२० दिवस राहिले. परत आले. मधून अधून म्हणजे १-२ दिवसा साठी मी जात असे. सोनाली कामात रमली होती, पेंटीग हि काढणे सुरु होते , सगळे नॉर्मलला येतेय , ती प्रयत्न करतीये असे आम्हाला वाटत होते. याहो वेळी आम्ही  गृहीत धरले. लगेच लग्न बद्दल बोलावे असे काही तिचे वय नव्हते, आम्हाला गडबड नव्हती आणि तिला तिचा वेळ द्यावा हि गृहीतके. ब्रेक अप नंतर, मी परत आल्यावर २-३ दिवसांनी अजय तिला भेटायला आला. त्याला म्हणे ब्रेकअप नंतर जाणवले कि तो तिच्या शिवाय नाही राहू शकत.  पण इतक्यात घरी नको सांगू यात म्हणाला. कारण लगेच असे सांगितले तर कुणाचेच आई बाबा आता विश्वास ठेवणार नाहीत आणि  घोळ वाढेल. त्याच्या आईनि अजून १५ दिवसात त्याच्यासाठी स्थळे पाहायला  सुरवात हि केली. एक मुलगा आधीच, मनासारखे करून हाताचा गेला होता, तेव्हा आता हा नको निसटायला म्हणून असेल कदाचित. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे त्याने सोनालीला सांगितली देखील होते; पण विश्वास हाही दिला कि लग्न हिच्याशीच करेल. नोकरी शोधायचे, घर पासून लांब राहायचे; म्हणजे आईचे स्थळे पाहणे मोहीम थांबेल आणि मग आपण लग्न करू असे त्याचे म्हणणे होते,. सोनालीला हे पटले. पण तिने आम्हाला काहीच सांगितले नाही. अजय तिला भेटतोय हे सुद्धा आम्हाला ठावूक नव्हते. त्या दोघांनी एका नव्या  शहरात जॉब  शोधले . अजय नि घरी मनवले कि १ वर्षे बाहेर नोकरी करतो, अजून बाबा एकटे सांभाळू शकतात तोपर्यंत. नंतर मला चान्स नाही मिळणार, घराचे हि तयार झाले. अजय बाहेर पडला आणि १ महिन्यातच त्या दोघांनी लग्न केले."
"तुम्हाला, लग्न झालेले कधी कळले?"
"कधी वाटले नव्हते कि आपलीच मुलगी, इतकी मोठी गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवेल आणि इतकी मोठी गोष्ट. पण खर सांगू तर मी अधून मधून तिच्या कडे जात होते; पण अजयचा विषय आपणहून कधी काढला नाही, आम्हाला वाटले  नको. पण काढला असता तर  बरे झाले असते,  समोर असताना ती हे लपवू नसती शकली. अर्थात लग्न करायचा  पासून घेतला नव्हता; पण अजय भेटतोय हे तरी कळले असते.  त्यांनी लग्न केले, पण अजून १ महिनाभर सोनालीला  जॉब करावा लागणार होता. त्यामुळे आम्हाला लगेच नाही कळले. लग्न झाले त्याच्या नंतर १० दिवसांनी, अजयचा दादा आमच्याकडे आला. आमची काहीच ओळख नव्हती त्यांनी करून दिली. आधी आम्हाला  वाटले कि ब्रेक अप बद्दल बोलायला आल असेल; पण त्याने बॉम्बच टाकला.  तो हे सांगायला आला होता कि अजय - सोनालीनि लग्न केले आहे, तेव्हा आता आपण सगळ्यांनी ते मान्य करून पुढे जायला हवे. खर तर अजयचा भाऊ आम्हाला  खूपच चांगला आणि समंजस वाटला. अत्यंत मनापासून त्यांनी आम्हाला सारे  सांगितले आणि मुलांना जवळ करा असे हि सांगितले. तो त्याच्या  आई बाबांना हि हेच सांगून आला होता. आम्हाला याच कल्पना असावी असे त्यना वाटत होते, ते  आम्हाला फोन करणार ; पण फोनवर गैरसमज नकोत आणि आम्हालाही खरच काहीच कल्पना नाही याची खात्री  देवून तो आमच्याकडे आला होता.  झाल्या प्रकाराने आम्ही फारच खचलो होतो.  आपण आई वडील म्हणून हरलो असे वाटले, तिने स्वताचा जोडीदार निवडला याला आमची कधीच हरकत  नव्हती, पण तिला आम्हाला विश्वासात घ्याव असे नाही वाटले यातच आमची हार होती. "
"म्हणजे अजयच्या भावाला हे सारे आधी पासून ?"
"नाही त्याला ठावूक नव्हते. गंधालीचा वाढदिवस म्हणून त्याने तिला फोन केला, तर गांधली म्हणाली कि पहिल्यांदाच असे झालाय कि अजयच फोन नाही , पत्र नाही काहीच कसे नाही. मग दुसऱ्या  दिवशी तिने अजयच्या घरी फोन केला तर तो घरी नाही,  आहे असे कळले, नोकरीच्या ठिकाणी आहे; पण ४-५ दिवसात घरी हि त्याचा फोन झाला नाही असे पण कळले. तिला काळजी वाटली.  तिला सोनालीला फोन केला तर ती रजेवर आहे असे  समजले. मग तिला काय वाटले काय माहित, तिनी अजयच्या दादाला  फोन केला आणि अजयकडे जावून ये असे म्हणाली. तिला म्हणे अस्वस्थ वाटत होते कि अजय बद्दल काही तरी घडलय कारण कितीही गडबडीत असला तरी वाढदिवसाला त्याचा फोन नाही याचा अर्थ काही तरी आहे. कदाचित बरे नाहीये किंवा …. अजयचा दादा गेला तिकडे तर हे सत्य बाहेर आले. त्याने  पहिले गांधलीला फोन केला. तिचे म्हणणे असे होती कि दादानीच लगेच हे सत्य आम्हा आई वडिलांना सांगावे; जेणे करून परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही. अजयच्या भवानी पण मागचे सगळे विसरून आपल्या घरी या साऱ्याची कल्पना दिली आणि आमच्या कडे आला"
"मग?"
"मग काय , आमच्या समोर काही पर्यायच, नव्हता. आम्ही त्याच्या आई वडिलांकडे गेलो, थोडी शाब्दिक चकमक झालीच, साहजिकच होते. पण दोन्ही मुलांना आम्हाला गाफील ठेवले यात आमची कुणाचीच चूक नव्हती; तेव्हा हे मान्य करावे आणि नाते जोडावे हेच ठीक होते. पण ते तसे नाखूष होते. त्यांच्या इच्छेखातर, एक छोटा स्वागत समारंभ केला   आणि  झाला"
"इतक्या सहजपणे ?"
"नाही, सहजपणे नक्कीच नाही. त्यांनी नाते स्वीकारले; पण मुलाला परत बोलवले नाही.  तुम्ही आता आपपले  पहा हेच सांगितले. तसे आम्ही हि दुखावलोच होतो; त्यामुळे गरज लागेल तेव्हाच मदत करू अश्या विचारात आम्ही त्या  दोघांनी स्वत:चा संसार उभा करावा असे आम्हालाही वाटले. आणि खरे तर आम्ही एक तर्फी मदत केली असती तर अजयचे आई वडील अजूनच  दुखावले गेले असते. काही काळानंतर, सारे ठीक होईल ;म्हणून आम्हालाही असाच वागणे भाग होते. दुरूनच लक्ष ठेवू असे आम्हीही ठरवले. आणि ते संसाराला लागले"
"किती वर्ष एकत्र होते; १ वर्ष तर नक्कीच"
"आणि सोनाली कधी यायची घरी ?"
"हो . येत असे. आम्ही हि जमेल तेवढे रीतीरिवाज पाळले कि. अजयच्या ऐं वडिलांना हि दर वेळी मी बोलावयाचे. १-२  वेळा तेही आले. सोनाली सासरीही गेली होती २-४ वेळा, काही न काही कारणांनी. अर्थात दोघांच्या नोकऱ्या, दूरच्या शहरात असल्याने, आमचे आणि त्याचा आई चे विशेष जाणे  व्हायचे कारण नव्हते. सुरवातीचे ६ महिने असेच गेले. मग त्यांनी अजयला  परत बोलावले. म्हणजे घरी नाही, पण घरापासून जवळच्या शहरात त्यांना एक ब्रांच सुरु  करायची होती, ती अजयनि पहावी असे त्यांना वाटत होते. आम्हालाही बरे वाटले, कि वातावरण निवळत आहे. अर्थात सोनालीने काय करावे हे काही त्यांनी सांगितले नव्हते. पण सोनालीला  पगाराची नोकरी मिळेल आणि तिने ती केली तर दोघांचे  निभावेल, अजयचा जम बसे पर्यंत हे गरजेचे होते. कारण नवीन  शाखा जरी सुरु करायची तरी ती पार्टनर म्हणून काढायची होती. अजयची आताची जी बायको आहे, तिचा भाऊ ,  ती आणि अजय असे पार्टनर होते. ते अजयच्या कुटुंबाचे जुन्या जाणत्या ओळखीतले होते. मुलांचा जम बसावा या हेतूनी त्यांनी असे ठरवले होते. त्यामुळे घरातला, एक खांब मजबूत असावा म्हणून सोनालीने नव्या शहरात नवी नोकरी शोधली. खरतर सोनाली हुशार तर होतीच पण तिला चांगला अनुभव होता; पण शेवटी अजय त्यांचा मुलगा आहे आणि लगेच परत बोलवण्यापेक्षा,  हळूहळू करत ते या  दोघांना घरी बोलवतील असा माझा अंदाज होता. शेवटी  पालकांना  इगो  असतोच नाही का? सहज सहजी ते  माफी नाही देत. पण जी सुरवात आहे असे वाटले तिथूनच  हे  लक्षात आले. "
"काही न काही कारणाने सोनाली आणि अजय  सुरु झाल्या. अजयला बऱ्यापैकी  ऐषोरामात होती. सोनालीला पगार चांगला होता ; पण संसाराची पण सुरवात होती न . बर आम्ही काही मदत केली असती तर कदाचित  नसते आणि तसाही आज न उद्या मुले त्या घरात  जातीलच कि. संसाराचे चटके ज्याचे त्याने सोसावेत. प्रेमानी संसार होत नाही; नाते जन्मते पण टिकवायला, रुजवायला थोडी तडजोड करावी  लागते, कधी आर्थिक, कधी मानसिक , कधी भावनिक"
"अगदी खरे आहे तुमचे. थोडा धीर तर धरावाच लागतो" 
"सोनाली  फोनवर. पण नावर बायको मध्ये किरकोळ भांडणे चालतात. त्यातूनही दोघांच्या राहणीमानातील फरक पण होताच. काम , घर यातून वेळेची ओढाताण होती. अजयला हि विशेष कामाची सवय नव्हती, सोनाली ला बाहेर राहल्याने झाली होती. पण अजयला घर गाड्या, नोकर चाकर आणि मुख्य म्हणजे आई   सवय. सोनालीला नोकरीची सवय, पण  एकट्याने राहणे आणि दोघांनी राहणे यात फरक आहे न. बाहेर २ तास  भेटली कि केवळ प्रेमाच्या , स्वप्नाच्या गप्पात माणूस रमतो. पण हे घरोघरी होते. पण एवढे प्रेम  आहे यांचे एकमेकांवर तर समजून घेतील आणि भांडणे मिटतील, असा होता. आणि तशी सोनाली खुशीत होती"
"बरे  झाले तुम्ही इतके सांगितले मला. साधारण अंदाज आला आहे मला. मी थोडे सोनालीशी बोलेन, नेमके कसे बिनसले हे कळले तर तिला अजूनही इतका  होतोय हे कळेल. अजय दुसरा संसार थाटला तरी कुठे तरी खोलवर सोनालीच्या मनात  प्रेम आहे, हे जाणवतंय आणि तिला तेच मनातून काढून टाकायचे आहे "
"असे काढता येते ते डॉक्टर ?"
"नाही, असे कसे काढून टाकणार एकदम. वस्तू नाहीये ती. एक सजीव भावना आहे. ती हळू हळू कमी होईल. पण सोनालीला आपण त्या भावने सहित जगायला शिकवायचे आहे. काळजी नका करू.  तुमची सोनाली मनापासून आयुष्य स्वीकारेल.  बाहेर पडायची इच्छा  आहेच कि"
"धन्यवाद डॉक्टर. गंधाली ला सुद्धा एकदा भेटायचे आहे. भेटू आम्ही तिला सुद्धा. सुरवाती पासून जितके जमेल तितकी मदत तिनी केली आहेच. सोनाली साठी तिनी अजयला हि तोडले, ज्यांनी तिला व्यक्तिश: दुखावला नसले तरी. हे लग्न वाचवण्याचा हि तिने प्रयत्न करून पहिला ;पण … असो. येतो आम्ही "
"हो . बाकी कधी वाटले तर मी बोलवेन तुम्हाला. आणि हो  सोनालीने मागचा  विषय काढला तर टाळू  नका. आजचे हि आपले बोलणे तिला आपणहून सांगा. तसे काही काळजी करण्या सारखे नाही आहे. दोन वेगवेगळ्या भावनेच्या कचाट्यात सापडली आहे ती इतकच. आपणही  आयुष्यात पुढे गेलो तर आपणही अजयशी प्रतारणा केली असे होईल असे वाटतंय तिला. आपल्याला तिला या विचारानाच्या चौकटीतून बाहेर काढायचा आहे. अजयचा राग, द्वेष वाटायला पाहिजे असे हि नाही आणि त्या वेळी जे वाटले ते खर प्रेम होतच; पण म्हणून तेच शाश्वत म्हणून जगायला पाहिजे असेही नाही, हे हळू हळू तिला समजावून द्यायचे आहे आपल्याला . यात सगळ्यात जमेची बाजू म्हणजे गंधाली. मी तिचा डॉक्टर असलो तरी गंधाली  तिचे औषध आहे. केवळ मी असतो तर वेळ लागला असता; पण गंधालीच्या असल्याने, आपण सारे हे लवकर पार करू. सोनालीला बाहेर जावू द्या; तिला घरात बोलते करा. तिला पेंटिंग काढायला परत भाग पाडा। त्या  चित्रातून सुद्धा, हि उदासी , मळभ व्यक्त होईल  तर आपल्याला मदतच होईल. आणि तिची जुनी  पेंटिंग  चुकून कधी तिच्या नजरेला पडली तर पडू द्यात. भूतकाळ मागे टाकणे म्हणजे त्यापासून पळणे नक्कीच नाही"
क्रमश : 

Sheetal Joshi 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Our visit to an experimental School- Prayog Bhumi

खिडकीतला पाऊस आणि मी !!!!(Poem/Kavita/Mukta Chhand)

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी