आम्ही अडगळीत टाकलेला इतिहास !!!(article/Lalit Lekh)
आम्ही अडगळीत टाकलेला इतिहास !!!
इन्कलाब झिंदाबाद किंवा वन्दे मातरम म्हणताना , आज हि आपला उर भरून येतो , लोकमान्य म्हणाले होते कि रक्त सांडल्याशिवाय मिळालेल्या स्वातंत्र्याची किमत राहणार नाही , रक्त सांडून हि ती कुठे राहिलीये? . आतंकवादी गुन्हे करणाऱ्या , त्या मध्ये सामील असणाऱ्या लोकांवर , त्यांच्या शिक्षेवर आम्ही तास न तास बोलतो , कधी कधी अगदी टोकाचे , पण काकोरी कट , क्रांती दिन आम्ही विसरू शकतो , कारण घटनेनी आम्हाला ते स्वातंत्र्य दिले आहे . व्यक्ती स्वातंत्र्य , आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या बद्दल बडबड करताना , ते घटनेच्या कोणत्या कलमात आहे , ते जाणून घेण्याची हि आम्हाला गरज वाटत नाही . पोकळ शब्दांचे इमले , भरल्या पोटी सुचतात आणि ते उभे करण्याचे स्वातंत्र्य आम्ही केवळ आय कर भरतो , या गुर्मीत मिळवले आहे . मागच्या वर्षी माझ्या एक मैत्रिणीने , एक पुस्तक मला वाचायाल दिले , शहीद भगत सिंग यांच्या वरचे , मृणालिनी देसाई यांनी लिहिलेले . ते पुस्तक वाचतना आणि वाचल्यावर , मला आतून इतके रिकामे वाटत होते , झोप उडवणारे पुस्तक आणि आपण किती छोटे आहोत याची जाणीव हे फार बेचैन करणारे होते . हे असे खूप वेळा झाले आहे , शिकत असताना सावरकरांचे साहित्य , इतर इतिहास विषयक साहित्य याची जवळून ओळख झाली . प्रत्येक वेळी मन हेलावले , इतिहासात जी माणसे आपण गमवली , ते तर आपण पुनुराजीवीत नाही करू शकत , पण स्मृती जागवू शकतो हे मनात नेहमी होते . पण खंत आणि बोच राहतेच न मनात , असे काही वाचले कि .
देशासाठी शहीद वगैरे होणे तर खूप दूरची गोष्ट आहे , साधे कामाच्या ठिकाणी एखाद्यावर अन्याय होत असेल किंवा अगदी स्वतःच्या बाबतीत होत असेल तरी आम्ही मुग गिळून गप्प राहणे पसंत करतो , "आपल्याला काय करायचे ? आपण आपल्या पुरते बघावे आणि आपले जे काही असेल ते टिकवावे " असा साधा सरळ विचार आम्ही करतो . अर्थात असे किती हि वाटले तरी आपण सगळेच तसेच आहोत , आणि मग कधी तरी हे गिल्ट घालवण्यासाठी एखादे दान करतो NGO मध्ये , सोशल वर्क . स्वतंत्र देशामध्ये जर अजून हि आम्ही अन्न, पाणी , रस्ते , शिक्षण , वैद्यकीय सेवा पोचवू शकत नसू , तर मग ज्या लोकांनी प्राणाची आहुती दिली ती वाया गेली का ? खर तर परिस्थिती इतकी बिकट आहे कि , जास्त लिहायाची हि भीती वाटते . मी किती हि म्हंटले , तरी आम्ही धाडस दाखवू शकत नाही , कारण आम्ही एकत्र नाही , कुणाच्या भावना कधी दुखवल्या जातील हे हि सांगता येत नाही . जिथे मोबईल च्या क्षुल्लक कारणावरून मारामारी होते . कुणी सिग्नल तोडला म्हणून तुम्ही सुनवायला गेलात तर , rash driving करत ते तुमचा पाठलाग करतात , तुम्ही पडाल किंवा किमान घाबराल याची ते खबरदारी घेतात . बदल व्हायला हवा आहे , पण सुरवात आपणच केली पाहिजे , प्रत्येकाला वाटत कि कुणी तरी करेल कि बदल . मी तरी आज ठरवले आहे , कि कमीत कमी खऱ्या आणि परीक्षे पलीकडल्या इतिहासाची ओळख मी ज्या पद्धतीने जमेल तशी भावी पिढीला करून द्यायचा प्रयत्न करेन , कमीत कमी एक धग माझ्या मनात जिवंत राहील आणि खरच वेळ पडली तर ती उपयोगी पडेल . पुस्तके भेट देवून , किंवा लिखाण द्वारे किंवा अन्य काही मार्गांनी आपण आपला इतिहास जपायला हवा , जश्या परंपरा जपतो न तसाच . या विषयाला अनुसरूनच मला एक कविता सुचली होती , ती हि …
परवा जुन्या अडगळीत , मनाच्या
एक जुने पुस्तक सापडले , इतिहासाचे
जर धूळ झटकली त्यावरची
अन मग जरा बाजूला वळून पहिले
मागच्या बुक शेल्फ वर
अजून काही पुस्तके होती इतिहास सांगणारी
एक जुने पुस्तक सापडले , इतिहासाचे
जर धूळ झटकली त्यावरची
अन मग जरा बाजूला वळून पहिले
मागच्या बुक शेल्फ वर
अजून काही पुस्तके होती इतिहास सांगणारी
दोन्ही पुस्तके इतिहासाचीच
पण एक सनावळ्या मध्ये अडकलेले
अन एक मात्र वर्तमानाचे अस्तित्व सांगतच
भविष्याचा हि वेध घेणारे
पण एक सनावळ्या मध्ये अडकलेले
अन एक मात्र वर्तमानाचे अस्तित्व सांगतच
भविष्याचा हि वेध घेणारे
अभ्यासाचे पुस्तक मध्ये
शिवाजी महाराज, अन झाशीची राणी
एखादा धडा किंवा चार ओळी
अन जमलाच तर एखादे चित्र
इतक्यातच संपून जाते
शिवाजी महाराज, अन झाशीची राणी
एखादा धडा किंवा चार ओळी
अन जमलाच तर एखादे चित्र
इतक्यातच संपून जाते
आग्र्याहून सुटका किती कष्टाची
आणि जीवावर बेतलेली होती
आणि "मेरी झांसी नाही दुंगी"
म्हणायला किती मोठे जिगर पाहिजे
हे आम्हाला माहीतच नाही ,
आमचे पुस्तक त्यावर भाष्यच
करत नाही
आणि जीवावर बेतलेली होती
आणि "मेरी झांसी नाही दुंगी"
म्हणायला किती मोठे जिगर पाहिजे
हे आम्हाला माहीतच नाही ,
आमचे पुस्तक त्यावर भाष्यच
करत नाही
सुखदेव , भगत सिंग आणि राजगुरू
यांना फाशी झाली आणि ते हसत हसत फासावर गेले
एवढाच उत्तर माहित आम्हाला
पण त्यामागचा विचार बद्दल चा
प्रश्न कधी नाहीच विचारला परीक्षेत
यांना फाशी झाली आणि ते हसत हसत फासावर गेले
एवढाच उत्तर माहित आम्हाला
पण त्यामागचा विचार बद्दल चा
प्रश्न कधी नाहीच विचारला परीक्षेत
सावरकरांना स्वात्यंत्र वीर , क्रांती सुर्य
असे म्हणतात इतके जरी शिकलो आम्ही
तरी "माझी जन्मठेप" "सन्यस्त खड्ग "
कमला अन सहा सोनेरी पानांपासून
आमच्या पुस्तकाची पाने किती तरी योजने दूरच राहिली
असे म्हणतात इतके जरी शिकलो आम्ही
तरी "माझी जन्मठेप" "सन्यस्त खड्ग "
कमला अन सहा सोनेरी पानांपासून
आमच्या पुस्तकाची पाने किती तरी योजने दूरच राहिली
आमच्या साठी राम मोहन राय
केवळ सतीच्या एका प्रथेत अडकले
केवळ सतीच्या एका प्रथेत अडकले
लोकमान्य मंडाले मध्ये , अन
आगरकर, फुले , कर्वे केवळ "समाज सुधारक"
दोन चार गुण मिळवण्या इतकेच
आठवणीत सामावले
आगरकर, फुले , कर्वे केवळ "समाज सुधारक"
दोन चार गुण मिळवण्या इतकेच
आठवणीत सामावले
म्हणे आम्ही इतिहास शिकलो
स्वातंत्र्याचा , केवळ पुस्तकात होता तेवढाच
शंभर किंवा त्या पेक्षा हि कमी मार्काचा
स्वातंत्र्याचा , केवळ पुस्तकात होता तेवढाच
शंभर किंवा त्या पेक्षा हि कमी मार्काचा
खरा इतिहास शिकलो असतो
तर फार बरे झाले असते
कमीत कमी वाहतुकीचे नियम तरी मोडले नसते ,
इतके तरी देशा साठी नक्की केले असते आम्ही
तर फार बरे झाले असते
कमीत कमी वाहतुकीचे नियम तरी मोडले नसते ,
इतके तरी देशा साठी नक्की केले असते आम्ही
पण एक बरे झाले कि
कमीत कमी घरात तरी
खऱ्या इतिहासाला ,
बुक शेल्फ मध्ये जागा आहे
कमीत कमी घरात तरी
खऱ्या इतिहासाला ,
बुक शेल्फ मध्ये जागा आहे
प्रत्येक घरात देवघर सोबतच
एक असा कप्पा असेल तर
इतिहास जपणारा, तर
परत एक इतिहासच घडेल , नाही का
एक असा कप्पा असेल तर
इतिहास जपणारा, तर
परत एक इतिहासच घडेल , नाही का
- शीतल

Comments
Post a Comment