खिडकीतला पाऊस आणि मी !!!!(Poem/Kavita/Mukta Chhand)

खिडकीतला पाऊस  आणि मी !!!!

किती सारी वर्षे झाली , मी पावसाला कधी दारातून , कधी खिडकीतून , कधी अंगणात भेटत होते
आज मात्र गम्मत च झाली , मी खिडकीत होते , अन पाऊस माझ्या खिडकीतून डोकावत होता
मी त्याच्याकडे आणि तो माझ्या कडे , हसत हसत बघत होता
माझ्या सारखाच तो सुद्धा आठवांच्या सरीमध्ये जणू काही भिजत होता
त्याचे स्फटिकासारखे थेंब मी हातावर झेलत होते ,
अन तो जणू माझ्या साठीच ते थेंब साठवत होता
सारे होते आजूबाजूला , पण तरी मी गर्दीमध्ये एकटीच होते
कारण आज चक्क पाऊसच माझ्या सवे बोलत होता
इतके दिवस मी पावसला घरातून पहायाचे
आज मात्र तो माझ्या कडे पाहत होता
माझ्या सारखाच तो सुद्धा आठवांच्या सरीमध्ये जणू काही भिजत होता
खूप दुरून आलोय मी आज , बरसणार आहे मनसोक्त
मी म्हणाले पाहुण्यासारखा चार दिवस नाकी राहा
राहा कि आमचे मन भरे पर्यंत अगदी मनमुक्त
कशाला ग ? मी थांबलो जास्त वेळ , कि
मगसगळी कडे चिकचिक होणार , चिखल किती झालाय इथे
म्हणून तुझी ओली , भिजली चिडचिड होणार
अरे असे कसे , तू तर हवासाच कि , चिडचिड झाली तर होवू दे
पण थांबला नाहीस तर निर्झर आमचे कसे वाहणार
नदी कशी सागराला मिळणार, अन मग तू नसलास तर मेघदूताचे काय होणार
इंद्रधनुचे रंग कसे मनात भरणार
वसुधेचा हिरवा शालू , काय या वर्षी पेटीतच पडून राहणार
अन मोराचा पिसारा रे कसा फुलणार
बाकी सारे जाऊ दे , पण मला कविता तरी कशी सुचणार
गप्पा छान मारता मारता , पाऊस चक्क खूप वेळ थांबला
माझ्या गप्पिष्ट स्वभावाचा आज काही तरी फायदा झाला
किती तरी दिवसांनी मला पाऊस मित्र सारखा भेटत होता
मी त्याच्याकडे आणि तो माझ्या कडे , हसत हसत बघत होता
माझ्या सारखाच तो सुद्धा आठवांच्या सरीमध्ये जणू काही भिजत होता
किती सारी वर्षे झाली , मी पावसाला कधी दारातून , कधी खिडकीतून , कधी अंगणात भेटत होते
आज मात्र गम्मत च झाली , मी खिडकीत होते , अन पाऊस माझ्या खिडकीतून डोकावत होता
शीतल जोशी

Comments

Popular posts from this blog

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी

Parv: An amazing reading experience