स्वच्छंद पाऊस (poem)






   स्वच्छंद पाऊस
रिमझिम रिमझिम पाऊस  मातीचा ओला गंध
तप्त धरणी वर कसा बरसे स्वच्छंद
अवचित अस आभाळ आले की मन पण कसे भरून येते
आठवणीच्या शिडकवा होवून  आंगण सारे भिजुन जाते
पावसनी खर तर असे  न सांगता येवू नयेच
अन् जर आलच जर  अनाहूत पाहुणा बनून
तर असा अशी हुरहुर   लावून परतू नये

काय माहित हे सरसर शिरवे अस काय घेवून येतात
की मृदगंध दरवलताच मनाचा ठाव घेवून जातात
पाऊस आला की न भिजता पण ,  आपण जरा चिंब होतो
आपल्याल्या भावलेला एखादा पावसाचा थेंब ,आपल्या तळ हातावर अलगद झेलतो

बाहेरचा पाऊस त्याच्याच सूरात गात असतो ,अणि
आपल्या आतला पाऊस , मनात दडलेला मेघ मल्हार अळवत बसतो
पाऊस तोच असला तरी, प्रत्येक वेळी नवा भासतो
कधी आठवांचे आसव घेवुन येई ,तर कधी मजकडे पाहून खट्याळ हसतो

पाऊस थांबला तरी , चिंब मन थांबले कुठे
हरवले जावूंन ते ,मे घांच्या गर्दीत पिसे

-शीतल

Comments

Popular posts from this blog

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी

खिडकीतला पाऊस आणि मी !!!!(Poem/Kavita/Mukta Chhand)

Parv: An amazing reading experience