एक गोष्ट त्यांची पण : भाग ८ (story/katha)
भाग आठवा
आकाश, आणि त्याचे मन त्याच्या नावा इतकच मोठे होते. म्हणूनच त्याला सगळ्या गोष्टींचा त्रास जास्त होत होता. आपल्या घरी राहायला आल्या पासून त्याला एकी कडे बरे पण वाटत होते आणि दुसरी कडे भूतकाळ सतत डोळ्या समोरून जात होता. किती छोटे छोटे प्रसंग , आणि त्याचे किती वेगवेगळे अर्थ प्रत्येकाच्या दृष्टीने . त्याला उगचाच तो दिवस आठवला. इरा आणि आजी , कंटाळा आला म्हणून आठवडा भर , आजीच्या बहिणीकडे , म्हणेज आमच्या मावशी आज्जी कडे कडे गेल्या होत्या . तिला हि त्यांची सोबत हवीच होती . आकाश साधारण १४-१५ वर्षाचा असेल तेव्हाची गोष्ट. आई बाबा आणि तो असे तिघेच घरात होते . आई बाबा काही तरी बोलत होते , आकाश त्याच्या रूम मध्ये अभ्यास करत बसला होता, एकदम त्याला
इराचे नाव ऐकू आले आणि बाबा चा आवाज थोडा मोठा झाला , ते आई शी इतक्या मोठ्या आवाजात का बोलत आहेत असे त्याला वाटले , आई बाबांचे बोलणे असे ऐकू नये हे माहित असताना पण तो ऐकत होता
"हे शक्य नाहीये, म्हणजे अधून मधून सुट्टीला जाणे इथ पर्यंत ठीक आहे आणि ती आपल्या मुलांना कधी पण भेटू शकते , पण इरासाठी म्हणत असशील तर शक्यच नाही . तू स्वताच जें ठरवले होतास ते कसे विसरू शकतेस आणि आई , आणि आकाश ला तर अजिबात आवडणार पण नाही "- बाबा
"पण अरे मी कायमचे थोडी न म्हणतीये , १-२ वर्षाचा तर प्रश्न आहे. विनिताला पण गरज आहे बदलाची आणि इराला पण तिथल्या मिलिटरी स्कूल मध्ये जायचे आहे. जवळच तर जायचे आहे "- आई
"नाही, नको . हा निर्णय माझ्या वर लादू नकोस प्लीज. विनीता काही गैर समज करून घेणार नाही, मी बोलेन तिच्याशी , हवे तर आई पण बोलेल. इराचे काय ती लहानच आहे अजून, नाही ते हट्ट का ऐकतेस. मैत्रिण जाणार म्हणून मी पण जाते इतकाच गणित आहे तिचे " -बाबा
"पण …."-आई
"मला वाटते, आपण इथच थाबु यात या विषय वर "- बाबा
आकशाला चैन पडलच नाही , विनीता मावशी , आई. इरा काय चाललाय नक्की. मी विचारतोच. त्यांना नाही आवडले तरी चालेल .
"आई - बाबा, रागावू नका पण नक्की काय चाललाय? मला काहीसे कानावर पडत होते . इराचा विषय होता म्हणून मी विचारतोय . "
"आकाश तू यात पडू नको, तसे हि तुझ्या बाबांनी हा विषय थांबवला आहे "
"आई, पण मला कळलाच पाहिजे , कारण मला आवडणार नाही असे बाबा म्हणाले, म्हणजे जर हा विषय पुढे गेला असता तर माझ्या पर्यंत येणार होता , मला सांगा काय ते . "
"
तुझ्या बाबानच विचार "
"ठीक आहे आकाश , मी सांगतो तुला . तस हि कधी न कधी सगळे बोलायला हवच होते , फक्त इतक्या लवकर नको असे वाटत होते मला "
"असे काय आहे नक्की बाबा "
"ऐक, आकाश . तुला तर माहितीये कि विनीताचा किती जीव आहे तुमच्या वर ते ."
"हो , विनीता मावशी , सख्खी नसली तरी त्यापेक्षा जवळची आहे आपल्याला . आई इतकाच तिचे प्रेम आहे आमच्या वर. पण त्याचे काय आता "
"मावशी एक वर्ष भर पुण्याच्या बाहेर जायचे म्हणतीये, जवळच ;म्हणजे सातारा इथे. तुला तर माहितीये तिचे सासर आहे ते आणि समीर काका तिकडे पण एक कारखाना सुरु करायचा म्हणतोय. तर ती म्हणत होती कि एक वर्ष भर आम्ही तिकडेच राहणार आहोत , ती पण तिथेच क्लिनिक सुरु करेल , एखाद्या वर्ष नंतर परत येतील . त्या दोघान पण बदलाची गरज आहे. पण ती तुम्हा दोघांना खूप मिस करेल असे म्हणत होती "
"त्यात काय मग , सातारा जवळच तर आहे , आम्ही सुट्टी दिवशी जाऊ कि भेटायला तिला . "
"अरे तेच तर आकाश , जवळ आहे म्हणूनच मी तुझ्या बाबाला म्हणत होते कि "- आई
"मी सांगतोय न त्याला , मला बोलू देत मग. विनीता म्हणाली कि दोघा पैकी कुणी तरी एक जावू शकेल का तिच्या सोबत , शाळा वगैरे बघेल ती तिकडे "
"काय ? असे म्हणाली मावशी . पण खरच ती का जातीये तिकडे? समीर काका येवून जावून करू शकतोच कि . म्हणजे कळतंय मला कि तिला आम्ही सोबत असावासे वाटतय , पण कसे शक्य आहे ते आणि आई तू काय आई इराला पाठवणार होतीस का , कसे शक्य आहे , किती लहान आहे ती आणि मला नाही चालणार , मी बोलतो मावशी सोबत आणि इतकाच असेल न तर मी जातो "
"अरे आकाश , तुझी महत्वाची शाळेची वर्षे आहेत. इरा तशी लहान आहे अजून , एखादे वर्षे , अगदी नाही करमले तर २ महिन्यात परत येयील कि ती. आणि इराला पण मागे लागलीये मी जाते म्हणून, तिची मैत्रीण पण तिथे गेलीये न "
"नाही आई, शक्यच नाही .असे कसे तू म्हणू शकतेस . इराला सवय तरी आहे का ग , आपल्याला सोडून रहायची आणि आपल्याला तरी करमेल का ? मुळीच नाही , मी सांगून ठेवतोय आणि जायचे असेलच तर मीच जाईन . आणी मावशी सहज म्हणाली असेल तर तू इतके सिरीयासालि का घेतले आहेस. मावशी कधीच असे म्हणणार नाही . ती सहज बोलली असेल आणि तू मनावर घेतलेस. इराचे काय, लहान आहे ती, तिचे सगळाच काही ऐकायची गरज नाहीये हा विचार काढून तक डोक्यातून आणि मावशी पण नाही जाणार मी आताच बोलतो मावशीशी …"
"आकाश ,तू काही बोलणार नाहीयेस विनीता सोबत , फोन ठेव खाली आणि माझ्याशी पण असे का बोलतो आहेस? "
"काय चुकले माझे आई, तू मावशीला समजवायचे सोडून , मला आणि बाबाला समजावत आहेस "
"खरे म्हणतोय ग तो. मी बोलेन आकाश , विनीता सोबत . ती सहजच म्हणाली असेल "
"म्हणजे तुम्हा दोघांना असे वाटतंय कि मीच तयार झालाय इराला पाठवायला आणि तुम्हालाच काय ते विनीता बद्दल खात्री आणि इरा काय फक्त तुमची मुलगी आणि ह्याच बहिण आणि माझी कुणीच नाहीये का ?"
"आई , असे आम्ही म्हणलाय तरी का , तू उगाच विषय भलती कडे नेवू नकोस "
"आकाश , तू खूप बोलतोयेस . ठीक आहे हा विषय इथेच संपला . मी सांगेन विनीता ला काय असेल ते "- आई
"आई , तू एकटी का ? आपण सगळे बोलू न तिच्याशी . कदाचित ती जाण्याचा निर्णय बदलेल सुद्धा . पण इरा इथेच राहील आणि अगदी वाटले तर मी जातो मावशी सोबत "
"आकाश, तू कुठे हि जाणार नाहीयेस "- आई
"आई , इरा गेलेली चालेल आणि मी का नको "
"अरे कारण ९-१० वि महत्वाची वर्षे आहेत, म्हणून "- आई
"आकाश , इरा नाही जाणार बेटा. मी आतच विनीतशी बोलतो "- बाबा
बाबा आईचे काही न ऐकता मावशी सोबत फोन वर बोलले , पण त्यांच्या रूम मध्ये जावून. ते आले आणि न राहवूनच मी विचारले
"काय म्हणाली मावशी ?"
"काही नाही रे आकाश , ती म्हणाली मी सहजच विचारले . बोलता बोलता विषय निघाला म्हणून . आणि तसा हि त्यांचे पण अजून नक्की नाही , आणि ती म्हणाली कि मला माहितीये कि हे असे अवघड आहे इराला किंवा तुला चल म्हणणे . सुट्टीला तिकडे किंवा आम्ही पुण्यात राहिलो तर अधून मधून मुले येत राहू देत . नेहमी येतात तशी. मला वाटते विनीता चे पण अजून काही जायचे नक्की नाही आहे आणि माझे तिचे बोलणे झालाय आता. "
आकाश इतके ऐकून निघाला आणि तेवढ्यात आई अगदी हळू आवाजात जे पुटपुटली ते त्याला ऐकू गेले
"मी इराचे इतके करून पण तू मला आरोपीच्या पिंजऱ्या मध्ये उभे केलेस "
"असे काही नाहीये अग , मला महितोये कि इरा चे तू मुली सारखच :- बाबा
"सारखाच म्हणजे मुलगीच आहे ती माझी "-
आकाश मागे वळला आणि इतकाच म्हणाला मी ऐकले आत मला सगळे पूर्ण सांगा . बाबा सांगायला तयार नव्हता , पण आई मात्र म्हणाली उगाच नंतर गैर समज नको , तो मोठा आहे आता. आकाश ऐकत होता पण त्याला खूप टेन्शन आले होते कि हे लोक काय सांगणार आहेत
आई सांगत होती आणि तो कानात प्राण आणून ऐकत होता
"आकाश, तुला इरा पहिल्यांदा या घरात आली ते आठवते "
"हो आई "
"मग ऐक, ती या घराची मुलगी आहे, पण तुझी सख्खी बहिण नाही ."
"म्हणजे ?"
"सांगते आकाश . एक दीड वर्षे आम्ही बाहेर होतो तेव्हाची गोष्ट. अवि काका पण बाहेरच होता . आणि तो परत यायची शक्यता कमीच होता. अगदी निष्णात डॉक्टर होता तो. पण आम्ही इथली जबाबदारी घायला समर्थ आहे हे कळले तसा तो या सगळ्या पाशातून मुक्त झाला आणि जिथे गरज आहे त्याच ठिकाणी सेवा करायची असे त्याने ठरवले . त्याला खर तर संसार , मुले या पाशात अडकायचे नव्हते . तुझा जन्म झाला न तेव्हाच मला म्हणाला , कि हा माझा पण मुलगाच आहे कि , बाप म्हणून जे काही प्रेम द्यायचे असेल ते याला देईन . "
"आई , ते सगळे खरय , म्हणजे मला तसे माहित नाही , पण अवि काका मला आठवतोय . मी खूप लहान होतो तरी सुद्धा. पण हे सगळे तू आता का ?"
"ऐक आकाश. तुला आठवत एकदा तू जुने फोटो पाहून म्हणाला होतास कि इराचे डोळे आणि अवि काकाचे डोळे सारखे वाटतात , म्हणजे त्यातले भाव सारखे वाटतात . वाटणारच न कारण … "
"कारण, म्हणजे तुला असे म्हणायचे आहे कि इरा अवि काकाची , आय मीन ती अवि काकाची मुलगी……………… "पण आई कसे शक्य आहे , तू आताच तर म्हणलीस कि काका ला हे सगळे नको होते , मग इरा … आणि मला कसे नाही माहित आणि आज्जीला , आणि आजोबाना ?"
"सांगते सगळे सांगते. आजी आजोबाना माहित आहेच. तू लहान म्हणून तुला सांगितले नाही आणि तशी गरज पण वाटली नाही "
"हो आकाश , आम्हाला तुला सांगायची गरज वाटली नाही कारण इरा आपलीच आहे आणि तुमचे इतके प्रेम बघून तर आम्हाला खूप आनंद वाटतो "- बाबा
"पण मग इराचि आई ? तिला इरा नको होती "
"
नाही नाही, तसे काहीच नाही दुर्दैवाने अवि काका आणि इराची आई दोघे पण या जगात राहिले नाहीत . इराच्या जन्म नंतर काही महिन्यातच ती गेली आणि अवि काकाला इराला सांभाळायला मदत म्हणून आम्ही त्याचेकडेच गेलो आणि इराचे लळा लागला आम्हाला . पण तरी अवि काका परत यायला तयार नव्हता आणि इरा ला पाठवायलासुद्धा . म्हणून थोडे दिवस आम्हीच राहलो आणि नंतर थोडे दिवस आजी आजोबा येणार असे ठरले होते "
"पण आई मला काही आठवत नाहीये कि , काका मला म्हणाला कि काकू आणलीये तुला किंवा बहिण आहे तुला "
"नाही राजा , तू लहान होतास आणि दुर्दैवाने तुझी काकू या घरात येवूच नाही शकली . कारण त्यांनी तिकडच लग्न केले आणि ते पण आजीचा आग्रह म्हणून . तुझी काकूसुद्धा काका सारखीच होती, तिला पण आपली रुग्ण सेवा दुर्गम भागात करायची होती , म्हणूनच ते दोघे कदाचित एकमेकांच्या प्रेमात पडले आजीच्या लक्षात आले एकदा, ती तिकडे असताना. आजी म्हणाली लग्न करा मग , तुमचे ध्येय एकाच आहे तर संसार त्याच्या आड येणार नाही . आधी काकाला पटले नाही. शेवटी लग्नाला एक मान्यता आहे ती फक्त प्रेमाला नाही. तरी हि काका लगेच तयार झाला नाही. पण काय माहित , एकदा फोन केला आणि म्हणाला आजी आजोबाना कि लग्न करेन , पण इकडेच , अगदी सध्या पद्धतीने. काय झाले काय माहित , पण त्याने ठरवले . नंतर आम्हाला म्हणाला कि त्याला जेव्हा जाणवले कि संसार आपल्या कामाच्या आड नाही येणार तेव्हा ठरवले. आजी आजोबा गेले तिकडे , काकाचे लग्न झाले. काका काकू इथे येणार आणि मग एक छोटी पार्टी करायचे असे ठरले खरे. एक दोन महिने असेच गेले . आपल्या काही जवळच्या नातेवाईक मंडळीना आजोबांनी पत्राने कळवले लग्न झाले म्हणून. पण काकूचा हे घर बघायचा योग आला नाही. तिला लगेचच दिवस गेले आणि प्रवास करणे शक्य नव्हते . खर तर तिने सगळाच अचानक घडले रे. पण काका म्हणाला इतक्यात कुणाला सांगू नका , कारण तिची परिस्थिती नाजूक आहे . म्हणून मग मी आणि बाबा तिकडेच गेलो, तशी पण आजोबांची अट पूर्ण करायची होती . इराच्या जन्मा नंतर जेमतेम २ महिने जगली ती. तू इकडे त्यामुळे आजी आजोबा दोघे एकदम येवू शकत नव्हते . एकेकटे येवून भेटून गेले. "
"काकू गेली , पण मग काका ?"
"आम्ही तिथेच होतो आकाश. काका एके दिवशी जवळच्या गावातून येत असताना , त्याच्या कार चा भीषण अपघात झाला ."- आईचा गळा दाटून आला आणि साहजिकच होते काका फक्त तिचा दीर नव्हता तर तिचा मित्र हितचिंतक आणि godfather होता .
"
फार काही आशा नव्हती. तरी आमचे प्रयत्न सुरु होते. शुद्धीत आला , तेव्हा वाटले कि सुटलो , हा परत आला . "- बाबा
"हो रे आकाश , आम्ही दोघे पण तसे फार काही मोठे नव्हतो वयाने . एक आईविना छोटे बाळ आणि तुझा अवि काका असा मरणाच्या दारात. पण फार धीराचा तो. कदाचित आम्हाला शेवटचे भेटायचे याच इच्छाशक्तीने तो शुद्धीवर आला , काही तासच . मला आणि तुझ्या बाबाला बोलावून घेतले आणि म्हणाल संसारात पडलो हे ठीक होते, पण या पोरी साठी वाईट वाटते , आई पण गेली आणि आता मी . पण तुम्ही आहात , माझी हि आठवण तुम्ही जपा. मला माहितीये कि तुम्ही आई वडिलांचे प्रेम द्याया . आकाश मला काही सुचत नव्हते रे . अवि दादाला काय वाटले काय माहित , मला म्हणाला तू आई चे प्रेम देशील ग , पण आकाश हिला बहिणीचे प्रेम देईल का ग ? चुलत म्हणाले न कि उगाच महाभारत आठवते ग आणि कधी कधी वाटते तुम्ही किती पण केले तरी आई बापा विना पोर म्हणून तिला केवळ सह्नुभित मिळेल का ग लोककडून. तसे नको ग व्हायला. आणि पुढे जावून इराला पण असे नको वाटायला कि तुम्ही तिचे सक्खे आई वडील नाही आहात आणि आकाश चुलत भाऊ आहे. मला काय वाटले माहित नाही आकाश पण मी अवि दादाला म्हणाले कि माझीच मुलगी असेल हि. पण तुला चालेल का कि तुझी नाही तर माझी मुलगी म्हणून जिला जग ओळखेल , तुझे अस्तित्व हिरावून कसे घेवू आम्ही . तुझा काका मला म्हणाला कि शक्य असेल तर आम्ही अवीची म्हणून नाही तर आमची म्हणूच इरा ला इकडे आणावे त्याचे नाही, आमचे नाव लावून. नाही म्हण्याचे प्रश्नच नव्हता. म्हणजे आम्ही जरी तिला अविदादा चे नाव लावले असते तरी तेवढच प्रेम दिले असते . पण अवि दादाची इच्छा आम्ही पूर्ण केली "
"आई , बाबा … हे इराला ?"
"तिला कसे माहित असेल , जर आम्ही तुला सुद्धा नाही सांगितले. पण आकाश हे तुला आता माहितीये तर "
"खरे सांगू आई , धक्का बसलाय . पण मला इरा बद्दल जे वाटतंय ते तसाच आहे . कारण मला ती माझी बहिण आहे हे च सत्य माहितीये आणि मला तेच स्वीकारायचे . पण आई एक विचारू ?"
"विचार कि "
"मी विसरू शकेन कि इरा सख्खी नाहीये , पण तू कधी हे विसरू शकशील ?"
"आकाश, तू काय बोलतो आहेस हे. मी इराचे तितकाच केलेय जितके तुझे , किंवा त्या पेक्षा जास्त काळजी आहे मला तिची "
"हो आई , काळजी आहे माझ्यापेक्षा जास्त . पण मला असे वाटते कि काळजी जास्त आहे इराची जबाबदारी म्हणून. अवि काकाच्या ओझ्याखाली , पण प्रेमाचे काय? "
"आकाश , मला हे अजिबात आवडले नाहीये तुझे असे बोलणे. इरा बद्दल मला काहीच वाटत नाही असे का वाटतय तुला . खरे सांगू तुझ्या नंतर इरा आली आणि आम्ही भेद जोवू नये म्हणून तुझ्या नंतर इराचा विचार केला आणि नंतर कधी तुझ्या साठी भावंडाचा विचार सुद्धा नाही केला आणि तूं … मला दुखावले आहेस तू आकाश "
"आई असे नाहीये , बाबा तू पण ऐक. मी असे नाही म्हणत आहे कि तुम्ही सावत्रपणा करताय. पण कधी कधी असे जाणवतंय . म्हणजे आई मला हक्काने ओरडते तशी इराला नाही. म्हणजे ती इराचे काही कमी करत नाही , पण त्या करण्यात कधी कधी असे वाटत कि आई टेन्शन मध्ये आहे . जणू चांगली आई होण्याचे बर्डन आहे तिच्या वर . आई च्या काही काही वागण्याचा संदर्भ आता लागतोय मला. ती त्या जबबदारी खाली आदर्श आई होते हि , पण तरी "आई" नाही वाटत "
"आकाश, इरा तुला असे म्हणाली ?"- बाबा
"नाही बाबा. उलट तिला असे च वाटतय कि ती आईची आणि तुझी जास्त लाडकी आहे . बाबा आई सारखे तुला पण टेन्शन आहे का ?"
"माहित नाही आकाश, मी इतका विचार नाहीच करत , पण एक आहे कि तिला पहिले कि कधी कधी जीव गलबलतो , अवीची आठवण येते. आणि असे वाटते कि चुकून या भरात इरा ला सत्य समजणार तर नाही न "
"आई , बाबा , आपण हे इराला कधीच नाही सांगायचे. तसे हि अवि काका तिला आठवत पण नाहीये . तू खूप खुश आहे या आयुष्यात आणि तिला या घरात सगळे तेच मिळेल जे तिला मिळायला हवे "
"आकाश, तू पण हे विसरून जा आणि खरच मी इराला मुलगीच मानते , विश्वास ठेव " आई
Comments
Post a Comment