Story : मैत्र !!!: भाग -१

मैत्र !!!

भाग -१ 

"गंधाली , आवरले का ग ? चल न लवकर "-  मनु गंधालीच्या मागे लागली होती, लवकर आवर म्हणून . मनु  आणि गंधाली   जुन्या  मैत्रिणी  होत्या.  खर तर शेजारी राहायच्या आणि म्हणून मैत्रिणी झाल्या. आज नाटकाला जायचा बेत  होता.

"चल मनु , आवरले माझे . पण अग  ऐक न, एक तिकीट वाया  जाणार ग.  म्हणजे तुझ्या लक्षात आलाच असेल म्हणा , मी एकटीच दिसतीये घरात तेव्हा.  आईला जमत नाहिये  ."- गंधाली
"असू दे ग ! बघू काय ते  नंतर ,आधी   बाहेर तर पडू यात "
मनु आणि गंधाली बाहेर पडल्या. नाट्यगृहावर पोचल्या.  आता प्रश्न होता तो शिल्लक असलेल्या एक तिकिटाचा. मनुला वाटत होते कि गेले तर जावू दे वाया , काय फरक पडतो; पण तिला माहित  होते कि गंधाली ला हे पटणार नाही.
"मनु  मला काय वाटतय, हे तिकीट मी तिकीट खिडकीवर नेवून देते.  पुढच्या रांगेतले आहे आणि नाटक तसे हाउस फुल आहे ; तर खरच जर कुणी आयत्या वेळेला आले तर चांगले पुढच्या रांगेतले मिळेल ना  त्या रसिकाला.  मी जावून देते थांब ".  मनुचे बोलणे ऐकण्या आधी गंधाली  गेली सुद्धा.  मनात आले कि करून मोकळे, हा स्वभावाच होता तिचा . ती परत फिरणार इतक्यात खिडकी मागच्या गृहस्थांनी तिला थांबायला सांगितले. 
"ताई, पाच दहा मिनिट थांबा इथच जवळपास, विकले गेले तर पैसे घेवूनच जा.  नाही तर खेळ संपल्यावर या परत".  ती थांबली इकडे तिकडे बघत आणि तिचे लक्ष नसतना, तिचे तिकीट खपले सुद्धा , आणि पैसे हि मिळाले .
 ती परत मनुजवळ येवून थांबली, तोच तिला मागून आवाज आला 
"धन्यवाद ", तिने मागे पहिले , अरे हा तर ओळखीचा नाहीये आपल्या 
"सॉरी , मी ओळखले नाही , आणि धन्यवाद कशा बद्दल "- गंधाली 
 "नाही ओळखत नाहीच आपण एकमेकांना, आणि धन्यवाद परत केलेल्या तिकीटा बद्दल . इतक्या उशिरा सुद्धा इतक्या पुढच्या रांगेतले तिकीट मिळाले तुमच्या मुळे.  नाही तर आजचा शुभारंभाचा  प्रयोग बुडला असता आणि कुठल्या हि परीस्थितीत मला नाटक पहाणे  प्राप्तच  होते "
" धन्यवाद कशाला.  म्हणजे मी परत जरी केले असले तरी त्याचा मोबदला मिळाला आहे कि मला. आणि खरच नाटक बघायला पुढच्या रांगेमधले तिकीट मिळाले कि जास्त आनंद लुटता येतो  "
"अगदी खर, म्हणून मी धन्यवाद द्यायला आलो .

तो आता गेला आणि या दोघी पण . खर तर गंधालीच्या शेजारीच बसला होता तो , परत एकदा हास्याची देवाण घेवाण झाली.  नाटक सुरु झाले . मध्यंतर मध्ये  गंधाली  आणि मनु  बोलत होत्या , 
"मनु  , तुला कसे वाटतय ग नाटक ? "
"चांगले आहे कि.  आवडलय मला , तुला कसे वाटतय ? "
"मला हि तसे छान वाटतय.  अर्थात माझी दोन पानाची लघु कथा होती त्याचे दोन अंकी रुपांतर केलें म्हणजे बदल असणारच ग ! पण अजून तरी कथेचा धागा बरोबर पकडला आहे . आणि मी काय इतकी मोठी लेखिका नाहीये यावर बोलायला . "
तो सगळे ऐकत होता. 
"म्हणजे हे सगळे तू लिहिले आहेस ? आणि तरी तू तिकीट काढून आली आहेस ?" त्याने  तिला विचारले 
गंधालीला खर तर हे आवडले  नव्हते त्याचे असे एकदम एकेरीवर येवून विचारणे.  पण मग तिला वाटले काय हरकत आहे , आपण समवयस्क आहोत  असे दिसतंय कि आणि उत्सुकता म्हणून विचारले असेल . ती पण तोच धागा पकडत म्हणाली 
"अरे मी नाही लिहिले आहे नाटक.  म्हणजे न मी खूप पूर्वी कॉलेज च्या अंकासाठी एक लघुकथा लिहिली होती , त्यावर आधारित आहे इतकच . म्हणजे या नाटकाचा दिग्दर्शक माझा मित्र आहे.  तो म्हणाला तुझी गोष्ट साधीच  आहे पण मला आवडली आहे.  मी वापरू का ?, नाही म्हण्याचा प्रश्नच नव्हता आणि माझ्या साठी खूपच आनंदाची गोष्टच होती हि "
" मग तूच नाटक का नाही लिहलस ?" तो म्हणाला 
"नाही नाही , माझा प्रांतच नाही तो आणि तसही मला आता   जमत नाही .  वेळ नसतो तसा निवांत आणि नाही वाटले नाटक लिहावे असे कधी .   मला जो पर्यंत मनापासून वाटत नाही न तोपर्यंत मी काहीच करत नाही " "गंधालीने उत्तर दिले 
" म्हणजे तू पराग ची मैत्रीण आहेस तर, गम्मत बघ न मी पण त्याच्या साठीच आलो आहे.  तो माझा शाळेपासूनच मित्र आहे .  थोडे आगाऊ पणाचे  वाटेल पण एक  एक सांगू  का,  तूच लिहायला हवे होतस हे नाटक.  तुझी गोष्ट तूच चांगली सांगू शकली असतीस नाही का ! कधी तरी मनात नसले तरी प्रयत्न करायचे कि,  त्यात  काय इतके "
आता मात्र गंधली वैतागली.  हा  उगाच का   मला सल्ला देतोय ओळख न पाळख.  तेवढ्यात तोच म्हणाला 
"तुला असे वाटत असेल न कि ओळख न पाळख , हा काय अनाहूत सल्ला देतोय.  असो.  पण आत पर्यंत ची गोष्ट आवडली मला , कीप इट  अप . आणि हो मी माझी ओळख करून देतो मी , अभी , म्हणजे अभिजित. आणि  तुमच्या दोघींची नावे कळली  बर का मला ."
गंधाली , मनु उत्तर देणार  तोच दुसरा अंक सुरु झाला.  तिघांना हि नाटक  आवडले होतच आणि तिघे पण परागला भेटायला गेले.  परागच्या आग्रह म्हणून नंतर जेवायला हि गेले एकत्र . गंधाली नि किती हि नाही म्हणाले तरी तिला पण क्रेडीट होतेच कि कथा लिहिल्या बद्दल . पण खर तर तिने सहजच लिहिलेली गोष्ट होती ती . आणि त्यात बऱ्या  पैकी  की बदल हि झालेच होते , त्यामुळे सारे क्रेडीट आपले नाही याची तिला जाणीव होती . अभिला मात्र गंधाली आणि कथा दोन्ही आवडले होते.  पण इतक्या साऱ्यांच्या गोंधळात त्याला तिच्या बद्दल जास्त काहीच कळले नाही.  पण पराग आहेच कि  त्याच्या कडून कळेलच सारे.
नंतर काही घटनाच अश्या घडत गेल्या कि , त्याची गंधाली सोबत मैत्री झाली. अगदी नकळत ते प्रेमात हि पडले एकमेकांच्या . लग्न ठरले सुद्धा . एकंदरीत सगळाच छान होते.  अभी एक मानसोपचार तज्ञ होता आणि गंधाली इंजिनियर, सुरवातीला ती नोकरी करत होती  आणि तिचा स्वत:चा  व्यवसाय करायची इच्छा   होती , अभिच्या बाबांचा व्यवसाय होताच , गेले एक वर्षे गंधाली तोच सांभाळत होती  आणि तिने तसा जम बसवला होता , अभिच्या बाबांना  हि आता काळजी नव्हती  , सगळच मस्त सुरु होते 
"आई , रात्री जेवायला नाहीये , मी आणि अभी भेटलोच नाहीये ग गेल्या ७-८ दिवसात , आज भेटतोय ग , मग जेवूनच येयीन आणि उशीर झाला तरी तो सोडेल मला , काळजी करू नको"
"बर जावून ये , सावकाश जा . "
"हो "- गांधली बाहेर पडली 
गंधालीला, अभी नि क्लिनिक मधेच बोलावले होते , म्हणजे त्याचे काम संपले कि एकत्र जाता येयील म्हणून . तिने हि काम आवरले होते लवकर , तिला सवयीने हेही ठावूक होते कि अभिची वेळ नक्की नाही , थांबायला लागेल , आणि म्हणूच सवयीने एक पुस्तक हि सोबत घेतले होतेच . ती पोचली ,  आणि वेटिंग रूम मध्ये च बसली . अभिच्या सहायक राजू नि अभिला  मेसेज दिला  आणि गांधालीशी तो पाच मिनिट बोलला  , तेवढ्यात एक मुलगी आता आली , राजू तिच्याशी बोलायला गेला 
"मी सोनाली, मी  आज सकाळी फोन केला होता , म्हणजे मला लवकर बोलावलो होते , पण काही कारणामुळे उशीर   झाला "
"हो पण , आता सर जायच्या वेळेला आला आहात तुम्ही , आणि  तुमचे पहिलच  सेशन आहे न , मग वेळ लागतो , उद्या येवू शकला का ?"- राजू 
"उद्या येइन मी , पण दहा मिनिट मिळाली असती तरी चालले असते , आता इतक्या दुरून आले आहे मी . म्हणून "
"ठीक आहे मी विचारतो "
तेवढ्यात अभीच बाहेर आला , निघायच्या तयारीत होता तो , त्यानी  गंधाली ला हाक मारली , तेवढ्यात राजू सोबत ती मुलगीच आली त्याच्या कडे 
तिने गंधाली  कडे आणि गंधाली नि तिच्या कडे पाहिले मात्र, एका क्षणात तिने "गंधाली ला ओळखले आणि गंधाली नि तिला , …हि तीच आहे , हो तीच आहे , किती बदलली आहे , किती वर्षे झाली ५ किंवा जास्तच , पण कशी तरीच वाटतीय हि, म्हणजे , आणि हि अभिकडे पेशंट  म्हणून ? खूप प्रश्न आणि प्रश्नच होते "गंधालीच्या मनात 
"तू मला …"- सोनालीने  विचारले 
"ओळखले  ग , पण असे वाटले कि ओळख विसरले आहे इतकी वेगळी वाटलीस तू मला क्षणभर  . सोनाली तुला कसे विसरता येयील ग मला.  तुझ्या बद्दल काहीच कळले नाही नंतर , म्हणजे मी भारतात परत आल्यावर तसा प्रयत्न केला सुद्धा , एकदा भेटायचे होते तुला , कशी आहेस ?"
"बरी आहे " एक ओशाळे हसू होते सोनालीच्या चेहऱ्यावर . 
"एक मिनिट , तुम्ही ओळखता का एकमेकींना "- अभी 
"हो , ओळखतो "- दोघी एकदम बोलल्या
"सोनाली , तू अभी कडे आली आहेस, म्हणजे अभिकडे पेशंट म्हणून आली आहेस ? "
"हो , आई बाबांनी आग्रह केला , ह्यांचे नाव त्यांना कुणी तरी सुचवले होते , आणि मला हि आता वाटले कि यावे असे . पण ,  तू इथे कशी ?, म्हणजे तू तर strong  मुलगी आहेस न , तूं या सगळ्याची काय गरज "
  "अभी  माझा होणारा नवरा आहे , मी त्याला भेटायला आले होते "- "गंधाली
"सॉरी , पण मी जर बोलतो मध्ये , सोनाली पहले म्हणजे केवळ कमकुवत  माणसे माझ्या कडे येतात असे नाही , खर तर धाडसी आणि strong माणसे चा माझ्या कडे येतात  कारण त्यांना हे मान्य होते कि माझी त्यांना गरज आहे आणि त्यात काही चुकीचे नाही. मन हा विषयच असा आहे , पहले तर  तू कमकुवत नाहीस आणि दुसरे म्हणजे तुझ्या मनात शंका येण्या आधी सांगतो कि , तुझ्या बद्दल गंधाली ला काहीही कळणार नाही , हि माझ्या व्यवसायाची गोपनीयता आहे , मला असे वाटते कि आपण आज १५ मिनिट तरी बोलू आणि मग  ठरवू पुढचे , म्हणजे उद्या बोलताना तुलाही थोडे मोकळे वाटेल  "
"पण तुम्ही , निघाला होतात न , मी येयीन उद्या "- सोनाली 
"नाही,असे काही नाही सोनाली  , मी थांबते , इथे येताना इतके गृहीत धरून येतेच मी , शेवटी त्याची कमीटमेंट महत्वाची "- "गंधाली
"गंधाली , तू तशीच आहेस ग कमीटमेंट  बद्दल विचार करणारी , हेच जर …", इतके बोलून सोनाली एकदम बैचेन झाली , आणि  तिचा तोल जाणार तोच तिला "गंधालीनि पकडले 
"सोनाली , …"- गांधली घाबरी झाली 
"काही नाही होणार , मी आहे न , राजू जा पाणी घेवून ये . सोनाली , पाणी घे आणि मला संग  तू एकटीच आली आहेस , म्हणजे तुझ्या सोबत कुणी आले नाही "- अभी 
"बाबा , येणार आहेत माझे  , पोचतील दहा मिनिटा मध्ये आणि मी ठीक आहे  " सोनाली ला पाणी प्यायला वर बरे वाटले . 
"डॉक्टर , माझी एक विनंती आहे , मला गंधाली सोबत हवी आहे मी इथे येयीन तेव्हा  , आपले बोलणे सुरु असताना , म्हणजे माझी हरकत नाही , पण उलट ती असेल तर मला बरे वाटेल कारण … तू येशील ना  ग  "
"चालेल , ते ठरवू आपण नंतर , मला वाटतय कि आज नकोच आपण बोलायला , तुला स्ट्रेस  असेल तर , मी एक गोळी लिहून देतो ती घे , पण आजच्या दिवस पुरतीच आणि उद्या  ये , राजू तुला वेळ सांगेल उद्या सकाळी फोन वर  "
"सोनाली ,  तुला सोडू का ग आम्ही घरी , बाबा  येवू देत तुझे , मग सोडतो तुम्हाला  "- "गंधाली
"नको बाबा कार  घेवून येतीलच . तुम्ही निघा "- सोनाली 
"असू दे थांबू आम्ही "- अभी 
"हे बघ बाबांचा फोन आलाच , मी त्यांना खालीच थांबायला सांगते , आपण निघू यात"
"सोनाली , नंबर दे न तुझा "- "गंधाली
"हो देते गंधाली , खर सांगू तुला बघूनच बरे वाटतय बघ मला आता, म्हणजे खर तर मला काय वाटतय ते माहित नाही , पण आधार वाटला .  "
सोनाली गेली . अभी आणि "गंधाली पण . 
"तुम्ही खूप चांगल्या मैत्रिणी होता का ग ?"- अभी 
"अभी खर सांगू , तसे आम्ही काय मैत्रिणी वगैरे नव्हतो . म्हणजे एकमेकीना ओळखत होते , आम्हला जोडणारा एक धागा  मात्र होता आणि तो आमच्या आयुष्यात महत्वाचा होता . पण ती एक चांगली , साधी सरळ मुलगी होती आणि म्हणूनच पहिल्या भेटीतच मला आवडली होती . बऱ्या  पैकी भेटायची आम्ही . आणि एकमेकांचा खूप आदर करायाचो  आणि त्यातूनच थोडी मैत्री झाली , पण तरी हि आम्हाला एकमेकीबद्दल खूप वाटायचे , हितचिंतक होतो आम्ही एकमेकींच्या . "
"हो , मी समजू शकतो , म्हणजे अशी काही नाती असतात आपली , कि नक्की मैत्री कि हितचिंतक असे काही लेबल नाही लावता येत. पण राहू दे , आपण या वेळी आता ते नको बोलू यात , एक तर आपण इतक्या दिवसांनी बोलतोय आणि नक्की काय प्रोब्लेम आहे ते हि माहित नाही, तिच्या वडिलांचा फोन आला होता मला , डिप्रेशन ची केस आहे असे म्हणाले , गंभीर आजार नाही वाटत आहे  "- अभी 
"हो ते पण आहेच , इतक्या वर्षात नक्की काय घडलय हे कुठे माहित आहे आपल्याला , म्हणजे मला तर काहीच अंदाज नाहीये , कि काय घडले नक्की कि ती डिप्रेशन मध्ये असेल "
"बर, मला संग काय खाणार आहेस , म्हणजे कुठे जावू यात आपण "- अभी 
"चल रे कुठे हि "- "गंधाली
अभिनि गाडी सुरु केली, त्याच्या लक्षात आले कि गंधाली थोडी बैचैन आहे , म्हणजे अपसेट वाटत होती , कदाचित सोनाली अचानक भेटली म्हणून असेल , तिच्या काळजीने . गप्पा नाहीत , कर मध्ये गाणी लावली नाहीत , पण तरी अभी काही बोलला नाही . कधी कधी अशी स्पेस द्यावी ज्याची त्याला अश्या मताचा होता तो  आणि गंधाली फार वेळ गप्प बसणार नाही असे वाटले आणि ते खरे होते 
"अभी , बाबा काही बोलले तुला , आम्हाला नवी  ऑर्डर मिळाली आहे एक्स्पोर्ट ची , बाबा खुश आहेत "
"हो मला म्हणाले ते काल  रात्री जेवताना , पण फोन  वर शुभेच्छा देण्या पेक्षा स्वताच देणे चांगले नाही का . तुझ्या समोरचा छोटा कप्पा उघड ना "
"काय आहे ? "
"उघडून तर बघ "
"वाह , सीडीज "
"बघ आवडतात का ?"
क्षणभर का होईना गंधाली , तिच्या विचारांच्या कोशातून बाहेर आली 
"अप्रतिम आहेत , माझ्या साठी का पण आता "
"खर सांगू सहजच  घेतल्या होत्या आणि ऑर्डर मिळवलीस कि एवढी मोठी म्हणून "
"मस्त यार अभी , दिल खुश कर दिया "
"दिल वगैरे ठीक आहे , पण पोटाचे काय  मला खूप भूक लागली आहे "
"मला पण "
गंधाली  विचारातून बाहेर आली खरी , पण काही वेळच . परत जाताना अभिला जाणवले कि अजूनही ती सोनालीचा विचार करतीये , तो काही बोलणार तोच तीच म्हणाली 
"अभी ,…"
"ना जाओ  छोडकर "- अभी 
"अरे , काय , हा पीजे किती वेळा , आणि मी तसा हि काही तरी महत्वाचे बोलतिये  न "
"बोल , बोल . मी जर उगाच आपले टीपी करत होतो , मला कळतंय कि सोनाली बद्दल तुला बोलायचे आहे "
"हे बघ , म्हणजे अलीकडचे मला नाही माहित , पण हो भूतकाळातली एक मोठी घटना आहे जी तिच्या साठी दुखद आणि मनस्ताप देणारी होती , पण म्हणून ती त्यामुळे अजून डिप्रेशन मध्ये असेल ? म्हणजे त्या नंतर मी जरी भेटले नाही तिला , तरी ती नोकरी करतीये आणि तिचे बरे सुरु आहे अशी ऐकीव माहिती नक्की मिळाली होती मला आणि ती खरी होती . त्या वेळच्या घटनेनि हे काही ओढवले असेल तिच्यावर तर …."
"तर काय , असू शकते . इतकी  बेचैन नको होवूस . उद्या काय असेल ते स्पष्ट होईलच आणि तसा हि मला सोनाली कडून ऐकायचे आहे . म्हणून मी तुला आता काही विचारात पण नाही . जा आता आणि झोप । आणि घरी संग मी आता वर नाही येत आहे , उशीर होईल . काळजी घे . आणि जर झोप नाही लागली तर …मला फोन करु…नकोस अजिबात … चेष्टा ग . मी पोचलो कि कळवतो "
अभी निघून गेला आणि गंधाली जरा  अपसेट विचारातच घरात आली .
"काय ग , चेहरा का  असा उतरलाय तुझा ,  दमली आहेस का ?"
"हो अग , जर दमली आहे , पण अभी ला पण भेटायचे होते नाही तर एकाच शहरात राहून दोन ध्रुवावर दोघे  आपण असे व्हायचे,, बर आई , आज मला कोण भेटले होते माहित आहे ? सोनाली भेटली होती  "
"सोनाली ?"
"अग , असे काय करतेस सोनाली ग , मला एक वर्षे सिनिअर होती आणि अजयची मैत्रीण …म्हणजे  आठवली का?"
"हो हो आठवली , पण कुठे भेटली आणि अशी अचानक , म्हणजे ती कुणाच्याच टच मध्ये नाही असे काही तरी म्हणत होता न तुम्ही "
"आई , खर सांगायचे तर , ती अभिकडे पेशंट म्हणून आली होती , म्हणजे मला खरच वाटत नव्हते , इतकी बदलली आहे ती . इतकी साधी सरळ आणि गोड मुलगी आणि रयाच गेली होती ग तिची , मला कससच वाटले बघ . पण बोलली माझ्याशी , भेटून छान वाटले म्हणाली . अभी म्हणत होता कि बहुधा डिप्रेशन मध्ये आहे . उद्या येणार आहे ती , पहिले सेशन आहे उद्या . मला पण बोलावले आहे तिने . काय करू ?"
"हे बघ बेटा , नक्की काय झालाय आपल्याला माहित नाही , आता  अजूनही ती भूतकाळाच्या घटनेत अडकली असेल नाही , नंतर काही घडले असू शकते . म्हणजे अगदी नोकरी सुद्धा . पण तरी तू तिला ओळखतेस आणि  मी तुला :). तुला जायचे असेल तर जरूर जा , त्यामुळे जर खरच तिला काही मदत होणार असेल आणि अभिला डॉक्टर म्हणून काही प्रोब्लेम नसेल तर जा तू . तितके हितसंबध होते कि तुमचे . "
"बर , उद्या अभिशी बोलेन मी आणि ठरवेन मग . आणि एक मला अभिनि आज सीडीज  आहेत . आता असे करते जर ऐकतच झोपते "
गंधाली झोपायला  गेली खरी  , पण झोप लागणे जर मुश्किल होते . गेल्या एक दोन वर्षात तिच्या जुन्या आठवणी पुसट  झाल्या होत्या , आणि आता जुने शहर आणि घर सोडून हि ६ -७ वर्ष झाली होती . काही जीव भावाचे मित्र मैत्रिणी अजूनही टच मध्ये होतेच . पण सोनाली ला ती या दोन तीन वर्षात विसरून गेली होती , म्हणजे तिची जुजबी माहिती कळली आणि तिचे सगळे ठीक सुरु आहे कळले तेव्हा गंधालीने तो विषय डोक्यातून काढून टाकला होता , आणि अजय शी तर तिचा अजिबातच संबध येत नव्हता . पण आता सोनाली भेटली आणि ती पण अडचणीत . 
झोपेने शरीराचा , कानांनी गाण्याचा ताबा घेतला खरा , पण मन मात्र सोनालीने त्याचा ताबा घेतला होता . तिला उद्या भेटे पर्यंत आता  गंधालीला चिं पडलाच नसते . अभीला हि काही गोष्टी नव्याने समजल्या असत्या . खर तर त्याला एकदा सहजच बोलताना तिनी  अजय बद्दल सांगितले होते , पण त्या गोष्टी मध्ये सोनाली होती हे अभिला माहित नव्हते , म्हणजे इते नाव निशीवर सांगायची वेळच आली नव्हती . अर्थात सोनाली चा प्रोब्लेम वेगळा असेल तर या गोष्टीचा काय संबध असेल असेही नव्हते . सोनाली ला लागेल ती मदत करायची या विचाराने गंधाली झोपी गेली . खर तर सोनाली पेक्षा , अजय तिचा जवळचा मित्र होता , त्यांची मैत्री म्हणजे अगदी हेवा करण्यासारखी आहे असे सगळ्यांना वाटायचे . मैत्री मध्ये , स्वभाव , आवडीनिवडी , आणि लिंगभेद येत नाही  याचे उदाहरणं म्हणजे त्यांची मैत्री होती . त्या दोघानी हि एकमेकांच्या अनेक गोष्टी पटत नव्हत्या , आवडत हि नव्हत्या , पण तरी त्यांची मैत्री होती , अगदी घट्ट . कदाचित लहानपणी निरागस पणे जुळलेले धागे , लगेच तुटत  नसावेत . अजय तिच्या  पेक्षा दोन वर्षांनी मोठा होता , म्हणजे तसे समवयस्क च . वर्ष नु वर्षाचा शेजार , आणि दोन्ही कुटुंबाची मैत्री . पण तरी हि अजय आणि गंधाली यांची मैत्री , सहजच झालेली आणि रुजलेली होती . अजय तसा थोडा अलिप्त राहणारा  होता, त्याच्या घरी तसे शिस्तप्रिय वातावरण होते , नावाजलेले आणि घरंदाज घराणे , याचा त्याला जर जास्तच अभिमान होता  आणि कमालीच व्यवहारीपण त्याच्या आईकडून त्याच्या रक्तात उतरले होते अगदी लहान पण पासून . गंधालीचे घर मात्र अधिक मोकळे ढाकळे , शिक्षण चे महत्व जाणातनाच , कलासक्त होते , त्यातून ती लाडकी म्हणून शिस्तीत न बसणारी , पण अतिशिय लाघवी अशी मुलगी .   अजय आणि गंधाली कधी एकमेकांशी संपर्क ठेवणार  नाहीत असे कुणाला स्वप्नात हि वाटले नव्हते . पण घटनाच अश्या घडल्या कि गंधालीनि एक तर्फी  हा निर्णय घेवून टाकला , आणि तिला विरोध करण्याचे धाडस कुणाच्यात हि नव्हते , अगदी अजय मध्ये सुद्धा आणि मुख्य म्हणजे गंधालीला या निर्णयाचा कधीच पश्चाताप झाला नाही ,  कठोर असले तरी न्याय आहे असे तिला पटले होते . खर तर तसे गंधाली आणि अजय चे काहीच बिनसले नव्हते . म्हणजे त्या दोघांचे प्रत्यक्ष असे काहीच भांडण नव्हते , पण तरी हि अजयच्या काही गोष्टी तिला पटल्या नाहीत आणि गंधाली दुखावली गेली . मैत्रीचे एक सुंदर नाते , तिने एका क्षणात परके केले . ती तशीच होती , जितकी लाघवी तितकी तत्वाला धरून राहणारी . व्यवहार चुकत नाही , हे तिला मान्य होते , पण अजय चा व्यवहारी पण ते मोठे होत गेले तसा वाढत  गेला असे जाणवत असातानाच ते खरे ठरले असे तिला वाटले . 
सकाळी पटपट आवरून गंधाली बाहेर पडली , आधी ऑफिस  गाठायचे म्हणून लवकरच निघाली . पोचून जर काम आवरते तोच राजूचा फोन आला 
"हेलो गंधाली ताई , आज संध्यकाळी ५ .३० ला जमेल यायला , त्या सोनाली ताई पण त्याच वेळी येणार आहेत . सर म्हणाले तुम्हाला निरोप दे , म्हणून . म्हणजे ते जर गडबडीत आहेत म्हणून मला सांगितलाय "
"अरे हो हो , तू काय वकील पत्र घेतले आहेस का अभिचा . आणि ठीक आहे मी येते , संग अभिला . म्हणजे मी कळवले असते , पण मी पण जर गडबडीत आहे न 😀। गम्मत रे "
कामाच्या धांदलीत , तशी गंधाली नॉर्मल होती . सोनालीचा विचार  आता करायचा नाही असे तिने ठरवले . बरोबर ५ वाजता ती निघाली . काही दिवस सकाळी लवकर यायचे आणि सोनाली सोबत सेशन ला जायचे हे तिने ठरवले होते . 
सोनाली ५. १५ लाच हजर होती , अभी नि तिला आता बोलावले , गंधाली पण आलीच तितक्यात 
अभी नि  संवाद सुरु केला 
"सोनाली , तुला काही सांगायचे आहे , ज्या साठी गंधाली इथे नको आहे तर तसे स्पष्ट सांग आणि  सनोच न करता बोल "
"नाही असू दे  गंधाली इथे . आणि मी सगळे सांगायचा प्रयत्न करीन . खरा तर मला तसे काहीच होत नाहीये पण …"
"कळतंय मला , कधी कधी आपल्याला कळत नाही न कि नक्की काय चुकतंय किंवा किंवा सगळाच छान आहे आजूबाजूला पण आपल्याला तसे वाटत  नाहीये "- अभी 
 "हो तसाच काहीसे . म्हणजे सध्या मी घरीच आहे , मी घरूनच थोडे काम करते , ते पण वेळ जावा म्हणून . दिवसातले ४-५ तास कामात जातात . थोडेसे वाचन, टीवी , असा वेळ जातो माझा . पण मला , नवीन काही करावसे वाटतच नाही . कधी कधी अगदी चहा सुद्धा करत  नाही मी स्वताचा . मला जास्त सोशल व्हायला आवडत नाही  आजकाल . सगळे फेक वाटते मला . गंधाली , मी अशी न्हवते न ग , तुझा विश्वास बसेल का ग कि गेल्या कित्येक वर्षात मी एकही स्केच काढले नाहीये कि ब्रश हातात धरला नाहीये . म्हणजे एक दोन वेळा तसा प्रयत्न हि केला , पण मला कुठले रंग  वापरावेत तेच कळेना , निसर्गचित्र काढायचे म्हंटले तरी उदासवाणी छटा  आली ग त्यात "
"अभी , सोनाली उत्तम चित्र काढते , स्केच आणि पोस्टर कलर्स  वर  हुकमत आहे तिची . मी  थोडीफार चित्रकला  जाणते , म्हणून समजू शकते . "
"ठीक आहे सोनाली होते असे कधी कधी . आता हे बघ मला न गाण्याचा छंद आहे , म्हणजे मी बऱ्यापैकी  गातो , पण असे कधी कधी वाटते मला हि कि गावूच नये किंवा अगदी गंधाली सोबत असताना हि एखादे विरह गीत किंवा गझल गवीशी वाटू शकते . गावून टाकायचे मग , म्हणजे मन मोकळे होते . किती हि उदास रंग आले न कागदावर तरी चालेल , कागद कोरा नाही ठेवलास तर मनाची पाटी कोरी होईल. पण मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि तुझ्या कडून अधिक माहिती सुद्धा लागेल .  आपण काही एकाच वेळी सगळे बोलणार नाही आहोत .  पण सुरवातीला काही बेसिक माहिती कळली तरी चांगले होईल आणि ती तूच सांग ,. मला तुझा दिनक्रम सांग , रात्रीची झोप, जेवणखाण या बद्दल हि सांग , इतर काही शारीरिक त्रास असेल तर तो हि सांग  "
सोनाली जे सांगत होती ते अभी नित लक्ष देवून ऐकत होता , गंधाली आहे याच्या  कडे त्याचे मुळीच लक्ष न्हवते , गंधाली पण ऐकत होतीच . तिला तसे सोनालीचे रुटीन नॉर्मल वाटत होते , ती इथे का आलीये तेच तिला काळात नव्हते .  आणि तिला एकदम स्ट्राईक  झाले , सोनाली म्हणाली आजकाल मला सोशल होणे , आणि बाकी सगळे फेक वाटतय . तिच्या बोलण्यावरून  सोनाली नि लग्न केले नाहीये हे तर कळलच , पण ती परत कुठच्या नात्यामध्ये बांधली गेलीये असे काही वाटत न्हवते . अभी नि अजून भूतकाळा  बद्दल तिला काहीच विचारले नव्हते . गंधाली ला वाटत होते कि त्याने पटकन विचारावे म्हणजे खरे कारण कळेल न . पण अभी म्हणाला आजच्या पुरते इतके पुरे . स
"सोनाली , बाहेर राजू तुला एक चिट्ठी देईल , त्यातली औषधे सुरु कर . तुला बरे वाटेल थोडे . आणि आपण आता चार दिवसांनी भेटू . शक्य असेल तर मला तुझ्या आई बाबांशी पण एकदा बोलायचे आहे . तू  ते येवू शकतील का . म्हणजे तुझ्या सोबत हि येवू शकतात , पण मग वेळेचे गणित जर बसत नाही न . म्हणून ते एकदा येवून जावू देत . आणि हो  जे वाटेल ते व्यक्त कर , आपल्याला चित्रांचे प्रदर्शन नाही भरवायचे आहे . आपली कला आपल्या व्यक्त होण्यसाठी असते , कुणाचा विचार नाही करायचा , स्वताच सुद्धा . कामा हि सुरु ठेव तुझे . आणि  you are ok . keep that in mind "
"अभी मी पण  निघते आता  फोन वर बोलू "-गंधाली
"ठीक आहे , बाय "
सोनाली आणि गंधाली बाहेर पडल्या . 
"सोनाली , वेळ आहे का ग तुझ्या कडे , चाल न काही तरी खावू यात मला भूक लागली आहे  आणि मी सोडेन तुला घरी "
"हो आहे कि वेळ "
तेवढ्यात गंधालीचा फोन वाजला , अभी नि मेसेज केला होता आणि गंधाली ला बजावले होते कि ती आपणहून सोनालीला काहीही विचारणार नाही , खास करून भूतकाळ किंवा काही अप्रिय घटना बद्दल .  अभिचे म्हणणे पाटण्या सारखे  होतच 
"तू सध्या काय करतीयेस ,  आणि राहतेस कुठे ?"- सोनाली 
"मी , आई आणि बाबा आम्ही इकडेच स्थायिक झालो आहोत आता . दादा सध्या दोन वर्षे परदेशात गेला आहे . लग्न झाले त्याचे , ते दोघेही तिथेच  आहेत , आता येतील परत ६-७ महिन्यात . मी सुरवातीला नोकरीच करत होते , गेले एक वर्षे मी अभिच्या बाबांसोबत काम करतीये . एकंदर छान चालले आहे . "
" मस्तच कि  आणि लिखाण ?"
" काही खास नाही ग , म्हणजे वेळ नाही आणि त्या वेळी तरी काय उत्साह होता म्हणून लिहायचे . माझी लिहिण्याची  मर्यादा ठावूक आहे ग मला आणि खर संगी आई म्हणते तसे एक न धड असे आहे माझे , कधी लेखन , कधी चित्रकला , कधी आणि काही  "
"मग सध्या काय आहे ?"
"सध्या काही विशेष नाही , पआम्ही ण मी गिटार  शिकतीये , बघू किती दिवस  जमतंय ते :). तुझे संग न कसे सुरु आहे "
"चाललय ग . घरातून काम करते थोडे फार , पैसे हि बरे मिळतात . बाकी काही नाही "
"एक सांगू ,  तू हुशार आहेस सो करिअर काय होईलच . पण तू खरच चांगली चित्र काढतेस , तू काढायला हवीस . मी तर म्हणते शक्य असेल तर त्यात काही  तरी नवे शिक . कलाकार  प्रतिभा आहे तुझ्या कडे . आपले काय होते न , अभ्यासात हि आपण बरे असलो न कि , कला मागे पडते . "
"खर आहे. एक विचारू चिडणार नाहीस ?"
 "नाही ग , विचार न "
"मी असे ऐकले कि तू आणि अजय , म्हणजे तू अजयशी मैत्री तोडलीस , कसे शक्य आहे "
"खरे आहे सोनाली .  तुझे नाते तुटले आणि माझे मी तोडले . त्याच वेळी . मला नाही पटले त्याचे वागणे . एरवी मी दुर्लक्ष केले असते , पण … जाऊ दे नको बोलू यात उगाच तुला आणि त्रास होईल "
"नाही ग , त्रास काय आणि जो त्रास व्हायचा तो झाला आणि होताच कि , मी इतके दिवस या सगळ्या पासून पळत होते , पण आता पळायचा  पण कंटाळा आलाय . आपण इतके हळवे , भावना प्रधान आणि कामिटेड   असे मला वाटायला लागले आहे "
" असे काही नाहीये . तू जशी आहेस तशी छान आहेस . आणि जे घडले ते चुकीचे होते , पण तुझी फारशी चूक नव्हती त्यात "
"हो पण , शिक्षा मात्र मला भोगायला लागली त्याची . पण मला कमाल तुझी वाटते . तुझी इतकी जीव भावाची मैत्री तू एका क्षणात  तोडलीस , अजय फार एकाकी पडला असेल ग "
"तू काय वेडी आहेस का ग जरा , त्याने तुझ्या पाठीत सुर खुपसला आणि तू त्याचा काय विचार करतेस सहानुभूतीने . आणि त्याचं सारखी  पडत नाहीत कधीच , इतक्या स्वकेंद्री   माणसाना अश्या सगळ्या गोष्टीची काही किंमत नसते . मी बोलले , खरे बोलले तर त्याला त्याचा राग आला , पण तो चुकलाय  केले नाही . आणि त्याची केवळ चूक नव्हती माफ करायला , माझ्या दृष्टीने तो तुझा अपराधी आहे . माझ्या कडून जी शिक्षा मी त्याला देवू शकले ती मी दिली  कदाचित त्याला ती शिक्षा हि वाटली नसेलच , पण स्वताचे समाधान "
"तू समाधानी आहेस  या बाबतीत . एक चांगला मित्र गमावाल्याचे वाईट नाही वाटत "
"अरे तू काय मुलाखत घेतीयेस का माझी ,?"
"नाही , म्हणजे नसेल सांगायचे तर नको सांगूस , पण गंधाली , मी मात्र अजून भूतकाळातच अडकून पडले आहे , कदाचित बोलले तर बरे वाटेल . कदाचित तुला ते जास्त समजेल "
" सोनाली , मला बोलायला काही प्रोब्लेम नाही , केवळ तुला परत मनास्ताप नको असे वाटले ग . खरे सांगू , अजयची आणि माझी मैत्री हे कोडच  होते नाही का , फक्त अश्या  कायमचे . आणि समाधानाचे म्हणशील , तर समाधानी आहे पण अपूर्ण . तुला भेटायचा , शोधायचा खूप प्रयत्न केला , तसा उशीरच झाला होता म्हणा . पण तू भेटली नाहीस . आणि आज भेटलीस अभी कडे "
"ह, नशीब दुसरे काय . म्हणजे मी तशी नॉर्मल आहे ग . सुरवातीला एक दोन वर्षे मला खूप त्रास झाला , पण मी जिद्दीने उभी राहिले . आई बाबांनी खूप सांभाळून घेतले . पण जुने काही नको म्हणून मी कुणाच्याच संपर्कात राहिले नाही आणि मला वाटतंय कि तेच चुकले . माझ्या मनात इतके सगळे  नसते , निचरा झाला असता . भावना दाबण्या पेक्षा त्याचा उद्रेक व्हयायला हवा होता . तुझ्यात ते धाडस होते , अर्थ अर्थी तुझा प्रत्यक्ष काही संबंध नसताना पण तू स्वताचा मित्र चुकला म्हणून त्याला शिक्षा दिलीस आणि मी मात्र , मी कधी अजयला विसरू , शकलेच नाहि , पण मला त्याला झिडकारता हि आले नाही ग . मी ठरवून हि ठरवून हि मला त्याच्या बद्दल द्वेष वाटत नाही , काहीच वाटत नाही . आणि आठवणी मधून मन बाहेर हि पडत नाही . काय चुकले  तेच काळात नाही "- सोनालीच आवाज कातर झाला होता , डोळ्यात  पाणी होते .गंधाली ला काळातच नव्हते कि कसे बोलावे पुढे ,, तिला वाटले काही अश्रू ओघळू द्यावेत , आणि मग । तिनी केवळ सोनालीचा हात हातात घेतला आणि म्हणाली 
"मी आहे न , मी तुझ्या सोबत  आहे . अजयच्या अपर्धाची शिक्षा मी तुला होवू देणार नाही ,  विश्वास ठेव , आणि एक हे मी तुझ्या साठी नाही करत आहे . मी कदाचित हे माझ्या साठीच करतीये , माझ्या समाधाना साठी . विश्वास ठेव "
 सोनाली केवळ तिचं कडे बघून हसली आणि त्या घरी जायला निघाल्या . गंधाली मनातून खूप  हलली होती , अजय सारखा मुलगा आपला मित्र  होता ह्याचे तिला गिल्ट वाटत होते . खर तर तिच्या मनात अपराधी पणाची भावना होतीच , काही इतरही कारणामुळे . पण इतके दिवस ती या भ्रमात होती कि सोनाली चे बरे चालले आहे . पण आता केवळ अजय नि केलेल्या फसवणुकीमुळे सोनाली ची हि अवस्था आहे यांनी तिला खूप त्रास होत होता . आता तर आजच्या बोलण्या वरून हे स्पष्ट होते कि अजय आणि सोनालीचा तुटलेले  नाते हेच तिच्या डिप्रेशन चे कारण होते . 
लहानपणीचा लपंडाव चा खेळ , मोठेपाणी , हा असा लपंडाव होईल असे तिला कधीच वाटले न्हवते . कथा कादंबरी मध्ये घडणाऱ्या कथा , जेव्हा आसपास  घडताना दिसतात , तेव्हा खरच काय होते ते तिला काळात होते . एक चुकीच्या माणसाच्या आयुष्यात  येण्याने , घराची उध्वस्त धर्मशाळा होते , हे तिला जाणवत होते . अजय तिचा लहानपणीचा खेळगडी तर होताच , पण हळू हळू ते बंध मैत्रीत  कधी रुपांतरीत झाले त्यांना हि कळले नाही 
गंधाली, ८ एक वर्षांची असेल 
"गंधाली,  जरा अजय  च्या घरी जावून ये न . हे बघ काकूला हे पुस्तक दे आणि हा डबा  पण दे . आणि काय ग आज काल  अभी ला घेत नाही का तुम्ही खेळायला ?"
"आई , तो बोअर  आहे . एक तर आमच्या वयाचे आम्ही ३-४ जनाच आहोत . त्यात अभी म्हणजे … "
"गंधाली, बोअर काय ग , असे नाही बोलायचे कुणा बद्दल आणि त्याला पण घेत जा . सगळ्यांशी  मिळून मिसळून खेळायचे आणि कदाचित तू पण त्याला बोअर  वाटू शकतेस "
"आई ,… कळले …. मी जावून येते . पण पुढच्या वेळी नाही जाणार हा . त्यांच्या घरी गेले कि उगाच बसवून घेतात आणि काकू फार खायचा आग्रह करते , ते पण सगळे अति गोड आणि मग कंटाळा येतो ग . फार मोठे आणि भकास घर आहे ते . मला नाही आवडत "
"जास्त बडबड नकोय हा गंधाली , वय किती आणि बोलतेस किती . जा सावकाश "
गंधाली नाईलाजाने या कामावर निघाली . खर तर अलिशान बंगलाच होता तो , पण गंधाली विशेष आवडायचा नाही . एक तर भयाण शांतता , जुना काळाचे पण अवाढव्य असे फर्निचर , बसलो तरी सुरकुती पडेल असे  वाटणारे सोफा , खुर्च्या . तिला कमालीचे अस्वस्थ वाटायचे त्या घरात . ती इतक्या वेळा आई सोबत गेली असेल , पण तिने पूर्ण बंगला कधीच पाहायला नव्हता . बंगल्याचे आवारातच , अजयच्या बाबांचे ऑफिस होते ,  सी ए होते ते . खूप हुशार होते असे बाबांनी खूप वेळा सांगितले होते तिला . अजयचा विजू दादा मात्र तिला आवडायचा , एक तर तो तिच्या  होता आणि एकदम मस्तीखोर होता . हसत राहायचा . हा कसे काय या बंगल्यात राहू शकतो असे तिला वाटायचा , पण विचारयाचे धाडस न्हवते . 
"ये ग , गंधाली बैस . आलेच हा १० मिनिटामध्ये "
 बाप रे , आत हि काकू येई पर्यंत १० मी थांबायचे . गंधाली उगाच इकडे तिकडे बघत होती . 
"शिरा खातेस का थोडा  ?"
"नको काकू , भूक नाहीये . विजू दादा कुठे आहे ?"
"आग विजू बाहेर गेलाय , अजय आहे बघ . थांब ह त्याला खाली बोलावते . अजय , अरे गंधाली आलीये बघ , खाली ये जरा"
बाप रे आधी १० मीन, मग शिरा आणि आता अजय , गंधाली जम वैतागली . अजय ने जर काकू ला सांगितले कि आम्ही त्याला खेळायला घेत नाही आहोत आणि परवा ची त्याची फजिती बद्दल सांगितले असेल तर , काकू सांगेल आईला आणि आई मग …. 
तेवढ्यात अजय खाली आला 
"काय ग इकडे कुठे ?"
"आई नि पाठवले आहे, काकू कडे "
गंधाली बघत होती , घरात कसा हा वेगळाच वाटतोय , आपणहून गप्पा मारायला लागला कि . गंधाली चे लक्ष त्याच्या हातात एक वही होती त्याकडे होते 
"कसली रे वही , चित्रकलेची दिसतीये "
"हो "
"माझी पण अशीच आहे , मला चित्र काढायला खूप आवडतात "
"मला पण . मला खूप गम्मत येते चित्र काढताना "
"मला दाखव कि वही "
"बघ कि , थांब काल  काढलेले दाखवतो "
गंधाली बघतच राहिले , चित्र तर छान होताच पण , ते खरे होते . म्हणजे काल ते अजय सोडून खेळत असताना , अजय नि त्यांचेच त्यांचेच खेळताना चे चित्र काढले होते . 
"अरे हे तर …"
"हो काळ तुम्ही खेळत होतात न , दादाच्या खोलीतून दिसते . "
"छान आहे , पण मला एक गोष्ट नाही आवडली . मिनुचे डोळे चिडके आले आहेत आणि माझ्या नाकाला शेंडाच नाही दिसत आहे . आम्ही काय अश्या दिसतो ?"
"अग , मी अजून शिकतो आहे न , चित्र काढायला . मोठा झालो न कि  मग कादेह्न छान . "
तेवढ्यात काकू आली आणि  गप्पा थांबल्या . गंधाली चे काम झाले , ती निघाली , चपला पायात सरकवताना , ती काकू कडे बघून म्हणाली 
"काकू , अजय ला पाठव ग संध्याकाळी आमचं कडे खेळायला . अजय ये रे "
एवढे बोलून गंधाली पळाली , अजयच्या आणि तिच्या मैत्रीची  सुरवातच होती हि 
क्रमश: 
  
- — ©शीतल जोशी

Comments

Popular posts from this blog

Our visit to an experimental School- Prayog Bhumi

खिडकीतला पाऊस आणि मी !!!!(Poem/Kavita/Mukta Chhand)

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी