Story मैत्र - भाग २

मैत्र - भाग २

अजय ला पण गम्मत वाटली . काल आपल्याला टाळणारी हि , एक चित्र काय पहिले एकदम मैत्रीत . पण त्या निम्मिताने आपल्याला खेळायला  मिळाले यातच खुश होता तो , 
"आई , मी आज जाणारे खेळायला ,  आपणहून बोलावलंय मला , ते पण गंधाली ने . अग आई ती आमच्यात लहान आहे , पण तीच न लीडर आहे आमच्या ग्रुपची . "
"हो हो , जा तू संध्याकाळी , पण आता पासून खेळ नकोय,  वर जा तुझा अभ्यास संपव आणि रोजच्या वेळेला खाली ये , जेवायला . उशीर नकोय हा . उगीच तंद्री  कशात तरी "
"आई , येतो ग . तू दादाला पण सांग  न , सगळे नियम मलाच "
अजय वैतागून निघून गेला , पण तो आनंदात होता , आता ग्रुप लीडर नीच बोलावले आहे म्हणजे . संध्याकाळ कधी होतीये असे त्याला झाले होते . ५. १५ झाले आणि आई मी जातो ग खेळायला असे ओरडतच तो पळाला . खरा तर इतके जोरात ओरडणे घरात अमान्य तर होताच , पण  स्वभावातही न्हवते . 
"ये रे अजय , ए मिनू ऐक ग , याला पण यायचे आहे खेळायला "
"पण हा काय खेळणार , हा काही सुद्धा दंगा  मस्ती करत नाही खेळताना , मग काय गम्मत "
अजय ला वाटले झाले आता काय आपल्याला घेणार नाहीत , पण ग्रुप लीडर नीच त्याची बाजू घेतली 
"अग , घेवू यात ग त्याला . तुला महितोये काळ किती भारी चित्र काढलाय त्याने आपले खेळताना "
"म्हणजे , आज पण आपण खेळायचे आणि हा चित्र काढणार वाटते "
"नाही ग , त्याला घेवू यात ना . आणि खेळ मी शिकवेन त्याला , आणि जरा  दंगा पण करायला शिकेल तू . मी शिकवेन त्याला आपल्या खेळाचे नियम . काय रे अजय ,  बरोबर न "
"हो हो , मी अगदी ऐकेन हिचे , म्हणजे सगळ्यांचे , मला घ्या न खेळायला "
अजय खूप दमला त्या दिवशी पळापळी  आणि आरडा ओरड च जास्त होती ,  हाच खेळाचा नियम होता . घरी खुशीतच आला 
"अजय , किती उशीर , १५ मिनिट उशिरा आला आहेस तू . हात पाय धु आणि  नमस्कार कर . आणि भूक लागली   असेल तर थोडे खायला देते . होमवर्क  पूर्ण कर आणि जेवायला ये . का खेळूनच पोट भरलाय आज "
बाप रे , आई किती बोलते पाठोपाठ , सूचना नुसत्या , अजय जर मनातून चिडला आई वर . खर तर आज किती गंमत आली ते त्याला आई ला सांगायचे होते  . पण आई नि संधीच कुठे दिले . आईचे सगळे नियम पळून तो 
वरच्या खोलीत गेले , बाबा अजून यायचे होते  , पण विजू दादा होता 
"काय रे अजय , आज उशीर "
"हो , दादा तुला गम्मत सांगू एक , आज जम धमाल केली "
"अरे वा "
"अरे तुला ती गंधाली , माहिती आहे न "
"हो , माहिती नसायला काय झाली . गोड मुलगी आहे ती , एकदम  हुशार आणि स्मार्ट . "
"अरे ती आमची ग्रुप लीडर आहे , म्हणजे मीच तिला ते नाव पडलाय आणि तिने मला आज स्वताहून खेळायला घेतले . आणि आम्ही जाम दंगा  केला त्यांच्या अंगणात , आणि  तुला माहितीये कुणी सुद्धा आले नाही ओरडायला , म्हणजे एकदा तिची आई डोकावून गेली आणि इतकाच म्हणाली कि आजी रेडीओ वर कार्यक्रम ऐक्तीये , म्हणून जर हळू आणि ते पण हसत हसत . मग काय आम्ही पण ऐकले त्यांचे . आणि तुला माहितीये गंधाली नि मी काढलेले चित्र छान आहे म्हणून सगळ्यांना सांगितले , आणि मला उद्या बोलवले आहे माझी वही घेवून , माझी चित्रे सगळ्यांना दाखवणार आहे आणि तुला माहितीये …  "
"अरे हो हो , तुफान मेल , काय १०० चा स्पीड एकदम . मग एकंदरीत काय तर आज खेळ आणि कौतिक झाले आहे तर . आणि आता काय ग्रुप लीडरच मैत्रीण म्हणजे , वशिला जोरात आहे."
"हो , मज्जा अल आज . मी उद्या ५ वाजताच जाणार आहे "
"हो हो जाशील , आधी अभ्यास पूर्ण कर नाही तर काह्ळून गजर वाजेल आईचा "
अजय आनंदातच झोपला , त्याल झोपेत  सुद्धा गंधाली आणि चित्रे दिसत होती .  दिवस भरभर पुढे जात होते , अजय , गंधालीच्या अड्ड्यात मस्तच सामावून गेला होता . त्यामुळे सुरवातीचे त्याचे अप्रूप  होते ते कमी झाले होते   एखादे वर्ष असाच निघून गेले , पण खेळायचा ग्रुप आणि ग्रुप लीडर अजून तेच होते . छोट्या मोठ्या कुरबुरी होवून सुद्धा मैत्री अजून टिकून होती . पण चार टाळकी एकत्र आली कि  काही तरी बिनासाणारच . झाले असेच एक  दिवशी मनुचे  आणि अजयच भांडण झाले . अजय ला मनुच  होता , पण गंधालीचा  जास्तच राग आला , तिने चक्क मनुची बाजू घेतली . 
"काकू , अजय आहे का ग घरी ?"- गंधाली चक्क आपणहून अजयच्या त्या  तिला अजिबात न आवडणाऱ्या  घरात आली  काय करणार चार दिवस अजय नि तोंड हि दाखवले नव्हते , दोघांची शाळा एक होती , पण तरी हि तिला अजय शाळेत हि दिसला नाही. म्हणू न आज बाई साहेबांचा मोर्चा  होता . 
"आहे कि घरातच आहे अग ,  नव्हते त्याला . आता बरे आहे पण मीच पाठवले नाही शाळेत आज . जा वर आहे बघ ."
"हो जाते , काकू आई नि संगीतालीये कि उद्या दुपारी ४ वाजता आमच्या कडे ये . कशासाठी ते नाही माहित , मी विचारले कि काकूनि विचारले तर काय सांगू , तर मला म्हणाली जास्ती चौकश नकोयेत ,  आहे तेवढाच बोल ."
"बर , बर येयीन मी उद्या " ,  काकू ला या छोकारीचे कौतिक वाटले , स्मार्ट  आहे . 
गंधाली  वर गेली , या घरात ती  या भागात कधीच आली नव्हती , एक तर तिला यायला आवडायचे नाही आणि खेळायचं थिअन तिचे घर होते , त्यामुळे अजयच यायचा 
"कुठली असेल बरे अजय ची रूम ?"
"काय ग ? काय शोधातीयेस ?"- विजू दादा 
"अरे विजू दादा , तू होय . मी माझ्या  मित्राला शोधतीय "
"आज काय घरातच लपंडाव का ?"
"नाही रे , तो आलाच कुठे ४ दिवस , शाळेत पण शोधले मी दिसलाच नाही . म्हणून आले तर काकू म्हणाली , त्याला बरे नाहीये . "
"चाल मी सोडतो तुला त्याच्या खोलीत "
"केवढे मोठे आहे रे वर पण "
"हो , अजय हे बघ तुला भेटायला ग्रुप लीडर आलाय स्वत :"  
"काय  रे विजू दादा , नेहमी   चेष्टा करतोस माझी "
"जर गम्मत ग , तू बोल ह्याचाय्शी मला बाहेर जायचे मी निघतो "
विजू दादा  निघून गेला . अजयचा राग अजून गेला नव्हता , तो गंधाली कडे  पाहून साधे हसला सुद्धा नाही . 
"अजय , काय रे बरे आहे का आता .  खेळायला पण आला नाहीस आणि शेल्ट पण दिसला नाहीस म्हणून मग मीच आले "
"ह , बरे आहे आता . उद्या जाणार आहे शाळेत . पण खेळायला नाही येणार "
" बर "
"बर म्हणजे , मी नाही आलो तुमच्यात तर तुम्हाला काय फरक पडतोय ,  नाहीच येणार मी "
"अरे बाबा , बर म्हणजे . तुला जेव्हा बरे  ये खेळायला , असे म्हणायचे होते मला . पण तू इतका  चिडला का आहेस ? काय झाले ? आणि खेळताना पहिल्यांदाच भांडण झाल्या सारखे  वागतोयस अगदी . आणि आता आपण मोठे झालोय न . "
"मोठे म्हणजे , इतके पण मोठे नाही झालोय आणि मोठी मुले - मुली  नाहीत "
"ए , असे काही नाहीये. खेळू शकतात.  क्रिकेट ,  टेनिस , लगोरी , काही पण खेळू शकतात . आमच्या कडे असे काही मुले मुली नाहीये . तुमच्या कडे असेल  आणि तुला फक्त मुलांच्यात खेळायला जायचे असेल तर जा कि "  
"हो ते बघीन माझे मी . हे बरे आहे .  तूच मला खेळायला बोलवले होतास आपणहून , आठवतंय न . आणि आता पण तूच आली आहेस . मला बरे नाहीयेस आणि तू सरळ …"
"बर बाबा , चिडू तर नको . आणि ते पर्वाचे तुमचे भांडण विसर रे , ती केव्हाच विसरलीये . तू पण विसर "
"पण मला तुझा राग आलाय "
"माझा ? मी काय केले ?"
"तू माझ्या बाजूनी का नाही बोललीस ? माझी मैत्रीण आहेस न तू . मी तुला चित्रकला स्पर्धे साठी किती मदत केली , अभ्यास सांभाळून आणि तू ?"
"अरे पण , तुझ्या बाजूनी का बोलायचे , जर चूक तुझी होती तर . तुझी चूक होती न मग. आणि मी तुझी मैत्रीण आहे कि अजूनही . एकदा तुझ्या बाजूनी नाही बोलले , पण आज आले न भेटायला . आणिहो तू मदत केलीस , पण मी पण करते कि नाही तुला मदत , मला जे येते त्याच्यात . बघ भांडायला शिकलास कि नाही तू माझ्याकडून :).  बर चाल मी जाते आता आणि उद्या शाळेत आला नाहीस ,  तर काकू ला सांग  निरोप द्यायला . मी येयीन कि गप्पा मारायला . गोष्ट पण वाचून दाखवते , मग तुला कंटाळा नाही येणार ."
"बर , कळवतो "
अजय  तसाही घरात  कंटाळला होता आणि  त्याला माहित होते कि अजून २-३ दिवस आई शाळेत  हि पाठवणार नाही आणि बाहेर हि , जर जास्तच काळजी . आणि तसाच झाले . पण गंधाली  थोडा वेळ . त्याचा वेळ मजेत जायचा .एक दिवस ग्रुप मधले सगळेच येवून गेले आणि गंधाली नि तर त्याच्या  वर्गातल्या अभ्यासाच्या वह्या पण आणून दिल्या .  अजय बरा  झाला . पण काही दिवसातच त्यांचा खेळायचा ग्रुप मोडला . पण अजयची आणि गंधाली ची मैत्री नाही . अजय नि चित्रकलेचा क्लास लावला होता आणि गंधाली पेटी शिकायला जात होती . बाकीचे मित्र मंडळ पण हा क्लास , तो क्लास या मध्ये होते आणि आपापले खेळाचे  ग्रुप तयार झाले सगळ्यांचे . 
अजय कडे तसे फारसे मित्र मैत्रिणी येतच नसत , गंधाली फक्त अपवाद होती .  अजयच्या आई कडक शिस्तीची असूनही गंधाली ला काही नाही वाटायचे , कदाचित तिची आई आणि काकू तश्या मैत्रीणीच होत्या म्हणून असेल . खर  तर काकू तर कडक होतीच तशी , पण आई म्हण्याची कि अजयचे बाबा आणि त्यांचे बाबा हि तसे शिस्तीचे होते , त्यामुळेच काकूला घरात हि असाच वातावरण ठेवायला लागायचे 
पण आता ती अधून मधून अजय कडे यायची , कधी अजय तिच्याकडे जायचं , पण तरी ग्रुप मधली मैत्री आता   राहिली होती. मोठे होत जाताना दोघांचे   गेले , आणि अगदी भिन्न प्रकृतीचे असूनही , एक अदृश्य धागा त्यांना जोडून होता . अजय चे १२ वि चे वर्ष होते .  खर तर १३-१८ हा वयोगटच  असा असतो न कि मित्र जास्त  जवळचे वाटतात , घरच्यांपेक्षा . असे वाटत असते कि घरच्यांना नाही समजणार , आपली स्वप्ने , आपल्याला काय हवाय ते . बालपणाच्या कोशांतून  बाहेर पडून सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचे दिवस . 
 त्या दिवशी संध्याकाळी , अजय गंधाली  कडे आला होता . त्याचा मूड जरा  गेला आहे , असे वाटले गंधाली ला . पण तो काय आपणहून सांगणार नाही , पण  त्याला बोलते करायची कला तिला अवगत होती 
"बाहेर चक्कर टाकायची का ? मला खूप कंटाळा आलाय , घर , शाळा , अभ्यास , १२ वि सगळ्याचा " अजय नि  विचारले  
"जावू यात चल , मला पुस्तक बदलून आणायचे आहे वाचानालायातून आणि आई ला काही समान हि हवे आहे , फिरत फिरत जाऊ . चालेल न . आणि काय रे एवढ्या गोष्टींचा कंटाळा आलाय तुला , नशीब माझा नाही आलाय कंटाळा "
"गंधाली , प्लीज . परत असे नको म्हणूस . तुझा कसा कंटाळा येयील मला . उलट तूच विसरली आहेस मला . किती दिवसात फिरकली नाहीस ८-१० दिवस झाले असतील . का नाही आलीस ?"
"अरे हो हो , आधी बाहेर पडू . बर काकू ला सांगितले आहेस न कि इकडे आला आहेस ते "
"हो  ग , तुमच्या कडे येतोय म्हणूनच तर परमिशन दिलीय . तुझ्या घरच्यांवर आणि तुझ्यावर खूप विश्वास आहे . आई म्हणालीच , कि जावून ये म्हणजे फ्रेश होवून परत अभ्यासाला लागशील . मी २ तास काढून आलो आहे . खूप बोलायचे आहे . "
"आई , मी आणि अजय गेलो ग ", गंधाली आणि अजय बाहेरसुद्धा पडले .  अजय शांतच होता आणि लगेच  विषय काढण्यात अर्थ नाही हे तिला माहित होते . 
"गंधाली, कधी कधी नुसते चालतच राहणे , ते पण तू असताना आणि ते पण शांत .  फार मस्त वाटतय ग "
"हो , कधी कधी असे छान वाटत न .  मग नावडता प्रश्न अभ्यास कसा सुरु आहे तुझा "
"चालू आहे , मी , करतोय पण तो पुरेसा नाही असे आई ला वाटतय . विजू दादा बोर्डात आल्याने आता माझ्यावर ओझे वाढलाय . त्याचे मला काही  इतके नाही वाटत आहे . पण कंटाळा आलाय सारखा तोच तोच अभ्यास करून  "
" अजय , तू त्या नव्या स्पर्धेत भाग  घे न , अरे राज्य पातळीवरची आहे चित्रकले साठीची . मी नाव देवू का  तुझ्ये माझ्या सोबतच . तुला तेवढाच बदल होईल "
"ओ बाईसाहेब , स्वप्न बघा पण मला दाखवू नका . तुझी काकू मला असले काही करून देणार नाही या वर्षी "
"तू हो म्हण रे , मी पटवते काकूला . आई  ला पण पटवायला लागेल , तुला आवडेल का ते संग रे फक्त "
"न आवडायला काय झाले . चित्र काढतान तुला माहितीय , मी कुणी वेगळाच आहे असे वाटते , मी दाखवेन तुला मध्ये मी थोडेसे स्केच केले आहे ते ."
"तू उत्तम कलाकार होवू शकतोस , खर तर  पण तू माझे सिरीयसली नाही घेत "
"गंधाली, नको ग नाही ती स्वप्ने पाहायला शिकवू मला . माझ्या घरी नाहीच चालणार कलाकार होणे ."
""अरे पण , तुला काय आवडतंय ते पण लक्षात घे न " 
"नको ग हा विषय , मग अजूनच …."
"ओके बाबा राहू दे . पुढचे पुढे . तसा हि आपण अजून शाळेत आहोत "
"गंधाली, पुढच्या वर्षी मी शाळेत नसेन . पण तू येशील न ग घरी . तू विसरणार नाहीस न मला "
गंधाली  जर विचारात पडली , असे काय बोलतोय हा , आणि इतका भावनिक का झालाय . अजय असा   नाहीये , आणि इतका भवन प्रधान तर नाहीच आहे .  तर ती मनातले कळू न देत त्याच्याशी  बोलत होती 
"अरे , तू काय परदेशी जाणार आहेस का ? आणि ऑन जवळ जवळ एक वर्षे आहे न मग . ते जावू दे ते स्पर्धेचे मी ठरवले आहे , मी काकू शी बोलेन "
"आधीच घरातले वातावरण असे आहे आणि त्यात तू हे बोल मग झाले कल्याण . एकाच मैत्रीण आहेस तू माझी , तुझे घर पण बंद होईल मला . "
"अजय , असे काही नाही होणार आणि घरात काही प्रोब्लेम ? म्हणजे काय ते वातावरण असे आहे म्हणत होतास ?"
"तुला माहित नाहीये खरच ?"
"नाही "
"विजू दादा आलाय "
"हो माहितीय , म्हणजे  माझा दादा आणि तो एकत्र आले आहेत न मुंबई वरून . या वेळी त्यांच्या सुट्ट्या एकाच आल्या आहेत . ते अधून मधून तिथे हि भेटत असतात . आत हे शेवटचे वर्षे आहे न दोघांचे "
" हो . ते आहेच ग . पण विजू दादांनी काय घोळ घातलाय  माहित का ? . आई खूप चिडलीये आणि बाबा पण जर अपसेट आहेत "
"कसला घोळ . मार्क तर मस्त असतात कि त्याला . दादा म्हणत होता कि पुढचे शिकायला तुझा दादा परदेशी जाणार असे काही तरी ठरतंय  . म्हणून  काही प्रोब्लेम आहे का ?"
"नाही  . मला वेगळीच शंका येतीय "
"म्हणजे ? काही सिरियस  आहे का ? विजू दादा स्मोक करतो का  कि त्याला गर्लफ्रेंड ? "
"नाही ग , तुझे न काही तरी वेगळाच "
"वेगळे काय , असे काही असू शकते न "
"तसे नाहीये . आई नि त्याची बैग उचकलि , तो भडकला मग . त्याला न विचारता उघडली म्हणून . मग आई पण चिडली , इतके काय त्यात म्हणून . काय आहे लपवण्यासारखे . मग खूप भांडणे  झाली त्यांची  बाबा पण चिडले विजू दादा वर "
"अरे  पण , काकुनीच पहिली न , मग विजू दादा का चिडला ?"
"हो न ग , आई त्याला म्हणाली कि कपडे असतील धुवायचे म्हणून तिने उचक पाचक केली पण दादा ला पटतच नव्हते "
"अरे अश्या गोष्टी घरात होत राहतातच . तू कशाला लक्ष देतोस "
"तसे नाही ग , मला नक्की माहितीये मला आता बाहेर पाठवले आहे , कदाचित त्यांना सगळ्यांना काही बोलायचे आह्रे "
"असू दे कि मग . मला सुद्धा कधी कधी असच करतात घरी , मला काही नाही वाटत . कळेल लायाचे असेल तेव्हा .तुला इतका वेळ मिळाला आहे न  आता , मग तो एन्जोय  कर कि . भेळ  खाणार ?"
"आता ?"
"मग . भेळ  काय कधीही खाऊ शकतो , तेवढाच टीपी रे "
"नको , मूड नाहीये "
"बर   राहू दे , गप्पानीच पोट भरेल "
"काय वाचातीयेस ? बर आहे का हे पुस्तक ? परीक्षण नकोय "
"बरे आहे , आणि परीक्षण काय रे , माझी चेष्टा  सुचातीये  तुला "
"गंधाली , मला कळलाय विजुदादा बद्दल "
"काय?"
"त्याला नाटकात  बक्षीस मिळाले , त्याचे दिग्दर्शन होते . आणि खुप कौतुक झाले . वर्तमानपत्रात हि थोडेसे आले होते तिकडे "
"मग , चांगले आहे कि . तशी त्याला आवड होती ,  इथे पण शाळेत काम करायचा कि तो "
"हो पण , तो म्हणतोय कि त्याला हेच  हेच करायचे आहे आता .  म्हणजे  शिक्षण पूर्ण झाल्यावर . यातच शिकणार म्हणतोय थोडे आणि २ वर्षे प्रयत्न करणार आणि नाहीच जमले तर केवळ हॉबी  म्हणून नंतर करत राहीन म्हणाला . "
"अरे वा . पण माझा दादा काही बोलला नाही या बाबतीत "
"अग , तुला  सांगितले  नसेल . त्याला माहितीये , कदाचित तुझ्या आई बाबांना  पण "
"पण मग त्यावरून घरात ?"
"रणकंदन माजलाय. बाबा तसे हि नाराज होते कारण हा सी ए न होता इंजीनेरिंग  ला गेला म्हणून . पण त्याची इच्छा  म्हणून आई नि तेव्हा रदबदली केली . त्याच्या बाजूनी उभी राहिली . आणि आता ह्याचे काही वेगळच.  या वेळी आई पण त्याच्या बाजू नि नाही आहे . आई ला वाटत होते कि पुढे शिकावे तरी किंवा सरक नोकरी करावी . तो परदेशी शिकायला गेला असता तरी तिची तयारी होती , बाबांना तयार केले असते तिनी . पण हे नाटक वगैरे , ते पण पूर्ण वेळ तिला मान्यच नाहीये  "
"अरे पण , विजू दादा २ वर्षे तर म्हणतोय न . मग ?"
"आपण काय बोलणार यात . तो पण हट्टी आहे , काही भलते सलते नाही झाले म्हणजे मिळवले "
"भलते सलते म्हणजे ?"
"माझ्या मामा  ला चित्रकार व्हायचे होते , ती कला माझ्या त्याच्या कडूनच आली आहे . पण म्हणवे तसे यश त्याला कधीच नाही मिळाले . कलेच्या नादात , तो कफल्लक च राहिला , आजोबाना मान्य न्हवते म्हणून घर सोडून गेला होता . मी कधी छान चित्र काढले न , कि आई त्याच्या कडे अशी बघते  आणि मला जवळ घेते न कि . तिला खूप आठवण येत असेल ग मामाची . तिला नाही आवडणार हे असे नाटक , चित्रकला कवटाळून बसलेले, तिला वाटते कि यामुळे घरे उध्वस्त होतात . कारण मामा एकदा गेला तो परत आलाच नाही कधीच , आजोबा गेले तेव्हा सुद्धा . ती स्वत : उत्तम चित्र काढते , तुला माहित नसेल पण खूप चांगल्या सूचना पण देते , पण तिने कधीच हातात ब्रश धरला नाही , उत्तम रंगसंगतीची जन असूनही , आईचा कॅनवास मात्र कोराच आहे . आणि बाबांकडे काय कलेची विशेष आवडच नाही . नाही म्हणायला पुस्तक आणि संगीत याचे वावडे नाही इतकच . विजू दादांनी हे वादळ परत घरात आणलाय . आई अशी भूतकाळाने होरपळलेली  आणि बाबांना  समजणारच नाही , विजू दादाचे मन . आणि मला सगळे कळतंय , पण मी काहीच करू शकत नाही . मला फक्त विजू दादा हवाय , तो पण  आनंदी . आणि मला आई ला नाही दुखवायचे . आधी मला इतके कळायचे नाही , पण हळू हळू  तिच्या स्वभावाचे , वागण्याचे , कडक शिस्तीचे संदर्भ मला  उमगत आहेत , तिच्या भूतकाळासोबत . खूप बोलतोय का ग मी ? आणि ते पण संदर्भहीन . आपण अजून इतके मोठे नाही आहोत का हे सगळे बोलायला "
"अजय , बोल रे तू . तुझ्या मनात जे आहे ते आणि मी कुणापाशी नाही बोलणार हे सगळे .  विश्वास ठेव "
"तो तर आहेच ग , तूच एकटी अशी आहेस कि माझे मन मी मोकळे करू शकतो . का सांगू? तू लक्ष देवून ऐकतेस आणि प्रश्न चिन्ह कधीच उभा करत नाहीस त्याच्यावर . आणि कधी कधी सरळ सोप्या शब्दात उत्तरे असतात न तुझ्या कडे "
"कधी कधी असतात रे . पण आपण अजून इतके मोठे नाही झालोय प्रश्न बिश्न  सोडवायला . एक सांगू तुला अजय , कधी कधी जे घडतंय न त्याच्या कडे त्रयस्थ पणे  पाहायला हवे  , असे बाबा परवा आईला सांगत होते . मला वाटते आता तू जे काय सुरु आहे त्यामध्ये भाग नको घेवूस . आणि  अरे काकू आणि काका विजू दादाला  असे सोडून कसे देतील , काही तरीच . आणि हे बघ विजू दादाचे वर्षे संपायला ६ एक महिने आहेत अजून , तोपर्यंत गोष्टी बदलतील बघ . तुझे कसे आहे माहितीये का , तू झालासा न कि एकदम इमोशानल होतोस , एकदम भावनेच्या  आहारी जातोस  आणि नाही म्हणजे  कधी कधी एकदम कठोर  वाटतोस मला . "
"काही पण हा गंधाली , पुस्तके वाचून तू जास्तच  परीक्षण करायला माणसांचे सुद्धा . मी काय असा आहे ?"
"हो अलबत , तू असाच आहेस . कधी तरी मी नक्की प्रूव्ह  करेन हे . सोदाहरण, संदर्भा सहित  स्पष्टीकरण."
"बघू बघू . आता मला बरे वाटतय मग पेक्षा . मूड ठीक झालाय . आणि तू म्हणालीस न कि अजून ६ महिने आहेत , खरे आहे , दिलासा वाटतोय मला आता त्याचा . आणि मी ठरवले आहे कि मी सी ए च होणार . मला हि आवडेल आणि घरातच राहता येयील . पिढीजात वारसा सांभाळतो ."
"चांगले आहे , पण मला आवडले असते जर तू चित्रकलेचा हि वारसा सांभाळला असतास तर :)"
"गंधाली ….?"
"जावू दे रे , असाच म्हणाले . काढत जा रे अधून मधून , भारी काढतोस तू , ए चल  न , भेळ  नको , पण चहा तरी . प्लीज नाही नको म्हणू "  
"हो बाईसाहेब , चहा चालेल , आणि तू तसे पण ऐकणार नाहीस कळलाय मला ते आता ."
दोन तास म्हणता म्हणता ३ तास होवून सुद्धा गेला , पण अजय आता उत्साहाने परत अभ्यासाला लागणार होता . गंधाली  नावाप्रमाणेच  होती , अत्तर साराखी दरवळून , मन प्रसन्न  करणारी . अजय च्या मनात एक विचार येवून गेला आणि तो स्वताशीच हसला ,  साहित्यिक वाक्य , संगतीचा परिणाम दुसरे काय , घरी परत आला , विजू दादा बाहेर गेला होता , बाबा पण बाहेर गेले होते . आई एकटीच होती 
"काय रे अजय , भेटली का गंधाली ? काय म्हणतोय तीच १० विचा अभ्यास "
"हो भेटली . सुरु आहे अभ्यास तिचा , ती काय निवांत असते एकदम "
"हो अरे , प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते , अगदी अभ्यास करायची सुद्धा . काही जणांना तणाव मानवतो , काही जण तणाव  नसतानाच चांगले काम करू शकतात "
"हो आई , खरे आहे . विजू दादा आणि बाबा दिसत नाहीयेत "
"बाहेर गेले आहेत . जेवायला आपण दोघेच आहोत . विजू आहे ४ -५ दिवस अजून . मग जाईल तो परत " 
"काय म्हणत होता दादा अजून , मला भेटलाच नाही "
"काही नाही रे , पुढे काय करायचे ते ठरवत होतो ."
"मग ठरले का ?"
"नाही . बाबांचे आणि त्याचे एकमत नाहीये . मी पण जर सहमत नाहीये विजुशी . पण मीच म्हणले कि काय गडबड आहे . अजून ६ महिने आहेत , ते तर पूर्ण होवू देत . जरी पुढे शिकायला जायचे असेल  परदेशी तरी , एखादे वर्षे जाईलच मध्ये नाही का . बघू काय ते नंतर . पटलय त्याला . ते जावू दे . तू नको जास्त विचार करू त्याचा . आता तुझे वर्षे महत्वाचे आहे . आणि एक सांगू तुला , मी इतके मागे लागते तुम्हा मुलांच्या कारण तुम्हाला पुढे जावून सोपे जावे आयुष्य म्हणुनच रे . उद्या तुला पण असे नको वाटायला कि सी ए व्हायचे म्हणून कॉमर्स  घेतले आणि नुकसान झाले वगैरे .  या वर्षी चांगले मार्क पडले तर तुझा आत्मविश्वास वाढेल . लक्षात ठेव . "
"हो ग . जेवायला काय आहे आज "
अजय नि शिताफीने विषय बदलला . पण आई अजून बाहेर यायला तयार न्हवती 
"हे बघ अजय , मी तुला पण चित्रकला शिकायला नाही कधीच म्हंटले नाही . तू ती कला जोपास , पण कला किंवा आवड म्हणून . पण अभ्यास आणि करियर बाजूला ठेवून नाही "
"आई , हो… मी लक्षात ठेवेन ग . आता जेवू यात का ? भूक लागली आहे "
"का आज भेळ  पार्टी न्हवती वाटते "
"तुला बरे माहित आहे "
"तू सांगत नसलास तरी गंधाली  सांगत असते, मला आणि तिच्या आई ला सगळे . त्यांच्या घरातले सगळे लोक म्हणूनच मला आवडतात . स्वच्छ आणि स्पष्ट आहेत , लपवा छपवी  काही नाहीच मुळी . म्हणूनच माझ्या दोन्ही  मुलांनी मैत्री केली त्या घरात तर मला  आवडलच. "
अजय आणि आई मध्ये इतका  संवाद आजच झाला होता .    आई हे आज बोलली कारण कदाचित तिला विजू दादाची खात्री नाही वाटत आहे , आणि आपल्या कडून त्या सगळ्या अपेक्षा अजून हि आहेत असे तिला वाट असेल . 
गंधाली  आणि अजय दोघांची हि वर्षे हा हा म्हणता संपली . अजय नि सुट्टीचा मोठा प्लान बनवला होता . पण गंधाली  मात्र सुट्टी लागल्या लागल्या गावाला  पळाली  होती १ महिन्यासाठी. अजय सध्या तरी घरीच होता . पेन्सिल , रंग , ब्रश आणि कॅनवास हेच त्याचे विश्व होते . सकाळी  टेनिस . आराम हेच सुरु होते . विजू दादांनी  नुकतीच शिक्षण संपवून नोकरी सुरु केली होती . त्यामुळे  घरात हि छान वातावरण होते . एकंदरीत सगळे शांत होते . अधून मधून गंधाली  ची आठवण यायची त्याला , ती परत आल्यावरचे  बेत त्याने ठरवले होते. गप्पा हि बाकी होत्या . त्याची नुकतीच सोनालीची मैत्री झाली होती . तीहि  त्याच्या सोबत सी ए चा अभ्यास करत होती , आणि क्लास मध्ये ओळख झाली त्यांची . ती या शहरात नुकतीच आली होती . हे सगळे त्याला गंधाली  ला सांगायचे होते . काही हि बिनधास सांगावे आणि गंधाली  नि ते ऐकावे आणि  मनात जपून ठेवावे . मैत्रीण हवी तर बस अशीच , असे वाटले त्याला . 
गंधाली  आणि अजय , आपल्या आपल्या वेगवेगळ्या वाटेने जायला लागले होते ,  एकमेकांमध्ये असलेले गुण दोष , आणि फरक जाणवेल इतके मोठे झाले होते ते आता . पण तरी हि मैत्री , मात्र आहे तशीच होती . एखाद्या मित्राशी जितक्या मोकळ्या पणे  वागता येयील तशीच गंधाली  होती त्याच्या साठी आणि तिच्या साठी सुद्धा , एक मनाचा  कोपरा आपल्या या मित्रासाठी राखून ठेवलेला होता .
आयुष्य असाच साधे सोपे सरळ  असते तर मग काय , सगळच छान झाले असते . पण रिझल्ट  यायचे अजून बाकी होते आणि सारेच आतुरतेने त्याची वाट पाहत होते . 
क्रमश:
- — ©शीतल जोशी



Comments

Popular posts from this blog

Our visit to an experimental School- Prayog Bhumi

खिडकीतला पाऊस आणि मी !!!!(Poem/Kavita/Mukta Chhand)

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी