एक गोष्ट त्यांची पण !!!: भाग -२

भाग -
आपल्याला अशी अधून मधून स्वप्न पडतात , आणि कदाचित आपल्याला आवडतात सुद्धा.  थोडेसे झोपेतच त्याच्या मनात हे विचार येत होते . आकाश स्वप्नाळू  कधीच नव्हता , पण हि अशी स्वप्ने त्याला आज काल आवडायची. आपण एकटे नाही आणि आपली काळजी करणारे आपल्या जीव भावाची व्यक्ती आहे  याची जाणीवच होती ती.  
 हे स्वप्न आहे कि सत्य ? पण डोळ्यांवर ची झोप अधिक प्रभावी ठरली आणि जागा झालेला आकाश   झोपी गेला . इरा खरच आली होती  का ? कि परत केवळ स्वप्न आणि  भास ?
 अंदाजे तास तरी झाले असतील, आकाशाला जाग  आली ; म्हणजे अजूनही नुसताच पडून राहावे असे त्याला वाटत होते.  इरा नि येवून उठवावे आणि आपले स्वप्न खरे असावे अस हि त्याला वाटत होते , पण …. 
तो उठला , आजूबाजूला नजर फिरवली आणि एकदम प्रसन्न वाटले त्याला , घरी आल्यासारखे . काल गडबडीत त्यानी आपली खोली निवांत पहिलीच  नव्हती  . आता पहिली आणि स्वताशीच हसला तो . 
आपल्या सगळ्या छोट्या छोट्या आवडी निवडी किती जपल्या आहेत या पोरीने. खोलीची रंगसंगती , चादरीचे रंग इथपासून  ते अगदी …, अरेच्चा , निशिगंध आणि गुलाबाची फुले सुद्धा आहेत कि इथे  फुलदाणीत . खर तर "फ्लॉवर  पॉट म्हण्याचे होते मला , पण इरा आठवली , इथे असती तर म्हणाली असती काय रे मराठी वापरायची लाज वाटते कि काय आता तुला :). 
 आकाशचे अलीकडे असच होत होते , सगळे संवाद स्वताशीच , विचारांच्या गर्दीत तो एकटाच :)
आकाश आवरून बाहेर आला        
"शुभ प्रभात निमिष "
"काय रे आकाश, सकाळी सकाळी  इरा चढली का तुला , शुभ प्रभात वगैरे "
 " , पण ती आली होती का रे सकाळी "
"नाही "
"नक्की ?"
"हो आकाश, पण तू असे का विचारतो आहेस"
"इरा नक्की आली होती, या वेळी भास नाही, खर होते ते .  प्लीज , सांग ना ""
"पण तुला असे का वाटतय , कि इरा आली होती "
"हे बघ , मला निशिगंध आणि गुलाब किती आवडतो ते तिला माहितीये आणि  रात्री ती फुले खोलीत नव्हती आणि आता आहेत . "
"शाब्बास , व्योमकेश बक्षी , अजून तुम्ही हुशारी टिकवून आहात तर "
"म्हणजे इरा आली होती , मग कुठाय आणि मला उठवता का गेली ?"
"अरे हो हो , गेलीये पण येणारे , अर्ध्या तासात येते म्हणाली . आणि ब्रेकफास्ट , म्हणजे न्याहारी एकत्र करू म्हणाली . बघ ना , तुमच्या दादा- ताई च्या प्रेमात मला उपाशी ठेवलाय  , जाऊ दे चहा घेणार तू , मी करतो एकदम सुंदर पैकी चहा आणि मग देतो तुला सुंदर पैकी कपातून "
"अरे चहा तर पाहिजेच, आणि काय रे अजून हे सुंदर पैकीच वेड  आहेच  वाटते , आणि कम ऑन तू आणि सकाळ पासून उपाशी , थापा नको मारू आता , लग्न दहा दिवसावर आहे , सुधारा आता "
"अरे म्हणजे काय खास नाही पण खाल्लाय जर आपले उगाच एवढस,खाली जावून , इडली सांबर, वडा पाव , एक पोहे आणि दोन चहा आणि आणि  काही नाही , बस तू मी आलोच आपला चहा घेवून"
  "वाह , निमिष , तू अगदी गृह कर्तव्य दक्ष झाला आहेस हा , चहा एकदम फक्कड , अगदी मला हवा तसा
"काय करणार बाबा, तुझ्या बहिणीशी संसार करायचा आहे .  तुला गम्मत सांगू , ती खूप आनंदात आहे रे तू आलास म्हणून . मला दहा वेळा बजावून गेली कि तुला कसा चहा आवडतो ते, पार पकलो मी पण मला छान वाटत होते कि या सगळ्या घडामोडी नंतर हि तुम्ही दोघे मात्र अजून हि तितकेच जवळ आहात.  कदाचित जास्तच . मजा  सांगू तू येणार म्हणून तिने आलं  , चहा मसाला  आणि चहाची  गवती पात सुद्धा आणून ठेवलीये घरात . मला म्हणाली त्याला चहा करून दे बाकी काय हवे नको बघ  , तिकडे सगळे स्वत: करतो. आणि तिने पाण्याचा माठ भरून  ठेवलाय  काल , आणि त्यात वाळा आणि मोगऱ्याची फुले सुद्धा टाकली आहेत , तुला आवडतात म्हणून . मला तर वाटते , त्या बायका नवरा साठी कसे हरतालिका , वट-सावित्री वगैरे करतात तसे अशी बहिण  मिळायला तू काही तरी व्रत केले असशील . "
"हो खर आहे हे. फार जीव आहे रे तिचा माझ्या आणि माझा सुद्धा तिच्यावर . आता तुला सोपवातोय तिलाम्हणजे काळजीच नाही.  खरच , मला कळतंय रे , मी आलोय म्हणून ती खुश तर आहेच , पण मला इथे, आमच्या घरात  नसून सुद्धा , घरी आल्याचे सुख मिळावे म्हणून झटतीय ती . मला कळतंय कि मला इथे राहा असे सांगण्यात तिला खूप मनस्ताप होतोय , पण मी बोलेन तिच्या शी . I am comfortable here and she should not worry about it. She should enjoy these days and my stay in India. anyways whats plan for today "
"अरे,  राहा रे माझ्या सोबत मजेत.  आपण पण किती वर्षात असे निवांत नाही भेटलोय , आणि माझ्या इथे तरी कोण आहे रे! आई - बाबा कधी येतील काय माहित , आज- उद्या असे त्यांचे सुरु आहे . जवळच आहे येतो वगैरे वगिरे आणि भावंडे काय आहेत पण आणि नाहीत पण.  मी पण जाम खुशीत आहे रे , आणि खरे सांगू दु: एकट्यानं जगू शकतो रे , पण आनंद वाटून घेणारे कुणी नसेल तर बाकी काही उरत नाही मग, आनंद सुद्धा .  जावू दे. साला बघ तू आलास बृहस्पती कि हे असे होते तत्वज्ञान वगैरे वगैरे . पण हे बृहस्पती  , हे ऋषिवर आपण स्नान करून घ्यावे . तो पर्यंत कुमारी इरावती आपली न्याहारी घेवून प्रवेश करेलच . तूर्तास आपण स्नानगृहा कडे प्रस्थान करावे आणि मी आपल्या बल्लावला दुपारच्या  भोजनाच्या सूचना देवून येतो"
आकाश  हसत हसतच आता गेला, निमिष काही तरी बारीक सारीक कामात होता , तेवढ्यात फोन ची रिंग वाजली
"निमिष, इरा बोलतीय "
"कळले , खास रिंगटोन ठेवलाय तुझ्या साठी , रडक्या बाळाचा , हि हि "
" , नेहमी नेहमी काय रे तेच तेच विनोद , इकडे  राडा झालाय आणि मी जाम  कातावालीये"
" अग हो, हो जर थंड हो .  काय झाले ते सांग "
" अरे यार , ह्यांनी केळवणं ची आमंत्रण घेवून ठेवली आहेत , तरी मी सांगितले होते कि जे काय असेल ते आकाश यायच्या आता संपवा . आधी त्याला तुझ्या कडे उतरवलाय , त्यात आम्ही त्याला सोडून हे असे  जायचे , केळवण खात फिरायचे , कसा तरीच वाटतय रे . तो पण  आमचा आहे कि . त्याला इकडे बोलावून मी काय केलाय चांगले कि वाईट , म्हणजे त्याला आनंद वाटतोय कि त्रास होतंय हेच कळत नाहीये रे "
"इरा , शांत हो आणि तू जा , मी  आकाश ला घेवून बाहेर जातो , ब्रेकफास्ट करतो , एक काम करीन आमच्या एक दोन दोस्ताना पण बोलावतो म्हणजे बेस्ट. आणि त्याला सांगेन मी कि तुला आता यायला जमत नाहीये "
"बरे , तू म्हणतोयेस तर तसच करु. मी दुपारी जेवण झाले कि येते. आपण चार वाजता बाहेर पडू . चल ठेवते आता "
"हो, काळजी घे , आणि शांत पणे  घे "
इराला , आता से वाटत  होते कि आकाश ला इकडे येवून खरच आनंदी आहे  ?
"इरा , आटप लवकर "
"हो , आलेच आई, पाच मिनिट "
इराचे घर पाहुण्यांनी भरले होते.   घर माणसांनी , आनंदानी आणि वेगवेगळ्या सुगंधानी भरलेले , फुलांच्या , अत्तरांच्या , तोरणाच्या , होमाच्या , आणि वेगवेगळ्या  गोड तिखट तळपच्या वासानी  . फक्त एक गंध तिथे उणा  होता , राखीचा , भाऊ बिजेच्या औक्षणाचा . पण इरानि आई बाबांना  सांगितले कि होते कि आकाश येयील आणि काही जबाबदाऱ्या  तोच पार पाडेल . खर तर घरच्यांनी पण तो आला तर हवाच होता , पण पाच वर्षात भेट नाही म्हणून कुणालाच अवघड वाटायला नको म्हणून त्याने सध्या तरी निमिष कडे राहावे असे आई ला वाटत होते . तिने इराला काल  पासून शंभर वेळा तरी , कळत नकळत त्याच्या बद्द्ल विचारले होते . इराला पण ते जाणवले , पण उघड पणे   आई बाबा दोघे पण बोलणार नाहीत हे हि तुला ठावूक होते 
"इरा, अग  काय कुठे हरवली आहेस , पोचलो कि आपण . "
"काही नाही बाबा असच . आकाश आला आहे काल "
"हो माहितीये, आम्हाला . पण आता त्याला बोलवणे खरच शक्य नाहीये बेटा"
"शक्य आहे, पण तुम्हालाच नकोय. जावू दे. ठरल्या प्रमाणे मी संध्याकाळी त्याच्या सोबत खरेदी ला आणि मेनू ठरवायला जाणारे आहे . ती जबाबदारी त्याला द्यायची असे ठरलाय आपले . तुम्ही येतंय का ? बघा  जमले तर . कमीत कमी मेनू ठरवायला तरी या "
"बघू , आता तर आता चल , आणि जास्त विचार नको करू , फक्त आनंदी राहा "
"आकाश शिवाय,  आनंदी  , हं  "- इरा 
आता नेहमी प्रमाणे आईला मध्ये पडावेच लागले 
"इरा , बास  आता,   हा विषय इथेच बंद कर. आकाश तुझा भाऊ आहे आणि आमचा कुणीच नाही का ? पण आता हि वेळ नाहीये. आपण घरी गेल्यावर बोलू . रागावू नको , पण तुझ्या कडे आता लोक आता तुझ्याकडे  नवरी म्हणून बघतात, मग तू पण छान आनंदी असायला नको का? बर तुझ्या मर्जीने तुझ्या आवडत्या माणसाशी लग्न होतंय आणि तुला हवे तसे आकाश  पण आलाच आहे कि आता . "
" , कळतंय मला, चल आता  आई "
इराला वाटत होते कि निमिष नि काय सांगितलाय आकाश ला काय माहित . 
इकडे निमिष च्या घरात,  
"आकाश , चल  रे आपण बाहेर खावून येवू माझी एक दोन काम पण करायची आहेत ती पण करू "- निमिष 
" अरे पण  , इरा ?"
"तिला कळवले आहे मी. ती दुपारी वाजता येयील आता ,"
'बर , चल मग "

आकाश आणि निमिष बाहेर पडले. आकाश आजूबाजूला पाहत होता. वर्षात बराच फरक पडला आहे कि शहरात पण . जाता जाता त्याला बरेच परिचित आणि खूप सारे अपरिचित अश्या खुणा दिसत होत्या . आणि इतक्यात त्याला ती,  दिसली तीच हि बाग   , आणि त्याला एकदम आठवले  , असे वाटले कि इरा  आहे त्या झोपाळ्यावर.  त्याचे लक्ष जर इकडे तिकडे झाले आणि "इरा आआआ …. "  आकाश जोरात ओरडला , तेव्हाच नाही आता सुद्धा …… 

Comments

Popular posts from this blog

Our visit to an experimental School- Prayog Bhumi

खिडकीतला पाऊस आणि मी !!!!(Poem/Kavita/Mukta Chhand)

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी