प्रिय पु ल काका (article/lekh)
प्रिय पु ल काका ,
लहानपणी
,मला
रोज रात्री गोष्टी ऐकत झोपायची सवय होती , मग मी हळू हळू मोठी
झाले , गोष्ट
ऐकायची सवय मात्र कायम राहिली , पण तो जादू करणारा आवाज
आता बदलला होता , तो
होता तुमचा … पुलकीत
आवाज . माणूस लिखाणानी आणि आपल्या आवाजांनी कायम अमर आणि चिरंजीवी राहू शकतो हे तुम्हीच दाखवून दिले
. आयुष्यात असे किती पण अवघड, उदास प्रसंग आले , आणि असे वाटले कि आज
तरी काय झोप लागणार नाही आणि वाचायचा मूड पण नाहीये तर तुमचे कोणतही कथाकथन किंवा
एकपात्री निवडावे आणि ऐकावे , मन प्रसन्न होते , आणि माणूस नावाच्या प्राण्यात
पुन्हा एकदा प्रेमात पडते . तुमच्या काही काही लिखाणानी माझ्या वर फार सूक्ष्म
संस्कार केले आहेत . तुम्हाला गम्मत सांगू , तुमचे चितळे मास्तर मला
खरच भेटले होते , ज्यांनी
मला शिकवले , आणि
माझ्या बाबा न हि , ते
पण कोणता हि विषय उत्कृष्ट शिकवू शकायचे , आणि तेव्हा पासून तुमची
हि सगळी पात्रे , माणसे
अगदी पूर्ण नाही तरी थोडी बहुत तरी सापडायला लागली . तुमच्या मुळे , माणसे वाचायचा छंद जडला
. नाटके खरे तर बघायची असतात (तशी मी घरात कधी कधी ती करते सुद्धा ), पण ती वाचायची आवड मला
का लागली माहितीये , कारण
तुमचे "तुज आहे तुजपाशी " , माझ्या हातात पडले, आणि मी पुन्हा पुन्हा
वाचून काढले . मी खूप नाटके पहिली किंवा वाचली त्या नंतर , पण का ठावूक या नाटकाशी
माझे वेगळे नाते आहे , तीच
पात्रे मला दरवेळी नवे काही तरी देवून जातात . काकाजी ,
आचार्य, उषा , सतीश , गीता , श्याम जणू माझे
कुटुंबातले च आहेत . दर वेळी वाचताना , प्रत्येक मधला एक नवा
विचार आणि भूमिका सापडते आणि जगण्याचा अर्थ हि
तुमचा
"नंदा प्रधान ","बबडू " "तो ", "भय्या नागपूरकर
"माझ्या मनाला फार चटका लावून गेले . एक मात्र नक्की ह,
"ती
फुलराणी" मधील "तुला शिकवीन चांगलाच धडा " हे स्वगत , नाटकात काम करायची आवड
असलेल्या प्रत्येकाला , लहान
पाणी करून पाहावे असे वाटतच , आणि ती फुलराणी मात्र
पक्की आपली मराठी वाटते बर का , भाषांतर असून हि .
प्रवास वर्णन हे किती रंजक असू शकते ते पण तुम्हीच सांगितले ,त्यामुळे एका नवा
साहित्य प्रकार आवडला . बटाट्याचा चाळी मधले चितन , बरच काही विचार करायला
लावून गेली . आणि मराठी वांग्मायाचा गाळीव इतिहास , उपहासत्मक विनोद
किती सकस असू शकतो याचे उत्तम उदाहरण आहे . तुम्ही साहित्याची इतकी
दालने खुली करून ठेवली आहेत न , कि कोणताही साहित्य
प्रकार निवडावा आणि तुम्ही तो किती मनोरंजक पण काही हि गाजावाजा न करता एक विचार
देवून ठेवणारा केला आहे . मी दर वर्षी तुमच्या बद्दल लिहित आलीये , पण शब्द आटले तरी
तुमच्या बद्दलचे पेम आणि आदर कधीच कमी होणार नाही . अलौकिक प्रतिभा असूनही , पैश्याचा मागे न लागता , केवळ माणसांवर प्रेम
करणारा आणि आपल्या साहित्य तून निरोगी मने तयार करणारा हा कलाकार . अर्थात तुमचा
संसार तुमच्या पत्नीने इतका समर्थ पणे सांभाळला , म्हणून तुम्ही आम्हाला
इतके भेटत गेलात.
तुमची
पुस्तके आणि तुमचा आवाज हा माझ्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे , इयत्ता चौथी पासून ते
आज पर्यंत तुमचे लिखाण माझ्या साठी अजून तितकेच ताजे टवटवीत आहे आणि काही तरी
देवून जाणारे आहे .
कारण
कदाचित माझ्या वयानुसार त्यातून मला नवीन काही तरी सापडेल असे काही तरी तुम्ही
त्यात दडवले आहे . चौथीत असताना मला त्यातले किती कळले असेल ते गुळाचा गणपतीच जाणो
. पण माझा "गटण्या " होण्याची सुरवात मात्र झाली हे नक्की बर का . आज
काल , समोरच्याला
कळणारे आणि भिडणारे असे लेखन बहुधा चांगल्या लेखनात मोडत नाही , सतत काही तरी माहितीपर, तात्विक असे तरी लिहिले
जाते किंवा मग ज्याला विनोद म्हणावे कि नाही अश्या प्रकारचे विनोद , कार्यक्रमात आणि
लिखाणात दिसतात , म्हणजे
अगदीच निराशावादी चित्र नाहीये तसे, तुम्ही कौतिक करावे असे
काही चित्रपट आणि नाटके येत आहेत अजून , आमची मराठी अजून तशी
जिवंत आहे , पण
नवीन पुस्तकांचे म्हणाला तर जर अवघड चित्र आहे . रंगून जावून वाचावे किंवा
ज्यामुळे वाचनाचे आवड निर्माण व्हावी असे तुमच्या सारखे लिहायला कधी जमेल का हो
आम्हाला ? मान्य
आहे कि तुम्ही आणि तुमचे लिखाण हे कालातीत आहे , पण आमचे दुर्दैव कि
आम्ही तुम्हाला प्रत्यक्षात भेटू नाही शकलो , पत्र व्यवहार करू नाही शकलो
, असे
कधीच नाही का होणार कि तुम्ही परत भेटाल ? . कसे झालाय माहितीये , पांडुरंग तोच आणि तिथेच
असून पण वारकरी दर वर्षी नियमाने जातात कि त्याला भेटायला , तसे किती हि वेळा वाचले
तरी तुमच्या लिखाणाची वारी करायची हे आमचे पण व्रत आहे , कारण हि ओढच जबरदस्त आहे
.
माझे
ना जरा गटण्या सारखे आहे , किती
हि लेखक वाचले न तरी " पु ल आणि ____" smile emoticon
मी
ठरवले आहे आता कि आपल्याला मिळालेला हा आनंद , वाटायचा आपण , म्हणूनच , ज्यांना कुणाला पु ल न
भेटायचे आहे , त्यांच्या
साठी , आमचे
दरवाजे नेहमीच खुले आहेत
तुज आहे तुजपाशी असे
म्हणताना
तुम्ही
आम्हाला काय दिले हे आम्हासच ठावूक
आमच्या
पाशी , आजू
बाजूला पण हे सगळे होताच
पण
कोणत्या नजरेतून पाहायचे ते तुम्ही शिकवलत
गुरु
दक्षिणा काय देणार तुम्हाला आम्हाला 'बस इतकाच सांगू कि
तुम्ही
माणसांवर , साहित्येवर
, कवितेवर
, संगीता
वर आणि आयुष्यावर भरभरून प्रेम केले
तसच
जमल तर करू आम्ही पण , तुमच्या
इतके नाही जमणार कदाचित
पण
१०० पर्सेंट नाही तरी छोटे मासे होऊ कि आम्ही
- तुमची
एक वाचक

Comments
Post a Comment