एक गोष्ट त्यांची पण : भाग सातवा

भाग सातवा 
आई आणि इरा हॉस्पिटल  मधून अक्षरश: पाच मिनिटात आल्या आणि आकाशाची विचारांची मालिका थांबली.  वातावरण हलके राहावे म्हणून असेल किंवा मुळातच स्वभाव म्हणून असेल पण इरानि गप्पा सुरु ठेवल्या होत्या. तसा हि निमिष गाडी चालवत असल्यामुळे तिला चिक्कार निवांत वेळ होता.  
" वर्षात पण खूप बदल वाटतोय मला इकडे "- आकाश 
"म्हणजे काय, अरे वर्षे हा मोठा काल  आहे.  दोन वर्ष मध्ये generation gap जाणवते आज काल, हो किनई आई  "-इरा नि आईला हि संभाषणात आणण्याचा प्रयत्न केला 
'आजूबाजूला बदल होत असतातच आकाश, आपण स्वीकारतो कसे त्यावर आहे सगळे . मी एका छोट्या घरातून आणि छोट्या शहरातून आले होते आई बाबा सोबत. शहरात थोडे जास्त पैसे मिळतील आणि आम्हाला शिक्षण चांगले मिळेल या हेतूनी  . या शहरात नवीन होते, किती हि हुशार असले तरी सुरवातीला बुजलेच मी. तुझ्या काकांनी आर्थिक मदत केली आणि तुझ्या बाबांनी खूप सांभाळून घेतले मला. तुझ्या बाबांनी आत्मविश्वास दिला मला या शहरात वावरायला. अर्थात त्या वेळा आजच्या इतके मोठे , वाढलेले आणि कॉस्मो नव्हते हे शहर. तुझ्या आजी नि तर माझा कायापालटच केला. एकच वाक्य म्हणाल्या त्या , शहरे आणि आजूबाजूची माणसे बदलत राहतात, आपण हि काळा प्रमाणे बदलायचे, पण आपली नैतिक तत्वे सांभाळून. ज्याच्या कडे ज्ञान , प्रामाणिकपणा आणि माणूस जोडायची कला आहे ना, तो पृथ्वीच्या पाठीवत कुठे हि राहू शकतो, सुखात . माझ्या आयुष्यात हे लोक आले नसते तर माझे आयुष्य नक्की वेगळे असते कदाचित लौकिक अर्थाने सुखी असते, पण इतकी समृद्ध असते कि नाही कुणास ठावूक? आयुष्यात काही वेळा चुकले    असेन मी सुद्धा, शेवटी माणूसच आहे. पण जगताना  खूप  निर्णय घेण्यामध्ये  खूप मदत केली मला तुझ्या आजीने, बाबांनी आणि काकांनी . आज तुझा काका, अवि हवा होता.  त्याला खूप आनंद झाला असता , तुम्हा दोन्ही भावंडांचे एकमेकांवर असलेले प्रेम बघून . त्याचे आणि तुझ्या बाबाचे पण असच होते अगदी. पण आता मला या शहरात राहायचा कंटाळा आलाय. कुठे तरी जवळ पास पण निवांत छोट्या गावात राहावे असे वाटतय ". 
"आई, अजून इतक्यात तरी अहि नाही . मला एकटे पडायला होईल."
"इरा, अग एकटे असायला काय झालाय, निमिष आहे कि हक्काचा आता. त्याला कटकट कर आता :) आणि आकाश पण आलाय कि परत आता, बरोबर आहे आकाश आणि अग मी काय लगेच चाललीय का."
आज आकाशाला आई वेगळीच वाटत होती थोडी. त्याला वाटत  पाच वर्षात शहरच काय,  पण आई पण थोडी बदलली आहे असे त्याला वाटत होते. स्वतःबद्दल, आपल्या घरंच्याबद्दल आई इतकी मोकळेपणानि कधीच बोलली नाही. आजी, काका, ती आणि बाबा यांचे जुने फोटो खूप वेळा पहिले होते आम्ही.  कधी कधी तिच्या सोबत सुद्धा.  ती पाहताना रमायची, पण बोलली कधीच नाही,  कधी आठवणी सांगितल्या नाहीत . आई खरच  एकटी पडलीये का? कि विचार करून करून थकलीये ती  कि आपले जे काही बोलणे झाले तेव्हा पाच वर्षापूर्वी, त्यामुळे  थोडी बदलली आहे. कदाचित आज मी तिला थोडे समजून घेवू शकतो, कदाचित काही गोष्टीसाठी माफ हि करू शकतो. तेव्हा मी पण पंचविशीतच होतो किकाही का असेना पण आता मी थोडे समजून घायलाच हवे. मी आणि ते  दूर झालो तरी, इरा त्यांना दुरावली नाही  हेच विशेष. मलाहि तेच तर हवे होते. आता तर मला उलट , त्या दोघी एकमेकांच्या जास्त जवळ आल्या आहेत असा वाटतय . Two is a company and three is crowd and may be that third personwas me . आणि एक गोष्ट त्याच्या लक्षात आली कि आई नि त्याला परत येण्या साठी सुचवले आहे बोलता बोलता. खरच मी यावर काहीच विचार नाही केला आहे अजून . 
"दादू , तू कसा रे असाच आहेस , निम्म्या वेळा हरवलेला स्वत:मधेच . लक्ष दे आमच्या कडे . तू मला काय घेवून  देणार  ते बोल . डॉलर  मधले बजेट आहे "
"घे तुला काय हवे ते, मी कधी नाही म्हणालोय का . पण मला असे सांगता नाही येणार  काय ते . असे कर आई बाबांनी एखादा हट्ट पुरवला नसेल तर तो माझ्या कडून वसूल कर, म्हणजे सगळेच खुश "
"डन , मग माझे ठरलच आहे "
"हे बरे आहे, तुम्हा बहिण भावांचे.   काय हो काकू,  म्हणजे लग्न नंतर मी पण एखादा हट्ट  नाही पुरवला तर चालेल नाही का , तिचा भाऊ  आहेच कि , म्हणजे तेव्हा पण सगळेच  खुश "
" असे नाही हा, चालायचे जावई बापू. माझ्या बहिणीची तक्रार येवून उपयोग नाही"
एकंदरीत सगळे हसत खेळत पार पडत होते . निमिषचे आई बाबा पण आले होते . खूप बरे वाटले 
त्यांना पण . ह्या सगळ्या मुलांना त्यांनी लहानाचे मोठे होताना पहिले होते  आणि आकाश आणि इराचे विशेष  कौतुक होते त्यांना.  तसे ते आकाशाला म्हणाले सुद्धा . आमच्या माघारी , आता निमिषची काळजी नाही , तू आणि इरा आता मित्रच नाही तर नात्यांनी पण जोडले गेले,खर तर निमिष लाही त्याची भावंडे आहेत, पण त्यांचे नाते तुमच्या सारखे नक्कीच नाही. आमचीच मुले आहेत, म्हणजे वाईट कुणीच नाहीत , पण एकमेकासाठी इतका वेळ आणि त्याग करणे त्यांच्या स्वभावातच नाही. गरजेला धावून येतील हि , पण ते तर रक्ताच्या नात्याची ओढ म्हणून . 
अजून एक दिवस तर गेला, रात्र सुरु झाली कि आकाशच्या स्वताशीच गप्पा सुरु . उद्या येतो असे आपण म्हणालो आहे खर पण , … काय होईल , जमेल का आपल्याला?  कधी कधी जास्त ओळखीच्या ठिकाणीच गुदमरायला होते कारण अपेक्षांचे ओझे पण तितकाच मोठे असते ! . 
सकाळी आकाशला  थोडी उशीरच   जाग  आली. बाहेरच्या खोलीत हसण्याचे , गप्पाचे आवाज येत होते . बाबा इतक्या सकाळी कसे आले आहेत , आवाज नक्की त्यांचाच  आणि आता इथे कशाला भास होतील , आकाश बाहेर आला, निमिष आणि बाबा गप्पा मारत होते . गेल्या वर्षात कधी तरी विडीओ chat वरच पहिले असेल . 
"शुभ प्रभात, साले बाबू , चहा घेणार का ?"- निमिष 
"शुभ प्रभात, चहा चालेल , पण आज मीच करतो आपल्या सगळ्यासाठी. बाबा तुम्ही इतक्या लवकर कसे ?, म्हणजे आई म्हणाली होती, तुम्ही याल असे .  पण मला वाटले  दुपारी याल " आकाश ला वाटले , काय बोलतोय हे  आपण , साधे तुम्ही कसे आहेत हे पण नाही विचारले.  सुचत नाहीये म्हणून चहा करण्याचा बहाणा.
"अरे, लवकर आलो मुद्दामून. आईला म्हंटले, आकाश ला थोडे लवकर घेवून, तसाच कार्यलय मध्ये जावून येतोमग तसेच घरी जावूखायला पाठवलाय आई नि.  आज तुम्हा दोघासोबत नाश्ता. आकाश, थोडा वेगळा दिसायला लागला आहेस; म्हणजे थोडा खराब झाला आहेस. अर्थात तुला प्रत्यक्ष बघून फार वर्षे झाली .पण बरे झाले आलास आणि घरी येतो म्हणालास हे तर उत्तम. तिथे गरज आहे तुझ . शेवटी इरा म्हणाली तेच खरे "
"काय म्हणाली इरा?, आणि तुम्ही खूप दिवसांनी पहातंय म्हणून खराब वाटतोय , पण असे काही नाहीये , सुरवातीला जर सेट होई पर्यंत गडबड होती, आता तसे निवांत आहे . पण हे इरा काय म्हणाली ?"
"काही नाही रे, तिनी मला प्रॉमिस  केले होते कि तु नक्की येशील आणि खरे केले तिने . खर तर आम्हीच  तू आलास त्या दिवशीच तुला घरी आणायला हवे होते. पण तू येशील कि नाहीस असे वाटले. मग इरानिच सुचवले इथे राहायचे "
"अरे, मी काही नाही येणार घरी बाबा. उलट मला वाटले  कि इतके लोक घरात आणि त्यात मी इतक्या वर्षांनी आलो तर सगळ्यान अवघडल्यासारखे वाटेल. उलट बरच झाले कि, तुम्हाला , आई ला , इरा ला , निमिष  ला निवांत भेटता आले, मला.
"मला माहितीये बेटा, सगळे एकदा पूर्ववत नाही शकणार. आपल्याला वेळ द्यायला हवा. काही गोष्टी सहवासाने सुद्धा बदलतात. मी पूर्वीच खर तर, माझे मत व्यक्त करायला हवे होते. पण गोष्टी अश्या घडल्या कि मी काही ठाम भूमिका घ्यायच्या मनस्थित नव्हतो. तू आणि अनू एकमेकांना अनुरूप होता असे मला वाटत होते आणि इराचे म्हणशील तर तिला आपल्या घरात तेच सगळे हक्क आणि अधिकार होते जे तुला पण होते. इराच्या बाबतीत मी पण जर हळवा  आहे  आणि जे घडत होते त्यातले तिला काहीच कळू नये म्हणून माझी धडपड सुरु होती. आणि म्हणूनच मला तुझा निर्णय पटला होता, पण मी ठाम पणे तुझ्या पाठी शी उभा नाही राहू शकलो. निर्णयाची जबाबदारी टाळता  यावी म्हणून अनेक महत्वाच्या क्षणी मौन होतो, आयुष्य भर.  हेच चुकले माझे .अनु काही खलनायिका नव्हती  पण अशी महत्वाकांक्षा असलेली  माणसे, कधी कधी टोकाला जातात आणि केवळ स्वतचा विचार करतातयाचा मला अनुभव आहेच कि. जे  झाले ते योग्य झाले  चुकून जरी इराला जास्त काही कळले असते  तर ती पोर पार खचून गेली असती . तिच्या मूळेच  सारे घडले असे तिला वाटले असते . आणि खर सांगू , काही काही गोष्टी अश्या असतात कि ज्यांचे ओझे आपण आयुष्यभर बाळगतो.ती वेळ माझ्या मुलांवर   येवो असू दे , मी काय बोलत बसलो हे "
"असे काही नाही रे   बाबा , उलट मला बर वाटले कि तू इतका मोकळा बोललास माझ्या सोबत. कदाचित इतका वेळ गेल्या मुळे  आपण सगळेच आपल्या आपल्या पद्धतीने विचार करत होतो  जे घडले त्याचा . काही गोष्टी घडतातच, बदलता  नक्की नाही येत. पण जे होते ते चांगल्या साठीच. कदाचित मी दूर होतो म्हणून तुम्ही तिघे थोडे जास्त जवळ आलात, तुम्ही मुलीची आणि मुली तुमची जबाबदारी निभावली.  अजून थोडा वेळ गेला कि सगळे छान होईल पहिल्या प्रमाणे किंवा त्या पेक्षा हि छान . कदाचित आपण सगळेच एकमेकांना  गृहीत धरत  जातो आणि गुंता वाढत जातो."
"खरे आहे  आणि माझे पण जरा  काही गोष्टीत दुर्लक्ष झाले खरे. पण तू  मला त्याची जाणीव करून दिलीस . नाही तर, मी स्वताला आयुष्यात कधीच माफ करू शकलो नसतो.  तुझ्या आजीला , आणि काकाला मी शब्द दिला होता कि त्यांच्या माघारी मी हे घर दुभंगू देणार नाही.  आकाश , मला असे वाटतय कि तू आता परत यायचा विचार कारावास आणि स्वताच्या पुढच्या आयुष्याचा पण. इरा नि तिचे एक पाऊल  पुढे टाकल आहे . म्हणजे तिची  जबाबदरी संपली असे वगैरे नाही . पण तरीही
किती वाजता निघू यात आपण  "
"आलोच , १०-१५ मिनिट लगेच . बाहेरची काम करून परत येवू , मला थोडे समान आवरावे लागेल , मग जावू , दुपारी आपल्या घरी. निमिष तू येतोस का आता आमच्या सोबत  "
"नको रे , आज आई बाबा येतात , त्यांना आणायला जातोय मी . आम्ही इथे - दिवस राहू , आणि मग नंतर कार्यक्रम आमच्या जुन्या घरीच आहेत . कदाचित , मी फक्त झोपायलाच येयीन आणि कुणी आले तर येयिल. इराकडे पण एक किल्ली आहेच इथली , जर कधी लागले तर वापरा तुम्ही पण "
आकाश आणि बाबा बाहेर पडले. आज आकाशाल खूप छान वाटत होते , आई -बाबा दोघे पण भेटले . मनाची घालमेल थोडी कमी झालीये आता. दुपारी आकाश , त्याच्या घरी आला . वास्तूशी पण आपले एक नाते असते, आठवणी असतात. आकाशाला आठवत होते कि एक वर्षाचा असेल तो, आई बाबा त्याला सोडून एक वर्षे , काका राहत होता तिकडे जाणार होते , वैद्यकीय सेवा दुर्गम भागात पोचावी म्हणून . आजोबांची ती एक अट  होती . आजी सांगायची कि , आई बाबा ची जर टाळाटाळ  होतीये असे लक्षात आले आणि आजोबांनी सांगितले कि , मी आधी म्हणत होतो तेव्हा गेला नाही आणि आता , मुलगा लहान आहे , मग त्याची शाळा असेल हे आयुष्य भर सुरूच राहील. दवाखाना आणि आकाशला आम्ही सांभाळू वर्ष दीड वर्षे . तुम्ही जावून या. तशी आकाशाला आजी आजोबांची सवय होतीच आणि अधून मधून ते इकडे येणार किंवा आजी आजोबा तिकडे जाणार आकाश ला घेवून असे ठरले. काका पण खूप लाड करायचा आपले , आपण तिकडे जायचो तेव्हा. साधारण  वर्षे आणि एक महिने झाले आणि आई बाबा आले . आणि त्यांच्या सोबत एक छोटी, गोड बाहुलीसुद्धा आली . माझी इरा, मला किती आनंद झाला होता तेव्हा. घरात पण खूप दिवसांनी सगळे खुश होते. कारण त्या आधी , आजी आजोबा मधेच खूप शांत शांत असायचे . नंतर मोठा झाल्या वर  कळले कि अवि काका हे जग सोडून गेला त्याचे हे दु: होते . किती लवकर जातो काळ , आणि  आता काही दिवसात इराचे लग्न आहे . 
आकाश घरात आला , घर सगळे तसाच होते , त्याची रूम पण . इरा वर्ष पूर्वी दुसऱ्या  रूम मध्ये शिफ्ट झाली ती तिथेच राहिली , जणू तिने आपल्या साठी केलेला हा पहिला त्याग किंवा आपल्याला दिलेली भेट
"आई दादू आला "- इराच्या आवाजात कमालीचा आनंद ओसंडून वाहत होता. तिने आल्या बरोबर त्याचा आणि सामानाचा ताबा घेतला . घर एकंदरीत नॉर्मल वातावरण होते . आकाश येणार याची कल्पना असल्यामुळे  असेल कदाचित . खूप दिवसांनी त्याला शांत झोप लागली , कसलीच स्वप्ने किंवा भास होता. शेवटी आपले घर ते आपले घर , असे वाटलच त्याला. 
लग्न घरातले दिवस भरभर जात होते , आकाश आल्यामुळे नूरच पालटला होता . सगळी सूत्रे त्याच्या कडे होती आणि आई बाबा थोडे निश्चिंत झाले. इराच्या हट्टामुळे हे घर परत एकत्र आले होते. इरा तिच्या मैत्रिणी सोबत बाहेर गेली होती, बाबा दवाखान्यात . बाकी सगळे पाहुणे इकडे तिकडे फिरायला गेले होते कारण आज तसा कोणताच कार्यक्रम नव्हता.आई आणि आकाश दोघेच होते 
"आकाश , तुला बरे वाटतय रे इथे , म्हणजे राहायला "
"हो , आपल्या घर सारखे सुख नाही बघ जगात.  माझे तर सगळे आयुष्याच या घरात गेलाय. मला छान वाटतय "
"एक विचारू "
"मी परत येण्या बद्दल  काय ठरवलंय असाच "
"हो "
" आता काहीच ठरवले नाहीये, येयीन हि कदाचित . पण जे काम हातात घेतली ते पूर्ण करून किंवा त्याची पुढची सोय लावून यायला हवे . आणि इकडे परत येवून …. तसा काही प्रोब्लेम नाहीये . माझे काही जुने सहकारी होते , तुला आठवतील बघ , सानिका , सुमित , कुमार वगैरे , त्यांनी स्वतचा युनिट  सुरु केलाय . मला पण बोलवत आहेत , रिसर्चच काम आहे , माझ्या आवडीचे "
"मग तू काय ठरवले आहेस ?"
"अजून काहीच नाही, पण विचार करेन इतकाच सांगतो "
"आकाश, जे झाले ते विसरून जा . सगळी कटुता , समज गैर समज मागे टाकले तरच आपण पुढे जावू शकतो "
"विसरेन कि नाही सांगता येत नाही, पण कटुता नक्कीच नाहीये आता. पण तुम्ही इराला काही नाही सांगितले आहे , मागचे . "
"नाही बाळा, तिला हे कधीच कळणार नाही.  आमच्या कडून तरी . खर माहितीये , अगदी निमिष आणि त्याचा आई बाबा ना पण . "
"पण इराला नाही सांगायचे कुणीच "
लग्नाला फक्त दिवस राहिले होते आता.  आणि  आकाश अजून एखादा आठवडाच होता इथे . मनावरचे ओझे खूप कमी झाले होते , सगळ्यांच्याच .
भविष्य काळात काय होते हे आपल्याला काळात नाही आणि भूतकाळ आपण डावलू शकत नाही हेच खरे  आणि वर्तमानात काळात , भविष्याची हुरहूर आणि भूतकाळाची सावली असतेच कि सोबत .
अनु आली आपल्या आयुष्यात , पण बराच काही शिकवून गेली . तिच्या मुळे खूप गोष्टींचा उलगडा झाला मला, माझ्याच मनात असलेल्या प्रश्नाचा.  व्यासांनी  महाभारत लिहिले आहे असे कि आपल्या सगळ्यान मध्ये त्याच्या प्रत्येक पात्रातले काही तरी गुण दोष आढळतोच .  सगळेच कधी तरी अर्जुन असतात , कृष्ण मिळाला आपला , तर पेच सुटतो , मला तेव्हा मिळाला माझा कृष्ण आणि आता …. जर नाही मिळाला तर ……  असे आकाश ला वाटले. कदाचित आई , बाबा , तो सगळेच आपापला कृष्ण शोधत होते आणि इरा …. ती कदाचित या सगळ्यात नव्हतीच मुळी  

Comments

Popular posts from this blog

Our visit to an experimental School- Prayog Bhumi

खिडकीतला पाऊस आणि मी !!!!(Poem/Kavita/Mukta Chhand)

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी