एक गोष्ट त्यांची पण : भाग तीन
भाग तीन
" आकाश, अरे काय झाले ……… इरा कुठे दिसली का तुला ? आणि इतका का घाबरून ओरडत आहेस ? काय झाले काय ? , पाणी पी थोडे, तुझ्या शेजारी आहे बघ बाटली "
"सॉरी, अरे काही नाही असच, असे वाटली कि इरा पडतीये खाली जोरात आणि मी पोचे पर्यंत …।"-निमिष
" अरे, तू इतका आणि तो पण असा विचार नको करू, आणि मध्येच कुठे इरा पडतीये वगैरे , लहान आहे का ती आत्ता. आणि हो
माझ्या प्रेमात पडलीये आणि आता संसारात पडतीये म्हणून ओरडत असशील तर इराआआ----
ऐवजी आकाश सांभाळ असे तरी ओरड. पण खर संग न काय झाले कारण माझ्या पीजे वर पण हसत
नाहीयेस मनापसून , बैचैन का
आहेस ?"
"काही नाही
दुल्हे बाबू, आपण थांबलो खायला
कि सांगतो "
"अरे पोचलोच
कि आपण,
मस्त पैकी मिसळ चापू आधी , मग ठरवू next काय
ते "
आकाश आणि निमिष गाडीतून
उतरले. खर तर निमिष ला जाणवले कि काही तरी बिनसले पण नक्की काय ते कळत नव्हते. अशी काय आहेत हि बहिण भावंडे , इरा पडतीये ह्या कल्पनेने पण हा केवढा बैचेन आहे , नाही तर आमचे भाऊ खरेदी ला या म्हंटले तर आता वेळ
नाही ,
मग वेळ नाही , तरी बरी नुसते खरेदीला मदत करायला यायचं , पैसे नाही खर्च कारयाचे आहेत . आकाश ला विचारायला पाहिजे काय झाले ते ? इतक्या
वर्षांनी आलाय , थोडे मन मोकळे झाले तर
त्यालाच बरे वाटेल
"आकाश , आता सांग कि मगाशी काय झाले ते "
"काही विशेष
नाही रे,
ती दिसली "
"कोण ??????, म्हणजे तुझ्या इतक्या मैत्रिणी होत्या त्यातली कोण
?"
"काय रे तू
पण,
ती म्हणजे ती बाग. आम्ही जुन्या घरी राहायचो तेव्हा नाही का
आपण सगळे जायचो ती …"
"आपण सगळे , नक्की न … खर
तर आकाश ,
तू बागेत जायचास तुझ्या लाडक्या बहिणीसाठी आणि म्हणून
आम्हाला खेळायला तिथे बोलावायाचास आणि यायलाच लागयाचे, कारण क्रिकेट चे किट , badminton ची राकेट हे सगळे तुझ्या कडेच होते न , बर ते जावू दे . बाग बघून ओरडलास? "
"तुला आठवते
का रे निमिष , एकदा इरा
झोपल्या वरून पडली होती त्या बागेत "
"हो , म्हणजे अंधुकसे आठवतोय , आपण जाम घाबरलो होते, आणि तिला तुमच्या दवाखान्यात नेले होते . काका ओरडले
होते आपल्याला, ‘लक्ष कुठे असते तुमचे आणि लक्ष देत येत नसेल तर तिला अजिबात नेऊ
नका वगिरे वगिरे’ "
"हो , अगदी बरोबर , अंधुक काय , स्पष्ट आठवतंय कि तुला "
"पण आकाश इतक्या वर्षांनी का आठवले तुला, आणि आठवले तरी इतके घाबरायला काय झाले आता ?, आणि तेव्हा पण काही फार लागले नव्हते "
'हो , फक्त चार टाकेच तर पडलेत , आणि सगळी लहान मुले अशी एकदा तरी पडतातच , त्यात काय इतके , इट्स ओके , अस
आईनी ऐकवले रे मला. पण माझ्या
साठी ते चा------र टाके होते. तुला आठवतंय का कि आपण दवखान्यात घेवून
गेलो, तेव्हा ती किती रडत होती आणि माझा
शर्ट रक्ताने भिजला होता . अजून हि आठवते मला .आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो, लहान पाणीच्या काही काही आठवणी आपल्या पिच्छा सोडत नाही
त्यातलीच हि एक . मला अह्जूनही असाच स्वप्न पडते कि इरा पडतीय आणि तिला
वाचवायला कुणीच नाहीये आणि मी तिच्या पर्यंत पोचू शकत नाहीये "
"अरे
आकाश , असे काय
करतो? ,
आता किती वर्षे झाली त्या घटनेला आणि मला अजून हि कळत नाहीये कि त्याचा इतका का परिणाम झालाय तुझ्या वर. म्हणजे आपल्या प्रत्येकच्या आयुष्यात असे असतच
कि कधी तरी किंवा आपली भावंडे पडलीये , त्यांना लागलाय किंवा खूप आजारी पडलीत , अगदी तू सुधा पडला होतास कि , हात
मोडला होता तुझा, ते विसरलास?
त्या मानाने
इराला काहीच लागले नव्हते रे "
"हो , खरय . ए तुला आठवतंय का रे निमिष ,
माझा हात मोडला होता तेव्हा मी इयत्ता ९ मध्ये असेन आणि इरा असेल चौथी मध्ये , पण रोज माझे दप्तर कार पर्यंत स्वत : घायची , पेलायचे नाही तरी. रोज डबा खायला पण आपल्या सोबत यायची , आणि रोज हट्ट करायची कि दादू मीच तुला भरवणार. खर सांगू
तुम्ही सगळे खूप चेष्टा करायचा माझी , पण मला कधीच फिकीर नाही वाटली त्याची. का सांगू, कारण
आजी नंतर तसे मला कुणीच प्रेमाने भरवले नाही रे , म्हणजे आई कधी तरी असायची पण ती तरी काय करणार , हॉस्पिटल , कॅम्पस
या सगळ्यातून वेळच कमी मिळायचा . इरा माझी बहिण नाही , तर माझे कुटुंब आहे रे "
"ते सगळे खरय
मित्रा ,
मला माहितीये आणि जाणवलय सुद्धा आणि म्हणूच इतक्या गोड
मुलीशी मला आयुष्यभर एकत्र जगायचं . फार जीव
लावते यार हि . पण इराच्या पडण्याचा अजुनही इतका प्रभाव का आहे तुझ्यावर ते सांग .
विषय बदलू नको . म्हणजे त्या हि पेक्षा किती तरी अश्या गोष्टी आयुष्यात कळल्या
आहेत तुला , ज्याने तू असा अस्वस्थ
झालास तर मी समजू शकतो "
"विचारतोच
आहेस तू निमिष म्हणून
सांगतो ,
कदाचित तुझा पण दृष्ट्कोन कळेल मला. आपण दवाखान्यात गेलो
इराला घेवून तेव्हा, मी तर
घाबरलो होतोच , पण इरा पण घाबरली होती
आणि नेमके त्या दिवशी च आई , बाबा
दोघे पण दवाखान्यात नव्हते , कॅम्प
साठी जवळ असणाऱ्या एका खेड्यात गेले होते आणि आजी
पण बाहेर गावी गेली होती . टाके सुद्धा विनीता मावशीने घातले . मी आई
ला फोन केला होता रे निरोप द्यायला , तेव्हा काय मोबाईल नवते , पण तिला निरोप मिळाला होता . ती विनीता मावशी सोबत
बोलली आणि मग निरोप दिला कि संध्याकाळपर्यंत पोचतेच आहे म्हणून . आमचच हॉस्पीटल त्यामुळे सगळ्यांनी सांभाळून घेतले रे .
घरात काय आमचे नोकर चाकर असायचेच सोबतीला . म्हणजे
घराच्या सारखेच होते , पण …मला वाटत होते कि हातातली सगळी कामे टाकून आई नि लगेच
यावे आणि इराला कुशीत घेवून विचारावे कि कशी आहेस बाळा , घाबरू नकोश वगैरे . आई आली म्हणजे तशी लवकर आली . इराला जवळ
पण घेतले आणि मला ओरडली पण नाही , पण
इतकच म्हणाली, ‘तुला इराची जबाबदारी
घायचो असेल तर घे नाही तर आम्ही आहोतच कि काही तरी व्यवस्था करू , बाकी काही नाही पोरीला काही झाले तर’ ….
तिच्या स्वरात काळजी होते रे , पण काही तरी नव्हते . एखाया दिवशी बघ भाजीत सगळे घातले तरी
चव येत नाही आणि काय राहालीये ते पण काळत नाही , असे काही तरी वाटले मला . मग काय बाबा आले आणि शाळा घेतली
आमच्या दोघांची , इराची पण .
इरा ,
आणि मी आजी च्या खोलीत झोपणार
होतो त्या दवशी कारण ती खालच्या मजल्यावर होती . मला उगाच वाटले कि आई पण इरा सोबत
झोपेल ,
पण तिला काही तरी काम होते म्हणे , कसले तरी रिसर्च चे . मला काय वाटले कुणास ठाऊक , पण मी आई ला म्हणालो , कि थांब न आजच्या रात्री इथेच. कदाचित इरा
उठली तर ,
तिला तूच हवी असशील आणि तुला तरी झोप लागणार आहे का ? काय आहे ते काम इथेच कर , दिवा सुरु राहिला तरी चालेल आम्हाला . तसे आई नि काही आढे वेढे घेतले नाहीत , ती थाबली , रात्री
बराच वेळ जागी होती , मध्ये मध्ये
उठून इरा कडे पाहत पण होती . सगळे होते पण तरी हि , माहित नाही , असे वाटले कि काही तरी नाहीये या सगळ्यात , काळजी आहे , जबाबदारी आहे , प्रेम ?, प्रेम
सुद्धा आहे पण आई ची माया थोडी आटली आहे का ? म्हणजे आई वाईट नाहीये , पण आज आता ती इराची आई नाही तर पालक वाटतीये. कदाचित
दिवसभर दमली असेल , आणि इतके
काही जास्त लागले पण नाहीये , त्यात
आई डॉक्टर म्हणजे तिला खरच किती लागलाय हे कळते ना म्हणून पण कदाचित ती …,
"
"अरे , हो आकाश पण तरी हे सगळे तुझे विचारच ना आणि तुला नक्की काय
खटकले ,
आई लवकर आली नाही हे का ?"
"नाही , ती कामात होती आणि इरा वर उपचार झाले होते आणि आजच्या इतकी
दळण वळणाची साधने पण नवती नव्हती तेव्हा . त्यामुळे ती या पेक्षा लवकर येवूच शकली नसती आणि ती विनिता
मावशी सोबत दोन वेळा बोलली पण होती . मला काय खटकल माहितीये "पोरीला काही
झाले तर ", मधला काळजीचा स्वर , काही तरी वेगळा होता , संकटात पडल्या सारखा आणि तिचे आपणहून रात्री न थांबणे . मी
म्हंटल्यावर लगेच थांबली
ती ,
म्हणजे तिने तसे इराला झोपवले होते , पण तिने आपणहून थांबायला हवे होते . तेव्हा पासून मला पक्के
डोक्यात बसले कि आता इरा माझी जबाबदारी आहे , तिच्या साठी कुणी थांबो अथवा न थांबो , मी आहे , माझ्या
इरा साठी . नेहमीच त्या घटनेने मला ह्याची जाणीव दिली म्हण किंवा त्या एका
प्रसंगात माझे आणि इराचे नाते बदलले असे म्हण , म्हणूच कदाचित आता इतके सगळी स्पष्टीकरणे मिळून
सुद्धा
हि ती घटना माझ्या मनात पक्की बसली आहे . कधी कधी हातातून
काही निसटते आहे असे वाटले कि मला असाच स्वप्न पडते . आता कारण म्हणजे ती बाग
इतकाच . जावू दे आपण फारच गंभीर विषयाकडे वळलो, पण
तू विचारलास मला बरे वाटले. कधी कधी प्रश्नाची उत्तरे मिळाली कि नवीनच प्रश्न समोर
येतात ,
आणि उत्तरे बरोबर असून हि पटत नाहीत . "
" मित्रा , काळजी नको करू , मी तुझ्या इराला कधीच दुखावणार नाही , जरा भावूक झालोय म्हणून सांगतो , विश्वास ठेव "
"अरे ए आकाश , भावूक हो तू , पण एक लक्षात ठेव , दहेज मे हम आ राहे है . मी काळजी घेईन असे
म्हणून मला कटवु नको, कट करून "
"नाही रे , तुला न कटवता , मिसळीचा कट मागवतो "
"अरे , दुपारी कुठे जायचं रे आकाश "
"मेनू
ठरवायला,
अरे तोच नेहमीचा हॉल ,तुझ्यावेळी ठरवले होते कि तेच रे …I am
sorry , चुकून बोललो कि तुझ्या वेळी
असे "
"असू दे रे , बित गायी बात गयी ,आणि असे काही नाही. इरानि सांगितलं मला कि लग्न केले आहे तिने …"
"इरा म्हणजे
न ,
अवघड आहे , मी
म्हंटले होते तिला कि आकाश ला काही बोलू नकोस . तू आधीच तिकडे एकटा , त्यात उगाच पुन्हा जुन्या आठवणी त्यापाणु कटू आठवणीना उजाळा
कशाला द्या "
"नाही रे , इतके काही नाही वाटत मला , आणि तसे पण जो काही निर्णय आम्ही दोघांनी घेतले
त्याचे वैषम्य नाही आहे मला . जे झाले ते योग्यच होते . माझे आणि तिचे आयुष्य
एकत्र कधीच सुखाचे झाले नसते. न माझ्या , न तिच्या आणि ना … कुणाच्याच . आई आणि बाबांना खूप मनस्ताप झाला, त्यांना मला समजून घेणे तेव्हा पण जमले नाही आणि आता पण
त्यांच्या आवाक्या
बाहेरचे आहे सगळे . आणि इराची तेव्हा पासून कसरत सुरु झाली , आई बाबा आणि मी अशी नात्यांची तारांबळ . "
"अरे पण , तिला पण नकोच होते हे लग्न , नाही तर तिने परत कशाला लग्न केले असते , ते पण प्रेम बिमात पडून . आणि मग आता काका काकुना काय
प्रोब्लेम आहे , हे तर माहितीये न कि तू
काय फक्त एक मार्गी लग्न मोडायचा निर्णय घेतला नव्हतास "
"निमिष , फक्त ते आणि तितकाच कारण असते तर मग कशाला , आमच्या या नात्याला खूप कंगोरे आहेत आणि म्हणूच गुंता पण
मोठा आहे . लग्नासाठी नकार किंवा त्याची करणे हे आणि इतकाच आमच्यातल्या तणावाचा
कारण आहे असे वाटते तुला . खूप वर्षापासून हा तणाव होता आमच्यात , हे एक निम्मित झाले फक्त कि तो तुम्हा सगळ्या समोर आला .
असे बराच काही आहे अजून . जावू दे , परत गंभीर विषय नको आणि मला पण एन्जॉय करायचे आहे
तुमचे लग्न . मी त्या साठी आलोय न इथे आणि तसाही तू फार वेळ गंभीर संभाषण करू नाही
शकणार . आता आपण तुझ्या भाषेत 'सुंदर पैकी
चहा घावू आणि सुंदर पैकी तुझी काम उरकू "
"अरे म्हणजे काय अति
महत्वाची कामे आहेत , माझे shopping राहिलंय अजून , साला कुणाला वेळच नाही यार . बरे झाले तू आलास , आता तुलाच राबवतो "
"रोजगार हमी
योजनेवर आल्यासारखे वाटतय मला . फ़ोरेन रिटर्न वेठ बीगार . पण निमिष , कमीत कमी तुझ्या आई बाबा न तर घेवू यात न बरोबर जाताजाता "
"ते काही तरी
वेगळ्या गडबडीत असतील , हा होम ते
हवन . यांना पत्रिका द्यायची , आमंत्रणे
बाकी आहेत वगैरे "
"अरे पण
विचारू तर खरे , मी विचारले तर नक्की
येतील बघ . आणि काकुनी काय लाडू बीडू बनवालते त्याची चव पण चाखता येयील "
"मग चल, तसाही आई नि काळ पासून १०० वेळा तरी मला सांगितले आहे आकाश
ला काय हवे नको ते बघ आणि त्याच्या सोबत घरी एखादी चक्कर टाक म्हणून "
"चल मग , म्हणजे वेळेत काम करु नाही तर ती आमची बया ४ म्हणजे ४ ला हजर होईल आणि माझे डोके खाईल "
" ए थांब
निमिष ,
इराला फोन करतो , जरा गम्मत , कश्यावर ताव मारतिये ते तर कळेल…लागला फोन,
ए काय ग काय खातीयेस तरी काय ? इकडे आम्हाला सोडून , माझा नाही भावाचा तरी विचार करायचास
"
"अरे ए , निमिष आधी फोने वर हेलो तरी म्हणत जा , लगेच काय चौकश्या , फोन कुणी पण उचलू शकतो . आणि फालतू गप्पा नकॊ, काही काम असेल तर सांग , मी आता विनीत मावशी कडे खाण्यात बीझी आहे , कळले . आणि काम नसेल तर ठेव फोन , नाही तर मीच ठेवते ?"
"काय ग इरा , निमिष चा फोन वाटते , अग मी त्याला पण घेवून ये म्हणाले होते "- विनिता
मावशी
"नको ग, त्याला कशाला , नंतर आहेच कि मग लग्न नंतर . सारखे त्याचेच कौतुक करता मग तुम्ही लोक. दहीवडे मस्त झालेत एकदम "
"आकशाला पण
खूप आवडतात न ग , खर तर म्हणून
केले.
उगचाच वाटले कि तो पण येयील आणि म्हणून चौघांच्या आवडीचे
पदार्थ केले न मी . तो एकटाच चुकला बघ . येणार आहे का नाही तो ? आता तुझे लग्न म्हणजे येणारच म्हणा , पण आज चुकला बघ "- विनीता
"मावशी, तू घरचीच आहेस , म्हणून खोटे नाही बोलत , तो कालच आला आहे "
"इरा……"-
इराची आई
"ए बोलू दे ग
तिला .
बोल
ग इरा तू . कधी आलाय आकाश आणि त्याला का नाही आणलस मग , तो काय परका आहे का ? आणि त्याला माझ्या कडे आणायला काय प्रोब्लेम आहे . तुला
माहितीये न कि मला तुम्ही दोघे मुलासारखेच आहेत आणि तू नुसते सांगितलास असतास न तर
माझ्या आमंत्रणाची वाट पण पहिली नसती त्याने आणि आईला घाबरता का तुम्ही अजून पण .
ती काय म्हणाली असती तर मी सांगितले असते का ते . तुम्ही चौघे आहात तिघे नाहीत
कुटुंब म्हणून किती वेळा सांगितलाय मी तिला . जावू दे बेटा , त्याला सांग येवून जायला, जमेल तसे "
"अग मावशी, तो आला असता ग . पण काळ
रात्री उशिरा आलो न , आणि आज आकाश
आणि त्यांचे मित्र भेटणार होते कोण कोण म्हणून मीच नाही आणले त्याला . आई बाबाचे
काही नाही ग तसे "
"असो , या निम्मितने का होईना , तो घरी आलाय , बरे वाटले . बर मी त्याच्या साठी न देते सगळे थोडे थोडे
डब्यातून , तू घेवून जा हा "
इरा विचारात होती कि मावशीला
जर आकाश यावासा वाटला तर आई बाबा का नाही म्हणले . मावशी काही आमची नातेवाईक नाही पण खूप जवळची आहे . मला आणि
आकशा ला तिने लहान पण पासुन पाहिलये , मग ती जर आकाश ला माफ करू शकते तर आई बाबा का नाही ? कधी तरी मला जमेल का मला हे सगळे परत पहिल्या सारखे करायला?
लहानपणी एकदा चित्र काढायला घेतले आणि मधेच जर खोडले न तर असे वाटायचे कधी
कधी कि पहिलाच चांगले आले होते , आता
परत तसच काही जमायाचे नाही , तेव्हा
आजी म्हणायची , कि बाळा चिडचिड
करू नको ,
थोडा वेळ काहीच करू नकोस आणि मग परत नवी सुरवात कर . तसा
अजून थोडा वेळ देवून नवीन सुरवात करावी लागणर का मला ?, आकाश- इरा आणि आई -बाबा अश्या समांतर रेषा झालाय आहेत
जणू ,
एकाच प्रतलात कधीच न मिळणाऱ्या …
"इरा , काय करायचं, तू खरच आकाश ला डबा देवून येतेस का ? आम्ही जातो घरी "- आई
"नको, उगाच हेलपाटा मला , तसे हि आपण त्याला सांगितले नव्हते आणि आत उगाच कशाला
?"
"पण मावशीनी
इतका प्रेमाने दिलाय आणि त्याला आवडतात न ग …………" - आई
"मग तूच नेउन
दे न ,
इतके प्रेम उफाळून आलाय तर "
" इरा , बेटा , प्लीज
,
तू तरी । जावू दे , मी सांगतीये न तू देवून ये आणि तसा हि आम्ही तुला पण ऐन वेळी
संगितले न हे केळवणं चे मग , त्याला
पण तसाच सांग . "
"ठीक आहे, निघा तुम्ही , मी दादू कडे जाऊन येते "
इरा पोचली , हे दोघे अजून आलेले दिसत नाहीयेत , फोन करून यायला हवे होते . जावू दे किल्ली तर आहे , डबा ठेवून , message करते . इराने दार उघडले, फ्रीज
उगडून त्यात डबा ठेवला आणि ती आकाशाच्या खोलीत गेली . खोली आवरलेली होती , काही वस्तू मात्र काढून ठेवल्या होत्या . आकाशानी
सगळ्यासाठी गिफ्ट आणल्या होत्या .
हा असा कसा आहे इतका कुल!!!! लहान पण
पासून असाच आहे , इकडे आग
लागली तरी हा असाच शांत . बर्फ पण कमी थंड असेल . मी याच्या
जागी असते तर , आई बाबांकडे
येवून सरळ कचकचा भांडले असते .
इतक्यात तिला दार उघडल्याचा
आवाज आला आणि गम्मत करावी म्हणून ती आवाज न करता तशीच थांबली
"निमिष प्लीज
,
हे बघ जे झाले ते झाले, आता उगच इराला यातले काही सांगू नकोस , ती बिचारी आधीच किती वैतागली आहे , हि कसरत करताना . मला उगाच आलो असे वाटते , तुमचा एवढा आनंदाचा काळ आणि हा नात्यांचा ताण . आता तिला हे काही सांगू नकोस "
"काय सांगायचे नाहीये मला आकाश ?",- इरा न राहवून आतून बाहेर आली
kramasha :
Comments
Post a Comment