Posts

Showing posts from September, 2015

मैत्र : भाग ४

Image
भाग -४   गंधाली  झोपली तरी, अभी अजून जागाच  होता. त्याच्या व्यवसायामुळे, अनेक प्रकारच्या समस्या त्याने पहिल्या  होत्या, माणसांची हि वेगवेगळ्या पद्धतीने ओळख होत होती. पण या   वेळी जर वेगळे होते.  त्याच्या अत्यंत प्रिय व्यक्तीच्या  जीवनाशी हि   हे सगळे निगडीत   होते . या सगळ्यातून, सोनाली सावरली तर आणि तरच गंधालीला समाधान मिळाले असते. किती हि व्यवसायिक तत्वे पाळायची म्हंटले, तरी तसे करणे आता  अवघड होते. त्याच्याच मनात खूप विचारांचा गदारोळ झाला होता. गंधाली  आणि अजयची मैत्री , इतकी जीवापाड, तरीही गंधालीने त्याला एका क्षणात दूर केले, म्हणजे हिच्या कडे  चुकीला माफी नाहीच कि काय? एकीकडे इतका जीव लावणारी, स्वताला   झोकून देणारी गंधाली आणि तितकीच कठोर पण . समजा  भविष्यात जर कधी, माझ्या कडून … नकळतच चूक झाली तर ,… तरी सुद्धा हि माफ नाही  का करणार ? एक संधी पण नाही देणार का हि ? काहीच सुचत नाहीये . गंधाली  या सगळ्या  घटनेमध्ये स्वताकडे इतका दोष का घेतीय ? केवळ ती अजयची चांगली मैत्री...

Educational System of India: Rethinking

Image
Educational System of India An old  Sanskrit Subhashit  says,   अन्नदानं परं दानं विद्यादानं अत : परम् | अन्नेन क्षणिका तॄप्ति : यावज्जीवं च विद्यया ,  which means Giving food to  hungry is a good deed.  educating  people (Teaching - 'vidya Danam') is  more appropriate and important type of 'Dana' because by food one's hunger would be calmed down only for the time being. But the knowledge attained is helpful for whole of our life. Therefore it is said that ' Vidya - Dan ' is the most important among various other types of Dana. India, is a country with strong, rich heritage, which also focuses on Education System. Gurukul parampara has been an important part of our ancient Educational systems. We are talking about skill based India now, however if we just look back at the ancient Eras, we can see that in ancient era, post primary education, (which is necessary for day to day life), students were allowed to select subje...

लोकमान्य, पत्र लिहणेस, कारण कि......................

Image
लोकमान्य, पत्र लिहणेस, कारण कि,  आदरणीय लोकमान्य,  खूप दिवस तुमच्याशी बोलावे असे मनात होते. सद्य परिस्तिथी तुम्हाला ठावूक असणे खरच निकडीचे आहे. तुमच्या सारख्या प्रज्ञावंत, दूरदृष्टी  असणाऱ्या, खंबीर आणि लोकमान्यता असणाऱ्या नेतृत्वाची आम्हाला गरज आहे. तुम्ही म्हणाल कि, मग तुमच्यात असा कुणी नाही का? असतील हि, पण कोशात गुरफटून बसले असतील, प्रत्येकलाच दुसऱ्यांनी  कुणीतरी हि जबाबदारी घ्यावी असे वाटतय. असो. पण आता तुम्हाला आठवण्याचे कारण म्हणजे गणेशोत्सव. तुम्हीच सुरु केला न हो हा गणेशोत्सव. घरातला उत्सव, सार्वजनिक केल्याचे श्रेय तुम्हाला आहेच. पण दुर्दैवाने आज केवळ उत्सवच उरला आहे, तुम्हाला आम्ही विसरलोच आहोत. मग तुमचे त्या मागचे विचार तर फारच लांबची गोष्ट आहे.   मला वाटते, तुमचे विचार न कळताच, केवळ तुमच्याप्रमाणे कृतीचा, किंवा तुम्ही  सुरु केलेल्या परंपरा, केवळ सांस्कृतिक किंवा धार्मिक म्हणून सुरु ठेवणे  कितपत योग्य आहे  ? तुमच्या सारख्या महापुरुषांचा आम्ही पराभव केलाय का हो ? . म्हणजेच सगळेच जण असे करत आहेत असे नाही...

प्रेमात रुसलेला तो आणि निशिगंध !!!(poem/kavita)

Image
प्रेमात रुसलेला तो   आणि निशिगंध  निशिगंध दरवळेल, माझ्या अस्तित्वाची जाणीव होईल  पावसात चिंब ओला होशील, माझे पाणावलेले डोळे दिसतील आकाशातून चंद्र खुणावेल, अन चांदण्याची शीतलता तुला आठवेल   कोसळणारा निर्झर पाहशील माझ्या मनमुक्त जगण्याचे क्षण भेटतील सागर किनाऱ्यावर लाटा झेलत थांबला असशील,  माझ्या आठवणीची अमृत धारा बरसल्याचा भास होईल रात्री कूस बदलून डोळे मिटशील,  पापण्यावर हळुवार रुंजी घालणारे माझे स्वप्न कसे दूर करशील स्वप्नामधून अलगद डोळे उघडतील अन तुझा असे तू कितीसा उरशील आता माझ्यावर रागावून गेलास तरी कुठे जाशील आयुष्याचा प्रत्येक पावलांवर, मला तुझ्या सोबत पाहशील  -शीतल जोशी

खिडकीतला पाऊस आणि मी !!!!(Poem/Kavita/Mukta Chhand)

Image
खिडकीतला पाऊस  आणि मी !!!! किती सारी वर्षे झाली , मी पावसाला कधी दारातून , कधी खिडकीतून , कधी अंगणात भेटत होते आज मात्र गम्मत च झाली , मी खिडकीत होते , अन पाऊस माझ्या खिडकीतून डोकावत होता मी त्याच्याकडे आणि तो माझ्या कडे , हसत हसत बघत होता माझ्या सारखाच तो सुद्धा आठवांच्या सरीमध्ये जणू काही भिजत होता त्याचे स्फटिकासारखे थेंब मी हातावर झेलत होते , अन तो जणू माझ्या साठीच ते थेंब साठवत होता सारे होते आजूबाजूला , पण तरी मी गर्दीमध्ये एकटीच होते कारण आज चक्क पाऊसच माझ्या सवे बोलत होता इतके दिवस मी पावसला घरातून पहायाचे आज मात्र तो माझ्या कडे पाहत होता माझ्या सारखाच तो सुद्धा आठवांच्या सरीमध्ये जणू काही भिजत होता खूप दुरून आलोय मी आज , बरसणार आहे मनसोक्त मी म्हणाले पाहुण्यासारखा चार दिवस नाकी राहा राहा कि आमचे मन भरे पर्यंत अगदी मनमुक्त कशाला ग ? मी थांबलो जास्त वेळ , कि मगसगळी कडे चिकचिक होणार , चिखल किती झालाय इथे म्हणून तुझी ओली , भिजली चिडचिड होणार अरे असे कसे , तू तर हवासाच कि , चिडचिड झाली तर होवू दे पण थांबला नाहीस तर निर्झर आमचे कसे वाहणार नदी कशी स...