Posts

Showing posts from 2017

व्यवहार

"व्यवहार" - भाग १ १० वर्षांनी , तो त्याच शहरात परत आला होता. त्याने जशी इतक्या वर्षात कात टाकली होती तशीच शहरांनी सुद्धा.तरी सुद्धा काही जुन्या खुणा शोधत त्याची नजर भिरभिरत होती. आणि अचानक स्थिरावली. काळ गेला तरी सगळंच बदलले पाहिजे असे नाही. त्याच्या चेहऱ्यावर हळूच एक स्मित पसरले. ती त्या पुस्तकांच्या दुकानाच्या काउंटर च्या त्या बाजूला होती. दहा वर्षा पूर्वी त्यानं जसे सोडले होते सगळे काही तसच होते तिथे. ते दुकान, गर्दी, अगणित पुस्तके आणि ती सुद्धा.. .. अजिबातच बदलली नाहीये ती. आता माझ्या इतकीच म्हणजे पस्तिशीत असेल ती, त्याच्या मनात सहजच हे विचार आले. अजून हि पंचविशीत असेल अशीच दिसत होती ती. तोच बांधा, चेहऱ्यावर तेच करारी भाव, तिचे केस, तिचे कपडे , तिचे एकूण सगळे दिसणे सुद्धा तसेच अगदी पूर्वी होते तसे. हुश्श्य, बरे झाले कि ती अजून तशीच आहे. तो दोन पावले पुढे आला , थोडी धाकधूक थोडा उत्साह . तरी.... . तो तिच्या कडे व्यवस्थित पाहत होता आणि काही खुणा दिसतात का बदलाच्या ते. शोधत होता. गळ्यात एखादी काळी पोत, नाही तरी सोनाच्या चेन मध्ये कुठे तरी दोन काळे मणी, कपाळावर ठसठशीत ...

मैत्री आणि जयकथा (महाभारत.) !! #मैत्री #महाभारत #जयकथा #friendshipday

Image
मैत्री आणि  जयकथा (महाभारत.) !! #मैत्री #महाभारत #जयकथा #friendshipday जयकथा म्हणजेच महाभारत. माझे अत्यंत आवडीचा विषय. जितके   मी या बद्दल वाचेन , विचार करेन  ते तोकडेच आहे. असंख्य नाती आणि त्याचा   भावनिक लेखा जोखा आणि  त्या  संबंधाची कोडी आणि त्यांची उकल, हे सगळे म्हणजे  जयकथा. सामान्य वाटावी अशी पण असामान्य माणसे. मैत्रीचे हे  नाते अनेक वेळा  या महाकाव्यामध्ये येत  रहाते. कृष्ण आणि पेंद्या  यांची लहान पणीची मैत्री. मग सुदाम आणि कृष्णाची मैत्री . पण  या मैत्रीला काही मर्यादा आहेत किंवा त्या बद्दल केवळ काही घटनाच  आहेत.  तीच कथा द्रुपद  आणि द्रोण यांची. नाट्य आहे या मैत्री मध्ये  पण नात्यावर भाष्य नाही. मग नात्यावर भाष्य करणाऱ्या मैत्री म्हणजे कृष्ण - अर्जुन आणि दुर्योधन आणि कर्ण यांच्या. या नात्याला  बरेच कंगोरे आहेत. पण अर्जुन अन कृष्णाच्या नात्याला अजून एक पदर आहे तो म्हणजे गुरु - शिष्य नात्याचा, भक्तीभावाचा  ; म्ह्णून यामध्ये एक  अदृश्य अंतर दिसत राहते. दुर्योधन आणि कर्णाच्या नात्...

#लघुकथा #shortstory #tinytale गुलमोहर

Image
#लघुकथा #shortstory #tinytale गुलमोहर  गुलमोहरचे झाडांची रांग च रांग बघून , ती खुश झाली. निळया आकाशी रंगाच्या पडद्यावर, लाल केशरी रंगाची जादू पसरली होती. मधेच एखाद्या गुलमोहरामधून हलकिशी हिरवी छोटी छोटी पाने त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून  देत  होती. कुठे एखदया झाडानी, मातकट रंगाच्या शेंगा अंगभर खेळवल्या होत्या. या लाल पखरणी मधेच, एखादा एखादा पिवळा जर्द बहवा मन मोहवून घेत होता. तिला उगाचच वाटले , ही लाल पिवळी झाड़े म्हणजे जणू चैत्र महिन्यताले हळदी कुंकु. प्रत्येक सण म्हणजे जणू निसर्गशी एकरूप होणेच. ती कित्येक वर्षे मागे फिरली. कुमुद आणि तिच्या घरा मधे असाच एक गुलमोहर होता, एक बहवा पुढच्या वळणावर. दोन्ही घरांच्या परसात एकेक आंबा उभा होता. त्या झाडांच्या सावलित, यांचा दुपरचा खेळ अगदी रंगात येत असे. कुमुद आणि ती बरोबरीच्या अन तिचा दादा यांच्या पेक्षा दोन वर्षानि मोठा. आम्बाच्या त्या झाडांच्या सावलीत तिघांचे बालपण सुखात सरले. काही वर्षात कुमुद आणि दादाचे नाते सुद्धा फुलले अगदी त्या गुलमोहरा सारखे. तो गुलमोहर आणि ती साक्षीदार त्या प्रेमाचे. पण शिशिरात पान गळ होतेच. प...

#shortstory #लघुकथा भातकुली

Image
#shortstory #लघुकथा भातकुली वंश परंपरागत असलेली आमची आजोळची भातकुली कोणाकडे आहे, हे शोध कार्य माझ्या अंगावर येवून पडले होते. माझी भाची अनु, 3 वर्षाची झलिये आणि तिच्या सोबत नवीन नवीन खेळ खेळणे  हा  माझा छंद. माझ्या काका आजोबांकडे , आजोळी एक पितळी भातुकली होती,. तिंची मला आठवण झाली . अनु साठी विचारवी म्हणून मी फ़ोन केला ; पण आता नक्की कुणापाशी आहे हे काहि नक्की कळले नाही. भगीरथ प्रयत्नन्ति शोध लागला. अश्विनी, माझी चुलत आत्ये बहिण, भातकुली ची सद्य मालकिण. अश्विनीच्या दारवरची घंटी वाजवाली. इतक्या वर्षनि भेटल्या वर काय बोलेवे  या विचारात असतानाच  तिने दार उघडले "कोण , मीनू? किती वर्षानि ग. ये ग आत ये" हसतमुखाने , मीठी मारून तिने माझे स्वागत केले. काही काही स्पर्शाने काळाचे हिशेब लगेच मिटतात ना! " इकडे कसा दौरा? ' " तसे सहजच ग आशु. कशी आहेस तू?" " मी मस्त ग" आशु  माझी बहीण , अजुन तशीच होती, मनमोकळी, जिंदा दिल. हुशार तर  ती  होतीच लहानपणा पासून. उत्तम नोकरी  असणारी ,  स्वावलंबी, तडफदार  अन मायाळू.  इकडच्या...

संसार #shortstory #tinytale #लघुकथा

#shortstory #tinytale #लघुकथा  तिला मी एकेरिच हाक मारते, आईला पण आपण एकेरिच बोलावतो की. एके दिवशी तिचे अहो आणि मी गप्पा मारत होतो.  मी सहज त्याना , त्यांच्या सहजीवना बद्दल विचारले  अहो म्हणाले, "चाळीस वर्ष झाली बघ लग्नाला, एकदा सुद्धा भांडण झाले नाही बर का आमचे.संसार अगदी सुखाचा झाला." ह्यामधे जरा अतिशोयक्ति आहे असे मला वाटले. चार दिवसांनी मी सहज तिला बोलता बोलता विचारले "इतके वर्ष संसार केलास तू. कशी गेली ग इतकी वर्षे? माझ्या आईला सतत अस वाटते की लग्नाआधीच आमचे एवढे वाद होतात, तर पुढे कसे निभावेल?. तुझे पण झाले असतीलच न वाद ? मग कस काय बाई इतकी वर्षे  हे नाते निभावले गेले ?" "सखी, अग वाद तिथे होतात जिथे संवाद असतो. आमच्यात नवरा बायकोचा संवाद कधीच नवता. असे समज की त्या काळाचे लिव इन." "म्हणजे?" " सगळ्याच गोष्टी सांगता नाही येत बयो. त्याना संसार नको होता, पण प्रवाह विरुद्ध पोहयचे ही  नव्हते. आणि हे सारे समजल्यावर, नात्यात बाहेर पडायच धाडस माझ्यात नव्हते. ते बावीस वर्षांचे, अन मी वय वर्ष वीस." "मग?" " म...

सहचर : लघु कथा

#shortstory #tinytale #womensday तो खुप चांगला, समंजस आहे हे त्याच्या बद्दलच सगळ्यांचे मत. अगदी तिला सुद्धा सहचर  म्हणून त्याची चांगली साथ होती.  तिची धावपळ होत असेल तेव्हा तो सगळ्या कामात मदत करायचा. त्याच्या चांगुल पणाचे कौतुक ऐकून ती सुखवायची. त्यांच्या आयुष्याचा नवा टप्पा नुकताच सुरु झाला होता, 8 महिन्याचे आई बाबा होते ते आता☺️ असाच एक दिवशी तो आला, "मी पुढच्या महिन्यात , 10 दिवसाच्या सहलीला जातोय. तुला तर महितिये, दर वर्षी मी फिरायला जातोच. It's my passion. मी तुझ्या सोबतीची सारी व्यवस्था केली आहे. आजच टिकिट बुक करतो मग" खर तर तिला सुद्धा कंटाळा आला होता. वर्क फ्रॉम होम म्हणजे सुद्धा घरिच दिवसभर. तिचे पण आई पण नविनच होते. त्यात त्याचे हे जाणे. तिला काय वाटले काय माहित, तिने ठरवले आज मनताले मनात नाही ठेवायाचे " तुझे जायचे ठरले तर ? आणि सोबतीचे म्हणशील तर मी करेन व्यवस्था." " काय झाले तुला एकदम? सगळे तर manage करतोय" " मान्य. पण खर सांगु, मला सतत हे ऐकायाचा कंटाळा आलाय. तू साधा वरण भात केलास तरी इतके कौतुक त्याचे की उगाचच उपकारचे ओझ...

अंतर #लघुकथा #shortstory #tinytale #freshstartofnewyear

#लघुकथा #shortstory #tinytale #freshstartofnewyear रोजच्या प्रमाणे 7 वाजता त्याला जाग आली. थोड़े ताणु न द्यावा असा विचार मनात आला पण क्षण भरच. आज घरिच दिवसभर, घर नुसते खायला उठेल. त्यातून सण असेल तर रिकाम पण जास्तच अंगावर येते. खुप दिवसांनी त्याला घराची आठवण झाली. अगदी काही वर्षा पूर्वी ची गोष्ट, पाडव्याचा दिवस आई साठी खास एकदम. पु ऱ्या तळ णे आणि श्रीखंड करायची जबाबदारी ह्याचीच. आईला मदत आणि याची हौस. त्याला वाटले असाच उठावे आणि जावे घरी. काय होईल ते होईल. गाड़ी काढली तर तासभरचा प्रवास. हे विचार त्याने पटकन झटकले मनातून. का जायचे आपण? जे काय झाले त्यात माझी तरि काय चुक होती ? मन मोठे विचित्र असते, एकदा आठवणी नी त्याचा ताबा घेतला की, ते हट्टी मुलासारखे वागते.हातातले खेलणे आणि मनताले आठव दोन्ही सोडता सोडावत नाहीत. त्याला कुणाशी तरि बोलावसे वाटत होते, तेवढ्यात फोन वाजला. जिवा भावाच्या माणसाला च ही तगमग उमगु शकते. इकडाच्या तिकडाच्या गप्पा झाल्यावर तीने सहज विचारले "घरची आठवण येते ना. अरे मग जा ना. आपल्याच घरी जायला कसला संकोच. कधी ना कधी तुलाच हे सारे मागे टाकावे लागणार आहे. भु...

slambook -#tinytale #shortstory #randomthoughts

# tinytale   # shortstory   # randomthoughts I asked her, " When did you precisely choose to be his life partner? I mean what exactly you admired about him. I know it isn't so much that simple to reply. All things considered, its not a math issue to have logical strides and arrangement" She just grinned and she went into her room. In 5 mins, she accompanied an old dairy rather a slam book. She offered it to me. "Perused it, right from the beginning till the end ." I couldn't understand this act of hers, however I began perusing. Its reflection of school days, high school. It's a collection of companionship, secretes, dreams, everything. Many of them expounded on their desire. Some of them wanted to be a doctor/engineer/teacher/scientist /legal advisor/CA/painter/performing artist/entrepreneur and some of them even kept this column blank  I opened the last page, I read it and I hugged her tightly. It's about him. I found my answer. ...

tinytale of her love -#shortlovestory #tinytale

# shortlovestory   # tinyta le She was excited, waiting for him to come. She was all prepared for this minute, her Valentine day. He holds her hand. She could feel the affection with a delicate touch. It's some kind of security.  His words, " I don't know, how you will respond , however I need to tell you this.The moment I will feel an unconditional love for you, I will return. I don't want to be judgemental about you, your any acts, that is an intimate romance for me. I wont like , if you need to make any adjustments for me. The minute I am certain about this, I will return." She couldn't say a word. She could feel and sense his affection, in his words and touch. She was thinking, by what means should she let him know, that 'what he just said is only love's. It's adoration. He began walking, she couldn't stop him. What's more? On that day , it was last time they saw each other " Love is a feeling, not a perfect though...

सखी

ऋतु कुस बदलतो निसर्ग नियमच आहे तो पण माणसे अशी कशी बदलतात ग? - तो अगदीच विमनस्कपणे म्हणाला इतका विचार नको करू बदल हाच स्थायी भाव आहे सामान्य माणसाचा. अजुबाजुला बघ प्रेमाची, मायेची गरज असलेले असंख्य जीव आहेत भले परके असतील तुला पण तुझ्या प्रेमाची कदर एके ठिकाणी झाली नाही म्हणून प्रेम मनात ठेवू नको ज्याला त्याची गरज आहे त्याला दे मोठा हो, मन मोठे कर म्हणजे दुःख छोटे होईल तीच त्याची खरी सखी होती -शीतल #marathistory #marathishortstory #laghukatha 

एका चुकीची गोष्ट: #लघुकथा #tinytale #shortstory

एका चुकीची गोष्ट  # लघुकथा   # tinytale   # shortstory तो आज खुप खुशीत होता. कधी एकदा तिला भेटतोय आणि आनंदाची बातमी सांगतोय अस झाले होते. आणि आजच नेमकी ती वेळेवर पोचली नाही. रोजच ठिकाण, वेळ सगळे ठरलेले. आज अजून आली नाही आणि निरोप पण नाही. तास भर झाला. येवू दे तर आता खरड पट्टी च काढतो. असंख्य विचार मनात त्याच्या धुमसत हिते आणि त्या ही पेक्षा राग धुमसत होता त्याच्या मनात. ती समोरून येत होती, धावत पळत, धापा टाकत.ती काही बोलणार इतक्यात, त्यानेच बोलायला सुरुवात केली. शब्द बंदुकीच्या गोळ्या सारखे सटासट सुटत होते. ती  फक्त ऐकून घेत होती. तिचे डोळे पाहता पाहता भरून आले आणि एका क्षणी गालावर ओघळले.  तो एकदम स्तब्ध झाला. तिचे अश्रू पुसायचे भान ही नव्हते त्याला.  आणि त्याला एकदम वाटले, आपण इतके बोललो का ? तिला बोलायची संधीच दिली नाही. पण तिनी तरी असे न कळवता, इतके उशिरा यायचे म्हणजे. मी तिच्या साठी महत्वाचा आहे ना, मग ती का नाही वेळेवर आली. कसला छान मूड होता आज.  खरच काही घडलय का विपरीत ?. असे कसे आपण, काही न विचारतच, तिला ताडताड बोललो.  थोड़ा खजिल झाला तो...

सुहृद - #tinytale #shortstory #लघुकथा

Image
सुहृद -  # tinytale   # shortstory   # लघुकथा   तुमच्या मैत्रीचे आश्चर्य वाटते मला, कसे काय तू तिचे सगळे गॉसिप ऐकून घेतेस काय माहित? तू अजिबात तशी नाही आहेस. तुझे विचार इतके समृद्ध आहेत, तुझी स्वतःची अशी इतकी व्यवधाने आहेत. तुला या घरगुती गप्पा रोज ऐकून घेताना कंटाळआ येत नाही का ? कशा साठी तू हे सगळे? मी तिला विचारले. खर तर माझा काहीच संबंध नव्हता या साऱ्या सोबत. पण आश्चर्य आणि उद्विग्नता होतीच. या सगळ्या मागे इरावतीची काय भूमिका असेल असे ही वाटत होते. इरावती माझ्याकडे बघून हसली. न ेहमी प्रमाणे प्रसन्न चेहरा. हसता हसता ती थोड़ी गंभिर झाली, बोलली "थोड़े पुण्य कमावून घेते बस तिचे ऐकून.बाक़ी काही नाही" "म्हणजे?" " अग, ती एक साधी सरळ गृहिणी आहे. दिवसभर सगळे करायचे आणि दमायाचे पण मन मोकळे करायला कुणीच नाही. घरात सगळे चांगले आहेत, पण प्रत्येकाला व्याप आहेत. सासुबाई नोकरी वाल्या होत्या, प्रगल्भ प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती, किती ही चांगल्या असल्या तरी यांच्या तारा जुळत नाहीत. नवरा जेवढा वेळ मिळेल तेवढा देतो. मुले आता मोठी झाली आहेत, त्याना त्यांचे व्याप आहेत. तिची त...

चौकट #मराठीकथा #shortystory #tinytale #marathiblog #लघुकथा

चौकट - लघु कथा तो बोलत होता, अणि ती मन लावून ऐकत होती. तिच्या मनात सतत त्याचेच विचार सुरु होते.  तिच्या  मनात अगदी सहज येऊन गेले, काय हरकत आहे याचा जोड़ीदार व्हायला. एका कलाकार, स्वछन्द, कलंदर माणसाला आपण साथ देवू, त्याचा संसार आपण करु. तो चौकटीत रमणार नाही, हे सत्य स्वीकारुन पुढे जाईन  कि  मी.कदाचित चारचौघीं सारखे आयुष्य नसेल माझा. आपण   स्वीकार करू त्याचा.   तिने हिम्मत करून एक दिवस त्याला विचारलेच. अन तो पटकन हो म्हणाला, तिला अपेक्षाच नव्हती की तो या नात्याच्या बंधात अडकायला तयार होईल. तिला थोडे आश्चर्य वाटलंच कि हा कसा काय लग्न वगैरे अश्या रूढार्थाने चौकटीतल्या  नात्यासाठी तयार झाला . पण दुसऱ्याच क्षणी  ती खुप खुश होती, आनंदात होती. पण या साऱ्यात ती इतकेच विसराली की, तो लग्नाला इतक्या पटकन तयार होवून चौकटी मधला विचार करतोय अन ती मात्र या कलन्दर संसारात तरुन जायचा चौकटी बाहेरचा विचार करतिये ©शीतल