एका चुकीची गोष्ट: #लघुकथा #tinytale #shortstory
तो आज खुप खुशीत होता. कधी एकदा तिला भेटतोय आणि आनंदाची बातमी सांगतोय अस झाले होते. आणि आजच नेमकी ती वेळेवर पोचली नाही. रोजच ठिकाण, वेळ सगळे ठरलेले. आज अजून आली नाही आणि निरोप पण नाही. तास भर झाला. येवू दे तर आता खरड पट्टी च काढतो. असंख्य विचार मनात त्याच्या धुमसत हिते आणि त्या ही पेक्षा राग धुमसत होता त्याच्या मनात.
ती समोरून येत होती, धावत पळत, धापा टाकत.ती काही बोलणार इतक्यात, त्यानेच बोलायला सुरुवात केली. शब्द बंदुकीच्या गोळ्या सारखे सटासट सुटत होते. ती फक्त ऐकून घेत होती. तिचे डोळे पाहता पाहता भरून आले आणि एका क्षणी गालावर ओघळले.
तो एकदम स्तब्ध झाला. तिचे अश्रू पुसायचे भान ही नव्हते त्याला. आणि त्याला एकदम वाटले, आपण इतके बोललो का ? तिला बोलायची संधीच दिली नाही. पण तिनी तरी असे न कळवता, इतके उशिरा यायचे म्हणजे. मी तिच्या साठी महत्वाचा आहे ना, मग ती का नाही वेळेवर आली. कसला छान मूड होता आज.
खरच काही घडलय का विपरीत ?. असे कसे आपण, काही न विचारतच, तिला ताडताड बोललो. थोड़ा खजिल झाला तो. पण माफी आणि तो?
ती भेट तिथेच संपली.
दुसऱ्या दिवशी त्याने ठरवले समजूत काढयाची, कसे ही झाले तरी आपली प्रेयसी आहे ती. त्याने एक प्रेम पत्र लिहले तिला.
तिला सिनेमा पाहायला आवडते म्हणून अगदी फ़िल्मी स्टाइल नी लिहले
"तुझ में रब दिखता है"
"तुझ में रब दिखता है"
ती दोन दिवस आलिच नाही, बोलली नाही. अन तिचे पत्र च आले रितसर नकार देणारे, फक्त दोन ओळींचे
"मैंने कहा मन ही मन में, समझ सको तो समझो
रब की बाते छोडो और
मुझे इन्सां ही रहने दो
तुम्हारी तरह गलतिया करने की इजाजत तो रहेगी"
©शीतल
Comments
Post a Comment