चौकट #मराठीकथा #shortystory #tinytale #marathiblog #लघुकथा

चौकट - लघु कथा

तो बोलत होता, अणि ती मन लावून ऐकत होती. तिच्या मनात सतत त्याचेच विचार सुरु होते.  तिच्या  मनात अगदी सहज येऊन गेले, काय हरकत आहे याचा जोड़ीदार व्हायला. एका कलाकार, स्वछन्द, कलंदर माणसाला आपण साथ देवू, त्याचा संसार आपण करु. तो चौकटीत रमणार नाही, हे सत्य स्वीकारुन पुढे जाईन  कि  मी.कदाचित चारचौघीं सारखे आयुष्य नसेल माझा. आपण   स्वीकार करू त्याचा.  

तिने हिम्मत करून एक दिवस त्याला विचारलेच. अन तो पटकन हो म्हणाला, तिला अपेक्षाच नव्हती की तो या नात्याच्या बंधात अडकायला तयार होईल. तिला थोडे आश्चर्य वाटलंच कि हा कसा काय लग्न वगैरे अश्या रूढार्थाने चौकटीतल्या  नात्यासाठी तयार झाला . पण दुसऱ्याच क्षणी  ती खुप खुश होती, आनंदात होती. पण या साऱ्यात ती इतकेच विसराली की,
तो लग्नाला इतक्या पटकन तयार होवून चौकटी मधला विचार करतोय अन ती मात्र या कलन्दर संसारात तरुन जायचा चौकटी बाहेरचा विचार करतिये
©शीतल

Comments

Popular posts from this blog

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी

खिडकीतला पाऊस आणि मी !!!!(Poem/Kavita/Mukta Chhand)

Parv: An amazing reading experience