सुहृद - #tinytale #shortstory #लघुकथा
सुहृद - #tinytale #shortstory #लघुकथा
तुमच्या मैत्रीचे आश्चर्य वाटते मला, कसे काय तू तिचे सगळे गॉसिप ऐकून घेतेस काय माहित? तू अजिबात तशी नाही आहेस. तुझे विचार इतके समृद्ध आहेत, तुझी स्वतःची अशी इतकी व्यवधाने आहेत. तुला या घरगुती गप्पा रोज ऐकून घेताना कंटाळआ येत नाही का ? कशा साठी तू हे सगळे?
मी तिला विचारले. खर तर माझा काहीच संबंध नव्हता या साऱ्या सोबत. पण आश्चर्य आणि उद्विग्नता होतीच. या सगळ्या मागे इरावतीची काय भूमिका असेल असे ही वाटत होते.
इरावती माझ्याकडे बघून हसली. नेहमी प्रमाणे प्रसन्न चेहरा. हसता हसता ती थोड़ी गंभिर झाली, बोलली
"थोड़े पुण्य कमावून घेते बस तिचे ऐकून.बाक़ी काही नाही"
"म्हणजे?"
" अग, ती एक साधी सरळ गृहिणी आहे. दिवसभर सगळे करायचे आणि दमायाचे पण मन मोकळे करायला कुणीच नाही. घरात सगळे चांगले आहेत, पण प्रत्येकाला व्याप आहेत. सासुबाई नोकरी वाल्या होत्या, प्रगल्भ प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती, किती ही चांगल्या असल्या तरी यांच्या तारा जुळत नाहीत. नवरा जेवढा वेळ मिळेल तेवढा देतो. मुले आता मोठी झाली आहेत, त्याना त्यांचे व्याप आहेत. तिची तशी काही तक्रार नाही ग. पण तिचे ऐकून घ्यायला कुणी नाही बघ. तशी ती हुशार आहे, सद्य घडामोडी बाबतीत जागरूक आहे, गाणे उत्तम गाते अणि उत्तम कानसेन आहे."
"सगळे खरे आहे पण तरि ? आणि पुण्य कसले ग यात"
"अग, माझ्याशी रोज बोलते ती. अगदी काहीही बोलते. तिला सल्ला, प्रतिक्रिया काही नको असते. फक्त ऐकून घेणारे कुणी तरी, बास. ती सामान्य आहे याची तिला सतत जाणीव न करून देता तिला एक सुहृद हवा आहे. ती गप्पा मारते , मोकळी होते आणि परत संसारात रमते. इथे मोकळी होते, म्हणून घरात शांतता आहे, नाही तर ती, आणि म्हणून ते घर दोन्ही कोलनाडून पडेल. एक घर अणि आयुष्य सावरले जात आहे याचे पुण्य आहे ते. आणि खर सांगु, एकटे पणाचे दुःख वाईट ग.आणि खर सांगू, मला नेहमी वाटते की माझ्या आई नी याच कारणाने विभक्त होण्याचे ठरवले असेल, पन्नाशी मधे. तिला नाही कदाचित समजून घेवू शकलो आम्ही नाही तर...घर वाचले असते ग आणि तिची तगमग उमगली नाही त्याचे हे प्रायश्चित्त समज."
" खर आपण सगळ्याच कुठे तरि तिच्या सारख्या." मी सहज बोलून गेले. माझ्या डोळ्यासमोर ती आली जिला एका सुहृदची गरज होती, मी पण पुण्यवान होणार होते आणि तिला पण पुण्यवान करणार होते. एक नवा पैलू सापडला आज आयुष्याचा
☺️
©शीतल जोशी
#मराठीकथा #marathikatha #marathiblog

Comments
Post a Comment