अंतर #लघुकथा #shortstory #tinytale #freshstartofnewyear

#लघुकथा #shortstory #tinytale #freshstartofnewyear
रोजच्या प्रमाणे 7 वाजता त्याला जाग आली. थोड़े ताणु न द्यावा असा विचार मनात आला पण क्षण भरच. आज घरिच दिवसभर, घर नुसते खायला उठेल. त्यातून सण असेल तर रिकाम पण जास्तच अंगावर येते.
खुप दिवसांनी त्याला घराची आठवण झाली.
अगदी काही वर्षा पूर्वी ची गोष्ट, पाडव्याचा दिवस आई साठी खास एकदम. पु ऱ्या तळ णे आणि श्रीखंड करायची जबाबदारी ह्याचीच. आईला मदत आणि याची हौस.
त्याला वाटले असाच उठावे आणि जावे घरी. काय होईल ते होईल. गाड़ी काढली तर तासभरचा प्रवास.
हे विचार त्याने पटकन झटकले मनातून. का जायचे आपण? जे काय झाले त्यात माझी तरि काय चुक होती ?
मन मोठे विचित्र असते, एकदा आठवणी नी त्याचा ताबा घेतला की, ते हट्टी मुलासारखे वागते.हातातले खेलणे आणि मनताले आठव दोन्ही सोडता सोडावत नाहीत.
त्याला कुणाशी तरि बोलावसे वाटत होते, तेवढ्यात फोन वाजला. जिवा भावाच्या माणसाला च ही तगमग उमगु शकते. इकडाच्या तिकडाच्या गप्पा झाल्यावर तीने सहज विचारले
"घरची आठवण येते ना. अरे मग जा ना. आपल्याच घरी जायला कसला संकोच. कधी ना कधी तुलाच हे सारे मागे टाकावे लागणार आहे. भुतकाल मागे टाकून पुढे जाणे त्यांच्या पेक्षा तुला सोपे आहे. आयुष्याच्या अश्या वळणावर तू आहेस, ते नाहीत. तुझ्या तारुण्याची रग आणि त्यांच्या उतारवयतला हट्टीपणा यांचे भांडण आहे हे. त्यांचे वय मागे नाही फिरणार पण तू मात्र  तुझ्या वयाचा हा टप्पा पार करशीलच ना. कदाचित त्याच सक्रंमण टप्प्यात आहेस तू. म्हणून हीच योग्य वेळ आहे सांधयची.
आज नव्या वर्षाला नवी सुरवात कर. तू परत गेलास तर तू छोटा नाही होणार .नाते आणि मन मात्र मोठे होईल."
त्याचेच विचार जणू तिने बोलून दाखवले. नविन वर्षाच्या या अश्या शुभेच्छा तिने मनापासून दिल्या होत्या. त्याच त्याला पुढे न्यायच्या होत्या इतकेच.
नविन वर्षाची खऱ्या अर्थाने नवी सुरवात, आनंदाची, मायेची गुढी उभा करून करायची होती. सोपे नसले तरि शक्य मात्र नक्की होते.
त्याची गाड़ी गैराज मधून बाहेर पडली. तासाभराचे अंतर पार करून जणू कैक योजने अंतर तो पार करत होता, नात्यामधले.
© Sheetal joshi

Comments

Popular posts from this blog

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी

खिडकीतला पाऊस आणि मी !!!!(Poem/Kavita/Mukta Chhand)

Parv: An amazing reading experience