संसार #shortstory #tinytale #लघुकथा
#shortstory #tinytale #लघुकथा
तिला मी एकेरिच हाक मारते, आईला पण आपण एकेरिच बोलावतो की. एके दिवशी तिचे अहो आणि मी गप्पा मारत होतो. मी सहज त्याना , त्यांच्या सहजीवना बद्दल विचारले
अहो म्हणाले,
"चाळीस वर्ष झाली बघ लग्नाला, एकदा सुद्धा भांडण झाले नाही बर का आमचे.संसार अगदी सुखाचा झाला."
ह्यामधे जरा अतिशोयक्ति आहे असे मला वाटले. चार दिवसांनी मी सहज तिला बोलता बोलता विचारले
"इतके वर्ष संसार केलास तू. कशी गेली ग इतकी वर्षे? माझ्या आईला सतत अस वाटते की लग्नाआधीच आमचे एवढे वाद होतात, तर पुढे कसे निभावेल?. तुझे पण झाले असतीलच न वाद ? मग कस काय बाई इतकी वर्षे हे नाते निभावले गेले ?"
"सखी, अग वाद तिथे होतात जिथे संवाद असतो. आमच्यात नवरा बायकोचा संवाद कधीच नवता. असे समज की त्या काळाचे लिव इन."
"म्हणजे?"
" सगळ्याच गोष्टी सांगता नाही येत बयो. त्याना संसार नको होता, पण प्रवाह विरुद्ध पोहयचे ही नव्हते. आणि हे सारे समजल्यावर, नात्यात बाहेर पडायच धाडस माझ्यात नव्हते. ते बावीस वर्षांचे, अन मी वय वर्ष वीस."
"मग?"
" मग काय. तसे लहानच होतो ग आम्ही. ते माणूस म्हणून खुप चांगले, पण समाज सेवा हेच व्रत, म्हणून संसार नको होता त्याना. दोन वर्षे अशीच गेली, मग मीच बोलले, तुम्ही तुमचे व्रत सुरु ठेवा. मी माझे शिक्षण पूर्ण करते"
" अस कधी वाटले नाही पण तुमच्या कड़े बघून?"
"अग , हे नाते असच असते, आकलन करण्याच्या पल्याड. तीन चार वर्ष गेली,मी नोकरीला लागले.म्हणजे वेळ आलीच तर भविष्याची तरतूद असा साधा हिशेब होता. आर्थिक आणि वैचारिक दृष्टया स्वतंत्र झाले. याच दरम्यान थोड़े प्रेम वाटायला लागले हळूहळ, कदाचित सहवासाने असेल . एकमेकांचा आधार पण वाटू लागला. तारुण्याची सहज सुलभ भावना पण निर्माण झाली, आणि काही वर्षे ते नाते पण निर्माण झालेच . पण तरी ते काही या नात्यात काळ रमणार नाहीत हे मला माहित होतच. तरि त्यांच्या सोबत रहाणे हा सर्वस्वी माझा निणर्य होता."
" तुम्ही दोघे अजुन ही एकत्र राहाता? आणि ते याला संसार म्हणाले हे सगळ नवलच आहे"
" पुढच्या पीढिची ना ग तू सखे. तुला का इतके नवल वाटावे?. काही काळ गेला की सगळी बाकी नाती मागे पडतात, राहते ती फक्त मैत्री किंवा नाव न द्यावे असे आधार देणारे काही तरी . हेच टिकवले आम्ही . त्याच्या सारखा सुह्रद शोधून पण सापडला नसता मला. आधी धाडस झाले नाही म्हणून असेल आणि नंतर मला बाहेर पडवास नाही वाटले आणि त्याला ही. "
मला नक्की काय वाटत होते नाही माहित, त्या क्षणी. मी तिला फक्त घट्ट मीठी मारली. आणि तिचे दोन अश्रु माझ्या खांद्यावर ओघळले
सवांद नाही म्हणून वाद नाही असे म्हणत तिने स्वतशी किती प्रामाणिक संवाद साधला होता हे त्या दिवशी मला कळले. आणि चूक काय बरोबर काय ,याचे सारे हिशेब मनातून गळून पडले.
©शीतल
#मराठीकथा #marathikatha #story

Comments
Post a Comment