सहचर : लघु कथा

#shortstory #tinytale #womensday
तो खुप चांगला, समंजस आहे हे त्याच्या बद्दलच सगळ्यांचे मत.
अगदी तिला सुद्धा सहचर  म्हणून त्याची चांगली साथ होती.  तिची धावपळ होत असेल तेव्हा तो सगळ्या कामात मदत करायचा. त्याच्या चांगुल पणाचे कौतुक ऐकून ती सुखवायची.
त्यांच्या आयुष्याचा नवा टप्पा नुकताच सुरु झाला होता, 8 महिन्याचे आई बाबा होते ते आता☺️
असाच एक दिवशी तो आला,
"मी पुढच्या महिन्यात , 10 दिवसाच्या सहलीला जातोय. तुला तर महितिये, दर वर्षी मी फिरायला जातोच.
It's my passion. मी तुझ्या सोबतीची सारी व्यवस्था केली आहे. आजच टिकिट बुक करतो मग"
खर तर तिला सुद्धा कंटाळा आला होता. वर्क फ्रॉम होम म्हणजे सुद्धा घरिच दिवसभर. तिचे पण आई पण नविनच होते. त्यात त्याचे हे जाणे. तिला काय वाटले काय माहित, तिने ठरवले आज मनताले मनात नाही ठेवायाचे
" तुझे जायचे ठरले तर ? आणि सोबतीचे म्हणशील तर मी करेन व्यवस्था."
" काय झाले तुला एकदम? सगळे तर manage करतोय"
" मान्य. पण खर सांगु, मला सतत हे ऐकायाचा कंटाळा आलाय. तू साधा वरण भात केलास तरी
इतके कौतुक त्याचे की उगाचच उपकारचे ओझे वाटते मला मग. खर तर ज्याला जस जमेल तस घर सावरावे हाच संसार नाही का रे? तुझी मदत हे मला कधीच उपकार नाही वाटले, तुला वाटतात का रे माझे करणे कधी उपकार. मग का आजु बाजुचे लोक त्याला असा रंग देतात  आणि तू पण त्याला मूक संमति देतो?
" मला कधी हे लक्षात आले नाहीच ग ?"
" तुला अजुन तरि कुठे लक्षात येतेय. मान्य आहे की आई म्हणून काही जबाबदारी निसर्गाने मलाच दिल्या आहेत आणि त्या गृहीत धरून च मी आई होण्याची तयारी केलि आहे. त्या मुळेच मला आज नाही म्हणता येत की, मी जाते 10 दिवस , व्यवस्था करून , तू बघ हिच्या कड़े. पण तू एक वर्ष नाही थाम्बू शकत?तुला नेहमीच तुझी स्पेस मिळाली आहे आणि मला पण.
पण आयुष्याचा हा टप्पा वेगळा आहे मला. इतके दिवस आपले आयुष्य सारखे होते. तुला वाटेल करियर तर सुरु आहे की माझे; पण अरे बाहेर जावून काम करणे अणि घरी बसून करणे खुप फरक आहे. ह्या 10 दिवासतले 5 दिवस जरी तू माझ्या साठी दिले असते ना ; तर"
"अग पण "
" जावू दे. मी माझे मन मोकळे केले इतकेच. तू हुशार आहेस, तुला कळले असेल.
फक्त एक कर, जर कधी ऑफिस मधे एखाद्या सहकारी मुलीला उशिरा पर्यन्त सोबत म्हणून थांबलास, तर त्याचे ओझे तिला वाटू देवू नकोस."
-शीतल
#महिलादिन #लघुकथा

Comments

Popular posts from this blog

Our visit to an experimental School- Prayog Bhumi

खिडकीतला पाऊस आणि मी !!!!(Poem/Kavita/Mukta Chhand)

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी