#shortstory #लघुकथा भातकुली
#shortstory #लघुकथा
भातकुली
वंश परंपरागत असलेली आमची आजोळची भातकुली कोणाकडे आहे, हे शोध कार्य माझ्या अंगावर येवून पडले होते. माझी भाची अनु, 3 वर्षाची झलिये आणि तिच्या सोबत नवीन नवीन खेळ खेळणे हा माझा छंद.
माझ्या काका आजोबांकडे , आजोळी एक पितळी भातुकली होती,. तिंची मला आठवण झाली . अनु साठी विचारवी म्हणून मी फ़ोन केला ; पण आता नक्की कुणापाशी आहे हे काहि नक्की कळले नाही.
भगीरथ प्रयत्नन्ति शोध लागला. अश्विनी, माझी चुलत आत्ये बहिण, भातकुली ची सद्य मालकिण.
अश्विनीच्या दारवरची घंटी वाजवाली. इतक्या वर्षनि भेटल्या वर काय बोलेवे या विचारात असतानाच तिने दार उघडले
"कोण , मीनू? किती वर्षानि ग. ये ग आत ये"
हसतमुखाने , मीठी मारून तिने माझे स्वागत केले. काही काही स्पर्शाने काळाचे हिशेब लगेच मिटतात ना!
" इकडे कसा दौरा? '
" तसे सहजच ग आशु. कशी आहेस तू?"
" मी मस्त ग"
आशु माझी बहीण , अजुन तशीच होती, मनमोकळी, जिंदा दिल. हुशार तर ती होतीच लहानपणा पासून. उत्तम नोकरी असणारी , स्वावलंबी, तडफदार अन मायाळू. इकडच्या तिकडच्या गप्पा, चहा पाणी झाल्यावर मी माझ्या येण्याचे कारण तिला सांगितले.
" आशु, अग आपली भातुकली तुझ्या कड़े आहे न. दादाच्या मुली साठी, म्हणजे अनु साठी ग, हवी होती"
" आहे की माझ्या कड़े . थांब देते तुला."
खर तर भातु कली चा खेळ आशु कड़े कसा ? हा स्वाभाविक प्रश्न पडलाच होता मला. तिने खेळ आणून दिला अन जणू माझे मन वाचले
" मीनू, घेवून जा ग. तस पण मिहिर आता मोठा झालाय आणि त्याच्या कड़े चिक्कार भांडी कुंडी आहेत"
"मिहिर कड़े?"
" सगळे हाच प्रश्न विचारतात मीनू. मुलगा भांडी कुंडी खेळाला तर केवढा प्रश्न ना!" मनमोकळी हसली ती, पण त्यात हि एक उदासीची छटा होती.
"तसे नाही ग, आशु. अनवधनाने बोलले मी"
"ठीक आहे ग. अपेक्षित प्रश्न होता हा . तुला आता सांगायचेच झाले तर,मिहिर एक महिन्याचा होता ; तेव्हा आम्ही दोघे वेगळे झालो .म्हणजे कायद्यानि, मनानी तर आधीच झालो होतो. तेव्हाच मी ठरवले की, जे माझ्या बाबतीत झाले ते भविष्यात घडू नाही द्यायचे. जे घडले ते टाळणे तेव्हा सहज शक्य होते. प्रश्न फक्त मानसिकतेचा होता. म्हणून ठरवले कि मिहीर ला मोठे करताना हे लक्षात ठेवायाचे. त्याने लग्न केलेच , तर हे असे प्रश्न निर्माण होणार नाहीत, याची बीजे त्याच्या संगो प नातच रुजवायची . त्याच्या जोड़ीदारला या सगळ्याला समोरच जायला लागणार नाही . पुढचि पीढ़ी घडवणे तरी माझ्या हातात आहे. सुरवात घरापासून करावी नाही का?"
ती मस्त हसली निरोप देताना, अन परत भेटायचे आश्वासन पण घेतले माझ्या कडून.
निघता निघता , मी पण एक गोष्ट मनाशी ठरवली अन आशुला आमंत्रण दिले
" अग , सुट्टीत ये ना मिहीरला घेवून आमच्या कडे . म्हणजे मग मिहीरला पण ही त्याची भातुकली खेळता येईल, अनु सोबत. "
परम्परागत भातु कली मागे एक नवा विचार घेवून मी बाहेर पडले.
©शीतल जोशी
#मराठीकथा #marathiblog

Comments
Post a Comment