सखी

ऋतु कुस बदलतो
निसर्ग नियमच आहे तो
पण माणसे अशी कशी बदलतात ग?
- तो अगदीच विमनस्कपणे म्हणाला
इतका विचार नको करू
बदल हाच स्थायी भाव आहे
सामान्य माणसाचा.
अजुबाजुला बघ
प्रेमाची, मायेची गरज असलेले
असंख्य जीव आहेत
भले परके असतील तुला
पण तुझ्या प्रेमाची कदर एके ठिकाणी झाली नाही
म्हणून प्रेम मनात ठेवू नको
ज्याला त्याची गरज आहे त्याला दे
मोठा हो, मन मोठे कर म्हणजे
दुःख छोटे होईल
तीच त्याची खरी सखी होती
-शीतल
#marathistory #marathishortstory #laghukatha 

Comments

Popular posts from this blog

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी

खिडकीतला पाऊस आणि मी !!!!(Poem/Kavita/Mukta Chhand)

Parv: An amazing reading experience