#लघुकथा #shortstory #tinytale गुलमोहर

#लघुकथा #shortstory #tinytale
गुलमोहर
 गुलमोहरचे झाडांची रांग च रांग बघून , ती खुश झाली. निळया आकाशी रंगाच्या पडद्यावर, लाल केशरी रंगाची जादू पसरली होती. मधेच एखाद्या गुलमोहरामधून हलकिशी हिरवी छोटी छोटी पाने त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून  देत  होती. कुठे एखदया झाडानी, मातकट रंगाच्या शेंगा अंगभर खेळवल्या होत्या. या लाल पखरणी मधेच, एखादा एखादा पिवळा जर्द बहवा मन मोहवून घेत होता. तिला उगाचच वाटले , ही लाल पिवळी झाड़े म्हणजे जणू चैत्र महिन्यताले हळदी कुंकु. प्रत्येक सण म्हणजे जणू निसर्गशी एकरूप होणेच.
ती कित्येक वर्षे मागे फिरली. कुमुद आणि तिच्या घरा मधे असाच एक गुलमोहर होता, एक बहवा पुढच्या वळणावर. दोन्ही घरांच्या परसात एकेक आंबा उभा होता. त्या झाडांच्या सावलित, यांचा दुपरचा खेळ अगदी रंगात येत असे.
कुमुद आणि ती बरोबरीच्या अन तिचा दादा यांच्या पेक्षा दोन वर्षानि मोठा. आम्बाच्या त्या झाडांच्या सावलीत तिघांचे बालपण सुखात सरले.
काही वर्षात कुमुद आणि दादाचे नाते सुद्धा फुलले अगदी त्या गुलमोहरा सारखे. तो गुलमोहर आणि ती साक्षीदार त्या प्रेमाचे. पण शिशिरात पान गळ होतेच.
प्रेमाच्या आणा भाका बाजूला पडल्या अन कुमुद कोण्या दुसऱ्याची चि सौ का झाली. तिला दोघांमध्ये काय झाले काहीच कळले नाही, ना दादानी काही सांगितले.
दादा एकटा उरला त्या बहाव्या सारखा एका वळणावर. दोन्ही घरांच्या मधे असलेला गुलमोहर, बहरत राहिला कैक वर्ष. पण दोन्ही आंबे मात्र कधीच मोहरले नाहीत परत कधीच. निसर्ग पण आपल्या भावना समजून घेतो, असे तिला वाटले.
आता तो गुलमोहर पण पडला आहे म्हणे, आता पडला की पाडला काय ठाऊक?
कित्येक वर्षानि तिचि पावले , कुमुद च्या घराकड़े वळली. मधला गुलमोहरच नाहीसा झाला होता. कोणी तरि कुणाचे तरि सांत्वन करेलच एकाकी पणा बद्दल.याच आशेने ती कुमुद च्या घरापाशी थांबली. कुमुद परत आली होती एकटिच. दोन्ही घरताली करती- सवरति माणसे आता नव्हती. तिच्या घरात ही दादा एकटाच होता.दोन्ही एकाकी घरे पाहून तिला कस तरि झाले. भूतकाळ बदलता आला असता तर दोन्ही घरे बहरली असति.
निसर्ग माणसाच्या भावनासोबत एकरूप होतोच  याच आशेने तिने कुमुदला साद घातली.
दोन घरांच्या मधे एक गुल मोहरचे झाड़ आणून लावले, काही वर्षानि बहरेल या आशेवर.
पुढच्या चैत्रा मधे कुमुदचे हळदी कुंकु अगदी जोरात झाले तिच्या घरात . काही वर्षानि गुल मोहोर पण बहरेलच कारण आंबे या वर्षी मोहरले होते, माणसंप्रमाणे
©शीतल जोशी
#मराठीकथा #marathiblog #love #गुलमोहर

Comments

Popular posts from this blog

Our visit to an experimental School- Prayog Bhumi

खिडकीतला पाऊस आणि मी !!!!(Poem/Kavita/Mukta Chhand)

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी