मैत्र भाग : ५ आणि शेवटचा भाग

मैत्र भाग : ५ आणि शेवटचा भाग 



सोनालीच्या आई बाबांनी बऱ्याच  गोष्टी सांगितल्याने, बराच खुलासा झाला होता. इतके समजूतदार पालक असून हि , सोनालीने त्यांना न सांगता लग्न केले, या बद्दल आश्चर्य वाटावे  अशीच परिथिती होती. अर्थात एकीकडे अभिला असे हे वाटले कि, खरच कसे सांगितले असते तिने, एकदा होकार, एकदा नकार काल्वणारा अजय, त्याच्या आई वडिलांची नाराजी. अजयच्या कुटुंबाला न कळवता ते आपल्याला लग्न नाही करू देणार, हे हि तिला मनोमन ठावूक असावे; पण हेही  लक्षात येतेय कि तिला या सगळ्याचा किती त्रास होतंय. अजय मध्ये ती इतकी गुंतली होती, तिचे खरच मनापासून प्रेम होते अजयवर. मग नेमके काय झाले तिच्यात आणि अजयमध्ये असे कि, इतका कडवटपणा  अल. अजयची अशी करणे होती आणि ती गंधालीला  पटली नाहीत, ती पण इतकी कि तिने त्याला झिडकारले. आता कसा असेल अजय? त्याला खरच कधी सोनालीची आठवण येत असेल का ? आणि गंधाली, तिच्याबद्दल आता काय वाटत असेल त्याला? प्रेम, द्वेष, तिरस्कार कि काहीच नाही ? मैत्री नसेल तर खरच फरक पडतो का आयुष्यात? आपले पण किती जुने मित्र होतेच कि, ज्यांच्या शिवाय एक क्षण चैन पडायचे आपल्याला आणि आता ? तसाच अजयला तरी का फरक पडावा गंधालीच्या मैत्रीचा ? अभी या सगळ्यात फारच अडकत चालला होता. हे सगळे त्याच्या वयक्तिक आयुष्याशी हि निगडीत होते. अभिला पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरे सोनाली आणि गंधाली कडे होती आणि काही प्रश्न, अनुत्तरीतच राहणार होते, अजयशिवाय. अभी या विचारातच घरी पोचला.  गंधालीला फोन करावी कि नाही याच्या विचारातच होता. उद्या एक दिवस ब्रेक घ्यावा असे त्याला वाटत होते. काय माहित थोडे अस्वस्थ वाटत होते. आपण सोनालीला या सगळ्यातून बाहेर काढले., तर आणि तरच  त्याची गंधालीपण … … आपल्या नात्याच्या सुरवातीलाच, गंधालीच्या आयुष्यातला एका नाजूक वळणावर आपण उभे आहोत असे त्याला वाटले. हे सगळे सुरु असतानाच गंधालीचा फोन आला. अभिनि तिला सांगितले कि तो एक दिवस ब्रेक घेणार आहे, मग तिने पण अर्धा दिवस त्याच्या साठी राखून ठेवला. काम कधी संपता संपत नाहीत, तेव्हा असा वेळ मुद्दामून काढावा लागेल याची त्या दोघानाही कल्पना होती आणि त्यांनी तसच ठरवले होते कि, जो वेळ एकमेकांसाठी आणि कुटुंबासाठी द्यायचा त्यात हलगर्जी पण नाही करायचा.  

गंधाली  आणि अभी भेटले, ठरल्या प्रमाणे. खर तर दोघानाही सोनाली - अजय बद्दल बोलायचे होते; पण काही वेळ दोघे हि टाळत  होते. अर्थातच गंधाली नि सुरवात केली 
"मला माहितीये अभी, आपल्या दोघांच्या डोक्यात आता काय विचार आहेत ते. कधी तरी बोलणारच न आपण. मग टाळायचे कशाला नाही का ?"
"खरय. मला तुझे हेच आवडते, सरळ एकदम, मनातले ओठावर. खर सांगू इअतर वेळी मी विशेष कधी तुझ्याशी माझ्या केसेस बद्दल बोलत नाही; पण या वेळी वेगळे आहे "
"कळतंय मला. मी या सगळ्यात गुंतलीये; त्यामुळे साहजिकच आहे. तूच सोनालीला या सगळ्यातून बाहेर काढू शकतोस, मी वाट्टेल ती मदत करेन तुला"
"फक्त सोनालीला ? तुला सुद्धा यातून बाहेर पडायची गरज आहे !!!" 
"मला ? माझा काय आता ? मला नाही कळले, मी तर नॉर्मल आहे "
" मला असे नाही म्हणायचे आहे. माझ्या साठी तर सोनाली पण नॉर्मलच आहे. तिला फक्त आत्मविश्वास परत मिळवून द्यायचा आहे. अजय दूर गेल्याचे दु:ख तिला आहेच, पण त्याहि पेक्षा, त्याच्याशी इतक्या गडबडीने लग्न केले हि चूक झालीये, माणूस ओळखण्यात, नाते जपण्यात आपण कमी पडलो आहे, यामुळे तिने आत्मविश्वास गमावला आहे. तुझे तसे नक्की नाहीये, पण हे असे वागणारा माणूस आपला मित्र आहे किंवा आपण हे टाळू शकलो असतो कदाचित, एक जवळची मैत्रीण म्हणून, याचे क्षम्य तुला वाटतंय गंधाली ? आणि तुझ्यासाठी, सोनाली तिचे आयुष्य आनंदाने जगायला लागेल तेव्हा।"
"तेव्हा, मी मुक्त होईन अजयच्या मैत्रीच्या ऋणातून. "
"म्हणजे ? मला वाटले तू सोनालीची मैत्रीण आहेस किंवा या काळात झाली आहेस म्हणून हे सारे करतीयेस, नाही का ?"
"अभी, सरळ प्रश्न विचार, गोल गोल नकोत. तुला हेच विचारायचे आहे न कि आता मला अजय बद्दल काय वाटतय? मी अजून हि त्याला मित्र मानातीये का ? एक विचारु, नाते तोडले, म्हणून भूतकाळात जिवंत असलेले, जीवापाड जपलेले नाते तोडले म्हणून विसरता येते का ? आणि का , कशासाठी विसरायचे ?. मान्य आहे कि , त्याने सोनालीला दुखावले आणि मलासुद्धा. त्याने लग्न करेपर्यंत, मला तो कमजोर वाटत होता आणि त्याने जेव्हा नकार दिला, तेव्हा मी  इतका राग नाही केला; कारण कदाचित लग्न आधीची नकाराची ती वेळ योग्य होती. पण त्याने लग्न केले आणि मग मला वाटले, कि आता सुरळीत होईल. थोडा त्रास तर नक्कीच होईल, पण मला खात्री होती कि अजयच्या घराचे आज न उद्या सोनालीला स्वीकारतील हि. तस हि , ती हुशार, आणि समंजस होती आणि काकांचा व्यवसाय ती उत्तम पणे  सांभाळू शकत होती. मला वाटले, अजय नि स्वताच्या हिमतीवर, बुद्धीचे न ऐकत, मनाचे ऐकून हा निर्णय घेतला आहे, पहिल्यांदाच. तो निर्णय तो निभावेल शेवट पर्यंत याची मला उगचाच खात्री वाटत होती. किती हि नाही म्हटले, तरी आम्ही एकमेकांपासून दूर होत होतो, म्हणजे रोज भेटणे शक्य नव्हते, फोन कधी तरीच. आणि खर सांगू आपण मोठे होवू तसे आपले विचार अधिक दृढ , पक्के होता जातात . आमच हि तसाच होते, वैचारिक तफावत खूप होती; पण तरी आम्ही बांधलो गेलो होतो. का ते नक्की सांगता नाही येणार; पण कदाचित लहानपणीच्या मैत्रीचा, प्रेमाचा एक निरागस धागा आमच्यात अजूनही होता आणि आम्ही दोघांनी हि मनाच्या कोपऱ्यात  तो जपून ठेवला होता. पण म्हणूनच सांग, कि मी त्याचे माझे नाते कसे विसरू ?"
"पण ते नाते आता तू तोडले आहेस न गंधाली ? अग  एकीकडे आपण सोनालीला या सगळ्यातून बाहेर काढतोय न , मग तूच त्यात का अडकून पडतीयेस ?"
"अरे, इतके सोपे आहे का. आणि मला मुळात अजयला विसारायाचे नाहीच आहे. त्याची माझी मैत्री मला प्रिय आहे, शक्य झाले असते तर आयुष्यभर ती निभवायला मी तयार होते आणि तो सुद्धा. आता वर्तमानात मी आमच्या मधले सगळे दोर कापले आहेत. पण म्हणून मला सत्यापासून दूर नाही पळता येणार. मैत्रीचे असंख्य, अनमोल , आनंदाचे , प्रेमाचे, हसण्याचे,  असे क्षण  त्यांनी माझ्या पदरात टाकले आहेत, ते मी का नाकारू ? आणि तसे नाकारणे हा आमच्या मैत्रीचा, आमच्या त्या वेळी एकमेकांबद्दल असणाऱ्या भावानेचा अनादरच होईल. "
"पण गंधाली, तुला या सगळ्याचा त्रास होईल आणि सोनालीला काय हेच सांगणार आहेस ?"
"त्रास …. त्रास कसला रे त्यात.  तो जे वागला आहे त्यासाठी त्याला मी कधीच माफ करणार नाही, पण मला आमचा सौख्याचा, मैत्रीचा काळ जपायचा आहे. माझ्या आयुष्याचा तो अविभाज्य भाग होता. माझी किती तरी सुख , दु:ख, स्वप्ने मी त्याच सोबत वाटली आहेत आणि त्याने हि माझ्या सोबत . आणि मला ते सगळे लक्षात ठेवायचे आहे. त्रासाचे म्हणशील तर हो , एक त्रास नक्की आहे, हे सगळे लक्षात असताना हि, त्याला माफ न करण्याचा जर कधी चुकून तो माझ्या समोर आला आणि मला किंचित का होईना असे वाटले कि त्याला माझी गरज आहे, किंवा … असाच काही तरी, तर फक्त मी कमजोर पडू नये. इतकाच त्रास आहे. कधी असा प्रसंग आलाच तर तू मला याची आठवण करून देशील न अभी"
"नक्की. मला कळतंय तुला काय म्हणायचे आहे ते. सोनालीचे पण असाच झालाय कि ती त्याच्या सोबतचे क्षण, तो सहवास विसरू शकत नाहीये."
"अभी, जर आपण तिला तो मुद्दाम विसरायला लावला तर, ते योग्य नाही असे मला वाटतय"
"हो, मी तिच्या आई वडिलांना तेच म्हणलो कि भूतकाळातील  आठवण  तिच्या समोर आली तर येवू द्या किंवा   तिला त्याबद्दल बोलू द्या. जेव्हा तिला या गोष्टीची जाणीव होईल न कि, तिच्या वर अजयपेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे लोक अवती भोवती आहेत. आणि मुख्य म्हणजे ती स्वतावर प्रेम करायला शिकेल न, ती हळू हळू  वर्तमानात जगायल शिकेल. आपल्याला दिलेले हे आयुष्य अनमोल आहे आणि आपण ते छान जगू शकतो, करण्यासारख्या खूप गोष्टी आपण केल्याच नाहीयेत आणि छोट्या छोट्या गोष्टीत हि कि आनंद असतो, हे तिला जाणवून द्यायचे. तिला मानसोपचार तज्ञपेक्षा एका चांगल्या मैत्रीची गरज आहे. ते निरपेक्ष प्रेम तू तिला दे. असे समाज हवे तर कि, अजयबद्दल च्या तुझ्या एके काळच्या भावनेची ती वारस  आहे. तिला तुझ्याबद्दल खूप आदर आहे आणि तुमच्या मैत्रीबद्दल सुध्दा. तू आज तिच्या बाजूनी उभी आहेस, अजयलासोडून याचे तिला एक वेगळाच  समाधान आहे. हे बघ तिचा डॉक्टर म्हणून मी आहेच, पण आता मी केवळ एक सपोर्ट सिस्टम आहे फक्त" 
"हो अभी. पटलय मला तुझे म्हणणे. हे बघ ती पुढच्या महिन्यात तुझ्या बाबांना  जोइन होतीय. काम गुंतागुंतीचे आहे, ती नक्की रमेल त्यात.  तिच्या आवडी निवडी लक्षात घेवून मी हि वेळ काढेन तिच्या साठी. "
"हो, आणि मी तिच्या पालकांना सांगितले आहे, सहानुभूती नाही. तिला नकोय ती. अति काळजी करू नका, ती कोशात जाईल , उलट तिला रिस्क घायला प्रवृत्त करा.  बाहेर जात जा, नातेवाईकांमध्ये  मिसळा. सुरवातीला लोक काही बोलतीलहि, पण त्याची हि सवय होवू द्या तिला आणि तुम्हाला. हळू हळू बदलेल सारे . लोक हि समजूतदार असतात कि, सोनालीचे नवे आयुष्य सुरु झाले कि अजय बद्दल कुणी बोलणार नाही आपोआपच. "
"अभी, खर सांगू. माझ्या मनावरचे मोठे ओझे उतरेल रे !!!"
"एक विचारू गंधाली ?"- अभी 
"चक्क परवनागी ?"-गांधली 
"प्रश्नच तसा आहे. तुझ्याकडे चुकीला क्षमा नाहीच का ग ? इतकी कठोर आहेस तू ?"- अभी 
"घाबरलास अभी? अरे मी पण माणूस आहे, मी पण चुकातेच कि, मला हि वाटते कि मला पण माफी मिळावी चुकीची; मग मी का नाही माफ करणार. पण एक तर प्रांजळपणे आपली चूक मान्य करावी, तू सुधारावी आणि मुख्य म्हणजे चूक नकळत होते. समजून उमजून घेतलेल्या निर्णयाला चूक नाही म्हणत. जाणून बुजून केला जातो तो गुन्हा, चूक नाही "
"तू कधी अजयला नाही विचारलास कि त्याही काय बाजू होती ?"
"हे बघ अभी , मला न मुळातच हे पटत नाही कि नेहमी चूक दोघांची असते. कधी कधी एकाचीच चूक इतकी मोठी असते कि दुसऱ्याचे  वागणे नगण्य म्हणता येयील अगदी. विचारले मी अजयला, लग्न जसे न सांगून केले तसाच घटस्फोट  पण न सांगताच . मला कळले ते त्याच्या दादा कडून आणि त्याला कळले सोनालीच्या आई बाबांकडून, अजय कडून नाही. मी एकदा नाही ३-४ वेळा भेटले सोनालीला आणि त्याला घटस्फोट प्रक्रिया सुरु असताना. दादांनी हि खूप प्रयत्न केले. पण शेवटी तेच झेल जे अजयला हवे होते. त्याची करणे अगदी फुटकळ होती"
"असे कशी वरून सोनालीही चुकत असेल कि कधी तरी "
"असेल हि ; मी नाही म्हणतच नाहीये. पण म्हणून तिचे अजय वरचे प्रेम कमी नव्हते. ती त्याच्या कुटुंबाचा आब हि राखत होती. तिने अजयला त्यांच्याशी संबंध ठेवण्य पासून कधीच रोखले नाही. अजयच्या बाबांनी जेव्हा त्याच्या समोर नव्या ब्रांच चा पर्याय ठेवला; तेव्हा सोनाली नाही म्हणू शकत होती आणि तेव्हा अजय नि तिचे नक्की ऐकले असते. पण तिने तसे केले नाही, तिला वाटले किमान मुलाला तरी जवळ करत आहेत, तर असू दे. तिने स्वत: च्या पेक्षा अजयचा जास्त विचार केला नेहेमीच आणि अजय नि त्याच्या स्वभावाप्रमाणे नेहेमीच स्वताचा विचार आधी केला. अगदी लग्न करतानासुद्धा. "
"गंधाली , तो तुझा मित्र होता न "
"हो होताच. म्हणूनच मी त्याच्या बद्दल हे धाडसी विधान केले आहे आणि कित्येकदा मी सोनालीला हेच समजावयाचा प्रयत्न केला कि त्याच्या वागण्याकडे डोळसपणे  बघ. लग्न करायच्या आधी तिने हे करायला हवे होते. नकार देताना, अजय नि  स्वताच विचार केला, स्वतावर येणाऱ्या दबावाचा आणि नकोच ती कटकट आयुष्यभर म्हणून तो मागे हटला आणि मग पुन्हा सोनालीशिवाय जीव कासावीस व्हायला लागला म्हणून सोनालीला गाठले; लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मला संग या सगळ्यात त्याने सोनालीचा विचार कधी केला ? नकार देताना कि परत लग्नाची गळ घालताना ? सोनालीचे त्याच्या वर प्रेम होते म्हणून त्याचे सुख, त्याची इच्छा  ती जपत राहिली. असाच मग नात्यांचा तोल जातो. एकाने सतत कोसळायचे आणि दुसऱ्याने  सतत सावरायचे. जोडीदाराच्या चुकांवर  घातलेले पांघरूण. म्हणजेच आंधळे प्रेम. चूक हि दाखवून द्यायला हवीच "
"म्हणजे का लगेच तोडायचे ?"
"अभी , मी असे कुठे म्हणाले. चूक दाखवणे म्हणजे तोडणे नाही. मला असे म्हणायचे आहे कि, आपला जोडीदार जर माणूस म्हणून समृद्ध व्हावा असे वाटत असेल तर, तात्कालीक रोष ओढवून घ्यायला काय हरकत आहे? त्यातून जर त्याचे , आपले आणि कुटुंबाचे भले होणार असेल, तर ते एक कर्त्यव्य आहे फक्त प्रेम नाही. सोनाली इथेच चुकली बस. हा आता बायको म्हणून ती सगळ्या अपेक्षा पूर्ण करू शकली नसेलही कदाचित, पण त्याने हि नवरा म्हणून केल्या नसतीलच कि"   
"हे खरे आहे. थोड्या फार चुका होतात. अपेक्षा हि पूर्ण होत नाहीत. नाती शेवटी अपूर्णच असतात आणि त्यांना वेळ देण्याची हि गरज असते. म्हणजे माझे तुझ्या वर  वर किती हि प्रेम असल ना; तरी २ तास भेटणे आणि रोज एकत्र राहणे यात फरक आहे. आकर्षणाचा काळ संपला न कि. नात्याला जर वेळ द्यावाच. सहवासानेच प्रेमाचे रुपांतर मायेत होते. भल्या बुऱ्या  काळात  आपण कसे वागतो एकमेकांशी  यावर खूप गोष्टी अवलंबून असतात; मग त्या वेळचं स्मृतीत आपण एखादी चूक, अवगुण माफ करतो "
"खरय. अजयचे हेच चुकले. लग्न झाल्यावर त्याने हि काही वेळ द्यायला हवा होता स्थिरपणा साठी . स्वताच्या जीवावर संसार मांडला आहे तर मग, स्थिरता यायला वेळ लागणारच, आर्थिक आणि मानसिक सुद्धा "
"नक्की काय झाले सांगशील?"
"मोठे असे काहीच नाही. छोट्या छोट्या कड्यांची साखळी झाली. अजयला बाबांनी ऑफर दिली, तो जोइन झाला. काम तर होताच पण पैसा लिमिटेड. सोनालिनी हि नवी नोकरी पकडली असल्यामुळे तिला हि दगदग होत होतीच. शहर छोटे असले कि कामाचा मोबदला हि त्याच प्रमाणात. सोनालीच्या पगारातून कर्ज काढून, बाईक घेतली. साधा विचार कर, मला भेल खायला घेवून जाताना सुद्धा, अजय कार काढायचा. कर आमच्या कडे पण होती; पण मी २ व्हीलर , सायकल दोन्ही वापरायचे. चालत जायला तर आवडायचे मला; तसाच सोनालीचे पण होते. वेळ पडली म्हणून ती बस नि पण प्रवास करायची. तिने हि सगळी मानसिक तयारी केली होती. ती सुद्धा एका सुखवस्तू घरातून आली होती . तिचे आई वडील तिला मदत करायला हि तयार होते; पण ती नकॊ म्हणाली, एवढ्या वरून अजयच्या आई बाबांना  वाईट वाटायला नको किंवा गैरसमज नको. सोनाली नोकरीची होती ; अजयला घरात मदत करणे प्राप्त होते. पण सवय तर नाहीच, कशी असेल घरी नोकर चाकर तर होतेच आणि काकू लाड करायची ते वेगळेच. मग सोनालीची पण चिडचिड. घर नोकरी पैसा यात अडकले कि मग  प्रेमाला असा कितीसा वेळ उरणार रे. "
" खरय "
 "तरी पण सोनालीचे म्हणणे असे होते कि अजय थोडी मदत करेल ; तर ते एकत्र वेळ हि घालवू शकतील आणि एकमेकांसाठी वेळ हि मिळेल. अजय तयार झाला. काही दिवस बर सुरु होते. मी हि एक दोन वेळा पाहुणचार घेवून आले होते. मला हे सांगायचे अभी कि, सोनालीने आमचा असे वेळ आम्हाला राखून ठेवला. मला त्याचे खूप कौतुक वाटले. बायको आहोत म्हणून प्रत्येक वेळी आपण बरोबर असावा असा तिचा आग्रह नव्हता. तुला लक्षात येतेय न कि तिला अजय बद्दल किती वाटत होते ते. त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या आवडत्या गोष्टी ती जपत होती, त्याचे आई बाबा, त्याची मैत्री सगळे. हा आता संसार नवीन होता तर काही गोष्टी चुकल्या असतील हि. पण तिची मानसिक तयारी होती. बर तसे ते बऱ्यापैकी कमवत होते. फक्त सुरवात होती करियर ची इतकच. स्ट्रगल म्हणण्यासारखे अगदी काय नव्हते "
"पण अजय- सॉन्लिच्य बारीक सारीक गोष्टी अजयच्या घर पर्यंत पोचू लागल्या, त्याची पार्टनर त्या गोष्टी इमाने इतबारे पोस्टमन होती. "
"जी त्याची आतची बायको आहे . "
"हो. सोनालीला गडबड असेल त्या दिवशी डब्याला सुट्टी असायची' मग एक दोन वेळा काकू नि त्याच्या आवडीचे बनवून  डबा  पाठवला. घर पासून नवी बरंच फार दूर नव्हती , तासाभराचा रस्ता कारनि .  इतपर्यंत ठीक होते ; पण मग डबा  रोज यायला लागला; मुलाचे हाल होतात म्हणून. फक्त त्याच्या साठी. अधून मधून यायचा तेव्हा सोनालीची काही हरकत नव्हती. पण तिला यात डावलले गेले; तिच्या मुळे  अजयचे हाल होतात; यांनी तर ती दुखावलीच गेली आणि मग रागाच्या भारत एखादी ठिणगी पडली असेल. अजयनि  पण तेवढाच मनात ठेवले. हळू हळू ऑफिसच्या नावाखाली त्याला कारहि वापरायला मिळू लागली; पण अर्थात स्वतापुरातीच फक्त , ऑफिस साठी होती न. सकाळी न्यायला - सोडायला आणि मधल्या वेळेत कामासाठी म्हणून. मग बाईक  विकून टाकली आणि सोनाली साठी २ व्हीलर  घेतली. सोनालिनी कर्ज काढून घेतलेली पहिली वाहिली बाईक  त्याच्या साठी, न विचारातच अजय नि परस्पर व्यवहार केला. त्याचा हि हळू हळू जम बसत होता नवीन शाखेत, प्राप्ती पण बरी होती. सोनालीची हि काम उत्तम होते, तिला लगेच बढती मिळाली, एकूण सगळे छान होते पण वरवर. असे अनेक प्रसंग घडत होते. सोनाली काम - घर नव्या जबाबदऱ्या यात पार बुडून गेली. पण तरी हि अजय  नि चित्रकला  सुरु ठेवावी हा तिचा आग्रह होता. तिने सारे समान पण विकत आणले. अजय खुश झाला पण एक दोन दिवस. "
"का १-२ दिवसच का ?"
"मूर्खपणा दुसरे काय ? सोनालीला आपण चित्रकार व्हावे असे वाटतय , म्हणेज आपण चांगले सी ए नाही आहोत का ? कि तिला त्यांच्या फर्म वर तिची सत्ता हवीये, असे काही तरी मुर्ख सारखे विचार कसे त्याच्या डोक्यात आले काय माहित. आले कि इंजेक्ट  केले नाही माहित. आणि जरी केले तरी या मुर्खाने आपली सद्सद्विवेक बुद्धी वापरावी ना. हे आणि  असेच छोटे छोटे प्रसंग घडत गेले"
"मला अंदाज येतोय, हळूहळू मग सोनालीच्या प्रत्येक गोष्टीत त्याला चूक दिसणे, तिची चिडचिड, त्यातून निर्माण होणारा  ताण. प्रेमाखतर कितीही गप्पा बसली तरी सोनालीला पण स्वाभिमान आहेच कि, मग तिचे उलट उत्तर देणे आणि त्यातून न सुटणारा गुंता "
"खरय. थोड्या फार प्रमाणात असेच. मग हळूहळू अजय आई बाबांकडे झुकू लागला आणि एक दिवस घटस्फोटाची भाषा, त्या द्धि किरकोळ भांडण झालेच होते. अजय  घरी आला तर, सोनाली यायची होती. तिचा फोन आला, तिला ४ दिवस माहेरी जायचे होते. आणि ती ऑफिस मधून परस्पर निघाली होती; बस इतकच. मग २ दिवशी अजय हि तणतणत त्याच्या घरी गेला. सोनाली ८ दिवस आली नाही; कारण ती आजारी पडली आणि परत आली तेव्हा अजय नि घटस्फोट मागितला."
"हे सगळे खरय. म्हणजे मला असे म्हणायचे …."
"कसय न अभी, या गोष्टी दूर कुठे तरी घडतात तेव्हा आपली साठी बातमी असते नाट्यमय. पण समोर किंवा जवळच्या माणसात घडतात न तेव्हा या आशयच अंगावर येतात रे. सोनाली हि काही ठिकाणी चुकली असेल; पण तिच्या चुका इतक्या अक्षम्य नक्कीच नव्हत्या. मी हेच समजावयाचा प्रयत्न केला अजयला कि तिच्या त्याच्यावर असलेल्या प्रेम समोर हे काहीच नाहीये आणि तो पण चुकलाच आहे कि. आणि सोनालीशी लग्न करताना त्याला हे नक्कीच माहिती होते कि बंगला , गाडी , नोकर चाकर हे ऐशोआराम त्याला लगेच मिळणे शक्य नाहीये. घरी पसंत नाही म्हणून हे असे लग्न केले न त्याने. मग तयारी ठेवायची. आणि राहणीमानाचे म्हणशील तर सोनाली पहिल्या पासूनच साधी आणि मध्यम वर्गीय राहणी मान  असलेली होती. तो ज्या वर्तुळात वावरत होता, तिथल्या मुली किंवा बायका आणि सोनाली किंवा मी आमच्यात  फरक होता. हे हि त्याला माहित होते; मग ज्या गोष्टी माहित असताना आपण स्वीकारल्या आहेत त्या बद्दल नंतर तक्रार का ? "
"तू अजयला का माफ केले नाहीस ते आता कळतंय मला "
"पण अभी, मी लगेच त्याला तोडले नाही, घटस्फोट निश्चित झाला तेव्हा हि मी कमी बोलत होते; पण संपर्कात होते. घटस्फोट झाला आणि २ महिन्यातच त्याच्या लग्नाची कुणकुण लागली आणि मग मी संबंध तोडले. त्याने तेव्हा ते नाकारले पण ६ महिन्यांनी केलेच. मला अस वाटत होते कि कदाचित तितकेच ऋणानुबंध यांचे म्हणून झाले जे व्हायचे ते. आपण नाही टाळू शकलो. पण अजय हि खचून गेला असेल किंवा दबावात असेल असे मला वाटत होते; अजून थोडा का होईना सोफ्ट  कोर्नर  होता. पण लागांची कुणकुण लागली आणि मग मी सटकले. याचा अर्थ सरळ होता कि घटस्फोट ज्या करांसाठी मागितला गेला ती खरी असली तरी केवळ तीच एक कारणे  होती असे नाही, स्वताचे आयुष्य सो कोल्ड सरक्षित केले होते त्याने. त्याने सोनालीवर प्रेम केले, त्याने तिला विचारले, मग परत नाकारले, परत विचारले आणि लग्न केले आणि परत नाकारले. असू दे हे होवू शकते. त्यांनी स्वार्थी पणा  दाखवला हि असेल. मान्य केले कि सोनाली आता आयुष्यात नकोय. पण इतके कोरडे  प्रेम. सोनाली वर केलेलं प्रेम सच्चे होता न ; मग त्याला थोडा तरी त्रास व्हायला हवा होता, ती दुरावल्याचा. मी सावरले असते  रे त्याला त्यातून. मैत्री कदाचित तोडली नसती मी लगेच; तो सावरला कि दूर झाले असते आणि मग कदाचित त्याला शिक्षा म्हणून संपर्क ठेवला नसताही. पण माझा अजय असा हि न्हवता, इतका क्रूर आणि इतका स्वार्थी. मला असे वाटले कि हा तो नाहीच आहे जो मला माहितीये. गेल्या काही वर्षात तो इतका बदलत गेला आणि मला का नाही जाणवले, सोनालीला का नाही कळले ? माणूस इतका बदलू शकतो. सोनालीचे प्रेम आंधळे होते कि माझे सुद्धा ? माझी मैत्री डोळस असती तर होणारा बदल मला दिसला असता कि. मी पण माझ्याच कोशात हरवले होते कि जाणून बुजून मी त्याच्या पासून दूर होत होते, मला कुठे तरी कळत होते कि आपण खूप वेगळे आहोत, आपले विचार कधीच जुळणार नाहीत आणि म्हणून कदाचित मोठेपणी ती तशी मैत्री राहालीच नव्हती आमच्यात किंवा आम्ही टिकवली होती ती तशी, त्या एक न उमगलेल्या जवळीकीच्या धाग्यावर"
"गंधाली ……"
" मी ठीक आहे, काळजी नको करू. हे सगळे स्वताशी किती तरी वेळा बोललीये मी. पण खरच सांगते त्याचा हा कमालीचा रुक्षपण पहिले, आता तो केवळ स्वकेंद्रित नाही तर कृतघ्न  वाटत होता मला, मी तोडले मग त्याला, नको होता मला तसा माणूस आयुष्यात, आणि मित्र म्हणून तर अजिबातच नको होता. सोनालीवर त्याने अन्यायच केला होता. असा भित्रा, आणि स्वार्थी नवरा मिळाला हे खरच दुर्दैव तिचे. तिच्या बद्दलची माहिती मिळवली, ती सावरतीये असे कळले, ती ४ महिन्या साठी परदेशी गेली आहे असे हि कळले. तिच्या समोर जायचे धाडस न्हवते माझ्यात. काही काळ तिच्या बद्दल चौकशी करत असे मी, पण मग ती ठीक आहे असे कळले आणि मग मी जास्त काही मागे लागले नाही. आणि अचानक त्या दिवशी ती भेटली. मग माझ्या लक्षात आले कि मी प्रत्यक्ष तिला न भेटता मोठी चूक केली आहे. मी आधी भेटले असते तर …. मी लग्न आधी तिला अजयची कल्पना दिली होती; पण मधल्या काळात अजयशी संपर्क कमी होता; नाही तर मला तो लग्न करणार आहे हे कळले असते आणि मी त्यांना असे करू दिलच नसते. घरच्यांना न सांगता तर मुळीच नाही …. मी अजयचा आणि सोनालीचा पाठपुरावा करायला हवा होता … हि पहिली चूक आणि सोनालीला नंतर भेटायचे धाडस दाखवायला हवे होते …कदाचित  तिला काही मदत झाली असती, हे इतके सारे इतक्या वर्षात मनात साचले नसतच. त्याचा त्याच वेळी निचरा झाला असता. …. आता मला तिला या सगळ्या तून बाहेर काढायचं आहे. She deserve to live life happily and better than what she have been living. "
"गंधाली, जे झाले ते झाले. तू चुकलीस कि नाही हा प्रश्न नाहीये, तू जरी मध्ये पडली असतीस तरी हे सगळे घडले नसते अशी हि शक्यता आहे आणि नाहीही . आता विचार नको करू. चाल निघू यत उशीर झालाय. माझे काही प्रश्न निकालात काढलेस तू. खर सांगू   माझ्याच मनावरचे एक ओझे उतरले. तू इतकी कठोर कशी काय वागलीस ? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळालाच आहे. उद्या सोनाली येणार आहे,  तिला काही गोष्टी मला विचारायच्या आहेत "   
"विचार. तशी काल  ती छान मूड मध्ये होती. सावरतीये हळू हळू. चाल खरच निघू यात , खूप उशीर झालाय"
अभी ला त्याच्या खूप प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. खर आहे, असे एक ठोस  कधी नाती तुटायला, अनेक लहान सहान घटना घडत असतात आणि वेळच्या वेळी त्या सावरल्या नाहीत कि, मग एक क्षणी सगळाच संपते. आजचे त्याचे आणि गंधालीचे बोलणे हे केवळ अजय आणि सोनालीच्या  नात्याबद्दल  नव्हते तर त्यांच्या भविष्यातल्या नात्याबद्दल हि  होतच  अर्थाने. मैत्रीण म्हणून आणि जोडीदार म्हणून गंधाली कशी असेल याची एक झलकच होती. 
उरलेल्या काही प्रश्नाची उत्तरे त्याला सोनाली देणार होती. खर तर त्याचा डॉक्टर म्हणून अगदी कमी रोल राहिला होता आता. म्हणजे तो असणार होता, पण गंधाली आणि सोनालीचे हे नवे नातेच तिला परत उभारी देणार होते. एक पायदळी तुडवले गेलेले मैत्रीचे नाते आणि एक राखेतून  पुन्हा भरारी मारण्याचा विश्वास देणारे. गंधालीचे हि तगमग  णारे मन हि जर शांत झाले. किती तरी वर्षांनी ती आज अजय बद्दल तिला काय वाटतय ते बोलली होती आणि  अजयच्या आठवणी आपल्याला पुसायच्या नाहीयेत, हे तिने अभीला सांगितले होते; पण मुख्य म्हणजे तिने ते स्वत:पाशी ते कबूल केले होते, त्याचे एक वेगळे समाधान घेवून ती झोपी गेली. 
सोनाली  ठरल्याप्रमाणे अभिच्या क्लिनिक मध्ये आली.  मागच्या वेळी ती अभिला भेटली होती; पण पेशंट म्हणून नाही.  पण तरीही तिच्या वागण्या बोलण्यात एक मोकळेपणा नक्की आला होता.  आई बाबांनी बर्याच गोष्टी सांगितल्यामुळे, आता आपला भार कमी झालाय असे तिला वाटत होते. गंधालीने पुढच्या आयुष्याची,  करीयरची स्वप्ने पाहायला तिला शिकवले होते. अजूनही आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडू शकतात आणि फसलेले लग्न आणि निर्णय म्हणजे आयुष्य नव्हे हे तिला कळले होते, पण आता वळतहि  होते. आई -  बाबा , गंधाली  या आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांच्या खातर आपल्याला सावरले पाहिजेच असे तिला वाटले. गंधाली, अजयचा दादा या माणसांनी   रक्ताचे नाते नसूनही; तिची बाजू घेतली होती, सहानुभूतीने नाही तर तिची बाजू पटली होती म्हणून. अजय सुखी असेल तर असे न का ? आता झालेला काही बदलत थोडी न येणार आहे. 
"डॉक्टर अभी,  येवू का ?"
"अग, ये ना. वेळेत आली आहेस अगदी. बस."
"आई बाबा भेटले  ना ?"
"हो. भेटले . एक सांगू, सगळेच आई वडील मुलांवर प्रेम करतात, पण तुझे आई बाबा तुझ्या वर डोळस प्रेम करतात. तुझ्यावर विश्वास आहे त्यांचा अजूनहि. इतकी महत्वाची गोष्ट न सांगता केलीस त्याचे वाईट वाटले त्यांना आणि  त्यांनी ते तुला जाणवू हि दिले. पण वेळ पडली तेव्हा ते तुझ्या पाठीशी खंबीरपणे  उभे राहिले आहेत, सोनाली. अजय पेक्षा जास्त प्रेम करणारी माणसे  आज तुझ्या सोबत उभी आहेत"
"खरे आहे; पण माझे अजयवर आणि त्याचे माझ्यावर प्रेम होते डॉक्टर. त्या वेळी मला ते खर वाटले, जाणवले म्हणून तर मी, तो म्हणाला तसे लग्न केले.  कुणाला  काही वाटले तरी हेच सत्य आहे, सुरवाती पासून मला फसवावा, असा काही अजयचा हेतू नव्हता "
"बर झाले तूच सुरवात केलीस. तुझे आणि अजयचे नाते, विशेष म्हणजे नवरा बायको म्हणून कसे होते ? या इतक्या वर्षात कधी तरी त्रयस्थ पणे पहिले असशीलच कि , या सगळ्याकडे ? काय चुकत होते का ? नेमके काय झाला ? मी असे मानतो कि, नवरा- बायकोचे नाते कसे आहे हे केवळ त्या दोघांनाच खरे माहित असते. त्यांची भांडणे, प्रेम हे लोकांना दिसते तसे असेलच असे नाही. रक्ताचे नाते नसलेले दोन जीव एकत्र बांधले जातात या नात्यात. एकमेकांकडून असेलेल्या अपेक्षा - आशा, गरज अश्या अनेक गोष्टी केवळ ते दोघेच जाणून असतात. म्हणूनच आनंदात दिसणारे आनंदात असतातच असे नाही आणि सतत भांडत असणारे , दु:खात असतात असेही नाही. संसार पडायचे, म्हणजे खर तर संसार उभा करायचे, या शब्दातच विरोधाभास हि आहे आणि गमक हि या नात्याचे. तेव्हा तूच सांग"
" मागे वळून पहिले न अभी, कि असे वाटते. मी जेव्हा अजयच्या आयुष्यात मैत्रीण म्हणून डोकावले; तेव्हा तो एक अत्यंत नाजूक वळणावर  उभा होता.  ते वय हि तसाच होते, नेमके काय वाटतय हे न समजण्याचे आणि तरी हि ते समजून घ्यायचं अट्टाहास करणारे. तेव्हा मला जाणवले नाही; पण आता मला असे वाटतय कि …"
"बोल. मोकळेपणानी बोल. आपले बोलणे, हे ना  तुझ्या आई बाबा न मी सांगणार आहे, ना गंधालीला "
"धन्यवाद अभी. कारण आता कुणालाच दुखवावे असे मला नाही वाटत आहे. मला असे वाटते, तो आणि गंधाली  खूप जवळचे मित्र होते; पण गंधालीचे अजून एक वेगळे विश्व होते, अजय पलीकडचे. अजयचे मात्र तसे नव्हते, घर सोडून त्याला फक्त   तीच होती जवळची. ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती असे नाही; पण त्याला जितकी सहवासाची ओढ वाटत होती; तितका वेळ ती  नव्हती. मग एक रिकामेपण आले त्याच्या आयुष्यात. आणि तेवढ्यात आमची ओळख झाली. मधल्या काळात गंधाली  शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर गेली आणि मग त्याला तिचे नसणे खूप जाणवायला लागले. असे नाही कि मी तिची जागा घेतली होती; पण माझ्या निम्मिताने त्याचेहि अजून एक जग निर्माण झाले; माझ्या भोवतीचे :) किंवा आमच्या भवतीचे आणि त्यात तो रमायला लागला.गैरसमज नका करून घेवू अभी, कोवळ्या वयात भावनाची गल्लत होते  "
   "म्हणजे ?"
"म्हणजे त्याला गंधाली  बद्दल नक्की काय वाटतय ते त्याला काळात   नव्हते, अगदी आमच्या मैत्रीच्या सुरवातीच्या काळात. मैत्री पेक्षा हि जास्त काही ? आकर्षण ? प्रेम? पण तरीही जोडीदार म्हणून नाही कदाचित. म्हणजे मला आता असे वाटतय. "
"असे वाटायला काही कारण; म्हणजे तो कधी बोलला होता तसे ?"
"नाही तसे काही नाही बोलला  प्रत्यक्ष. त्याचा स्वभाव तसा नव्हताच. तसा घुम्या होता तो. गंधाली  आणि त्याची मैत्री झालीच कशी असे वाटण्या इतपत , दोन टोके. पण हे मात्र त्याने मला सांगितले होते कि गंधाली  त्याला खूप जवळची आहे, मैत्रिणी पेक्षा हि जास्त जवळची; तो तिला कधीच दुखवू शकत नाही, पण म्हणून त्या दोघे एकमेकांचा जोडीदार म्हणून कधीच विचार करू शकत नाहीत; म्हणजे तश्या भावना नाही आहेत त्यांच्यात"
"असू शकेल. आपले कसे आहे न, कि प्रत्येक नात्याला व्याख्या हवी, चौकट हवी, एखादे नाव हवे. मग त्याचे नियम , अपेक्षा सगळे हवे त्या सोबत. रक्ताचे नाते नाही किंवा कुटुंबातले नाते नाही म्हणून मैत्री, आणि मैत्री पेक्षा जर जास्त म्हणजे प्रेम; पण लग्नाच्या नात्याचे. नात्याला असे नियम नसतात ग. काही काही नाती आपण उलगडवून नाही दाखवु शकत. मला वाटते कि अजय -गंधाली, विचारी आणि समजूतदार म्हणून त्यांच्या नात्याची मर्यादा किंवा कुठे पर्यंत ते नाते जावू शकते हे त्यांना ठावूक होते   आणि म्हणूनच ते एकमेकांचे जोडीदार होवू शकत नव्हते"
"हो, आणि गंधाली, त्या दोघांमध्ये अधिक ठाम होती; म्हणून ती  कधी कधी अजयला टाळत  होती "
"आता हे कशावरून?"
"पुरावा नाहीये माझ्या कडे . डॉक पेक्षा वकील का नाही झालात ? अहो वाटले असे आणि मी पण मुलगी आहे ना; म्हणून कदाचित मला तिचे मन कळले असेल "
"असेलही "
"तर मग, हे सगळे असे होते, आणि मग त्यातच आम्ही जवळ आलो, प्रेमात पडलो आणि पुढचे सगळे तुम्हाला माहितीये"
"अजयनो लग्नाची मागणी घातली, तेव्हा असे तडका फडकी लग्न का केल?"
"तो खूप खचला होता. घरून दुसऱ्या मुली बघ असा दबाव सुद्धा होता. त्याच्या घरच्यांना काही मुली तश्या पसंत हि होत्या. त्याला नक्की काय करायचे कळत नव्हते, एकीकडे मी आणि आमचे प्रेम आणि एकीकडे घर, सगळच  विचित्र . त्याच्या पहिल्या नकाराचे कारण हि हेच होते. म्हणजे जरी त्याचे आई बाबा हो म्हणाले असले तरी, घरी तशी नाराजीच होती. काही न काही प्रकारे ती नाराजी त्याच्या कानावर घातली जायची. मग एक दिवस तो वैतागला , चिडला. गंधाली पण जवळ नव्हती, मी पण नव्हते. त्याला असे वाटले कि लग्न करून आपल्याला इथेच राहायचे आहे, मग रोज हे असे वातावरण, यात कुणीच सुखी होणार नाही म्हणून त्याने नकार कळवला. "
"पण तुझ्या सांगण्या वरून  तो असा उतावळा वाटत नाही , एक घाव दोन तुकडे असा."
"हो खरे आहे अरे. पण साठून साठून झाले म्हण. मोकळे व्हावे असे जवळ कुणीच नाही. म्हणून तो  असेल असे मला वाटले. त्याला अजून एक संधी द्यावी असे वाटले मला. म्हणून मी परत भेटू लागले. आणि आई बाबांना वेळ बघून सांगू यात असे माझ्या डोक्यात होते"
"मग?"
"त्या आधीच, एक दिवस तो आला, अस्वस्थ वाटला. मला म्हणाला नोटीस देवू आणि लग्न करू. कुणालाच नको सांगायला. एकदा लग्न झाले कि कुणी काही करू शकणार नाही. पण आता जर जास्त दिवस थांबलो तर गोष्टी हाताबाहेर जातील. आणि जर का असे काही झाले तर तो …. जगूच शकणार नाही "
"काय ?"
"हो , म्हणजे त्या वेळी खूप डिप्रेस वाटला, त्या नंतरअजून एकदाच तसा वाटला होता लग्न  झाल्यावर "
"लग्न झाल्यावर ?"
"हो डॉक्टर. त्या दोन्ही वेळी मी कमजोर पडले आणि त्याला जे हवे होते केले, एकदा त्याची सहचारिणी झाले आणि एकदा त्याला सहचर म्हणून मुक्त केले "
"तुला असे म्हणायचे आहे कि तू हि एका भावनिक दबावाला बळी पडलीस ? दोन्ही वेळा जे केलेस ते  तुझ्या मनात नव्हते ? मनाविरुद्ध आणि इच्छेविरुद्ध ?"
"काहीसे तसाच म्हणा हव तर. म्हणजे लग्न तर मला अजय सोबतच करायचे होते. त्याचा नकार मी पचवायचा प्रयत्न केला; पण तेव्हाहि त्याच्या सुखासाठीच, तो समाधानी राहावा म्हणून. पण तो लगेचच परतला आणि मी  स्वीकारले, कारण माझपण प्रेम  आहेच कि, आय मीन मीन होते कि  त्याच्यावर. पण अरे असे कसे म्हणून कि बळी पडले, मी पण सज्ञान होते आणि त्याला विरोध करू शकलेच असते; पण नाही जमले तेव्हा. भावनिक दबाव होता हे मात्र खरे. "
"अजय निर्माण करायचा दबाव करायचा तुझ्यावर ? कि तूच थोडी कमजोर पडलीस , तुला  पाहताना काय वाटते ?"
" जेव्हा  तो मला लग्न करू यात म्हणाला, तेव्हा त्याचा विचार पक्का आहे असे वाटले. तो असे हि म्हणत होता कि मी जर नाही म्हणाले तर त्याला जगणंच कठीण होईन बसेल. या पुढे कोणाशीच संबंध जोडणार नाही, कुणाशीच बोलणार नाही , कुठे तरी दूर निघून जाईन असे त्याचे म्हणणे होते. पण त्यावेळी त्याला माझ्या सोबतीची गरज आहे हे मला प्रकर्षाने जाणवले म्हणूनच मी …"
"आणि मग?"
"लग्न झाले , संसार सुरु झाला आणि अजयच्या इच्छेनुसार आम्ही शिफ्ट हि झालो. सुरवातीला आम्ही दोघे नवीन नात्यात खुश होतो. आर्थिक स्थिती हि तशी चांगली होती, पण आमची सुरवात होती आणि आम्ही सेटल नव्हतो. अजयच्या राहणीमानात बराच फरक पडला, लग्नानंतर. कार मधून फिरायचो तो, बंगल्यात राहायचा,पाणी सुद्धा हातात मिळायचे  त्याला. मी पण चांगल्या परीस्थित वाढले पण तरी हि मला adjust  करणे त्याच्या पेक्षा सोपे गेले. मला हि घराची जबाबदारी सवय कुठे होती, जेवण बनवता यायचे पण हौस म्हणून. पूर्ण जबाबदारी  पडलीच नाही. त्याला तर सवयच नाही. पण तरी आम्ही सुरवात तर केली होती. सुरवातीचा उत्साह हळू हळू कमी होत होता. थोडीशी मदत त्याने करावी अशी माझी पण अपेक्षा होती. काही प्रमाणात तो मदत करत हि होता.  पण हळू हळू त्याचा अवती भोवतीचे वातावरण बदलत होते, त्याचा साठी कार आली , डबे सुरु झाले. मी तक्रार नाही केली, त्याच्या आईला वाटत असे त्याच्या बद्दल तर चांगलच आहे असे समजून मी दुर्लक्ष केले. पण तो परत त्याच्या जुन्या जीवनशैलीकडे ओढला जात होता आणि माझ्या हातून सगळच निसटून जातंय कि काय असे वाटत होते. त्याची कामे वाढली होती, ऑफिस ज्या शहरात होते ते तिथे का उघडले काय माहित ; कारण त्याचे बहुतेक कस्टमर  आजूबाजूच्या गावातलेच जास्त होते त्यामुळे  तो सतत फिरतीवर असायचा. पण मग तेव्हाही वाटले कि सुरवात आहे तर कष्ट करावे  लागतीलच आणि त्याच्या प्रगतीच्या आड मला यायचे नव्हते. एकदा वाटले कि आपणच त्याला जोइन करावे, पण ते शक्य नव्हते. मी त्याला वीकएंड ला विचारायचे कि मी येवू का किंवा मी मदत करू का ? पण त्याने  नकार दिला, आई बाबा आणि इतर पार्टनरना  कदाचित आवडणार नाही आणि सगळच बंद होईल असे म्हणाले. मग मीही गप्प बसले"
"तुला असे कधी जाणवले कि तो त्याच्या कलीग मध्ये गुंतला जातोय, म्हणजे जी त्याची आताची बायको आहे "
"नाही, मी असा कधी विचारच केला नाही. आमच्यात वाद झाले तरी आम्ही परत संवाद करत होतो. अधून मधून बाहेर जाणे, घेणे , आवडी निवडी लक्षात ठेवणे, सगळे सण-वर साजरे करणे, करून घेणे सुरु होतो. घटस्फोटाची मागणी करण्या आधी ३-४ महिने मात्र , वाद सतत होत होते. मी  कसे हि वागले तरी त्याचे समाधान होतच नव्हते आणि नक्की काय चुकतंय याची काही ठोस कारणहि तो देत नव्हता. त्याच्यावर त्याच्या घराचा दबाव खूप होता, त्याला गिल्ट  आले कि माझ्यासाठी त्याने आई वडिलांचा विश्वासघात केला. त्यांना वाऱ्यावर  सोडलेजिच्यासाठी आपण हे केले, ती तितकी पात्र  आहे का आपली सहचारिणी म्हणून कि मी   "i deserve better", हे द्वंद त्याच्या  मनात सुरु असायचे, त्याचा तो बेटर ऑप्शन त्याच्या समोरच होतासुद्धा. पण तो हे विसरला कि त्याने माझ्यासाठी हे सगळे केले फक्त? स्वतासाठी नाही ? त्याने जे त्यागले तेच मीही नाही त्यागले, त्याच्या प्रेमाखातर. अशी गणिते मांडता येतात का आयुष्यात, कि कुणी कुणासाठी काय आणि किती केले, याचा जमा खरच असतो ? पण तो ते गणित मांडत होता, गंधाली त्याच्याबद्दल हे असे  एकदा बोलली होती, त्याच्या स्वभावाबद्दल, त्याच्या व्यवहारीपणा  बद्दल. मी तिला म्हणाले हि कि मग तू त्याची इतकी चांगली मैत्रीण कशी ?"
"मग काय म्हणाली ती ?"
"म्हणूनच, त्याला माणूस म्हणून व्यवहाराच्या पलीकडली बाजू हि दिसावि म्हणून. त्याने आयुष्याकडे रसिकतेने हि पाहावे म्हणून. मला तने हि कल्पना दिली होती कि त्याच्या बाबतीत हा समतोल मला राखला पाहिजे, विशेष काळजी घेवून "
"तुला त्याचा हा स्वभाव आधी नाही कळला , म्हणजे गंधालीनि सांगूनही ?"

'खर तर विशेष नाही, म्हणजे मला गंधालीला काय म्हणायचे तेच कळले  नाही तेव्हा. मला वाटले व्यवहारीपणा  म्हणजे केवळ पैश्याबाबतीत ….  जास्त व्यापक अर्थ मला कळलाच नाही. वेळ आली म्हणजे स्वत:चा आधी बचाव करणारा, स्वकेंद्रित असणारा,निर्णयाची जबाबदारी फार असेल तर अतिशय सहज त्यातून निसटून जाणारा. नेमके आपल्याला काय हवाय आणि ते कसे मिळवायचे ह्याची पूर्ण कल्पना असलेला, भान ठेवून जगतानाच, स्वतःचे सुख सेक्युर करून घेणारा, असा पण व्यवहारी माणूस असतो याची मला कल्पनाच नव्हती ?"
"एक विचारू, प्रोफेशन चा भाग म्हणून."
"हो"
"नवीन लग्न झाल्यावर असलेले आकर्षण कमी झाले असे नाही वाटले तुला कधी. म्हणजे तसे तुला कधी जाणवले नाही ? स्पष्टच विचारायचे तर  नवरा बायको म्हणून संबंध दुरावले? आणि कधी दुरावले ?"
"तबर झाले तुम्हीह विचारलात. मला सगळ्यात जास्त  कशाचा त्रास झाला तर,…. वाद होत होते, मिटत होते; पण नवरा बायको म्हणून आमच्या नात्याला तसा तडा नाही गेला.  मला हि असे वाटत होते कि, त्याची सुरवात आहे करियरची, थोडा स्ट्रगल  आहे म्हणून त्याची चिडचिड होते आणि म्हणून वाद होत आहेत. मला घटस्फोटचा अंदाज आलाच नाही खुप आधी, न त्याचे अफ़ेअर आहे असा"
"तेव्हा त्याचे अफ़ेअर सुरु होते ?"
"नसावे. म्हणजे मला नाही वाटत असे. मी त्याला कधीच नाही विचारले. मला अजूनही घरचा दबाव हेच कारण आहे असे वाटते आणि माझ्या नंतर आयुष्य सेक्युर करायला त्याला सुचवलेला ऑप्शन ती होती. अर्थात तिला तो आवडत होता, आणि कदाचित … तिचे प्रेम असेलहि, पण  आम्ही एकमेकीना ओळखत होतो, बोलत होतो. तशी तिने आमची स्पेस कधी घेतली असे मला नाही वाटले. घटस्फोट ठरल्या नंतरच मला माहित नाही. काहीही चिखलफेक न करता, मला बाहेर पडायचे होत. अर्थात निर्णय त्याचा होता आणि मी मान्य केला  " 
"का? जाब नाही विचारलास?"
"कारण विचारले, जाब नाही विचारला"
"कारण तरी काय होते?"
" खर तर नाट्यमय असे काहीच नाही,  पण त्याची आई आजारी होती; म्हणून तो खूप वेळा जायचा, मी हि अधून मधून गेले; पण त्यांना ते फार रुचत नसावच. मला त्या घरात प्रवेश करू द्यायचा नव्हता त्यांना. मुलाला माफ केले त्यांनी, पण मला नाही. अश्यातच तो एक दोन वेळा फार उद्विग्न मनस्थितीत घरी आला. एकीकडे तू आणि एकीकडे आई अशी मानसिक ओढाताण होत आहे म्हणाला. मी विचारले कि आपण जावून राहायचे का तिकडे थोडे दिवस, तर तो ऑप्शन बंद आहे म्हणाला. मग मी त्याला तू एकटाच जा म्हणाले आणि मग …."
"मग? संबंध बिघडले तुमचे "
"हो, यायचा अधून मधून तेव्हा टेन्शन मध्ये असायचा. आणि मग एकदा म्हणालाच कि  मला आता हा ताण सहन नाही होत आहे. हे असे आयुष्य नकोय मला. मी माझ्या आई वडिलांना दुखावलंय, आणि आपल्या नात्यातहि फोलपणा जाणवायला लागला आहे मला. मला माझ्या घरी जायचे आहे परत, माझ्या माणसात. मला जावच लागेल नाही तर …
 नाही तर, मीच उरणार नाही या जगात. आणि जर मी गेलो नाही तर … बाबांनी फार  मनाला लावून घेतलय. आई म्हणालीच आहे, त्यांना बिपी आहे, जर स्वताच्या मुलामुळेच त्यांचे जर  काही बरे वाईट झाले तर ….त्यापेक्षा मीच , म्हणजे सगळेच सुटतील"
"मग तू काय बोललीस त्याच्याशी?"
"मी परत त्याला म्हणाले कि त्याच्या दादांना सांगू आणि कमीत कमी त्या शहरात तरी जावू परत, त्यांच्या जवळ राहू. जी काही नाराजी असेल ती पचवेन मी. नाही तर त्याने काही तरी उपाय सुचवावा. पण हे स्वताचे बरे वाईट करून घेणे, माझ्या अंगावर शहरच उभा राहाला डॉक्टर हे ऐकून. मला गत्यंतरच नव्हते. मी त्याच्या साठीच पहिला नकार मान्य ,  मग लग्नही मान्य केले आणि मग घटस्फोट हि. गम्मत काय सांगू, Relationship is broken coz of misunderstandings and legal separation of the same with mutual understanding, what an Irony"
" मला समजतंय तुला काय म्हणायचे ते "
" दादांनी, गंधालीनि त्याला समजवायचे, संवाद साधायचे खूप प्रयत्न केले. अगदी त्याच्या आई बाबांशीसुद्धा. माझ्या आई वडिलांनी हि केले , पण काहीच  उपयोग झाला नाही. आणि मी तर काय,  विचार करायच्या सुद्धा मनस्थितीत नव्हते. पण   काही वेळ गेला आणि मी उभी राहिले, जेव्हा मला कळले कि तो लग्न करतोय. स्वताला सावरायला वेळ न देताच मी  उभी राहिले खरी, पण मुखवटा धारण करून. मी आनंदी नसतानाही, आनंदात जगतीय, त्याच्या जाण्यानी फरक पडत नाहीये असे मी  दाखवत होते. पण मला फरक पडला  पडला होता. जे दु:ख मला होत होते ते मी जगायला, भोगायला हवे होते. मी कुणाला हे सारे सुखाचे आभास निर्माण करून दाखवत होते ? अजयला ? त्याला तर माझ्याकडे वळून बघायचे हि नव्हते ? मग कुणासाठी? स्वताला फसवायची चूक माणसाने करू नये. जो त्रास होत होता तो  स्वीकारले असता तर संपला असता असा साचून राहिला नसता. आणि मग हळू हळू  बदलत गेले, मी कोशात गेले, माझा आत्मविश्वास हि कमी होत गेला. सतत मनात विचार, माझे काय चुकले ? माझ्या बाबतीतच हे का घडले ? आणि आता मी पुढे काय करू ? अजय कधीच परतून येणार नाही का?  या प्रश्नांचे उत्तर माहित असून हि … जावू दे. सतत तोच तोच विषय चघळायला कुठे हि गेले तरी, नाही तर आता दुसरे लग्न कर,, त्याने केलाय न ? अहो पण डॉक, त्याने केलाय म्हणून मी करायच यात काय लोजीक ? मग मी लोकांच्यात मिसळणे बंद केले . "बिच्चारी", हे नाकी होते मला. ठीक आहे माझे लग्न टिकले नाही, लौकिक अर्थाने प्रेम असफल झाले; म्हणून मी काय बिच्चारी आहे? माझे अस्तित्व केवळ अजयची बायको हेच होते का हो लग्न झाल्यावर. मला सहनुभिती नको होती , तोदेसे प्रेम आणि विश्वास हवा होता. जे काय घडले ते घडले, असे घडू शकते, त्याची चिकित्सा आता करू नको असे सांगणारे मला कुणी तरी हवे होते. मला हे सारे कळत होते; पण तरी हि ते समजावून सांगणारे मायेचे माणूस मला हवे होते. आई बाबांनी खूप केले , सांभाळून घेतले; पण तरीहि  त्यांना माझी काळजी वाटते हे डोकावत होताच अधून मधून"
"पण आता तर तुला ते माणूस मिळालाय ना ?"
"हो अभी. गंधालीचे आणि माझे काय ऋणानुबंध  आहेत काय ठावूक ? प्रत्येक क्षणी तिनी मला सावध केले आणि मी  चक्क डोळेझाक केली. पण आता मात्र मी तिचे ऐकणार आहे, पूर्ण विश्वासाने. अजय कधी आयुष्यात समोर आला तर त्याला इतकाच सांगेन, कि तू जिच्यावर तुझ्या स्वभाव पलीकडे जावून प्रेम केलेस ती तुझी मैत्रीण, आज माझ्या सोबत माझा हात धरून उभी आहे, तुझ्या कडे पाठ फिरवून. दैव देते आणि कर्म नेते हे असे. "
"म्हणजे तू आता अजयला फेस करू शकतेस तर ?"
"अस वाटतंय तरी"
"असु दे. पण एक लक्षात ठेव. एकदम उत्साहात येवून काही नाहीकरायचे. ठरवून, मुद्दामून काही नाही. मुद्दाम विसरायला हि  आठवायला हि. हे कसे करायचे ते मी तुला सांगेनच. व्यक्त होत राहायचे. जे दु:ख संपवायचे राहिले आहे, ते संपवायचे हळू हळू. त्या शिवाय समाधानाला जागा  कशी होईल? मी सांगे पर्यंत काही सेशन करू आणि औषध पण सुरु राहील. एक वर्कशोप  पण करू. आणि कनेक्टेड राहा गंधाली  सोबत आणि  इतरही मित्र परिवरात. अजयचा विषय कुणी काढला तरी काढू दे. दोन वेळा काढतील, पण तो पर्यंत तुझी नवी नोकरी, तुझे पेंटीग  असे विषय चर्चेत आले कि मग हळू हळू मागे पडेल. आणि एक लक्षात ठेव आपण कुणाला हि काहीही दाखवण्य साठी कधीच काही करायचे नसते. ज्याच्या पर्यंत जे पोचायचे असेल ते पोचेलच. "   
"हो . मी लक्षात ठेवेन. डॉक्टर, तुम्हाला एक सांगू. मी २-३ वेळा असे म्हणाले न कि गंधाली  माझ्या सोबत आहे यातच अजयची हार आहे"
"हो."
"का माहितीये ? मी तुम्हाला काही  पोट्रेट, स्केचेस  दाखवते, अजयनि काढलेले, काही माझे आहेत काही असेच"
"बघू. छान आहेत, एकदम सुंदर "
"हो पण व्यवस्थित बघा, काही तरी कॉमन आहे सगळ्यात"
"?"
"डोळे. चित्र सजीव करणारे डोळे. मी तर तुमच्या समोर आहे, पण माझे म्हणून जे चित्र आहे त्यातले डोळे माझ्या सारखे नाहीयेत न वाटत"
"हो, म्हणजे आता कळतंय मला कि चित्रे वेगवेगळी असली तरी  तरी साम्य आहे सगळ्याच चित्रांच्या…"
"बरोबर, ते डोळे गांधालीचे  आहेत"
"म्हणजे"
"अजय लहान असताना चित्रे काढायचा, पण त्याला हे डोळे काढणे जरा  अवघड वाटायचे; एकदा  गंधाली नि त्याला ते टेक्निक शिकवले. त्याने बरेच स्केच काढले डोळ्यांचे आणि मग त्यातले गंधालीला जे सगळ्यात जास्त आवडले तेच तो आयुष्यभर काढतो, गमतीत दिलेली गुरुदक्षिणा तो पाळत  होता. इतका  व्यवहारी असूनही. हळू हळू त्या डोळ्यात गंधालीच्या खर्या डोळ्यांची छटा  आली त्याच्या हि नकळत. जाणकारालाच दिसेल अशी. आता तुम्हाला कळले असेल कि त्यांची  मैत्री,ते नाते किती विलक्षण होते " 
"सोनाली, तू मला हे सांगितलस धन्यवाद. कारण गंधालीचा मनाचा हा हळुवार कोपरा ती जपेल आणि ते करताना तिला त्याचा त्रास होवू नये याची मी काळजी घेईन. आणि तु स्वताची काळजी घे. पुढची वेळ घेवून जा जाताना"
सोनाली बाहेर पडली, कात टाकूनच. नवीन नोकरी, तिची पेटिंग, आई बाबांसोबत वेळ घालवणे यात ती रमली सुद्धा. अजयची आठवण येत होती; पण हळू हळू त्रास कमी होता होता. अभिची उपाय योजना आणि गंधालीची निखळ मैत्री… सगळे सुरळीत होत होते. गंधाली  आणि अभिच्या लग्नात त्यांनी खूप धमाल केली.  सोनालीच्या करियरच्या,  वयक्तिक आणि सामाजिक आयुष्याच्या कक्षा हि रुंदावत होत्या. सोनाली, तिच्या त्या डिप्रेशन मधून बाहेर आली.  तिला लग्न मात्र करावसे वाटत नव्हते; पण अभि आणि सोनालीशी बोलून तिने सिंगल पेरेंट  होण्याचा निर्णय घेतला; कारण तिला स्वतालाच तीच इच्छा  होती. लग्नासाठी  मात्र ती तयार नव्हती. अभी नि तिच्या आई बाबांना हि या बद्दल  सांगितले, तेही तयार झाले. सोनालीनि मुलगी दत्तक घेतली आणि तीनि तिचा संसार नव्याने सुरु केला. गंधाली - अभीचे हि छान सुरु होते. अभिचे बाबा, व्यवसाय वाढवत होते आणि त्यांनी एक परदेशी कंपनीशी  करार केला. सोनालीला २-३ वर्षे परदेशी जायची आली होती; आणि ती तयार हि झाली. गंधाली  आणि अभिनि पूर्ण सपोर्ट केला; कारण मधल्या इतक्या वर्षाच्या काळात सोनालीचे वडील हे जग सोडून गेले होते. सुरवातीहुत्काळ ला तिने जावे आणि मागाहून तिची आई आणि मुलगी अशी  सोय झाली. 
खर तर सोनालीने तिचा भूतकाळ मागे टाकला होताच; पण या परदेशी जाण्यानी तिला जो हवा तो  बदल हि मिळाला असता. बर तिला परत यावसे वाटले तर तशी काही तरी सोय  करता येणे हि गंधालीला एक व्यवसायिक म्हणून शक्य होते. डिप्रेशन  ची एक केस म्हणून आलेली सोनाली. इतक्या आत्मविश्वासाने जगतीये, हे अभी -गंधाली  साठी एक वेगळे समाधान होते. ती आता  कुटुंबाचा एक भाग होती. अजय आणि गंधालीच्या मैत्रीचे ऋण काही अंशी फिटले होते. अश्या पद्धतीने गंधालीनि तिची मैत्री तोडली तरी निभावली होती. काळ थांबत नाही, म्हणून माणसांनी पण थांबू नयेच एके ठिकाणी. 
काही महिने झाले होते सोनालीला जावून, तिचे उत्तम सुरु होते. अभिचे काम इकडे जोरात सुरु होते.व्यवसायाला पूरक असे म्हणून काही तरी सामाजिक काम करायचे म्हणून तो शाळा -कोलेज मधून सेमिनार घेत असे, विना मोबदला. त्याला एके दिवशी असाच एक आमंत्रण आले, एका 
 NGO त्याला बोलावले होते. त्याने गावाचे नाव वाचले, संध्याकाळी गंधाली  सोबत बोलावे असे त्याने ठरवलेजेवण झाल्यावर . जेवण झाल्यावर त्याने विषय काढला 
"गंधाली, सोनालीचा काय फोन ?"
"हो. बरी आहे कि. तुला रविवारी फोन करणार आहे"
"अग, आज मला एक आमंत्रण आले आहे सेमिनारच "
"वा, छान . कुठे आहे ?"
अभिनि नाव सांगितले आणि गंधाली  क्षणभर एकदम विचलित झाली, मग शांतपणे त्याला म्हणाली, 
"अरे जा कि.  बघून ये मी लहानपणी कोणत्या शहरात राहत होते "
"खरच जावू. "
"हो नक्की"
"तू पण चल न. तसाही आपण खूप दिवसात कुठे गेलो नाही आहोत . २ दिवसाचा तर प्रश्न आहे"
"नको रे "
"का?"
"का म्हणजे नको इतकच"
"गंधाली, भूतकाळातल्या काही चांगल्या आठवणी हि आहेत न तुझ्या तिथे, मग चल ना. ते शहर मी तुझ्या नजरने पाहू शकेन. तू पल्तेस का भूतकाळापासून "
"नाही, असे अजिबात नाही. खरे सांगू, तसा तशी काही जवळीक नाही वाटत आता त्या जागेबद्दल. किती तरी वर्षे झाली न, आणि आता तिथे तसाही फारसे कुणी नाही माझ्या ओळखीचे. शाळेतले ३-४ जणे  आहेत आणि कदाचित……।  "
"असू दे ग. चल ना तू"
हो नाही करता करता गंधाली  तयार झाली. शहरात पाऊल  टाके पर्यंत तिला धाकधूक वाटत होती. पण मग ती नॉर्मलला आली. काही जुन्या खुणा पटत होत्या आणि काही अजिबातच नाही. वेळ थांबत नाही हेच खरे,  चेहरा बदलून गेला होता. गेलेल्या दिवशी ३ तास आणि दुसऱ्या  दिवशी २ तास असेच अभिचे सेशन होते.  ते थोडे फिरून आले. संध्याकाळी ते जिथे उतरले होते तिथेच त्यांच्यासाठी एक जेवण ठेवले होते, एका क्लबनि. त्यांचे काही मेंबर आणि अभी गंधाली . अभी खाली येवून थाबाला होता थांबला होता, लोक हळू हळू येत होते आणि ओळखी होत होत्या. थोड्याच वेळात गंधाली  पण खाली येत होती, तिची नजर अभिला शोधत होती, ती अभि शेजारी येवून पोचली, तो पर्यंत क्लबचे अध्यक्ष, त्यांना ओल्काही करायला घेवून गेले, 
"डॉक्टर  अभी हे …. "
"मी ओळखते यांना"… गंधाली पटकन बोलून गेली 
अभी हि दोन मिनिट गोंधळला, कोण असेल हा, वर्गमित्र कि …. आणि अजय असेल तर गंधाली  इतक्या शांतपणे … म्हणाली मी ओळखते 
"गंधाली, तू इथे? आणि  डॉक्टर अभी ?", विचारणारा जर शोक मधेच होता 
"हो, मी आले अभिसोबत. He is by better half आणि अभी हा अजय, माझा एके काळाचा चांगला मित्र. खर तर  त्याने मला ओळखले हेच जास्त आहे.  पण आता समोर आलासच अजय आणि ते पण सोशल इवेन्ट  मध्ये, म्हणून "
"गंधाली, पण … इतकी वर्षे कुठे होतीस ? काहीच संपर्क नाही.  चिडून गेलीस ती आता एकदम अचानक. मला काय बोलावे तेच सुचत नाहीये. "
"संपर्क राहणार नाही हे मी तुला  संगीतालाच होते आणि मी शब्दांची पक्की आहे. शब्द फिरवत नाही मी"
"डॉक्टर, अहो हि जी चिडून गेली, ते तिने परत वळून पहिले सुद्धा नाही. "
"असे तोडलेल्या नात्याकडे परत वळून बघता येते अजय ? विचार करून बघ आणि सांग"- गंधाली 
"गंधाली, तुम्ही बोला मी आलोच "- अभी 
"अभी, थांब मी पण येते"- गंधाली 
"गंधाली , इतक्या वर्षांनी भेटतोय  आपण. मला बोलायचे आहे ग तुझ्याशी, प्लीज. इतक्या वर्षात माफ नाही केलेस मला. आपण एके काळी किती चांगले …"
"अजय, एक मिनिट. एके काळी…तो काळ मागे पडला आता. आणि मला नाही काही बोलायचे आहे"
"अशी नाती   तुटतात का ग ? तुला काहीच नाही वाटत माझ्या बद्दल? कमीत कमी तू कसा आहेस ? काय करतोस ? असे जुजबी प्रश्न पण नाही पडत तुला ? इतका कसला राग?"
"अजय, नात्यांबद्दल आपण नाही बोललो तरच बर होईल, पण आता विषय निघालाच आहे तर एक काम कर जेवण झाल्यावर भेट. मी बोलेन"
अजय थोडा relax  झाला, गंधाली इतक्या वर्षांनी समोर आली आहे, बोलायचे तर खूप आहे तिच्याशी. तिने तोडले, पण तरीही असे कधीच झाले नाही कि तिची आठवण येत नाही,  पेन्सिल हातात धरली, मुलांची चित्रकला पूर्ण करताना तरी डोळे … अजूनही …. बोलू यात म्हणाली आहे म्हणजे कदाचित मला माफ करेल ती … केले हि असेल. तिने किती जरी दाखवले तरी  ती पण आपली मैत्री विसरू शकत नाही… आणि शेवटी मी तिचा मित्र होतो, सोनाली तिची कुणीच नव्हती. मला गंधाली  परत मैत्रीण म्हणून मिळाली तर हवी आहे, हे धागे परत नक्की जुळतील 
जेवण झाले, आलेले बरेच लोक पांगले आणि अजय गांधलीकडे आला. अभी जायला निघाला, तर गांधलीने त्याला थांबवले. 
"अभी, थांब तू.  मला  तू आता इथे हवा आहेस. बोल अजय  "
 " अग , बोल म्हणजे? कशी आहेस तू ? लग्न कधी झाले ? तू काय करतेस सध्या ? "
"मी छान आहे. आणि खरच तुला माहिती नाही काहीच माझ्या बद्दल?"
"म्हणजे तसे कळत असते, अधून मधून.  आपला संजू, ग तुझ्या वर्गातला तो कधी भेटला तर सांगतो. मध्ये एकदा तुला यांचे भेटला पण होता न तो , काही वर्षापूर्वी. " 
   "हो"
"मला काहीच विचारायचे नाही का ग तुला ?"
"खर सांगू. काहीच विचारयाचे नाही. तू समोर आलास आणि इथे तुझ्या ओळखीचे लोक होते,  अपमान नको म्हणून मी बोलले इतकच. तुझे कसे सुरु आहे याचा विचार मी नाही करत आणि केला . नात्याचे म्हणशील तर हो आपण चांगले मित्र होते , कोणे एके काळी. आता ज्या गोष्टीची सुरवातच कोणे के काळी ने होते, तेव्हा तो भूतकाळ आहे. मला काय म्हणायचे तुला कळले असेलच, तितका तू  हुशार आहेस"
"गंधाली, मला समजून घे. जे झाले ते झाले आणि ते माझ्यात आणि सोनाली मधले होते, तुझ्या माझ्यात असे काहीच नाही झालय. किती  ताणणार आपण तेच ते. पुढे जायला हवे न "
"अजय , मला जे बोलायचे होते मी ते तेव्हाच बोलली आहे, मला आता काही परत बोलायचे नाही आहे. तू चूक बरोबर मला यात पडयचा नाही , तू जे केलेस ते माझ्या सद्सदविवेक बुद्धीला पटले नाही आणि जे तुटलाय ते ताणायचे प्रश्न येतोय कुठे? आणि आज मी सहज भेटले म्हणून, नाही तर कशाला हे सगळे आपण बोललो असतो का ? मला वाटते आपण थांबू यात इथच "
"गंधाली, पाचच मिनिट प्लीज"
"ठीक आहे "
गंधाली  त्याचा कडे पाहत होती. त्याचे राहणीमान अजून हि  तसच रुबाबदार होते, पण तरी  काळानुसार जे बदल  झाले आहेतच. पण वय पेक्षा जर जास्तच प्रौढ  दिसतोय का हा? जर झ समोर आला तर … याचा मी विचार करून हि, हा समोर आल्यावर मी अशी   थंडपणे   कशी काय  वागू शकले. हे सोनाली मुळेच  शक्य झालय, तिचा विचार मनात आला कि मन घट्ट होते अजयला नाकारायला. मी नाते तोडल्याचे शल्य त्याच्या मनात आहे अजून हि. पण आता त्याला काही  इलाज नाही, सुखात असेल का हा ? असेल हि, कोण जाणे. अज्ञानात सुख असते म्हणजे काय हे तिला आज कळले, इतके दिवस आपण हे होते, कदाचित बाळबोध पणे  असेल कि , कुठे तरी त्याला त्याच्या वागण्याचा त्रास नक्की होता असेल, आणि या अज्ञानातच सुख होते, एक विचित्र समाधान . आता विचारावे तरी प्रश्न आणि नुसता अंदाज  बांधावा तरी. मला असे टांगती तलवार नको आहे. 
"गंधाली, लक्ष कुठाय? अग अजय काय  तरी "- अभी 
"हा बोल , अजय . तू म्हणालास म्हणून विचारते, कसा आहेस ?"
"बरा  आहे. जगात परफेक्ट काहीच आणि कुणीच नसते हे कळून चुकलय. फर्म सुरु आहे, मुले संसार बायको सुरु आहे. आई बाबा दादाकडेच असतात राहायला. इथे कधी तरीच येतात. सगळच बदललय. तसे कुणी मित्र मैत्रिणी पण नाहीत जुन्यातले आणि तुझी उणीव भासते. माझ्या रुमच्या खिडकीतून अजूनही ते अंगण  दिसते, तुझे जिथे आपण खेळायचो "
गंधाली  क्षणभर हळवी झाली, अजय हात धरून आता त्या जागी असे वाटले हि तिला आणि मग तिने अभिकडे पहिले, सोनाली आठवली आणि मनात उठलेले तरंग निवळले. आई बाबा दादाकडे असतात या  एका वाक्यात जे काय कळायचे ते  तिला कळले. अजयनि सूचकपणे जे सांगायचे होते ते सांगितले आणि  हिला कळले, मैत्रीचा एक जीर्ण धागा होता, पण … गंधाली  शब्दांची आणि विचारांची पक्की होती 
"चल मग अजय.  निघू आम्ही, उशीर होतोय "
"गंधाली , एक शेवटचे"
"हम्म "
"संजू म्हणाला कि तो जेव्हा तुला भेटला तेव्हा तू लग्नाची खरेदी करत होतीस , तेव्हा तुझ्या सोबत ?"
"हो माझ्या सोबत जे कुणी होते ते खरय . झाले , निघू "
"ती कशी आहे ?"
"कोण ?"
"प्लीज, तुला कळतंय कि मी सोनाली बद्दल विचारतोय , ती कशी आहे ? तू तिच्या संपर्कात आहेस ? का, कश्या साठी? खरेदी करत होतात म्हणजे छानच चालले असणार तिचे "
"एक मिनिट अजय. Its none of your business. तुला हे सारे विचारायचा अधिकार आहे का रे ? आणि तिचे कसे हि चालू दे, तुला काय फरक पडतो? जे व्हायचे ते झाले न मग ? तुला तिच्या बद्दल मी  नाहीये"
"प्लीज सांग ना. ती बरी आहे का ? did she moved ahead in life ? तूच मला खरे काय ते सांगशील ? मला जाणून घायचे आहे ग, म्हणजे जे झाले ते आमच्या सुखाचे झाले असे वाटेल मला"
"अजय, मी आता शेवटचे  सांगते. जे झाले ते तू दोघांचा विचार करून थोडी न केले होतेस, तुझ्या सुखाचे झाले न, मग झाले तर. आता तुझ्या आयुष्यात स्थिरता असेलही नसेलही, पण आता काय उपयोग नाही. तू हे सगळे मागे टाकून खूप पुढे गेला आहेस आमच्या सगळ्यांच्या …. तिचा विचार नको  करू आणि आता तर अजिबातच  नको करू "

"आता अजिबातच करू नको म्हणजे?"
'तूच मारून टाकले आहेस तिला, वेळोवेळी. चाल अभी आपण निघू यात. माझी सहन शक्ती संपली आता. तू सोनाली बद्दल विचारले नसतास न तर बरे झाले असते अजय. परत अजिबात  भेटू नकोस आणि संजू ला मी सांगीनच कि तुला काही सांगायचे नाही ते. तितके तो नक्की ऐकेल माझे "
"गंधाली, प्लीज उत्तर न देता   जावू नकोस, नाही तर …."
"मग ऐक. She was abhi's patient for depression, she was collapsed and she is no more for you. goodbye Mr Ajay"
गंधाली, झपाझप पावले टाकत निघूनही गेली, मागे वळून न पाहता. अजय तिच्या कडे पाहताच होता, तिचे शब्द त्याला सुन्न करून गेले. अभिनी, त्याच्या खांद्यावर थोपटले आणि तो निघून गेला. 
अजय ला काही कळत नव्हते, डिप्रेशन आणि नो मोर  हे शब्द सतत त्याचा पाठलाग करत होते आणि आता ते असाच राहणार होते आयुष्यभर. सोनाली खरच , नाहीये कि नो मोर फोर यु, म्हणजे फक्त माझ्या साठी … नक्की काय घडलय? अज्ञानातच सुख असते हे त्याला पटले आज. संजू जे कळले त्या वरून तो  होता को सोनाली चांगले  आयुष्य जगतीय. २ तासापूर्वी  असे वाटले कि आपली मैत्रीण भेटली आणि आता असे वाटतय कि जी भेटली ती गंधाली  होती, तिला जे पटले त्याच्या बाजूनी उभी राहणारी. Noe even Gandhali, my  friend is no more for me. 
आयुष्यात गणिते मांडू नकोस असे सांगायची ती, ते खरच होते. हे असे सांगणारे हि कुणी नाही आता. अजय बाहेर पडला आणि घराच्या दिशेनी   कार  वेगाने निघून गेली 
गंधाली  आणि अभी रूम मध्ये आले.
"गंधाली. तू ठीक आहेस ना ? तुला काही हव आहे? कॉफी ? तू चांगले फेस केलेस अजयला. पण तू  शेवटी असे काय म्हणालीस त्याला ? बोलली होतीस आधी जे बोलायचे ते"
 "अभी, क्षणभर मी पण हळवी झाले त्याला बघून, एक शेवटचा जीर्ण धागा होता तो पण तुटला आज. त्याने सोनाली बद्दल विचारले आणि मग मला राहवले नाही, आता काय संबंध याचा.  दुटप्पी पणा. तिच्या बद्दल विचारले नसते ना, तर मनातून उतरला नसत तो माझ्या. जावू दे. जे झाले ते चांगले झाले. मन शांत झाले माझे आता. मला क्षणभर वाटले कि याचे कसे चालले आहे हे माहित नव्हते तेच बरे होते, आपण आपली कल्पना करायची हवी तशी, … पण मग म्हणूनच विचारले कसे चालले ते . उत्तर मिळाले मला, अर्थात खर तर काही देणे घेणे नाही आत त्याचे. मग सोनालीचा विचार मनात आला आणि मन घट्ट केले, कणखर. त्याला आता कधीच कळणार नाही कि सोनाली कुठे आहे, कशी आहे ? त्याची काळजी मी व्यवस्थित घेईन . तसही ती इथे नाहीये. डिप्रेशन, नो मोर आणि नो मोर फोर यु चा विचार करू देत त्याला, त्याने; विचारले म्हणून मी उत्तर दिले; पण असे कि उत्तरात एक नवीन प्रश्न दडलाय, त्याचे उत्तर तोच शोधेल. तीच त्याची शिक्षा आहे, खरी शिक्षा मी दिलेली. सोनालीचे काय झाले, ती कशी आहे हे  त्याला न कळण्यात, माझ्या मैत्रिणीच सोनालीचे हित आहे आणि त्याची तीच शिक्षा आहे. आज मला खूप शांत वाटतय "
"तुला असे वाटतय कि त्याला कधी ते कळणार नाही "- अभी 
"सध्या तर नाहीच, किमान काही वर्षे तर, याची काळजी घेवू आपण. बाकी जे होईल ते होईल. मी माझ्या मैत्रीचे ऋण आज खर्या अर्थानी फेडलाय अभी. मी माझ्या - अजयच्या मैत्रीतून आज पूर्णपणे मुक्त झाली आहे."
"आणि सोनालीच्या ?"
"तिच्या मैत्रीत बांधली गेली आहे. परमेश्वराने एक मैत्र नेला मात्र. पण सोनालीच्या रूपाने मैत्रीचे दान  मला भरभरून दिले आहे, समाधानाने जगायला"
आणि कित्येक वर्षांनी, गंधालीचे मन शांत झाले, एक ऋण फेडून आणि एक दान पदरी घेवून. वेळ कधीच थांबत नाही, ना माणूस, ना नाती. नाव दिलेली नाती, जुळतात, टिकतात, मोडतात; पण मैत्रीचे नाते, पानगळी नंतर पुन्हा  चैत्र पालाविनी बहरते, आपली एक नवी फांदी, शोधून. 
- समाप्त 
— © शीतल जोशी 

Comments

  1. खूप छान.
    पुढील गोष्ट कधी?

    ReplyDelete
  2. अजय बद्दल ची गंधा ली ची reaction तिच्या स्वभावाच्या विरोधी वाटली.

    ReplyDelete

Post a Comment