ती
ती धरित्री ती जीवन दायिनी
ती शक्ती ती भक्ती
ती विद्या ती प्रज्ञा
ती अर्धागिनी, ती कन्या
ती वीज , ती नीज
ती काळजी , ती प्रीत
ती प्रेरणा , ती ज्योत
ती ममता, मायेच स्त्रोत
ती हळवी, अन तरी ती खंबीर हि
ती मृदू , तरी प्रसंगी ती कठोर हि
तीची ओंजळ नेहमी रिक्त,
तीचे जगणे कधी मनमुक्त
ती पावसची रिमझिम बरसणारी धारा
अन ती , कृष्णाची प्रेमवेडी राधा
ती सर्व नात्या मध्ये गुंतलेली
तरी स्वत्व स्वताचे जपलेली
ती स्वतंत्र अन ती कणखर
ती स्वताला सावरणारी , सांभाळणारी
स्वतची काळजी स्वताच घेणारी
मला, अभिमान आहे मी "ती" असल्याचा
प्रत्येक दिवस माझ्या साठी स्व-सन्मानाचा
अपेक्षा तर काहीच नाही कुणाकडून
स्त्री म्हणून सन्मान अन माणूस म्हणून
आदर दाखवा हीच आशा आहे समाजाकडून
मला अभिमान आहे , मी स्त्री असल्याचा
आणि हा अभिमान माझ्या आई वडिलांना पण आहे
Save a girl Child
-शीतल

Comments
Post a Comment