एक गोष्ट आहे , त्याची अन तिची
एक गोष्ट आहे , त्याची अन तिची
ते म्हणतात आमची गोष्ट आहे वेगळी
वाटते त्यांना तसे वेगळे असे काय असते
कारण प्रेम असते प्रेमासारखे
तरी सुद्धा, तो आणि ती बदलले गोष्टीतले
कि गोष्ट प्रेमाची च असली तरी वेगळी वाटते
प्रेम तर तेच असते, मग वेगळे ते नक्की काय असते
वेगळी असती ती वेळ, परिस्थिती अन वेगळे असते ते वय हि
सतत एकत्र राहण्यासाठी धडपडणारे प्रेम, एकत्र राहण्याची सुरवात झाली कि आपली space शोधत राहतात. प्रेम तेच असते मग बदलते ते काय. सुरवातीला वेगळी असते ती व्यक्त होण्याची पद्धत . लिखित , अलिखित , स्वरूपा मध्ये ज्याला जशी जमेल तशी. हळू हळू व्यक्त होण्याची गरज हि वाटत नाही , इतके गृहीत धरत जातो आपण एकमेकांना . आणि मग सुरु होते ती अपेक्षा आणि हक्कांची नाती. प्रेम म्हंटले कि हक्क हवाच आणि अपेक्षा ठेवलीच तर काय चुकले त्यात असे दोग्न पण वाटत राहते , त्यातच दोघे पण स्वतंत्र विचाराने चालणारे असले कि मग सगळा आनंद च . भांडण , म्हणजे सो called diff ऑफ opinion होतात . खर तर भांडणच ते. मग इतके सारे असूनही टिकते ते काय तर "प्रेम" . एकमेकांसोबत रहायची सवय होते म्हणून नाही तर एकमेकांशिवाय जगायचे नसते म्हणून :). आणि मह इथेच प्रत्येकाची गोष्ट वेगळ्या वाटेने जाते.
काही जण त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून नाईलाजाने वेगळे होतात किना एकत्र राहतात. मग सुरवातीचे प्रेम जाते कुठे ? खोटे होते का ? तर नाही तेव्हा दोघांना पण जे काही वाटत होते ते खरच तर होते . खर तर गोष्ट तेव्हा सगळ्यान सारखी च असते . एकमेकां बद्दल च्या ओढीची आणि प्रेमाची . खर तर एकत्र आल्यावरच प्रत्येकाची वेगळी गोष्ट सुरु होते. कारण ती ज्याची त्यालाच लिहावी लागते . अपेक्षांचे ओझे जर कमी करावे लागते , आणि प्रसंगी हक्क थोडा जास्त दाखवावा लागतो.
पण कायम असते ते प्रेम , त्याची व्यक्त होण्याची पद्धत केवळ बदलते. एखादे वेळेस फुले नाही दिलीत तिला, तरी ती चिडत नाही, त्या ऐवजी डोके दुखत असताना एक कप चहा वर तिचे भागते .
आणि तिने त्याला ग्रीटिंग कार्ड दिले नाही तरी त्याला काही वाटत नाही , जेव्हा त्याला वेळ नसताना बाहेरची अनेक कामे ती स्वत लीलया पार पडते . सुरवातीला एकमेकांना दिलेली space अजूनही तशी च असते , पण कोणत्या वेळी ती एकमेकांनी भरायची ते कळले कि मग प्रेमाची गोष्ट बदलते . परत परत तेच मनात येते कि प्रेम मात्र तेच असते , तो आणि ती पण तेच असतात , फक्त प्रेमाची वाख्या आणि गरज हो गरजच बदलते .प्रेमाला गरज म्हणल्याने ते कमी होते असे मला अजिबात वाटत नाही. कदाचित ज्या क्षणी आपल्याला हे कळते कि आपल्याला प्रेमाची गरज आहे किंवा आपल्या प्रेमाची कोणाला गरज आहे, तेव्हाच त्या प्रेमाची एक गोष्ट होते नाही का !!!!!.
माझी अन त्याची अजिबातच वेगळी नाही गोष्ट , तुमच्या सारखीच आहे अगदी , तरी अन आमचे थोडे वेगळे आहे , कारण मला लिहावसे वाटतय म्हणून मी लिहित सुटलीये आणि तो घरात आणलेले समान काढतोय :)
शीतल

Comments
Post a Comment