पुलकित!!!!

पुलकित!!!!
०८ नोव्हेंबर, आज पु ल देशपांडेंची जयंती
पु ल , याच वर्षी मी तुमच्या स्मृती दिना निमित्त  एक मनोगत लिहिले, आज पुन्हा तितकच मन भरून येतंय. तुमच्या वर परत परत लिहावे इतके तुम्ही मोठे आहेत , आणि परत परत लिहाण्य्साठी शब्द संपदा तोकडी पडावी   इतके आम्ही छोटे आहोत. पण आमचा तुमच्या वर असलेला लोभ मात्र तीळमात्र हि  कमी  झालेला नाही.  तुम्ही खूप मोठे असूनही खूप जवळचे वाटता आणि आणि तुमच्या भोवती असलेलं प्रतिभेचे वलय, तुमचे पुस्तक हातात धरले कि गळून पडते आणि मला वाटते कि वाचकाला, आपला आवडता लेखक हा एक कुटुंब  सदस्य आहे असे वाटणे ह्या पेक्षा अधिक काय बोलू.
नाच रे मोरा मधून तुम्ही पहिल्यांदा भेटलात अन मग अनेक वेळा भेटतच गेलात. तुम्ही लेखणीतून जे जे उतरवलाय ते ते अगदी तुमच्या " गटण्या" सारखे आम्ही वाचून काढलाय. लोक ज्या भक्ती  भावाने  " दासबोध" किंवा "गाथा" किंवा " ज्ञानेश्वरी" वाचतात, तशीच तुमच्या पुस्तकांची कैक पारायणे करून झाली आहेत आणि अजूनही होतील. मन थोडे उदास झाले तर कोणतेही पुस्तक काढावे अन असे वाटेल कि आयुष्य किती सुंदर आहे . तुमचा निखळ विनोद आणि त्या बरोबर आयुष्यात  येणारी असंख्य माणसे, जी निरागस आहेत, कधी थोडी लबाड आहेत, कधी मनस्वी आहेत, पण स्वतचे अस्तित्व घेवून  उभी आहेत आणि ती सुद्धा कारुण्याची हलकीशी किनार घेवून.  पुस्तक वाचणे  आणि त्या तूनही तुमची हा मला वाटते नुसता विरंगुळा नसून तो एक संस्कार आहे. आता हाच संस्कार आम्हाला पुढच्या पिढीत पण जर रुजवता आला तर त्यांची पण आयुष्य आमच्या सारखी समृद्ध होतील
बटाट्याची चाळ, असामी असामी, वाऱ्या वरची वरात, ती फुलराणी , तीन पैशांचा तमाशा, तुज आहे तुझ पाशी, व्यक्ती आणि वल्ली, गोळाबेरीज ... किती आणि काय नवे घेवू , चुकून एकादे नाव राहले तर ते पुस्तक आणि तुमचे  वाचक दोघे हि रागावतील माझ्या वर. तुम्ही आम्हाला भाभारून दिलेत, पण आम्ही मात्र तुमच्या वर किती हि प्रेम केले तरी म्हणू " गेले द्यायचे ते राहून" , कारण थोडे प्रेम तुमच्या करायचे बाकीच राहील, मनाच्या एक कोपऱ्या मध्ये. अन तो कोपरा आम्ही  जपून ठेवू कायमचा. तुम्ही आज नाही आहात हे मनाला पटतच नाही, कारण तुम्ही खरच रोजच भेटता. तुमचे मोठे पण, तुम्ही केवळ चांगले साहित्यिक आहात म्हणून नाही तर एका चांगल्या माणसांनी समाजाला काय दिले पाहिजे हे हि तुम्ही वेळो वेळी धकवून दिले. तुम्ही  तुमच्या " हरी तात्या" , ये व्यक्ती रेखे मध्ये म्हंटले आहे कि" हरी तात्यांनी , कधी पैशाचा खाऊ नाही दिला, पण संस्कार दिले आणि  प्रसंगी  मुठी वळतील  असे बळ दिले". मला पण  आज हेच म्हणावसे वाटतय.साहित्य, कला , संगीत ह्याच्या शी नाते जपत तुम्ही मोठे होत गेलात आणि तुमच्या सोबत आम्ही  समृद्ध होत गेलो.
तत्वांशी जगत, तुम्ही साधे पण जपलत आणि तरी सुद्धा आयुष्य किती आनंदाने जगता येते हे दाखवलेत. अवघ्या, महाराष्ट्र  वर तम्ही  प्रेम केलेत. तुम्हाला लक्षात ठेवण्या साठी आम्हाला कोणत्याही  स्मारकाची,  महा महा मार्गाला अथवा उड्डाण पुलाला नाव देण्याची गरज नाही,  तुमचे स्मारक आम्ही मनातच  बांधले आहे. एकदा तुम्ही " स्वा सावकारांबद्दल"  बोलताना म्हणाला होतात कि " सावरकरांना जसे च्या तसे स्वतः मध्ये उतरवणे , त्यांचा विज्ञानवाद जपण कठीण आहे" . जसे सावरकर समजून घेवून त्यांना स्वीकारणे कठीण आहे, तसच तुमच्या सारखे साधे, परखड आणि तत्वांना पकडून जगणे सुद्धा अवघड आहे .
किती हि लिहिली तरी मनोगत अपुरच राहील , पण ... .. आणि एक संगवसे वाटत कि तुम्ही किती हि मोठे असलात तरी सुनीत बाई शिवाय तुमचा उल्लेख करणे मला जड जाईल.  पत्नी ची मोलाची साथ मिळून हि,  तिला तिचा वाटा तुम्ही मिळवून दिलात हे खर्च कौतुकाचे  आहे. तुमच्या लोकप्रियते मध्ये  पण त्यांचे अस्तित्व टिकले आणि यातच तुम्ही दोघे हि किती समृद्ध सहजीवन जगलात हे कळून येते. स्वताचे अस्तित्व टिकवून सुद्धा एकमेकान सोबत  प्रेम करत जगता येत हे कदाचित आम्हाला आज समजण्याची गरज आहे.
लिहावे तितके थोडेच आहे.  लिहिणे हा मुळी हेतूच नाही . हे तर केवळ मनोगत  आहे  . मागच्या मनोगताचा शेवट ज्या ओळीनी केला त्याच परत एकदा :

केले तुम्ही आम्हास पुलकित
केले तुम्ही आम्हा बहुश्रुत
दिले तुम्ही आम्हा हास्याचे क्षण
दिले तुम्ही आम्हा आयुष्याचे धन
तुमच्या थोर पणास  हिरयाचे  कोंदण
तुच्या स्मृतीस त्रिवार वंदन

तुमची  एक  वाचक
 - शीतल

Comments

Popular posts from this blog

Our visit to an experimental School- Prayog Bhumi

खिडकीतला पाऊस आणि मी !!!!(Poem/Kavita/Mukta Chhand)

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी