कोजागिरी

ती आज घरीच होती. रोजच्या दगदगीतून थोडी सुटका, म्हणजे आज थोडी वेगळी गडबड इतकच. साधारण ८ वाजले होते रात्रीचे. दरवाज्यावरची बेल वाजली, तिला वाटलंच तो आला असेल. त्याला सुट्टी नव्हती, रोजच्या प्रमाणे तो आला असेल. आणि असे क्वचितच होते की आपण दार उघडतो त्याच्या साठी 
ती हातातले काम तसच टाकून दाराकडे धावली. तिने दार उघडले 
तो दारातून येतानाच एकदम काळजीने म्हणाला 
"काय ग, काय झाले एकदम?"
तिच्या डोळ्यातून घळा घळा पाणी वाहत होते. 
त्याला काही कळेचना , काय झाले असे अचानक
" काय ग , पार्टनर कि स्वामी कि हि वाट एकटीची ?"
"यातले काहीच नाही." ती म्हणाली
"मग?"
"काही नाही रे असच "
"असच म्हणजे?"
"चहा घेशील का आधी?"
"विषय बदलू नकोस, काय ते सांग पटकन, उगाच टांगती तलवार"
"तलवार नाही रे सूरी " - ती
"म्हणजे?"
"अरे, काही नाही. तुझी गम्मत केली आणि गंगा जमुना सुरु होत्या , कारण कांदा चिरत होते. कोजागिरी आहे ना , मग भेळ हवीच कि " ती हसत हसत म्हणाली, डोळ्यातून पाणी मात्र वाहतच होते
"हुश्श्य " त्याने निश्वास सोडला .
"कोजागिरीच्या शुभेच्छा !" - ती , तो आणि खिडकीतुन डोकावणाऱ्या चंद्राकडून
- शीतल
#sharadpournima #kojagiripornima #blog #marathi

Comments

Popular posts from this blog

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी

Parv: An amazing reading experience

खिडकीतला पाऊस आणि मी !!!!(Poem/Kavita/Mukta Chhand)