बाल गंगांधर टिळक
आज १ ऑगस्ट, लो. बाल गंगांधर टिळक यांची पुण्यतिथी. आपण कडची विसरलो पण असू, एक तर आज सुट्टी नाही, आणि आता आपण शाळेत थोडी न आहोत अश्या गोष्टी लक्षात ठेवायला. शाळेत असताना, असायच्या वक्तृत्व किंवा कथाकथनाच्या स्पर्धा, म्हणून लक्षात राहायचे. म्हणूच आज वाटले कि थोडे से लिहावे. माझे स्वताच असे काहीच नाही लिहित आहे, केवळ ठावूक असलेली आणि विस्मृतीमध्ये गेलेल्या काही गोष्टीना उजाळा देणे आणि त्या निम्मिताने एका राष्ट्र भक्ताचे स्मरण करणे हाच केवळ उद्देश आहे . किती लिहावे तितकेच थोडे आहे, म्हणून केवळ काही महत्वाच्या घटना नमूद कराव्याश्या वाटतात, त्या अश्या,
लोकमान्य बाल गंगाधर टिळक, यांचे नाव केश असे ठेवले होते पण बाल हेच नाव रूढ झाले. लोकमान्य अतिशय प्रज्ञावंत होते आणि गणितामध्ये त्यांचे विशेष प्राविण्य होते, इतके कि त्यांचे गुरुजन आश्चर्यचकित होत. संस्कृत मध्ये सुद्धा त्यांना विशेष गती होती त्यांची शाळेतील "टरफले उचलणार नाही" हि कथा तर सर्व श्रुत आहेच. गणित आणि संशोधना मध्ये विशेष रुची असून हे केवळ राष्ट्र सेवा करत यावी , आणि त्या साठीचे ज्ञान असावे म्हणून त्यांनी BA ( गणित) केल्या नंतर LLB मध्ये प्रवेश घेतला.
टिळक आणि आगरकर हे राष्ट्र सेवेच्या ध्येयाने प्रेरित झालेले अगदी घनिष्ट मित्र होते, पण आधी स्वातंत्र्य कि आधी समाज सुधारणा या मतभेदामुळे त्यांनी एकत्र काम करणे थांबवले.
तरी हि स्वस्त आणि दर्जेदार शिक्षण हि काळाची गरज आहे हे ओळखून टिळक, आगरकर तसेच त्यांचे मित्र नामजोशी, करंदीकर यांनी चिपळूणकरांना मदत करण्याचे ठरवले व १ जानेवारी इ.स. १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली आणि मग अनुषंगाने डेक्कन एज्युकेशन सोसायटी ची. काही अतर्गत करांमुळे, डिसेंबर इ.स. १८९० मध्ये टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा दिला आणि स्वतः पूर्णवेळ केसरी व मराठा या वृत्तपत्रांचे संपादन करू लागले.
वृत्तपत्रे किती महाताचे कार्य करू शकतात आणि क्रांतिकारी असतात याचे उधहरन म्हणजे केसरी आणि मराठा मधील अग्रलेख. पुण्यातली प्लेगची साथ आणि चाफेकर बंधू खटल्याच्या वेळी प्रसिद्ध झालेले दोन महाताचे अग्रलेख म्हणजे " "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" व "`राज्य करणे' म्हणजे `सूड उगवणे नव्हे'" . १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले.इतका बाणेदारपणा आणि पर्कड शब्द, आज आपण स्वतंत्र भारतामध्ये पण बोलत नाही हे मात्र खरे आहे आणि तितकेच दुर्दैवी सुद्धा. या स्मृती जागवल्या तर कदाचित आपल्या मध्ये थोडे धाडस निर्माण होईल हीच इच्छा आहे.
या नंतर टिळकांवर दोन राजद्रोहात्मक लेख केसरीमधून लिहिल्याच्या आरोपाखाली खटला भरला आणि टिळकांना तुरुंगवास भोगावा लागला. या कालामाढेच त्यांनी " आर्क्टिक होम ऑफ वेदाज " या त्यांच्या पुस्तकाचा साचा तयार केला.
टिळकांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना मध्ये होमेरुळे चळवळीचा उल्लेख करावा लागेल. तसेच स्वदेशी चळवळीचाहि, ज्या पासून प्रेरेइत होवून, स्वा. सावरकरांनी त्यांचा सुरवातीच्या काळ खंडात विदेशी कपड्यांची होळी केली. तसेच सावर्जनिक उत्सवामधून समाज प्रेरणा करण्याची सुरवातहि टिळकांनी च केली आणि सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरवात झाली. त्याचे स्वरूप आता इतके बदलले आहे कि, टिळक जर परत जन्मास आले तर कदाचित त्यांना परत एक नवी सुरवात करून द्यावी लागेल या उत्सवाची.
टिळकांनी साहित्य निर्मिती मध्ये हि लोकमान्यता मिळवली, काही प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे " गीता रहस्य", The Hindu philosophy of life, ethics and religion , ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas ). आणि कले मध्ये ज्यांचे ऋण संगीत रंगभूमी आयुष्यभर मानेल त्यांना लोकमान्यांनीच दाद आणि
आम्हाला " स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे " याची पहिली जाणीव करून देणाऱ्या आणि " 'भारतीय असंतोषाचे जनक' म्हणून ओळखल्या जाणारया, लोकमान्य अश्या या धाडसी, कणखर, परखड आणि अखंड आयुष्य राष्ट्र सेवेस वेचलेल्या महान नेत्यास सह्त्र प्रणाम आणि त्यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन !!!!
( हा केवळ माहिती पार लेख आहे, सुदृश माहिती हि पुस्तके आणि website वरून संकलित केली आहे )
-शीतल जोशी

Comments
Post a Comment