पु ल पुन्हा न होणे !!!!!

पु ल पुन्हा न होणे !!!!!

आज १२ जून, पु ल देशपांडेंचा चा स्मृती दिन. खर सांगायचे तर स्मृती दिन त्यांचा असतो जे विस्मृती मध्ये जातात. पण पु ल तर  घरातलेच कुटुंबा पैकी एज्क आहेत असच वाटते.
पु ल तुम्ही आमचे जीवन पुलकित केलेत. तुमची पहिली भेट, अर्थात  तुमच्या  पुस्तकान  मधूनच ते नक्की आठवत नाही. तुम्ही खूप भरभरून दिलेत, आयुष्य छान आहे हे खूप लहान वयातच कळले, तुमच्या मुळेच. सकस साहित्य आणि निखळ विनोद  खळाळून  हसवातोच  पण जगणे किती सुंदर आहे हे हि शिकवतो. विनोदाला असलेली कारुण्याची झालर डोळ्यात पाणी आणतेच पण तरी हि मनाला प्रसन्न करते आणि जगायची उमेद वाढवते
तुमचे किती उपकार आहेत ते आम्ही वाचकांनी कसे फेडावे, जसे आई वडिलांचे ऋण न फेदाण्यासार्खेच तसेच तुमचे हि
व्यक्ती आणि वल्लीच्या प्रत्येक वल्ली नी माणूस  शोधायला शिकवले. तुज आहे तुजपाशी मध्ये काकाजी आणि आचार्यांनी ख्प्श्या प्रश्नाची उत्तरे दिली. सुंदर  मी होणार मुळे खरच सुंदर कसे जगावे हे शिकवले .   तुम्ही उपजीविका आणि आयुष्य यातला फरक सांगितलात
तुम्ही जमिनीवर राहायला शिकवले. प्रसिद्धी आणि पैसा म्हणजे आयुष्य नवे हे तुअम्च्य कडे बघूनच शिकलो.  समाजासाठी आपण काही देणे लागतो हे तुमच्या कृती मधून तुम्ही दाखवून दिलंत   वेळ पडल्यास सत्याचा बाजून निडर पणे लढा द्यायलाच हवा हे तुम्ही आणि बाणी मध्ये दाखवून दिलंत
लंडन आणि बाकीचा युरोप तुम्ही फिरवून आणलात तुमच्या लेखणी मधून आणि हे कळले कि प्रवास करताना केवळ प्रेक्षणीय स्थळे बघणेच नवे तर माणसाना हि भेटता आले पाहिजे
आज तुम्ही असतात तर कदाचित तुम्ही सुरु केलेल्या दूर दर्शन मुळे खचित दुखी झाला असतात. पण कदाचित तुम्ही असतात तर नयने घडणाऱ्या कलावंताला खूप मोठे आधार आणि प्रोत्साहन मिळाले असते. तुम्ही आणि सुनिता बाई नि एक आदर्श जोडप्याचे उदाहरण आमच्या समोर ठेवले आहे. कदाचित त्याची गरज आहे आज.
एक लेखक, कवी, गीतकार, संगीत दिग्दर्शक, गायक, नाटककार, अभिनेता या पलीकडे हि तुमचे आमचे नाते आहे,  आणि खरच होतेनही आहे कारण तुम्ही आम्हाला रोज भेटता. पुस्तक मधून , कॅसेट्स  मधून तुमचा आवाज आम्ही ऐकू शकतो,   तुम्हाला टीवी वर किंवा डीवीडी वर पाहू शकतो,
तुमचा आज स्मृती दिन,पण तुम्ही आमच्या मध्ये नाही असा एका हि दिवस वाटलेच नाही. कधी पण बुक शेल्फ मधून पुस्तक काढावे आणि तुम्हाला भेटावे, कधी झोप नाही आली तर एखादे कथ्कातःन ऐकावे आणि प्रसन्न व्हावे. लहानी पाणी आई, बाबा, आजीआजोबा गोषित सांगत असते, त्यांचे जे आयुष्यात महात्वे आहे तेच तुमचं कथाकथनाचे आजहि आहे

केले तुम्ही आम्हास पुलकित
केले तुम्ही आम्हा बहुश्रुत
दिले तुम्ही आम्हा हास्याचे क्षण
दिले तुम्ही आम्हा आयुष्याचे धन
तुमच्या थोर पणास  हिरयाचे  कोंदण
तुच्या स्मृतीस त्रिवार वंदन

तुमची  एक  वाचक
 - शीतल





Comments

Popular posts from this blog

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी

खिडकीतला पाऊस आणि मी !!!!(Poem/Kavita/Mukta Chhand)

Parv: An amazing reading experience