Mothers day

#happymothersday.
Miss you mom,. I know you are with us  and whatever I have expressed now are your  thoughts only .
इथे परमेश्वर सुद्धा आई होतो कारण विठु रायाला आम्ही विठु माऊली म्हणतो.
संत - विचारवंत सुद्धा ज्ञानोबा माऊली होतात
आईचे प्रेम द्यायला मुलाला जन्म दयावाच लागतो असे नाही, एक सिंधुताई सारयांची माय होवून जाते
श्यामची आई , गीते सारखी घराघरात वाचली जाते
स्वातंत्र्यवीर सुद्धा मातृ भूमीच्या विरहा मधे व्याकुळ होतात अन आईची झोपड़ी प्यारि म्हणतात, अन मृतुन्जय   होवून झुंज देतात
जिजाऊ असो वा धाराऊ , शिवबा अन शंभुराजे याना सारखेच बळ देते.
पराक्रमी पुत्र राधेय अथवा कौन्तेय म्हणून ओळखले जातात
अन पुत्र शोकच्या विरहाने उद्विग्न झालेली गांधारी, आई म्हणून साक्षात कृष्णाला सुद्धा शाप देण्याचे सामर्थ्य  बाळगते
गुरुला सुद्धा गुरु माऊली म्हणतो आम्ही.
जन्म दात्री न होता सुद्धा आईपण जगु शकतो आम्ही
#happymothersday
©Sheetal joshi

Comments

Popular posts from this blog

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी

खिडकीतला पाऊस आणि मी !!!!(Poem/Kavita/Mukta Chhand)

Parv: An amazing reading experience