पु ल

पु ल, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दर वर्षी किती लिहायच तुमच्या बद्दल. सहज परवा मनात विचार अला की, तुमच्या व्यक्ति आणि वल्ली मधे " स्त्री व्यक्तिमत्वे" नाहीत फारशी. पण तुमच्या नाटकांचा विचार केला आणि लक्षात आली की रूढ़ अर्थाने ती नाटके स्त्री प्रधान नसतील ही कदाचित पण त्यातील स्त्री व्यक्ति रेखा मात्र सशक्त. एकाच वेळी स्त्रीचा माणूस म्हणून विचार करणाऱ्या आणि तिच्या नैसर्गिक स्वभावचे रेखटन करणाऱ्या. 
तुज आहे तुजपाशी मधील उषा आणि गीता, दोघी ही स्वतःचे असे एक अस्तित्व घेऊन उभ्या आहेत. तसच दीदी राजे अणि बेबी राजे सुन्दर मी होणार मधे. एकीकडे प्रगल्भता, उद्वेग, स्वतंत्र बाणा आणि तरी ही "स्त्रीत्व" जपणाऱ्या या साऱ्या जणी. अन ती फुलराणी,जरी अनुवादित असले तरी व्यक्ती रेखा ही तुमच्याच लेखणी तुन उतरलेली अस्सल आपल्या मातीमधली.
तुमच्या वर केवळ विनोदी लेखक असा शिक्का मारणे म्हणजे कूप मंडूक वृत्ति आहे, असे वाटते हे सारे वाचल्यावर. कैक वेळा वाचून सुद्धा ह्या साऱ्या जणी नव्याने भेटतात मला. आयुष्यताला विसंवाद शोधत तुम्ही विनोद घडवाला तो पण दुःखाचि किनार असलेला. जे काही मनात आले ते लिहले मी आता,कदाचित तुम्हाला नव्याने अभ्यायसचि ही एक सुरवात असेल
© sheetal
#पुल #पुलदेशपांडे #पुलकित #पुलदेशपांडेजयन्ती
#मराठीलेखक #marathibooks

Comments

Popular posts from this blog

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी

खिडकीतला पाऊस आणि मी !!!!(Poem/Kavita/Mukta Chhand)

Parv: An amazing reading experience