मैत्र भाग : ५ आणि शेवटचा भाग
मैत्र भाग : ५ आणि शेवटचा भाग सोनालीच्या आई बाबांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्याने, बराच खुलासा झाला होता. इतके समजूतदार पालक असून हि , सोनालीने त्यांना न सांगता लग्न केले, या बद्दल आश्चर्य वाटावे अशीच परिथिती होती. अर्थात एकीकडे अभिला असे हे वाटले कि, खरच कसे सांगितले असते तिने, एकदा होकार, एकदा नकार काल्वणारा अजय, त्याच्या आई वडिलांची नाराजी. अजयच्या कुटुंबाला न कळवता ते आपल्याला लग्न नाही करू देणार, हे हि तिला मनोमन ठावूक असावे; पण हेही लक्षात येतेय कि तिला या सगळ्याचा किती त्रास होतंय. अजय मध्ये ती इतकी गुंतली होती, तिचे खरच मनापासून प्रेम होते अजयवर. मग नेमके काय झाले तिच्यात आणि अजयमध्ये असे कि, इतका कडवटपणा अल. अजयची अशी करणे होती आणि ती गंधालीला पटली नाहीत, ती पण इतकी कि तिने त्याला झिडकारले. आता कसा असेल अजय? त्याला खरच कधी सोनालीची आठवण येत असेल का ? आणि गंधाली, तिच्याबद्दल आता काय वाटत असेल त्याला? प्रेम, द्वेष, तिरस्कार कि काहीच नाही ? मैत्री नसेल तर खरच फरक पडतो का आयुष्यात? आपले पण किती जुने मित्र होतेच कि...