आषाढ मास

आषाढ मास, अनन्य साधारण महत्व असलेला महिना. तप्त धरतीला शांत करणारा, भूमी पुत्राला आशेचा किरण, ( खर तर मेघ) दाखवणारा.  आषाढ म्ह्नातला कि दोन  गोष्टी नक्की आठवतात,  प्रेयसीच्या भेटीने व्याकूळ झालेला प्रियकर, जो मेघदूताकरवी संधेश पाठवतो आणि महान काव्य  जन्माला येते, कालिदास रचित "मेघदूत".  आणि दुसरीकडे विठू - माउलीच्या भेटीसाठी व्याकूळ  झालेलं भक्त. कालिदासाचे काव्य जितके सृजनशील, तितकेच
 पायी चालत जाताना  आळवलेले अभंग आणि विठू नामाचा गजर. कालिदासाची  प्रतिभा आणि  भक्तांना वारीची अनामिक ओढ.  कैक वर्षापासून जितके मेघदूत चिरतरुण तितकेच वर्षानु वर्षे चालत जाण्याची मनीषा बाळगून मार्ग क्रमान करणारे वारकरी हि. आषाढ महिन्याचे खरच आपल्यालय या दोन्ही गोष्टीसाठी ऋण मानायला हवेत.

तृप्त करती आषाढ धारा  तप्त या धरणीला
मेघदूत पोहचवती संदेश व्याकूळ  प्रीतीला
कालिदास प्रतिभा अन विठू नामाचा गजर,
करी धन्य या भारत भूमीला

Comments

Popular posts from this blog

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी

खिडकीतला पाऊस आणि मी !!!!(Poem/Kavita/Mukta Chhand)

Parv: An amazing reading experience