Posts

Showing posts from 2015

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी

Image
मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी आज कवी मंगेश पाडगावकर यांचे दुख:द निधन झाले. त्यांच्या कविता नेहमीच आपल्या मनात असतील आणि मंगेश पाडगावकर हि. अगदी लहानपणापासून मला कविता आवडायच्या, बालकवींची निर्झरास आणि औदुंबर तर मी पाठच केली होती. पण पहिल्यांदा कविता सोपी आणि जवळची वाटली जेव्हा "बोलगाणी" हातात पडले . सहज सोप्या वाटणारया कविता, परत परत वाचल्या आणि त्या मागे असणार विचार हि कळत गेला. सोपे आणि सहज वाटणारे लिखाण हे सगळ्यात अवघड. शब्दांना बोलके करणारी हि कविता मला भावली आणि पहिल्यांदा मला वाटले कि हे शब्द आपणही गुंफावे कि, बघू आपले शब्द बोलके होतात का. माझे पहिले स्फूर्तीस्थान म्हणून कवी पाडगावकर यांना माझ्या मनात विशेष स्थान आहे. माझ्या कित्येक पहिल्या वहिल्या कवितांवर वाट त्यांच्या खास शैलीची छाप आहे. त्यांची उंची गाठणे हे अशक्यच आहे. पण तरी जेव्हा माझी बहिण मला म्हणते कि (कधी कधी वैतागून), बोलगाणी सारखी झालीये, किंवा नेहमी सारखीच झालीय (म्हणजे मंगेश पाडगावकर यांचा छाप जाणवतोय), तेव्हा थोडे बरच वाटते. एक मात्र आहे, कि कविता वाचनाचे एक नव दालन आपल्यासाठी उघडे केले ते बापट...

मैत्र भाग : ५ आणि शेवटचा भाग

Image
मैत्र भाग : ५  आणि शेवटचा भाग  सोनालीच्या आई बाबांनी बऱ्याच  गोष्टी सांगितल्याने, बराच खुलासा झाला होता. इतके समजूतदार पालक असून हि , सोनालीने त्यांना न सांगता लग्न केले, या बद्दल आश्चर्य वाटावे  अशीच परिथिती होती. अर्थात एकीकडे अभिला असे हे वाटले कि, खरच कसे सांगितले असते तिने, एकदा होकार, एकदा नकार काल्वणारा अजय, त्याच्या आई वडिलांची नाराजी. अजयच्या कुटुंबाला न कळवता ते आपल्याला लग्न नाही करू देणार, हे हि तिला मनोमन ठावूक असावे; पण हेही  लक्षात येतेय कि तिला या सगळ्याचा किती त्रास होतंय. अजय मध्ये ती इतकी गुंतली होती, तिचे खरच मनापासून प्रेम होते अजयवर. मग नेमके काय झाले तिच्यात आणि अजयमध्ये असे कि, इतका कडवटपणा  अल. अजयची अशी करणे होती आणि ती गंधालीला  पटली नाहीत, ती पण इतकी कि तिने त्याला झिडकारले. आता कसा असेल अजय? त्याला खरच कधी सोनालीची आठवण येत असेल का ? आणि गंधाली, तिच्याबद्दल आता काय वाटत असेल त्याला? प्रेम, द्वेष, तिरस्कार कि काहीच नाही ? मैत्री नसेल तर खरच फरक पडतो का आयुष्यात? आपले पण किती जुने मित्र होतेच कि...

पहिली आठवण अन पहिला क्षण

पहिला दिवस,  प्रत्येक वेळी हा पहिला दिवस फार संस्मरणीय असतो ना!!! शाळेतला पहिला  दिवस तसा नाही आठवणार आता, पण थोडे काही दिवस आठवत आहेत,  अगदी सुरवातीला जेव्हा लहान गट मध्ये गेले तेव्हाचा युनिफोर्म चा रंग  आठवतो आहे, पण गम्मत अशी कि लहानगट मधेच  शाळा बदलेली आणि सांगलीला नव्या शाळेत घातले त्यावेळचे म्हणजे म्हणजे कोणत्या रंगाची   waterbag  होती आणि कंपास box  हे मात्र आठवतंय. इतकाच काय,  ज्या रस्ता  वरून आईचा हात धरून  चालत यायचे, त्या वाटेवर खूप सारी बोगनवेल होते हे पण आठवतंय आणि त्याचे रंग सुद्धा, विलीग्डन  कॉलेज  सांगली मधून जायचा तो रस्ता., नंतर मी त्या कॉलेज मध्ये ११ आणि १२ वि ला होते , पण पहिली स्मृती हीच . मी स्वतःच त्या फुलांचे  नाव पण ठेवले होती "पेपर ची फुले ", बोगनवेल हे नाव मला फार नंतर कळाले  त्या नंतर शाळा बदलली तेव्हाचे पहिले दिवस मात्र स्पष्ट  आठवत आहेत, नवी जागा, नवे सवंगडी, नवीन शिक्षक , हुरुहूर तर होतीच पण भीती कधिच नाही वाटली  कॉलेज मधले पहिले दिवस   पण अ...

ती

Image
ती धरित्री ती जीवन दायिनी  ती शक्ती ती भक्ती  ती विद्या ती प्रज्ञा  ती अर्धागिनी, ती कन्या  ती वीज , ती नीज  ती काळजी , ती प्रीत  ती प्रेरणा , ती ज्योत  ती ममता, मायेच स्त्रोत  ती  हळवी, अन तरी  ती खंबीर हि  ती मृदू , तरी प्रसंगी ती कठोर हि  तीची ओंजळ नेहमी रिक्त, तीचे जगणे कधी मनमुक्त  ती पावसची रिमझिम बरसणारी धारा  अन ती , कृष्णाची प्रेमवेडी राधा  ती सर्व नात्या मध्ये गुंतलेली  तरी   स्वत्व स्वताचे जपलेली  ती स्वतंत्र अन ती कणखर  ती स्वताला सावरणारी , सांभाळणारी स्वतची काळजी स्वताच घेणारी  मला,  अभिमान आहे मी "ती" असल्याचा  प्रत्येक दिवस माझ्या साठी स्व-सन्मानाचा  अपेक्षा तर काहीच नाही कुणाकडून  स्त्री म्हणून सन्मान अन माणूस म्हणून  आदर दाखवा हीच  आशा आहे समाजाकडून  मला अभिमान आहे , मी स्त्री असल्याचा  आणि  हा अभिमान माझ्या आई वडिलांना पण आहे  Save a gir...