Posts

Showing posts from November, 2014

एक गोष्ट आहे , त्याची अन तिची

एक गोष्ट आहे , त्याची अन तिची ते म्हणतात आमची गोष्ट आहे वेगळी वाटते त्यांना तसे वेगळे असे काय असते कारण प्रेम असते प्रेमासारखे तरी सुद्धा, तो  आणि ती बदलले गोष्टीतले कि गोष्ट प्रेमाची च असली तरी वेगळी वाटते प्रेम तर तेच असते, मग वेगळे ते नक्की काय असते वेगळी असती ती वेळ, परिस्थिती अन वेगळे असते ते वय हि सतत एकत्र राहण्यासाठी धडपडणारे प्रेम, एकत्र राहण्याची सुरवात झाली कि आपली space शोधत राहतात.  प्रेम तेच असते मग बदलते ते काय. सुरवातीला वेगळी  असते ती व्यक्त होण्याची पद्धत . लिखित , अलिखित , स्वरूपा मध्ये ज्याला जशी जमेल तशी.  हळू हळू व्यक्त होण्याची गरज हि वाटत नाही , इतके गृहीत धरत जातो आपण एकमेकांना . आणि मग सुरु होते ती अपेक्षा आणि हक्कांची नाती. प्रेम म्हंटले कि हक्क हवाच आणि अपेक्षा ठेवलीच तर काय चुकले त्यात असे दोग्न पण वाटत राहते , त्यातच दोघे पण स्वतंत्र विचाराने चालणारे असले कि मग सगळा आनंद च . भांडण , म्हणजे सो called  diff  ऑफ opinion  होतात . खर तर भांडणच ते. मग इतके सारे असूनही टिकते ते काय तर "प्रेम" . एकमेकांसोबत रहायची सवय होत...

पुलकित!!!!

पुलकित!!!! ०८ नोव्हेंबर, आज पु ल देशपांडेंची जयंती पु ल , याच वर्षी मी तुमच्या स्मृती दिना निमित्त  एक मनोगत लिहिले, आज पुन्हा तितकच मन भरून येतंय. तुमच्या वर परत परत लिहावे इतके तुम्ही मोठे आहेत , आणि परत परत लिहाण्य्साठी शब्द संपदा तोकडी पडावी   इतके आम्ही छोटे आहोत. पण आमचा तुमच्या वर असलेला लोभ मात्र तीळमात्र हि  कमी  झालेला नाही.  तुम्ही खूप मोठे असूनही खूप जवळचे वाटता आणि आणि तुमच्या भोवती असलेलं प्रतिभेचे वलय, तुमचे पुस्तक हातात धरले कि गळून पडते आणि मला वाटते कि वाचकाला, आपला आवडता लेखक हा एक कुटुंब  सदस्य आहे असे वाटणे ह्या पेक्षा अधिक काय बोलू. नाच रे मोरा मधून तुम्ही पहिल्यांदा भेटलात अन मग अनेक वेळा भेटतच गेलात. तुम्ही लेखणीतून जे जे उतरवलाय ते ते अगदी तुमच्या " गटण्या" सारखे आम्ही वाचून काढलाय. लोक ज्या भक्ती  भावाने  " दासबोध" किंवा "गाथा" किंवा " ज्ञानेश्वरी" वाचतात, तशीच तुमच्या पुस्तकांची कैक पारायणे करून झाली आहेत आणि अजूनही होतील. मन थोडे उदास झाले तर कोणतेही पुस्तक काढावे अन असे वाटेल कि आयुष्य किती सुंदर आहे . तुमचा निखळ ...