एक गोष्ट आहे , त्याची अन तिची
एक गोष्ट आहे , त्याची अन तिची ते म्हणतात आमची गोष्ट आहे वेगळी वाटते त्यांना तसे वेगळे असे काय असते कारण प्रेम असते प्रेमासारखे तरी सुद्धा, तो आणि ती बदलले गोष्टीतले कि गोष्ट प्रेमाची च असली तरी वेगळी वाटते प्रेम तर तेच असते, मग वेगळे ते नक्की काय असते वेगळी असती ती वेळ, परिस्थिती अन वेगळे असते ते वय हि सतत एकत्र राहण्यासाठी धडपडणारे प्रेम, एकत्र राहण्याची सुरवात झाली कि आपली space शोधत राहतात. प्रेम तेच असते मग बदलते ते काय. सुरवातीला वेगळी असते ती व्यक्त होण्याची पद्धत . लिखित , अलिखित , स्वरूपा मध्ये ज्याला जशी जमेल तशी. हळू हळू व्यक्त होण्याची गरज हि वाटत नाही , इतके गृहीत धरत जातो आपण एकमेकांना . आणि मग सुरु होते ती अपेक्षा आणि हक्कांची नाती. प्रेम म्हंटले कि हक्क हवाच आणि अपेक्षा ठेवलीच तर काय चुकले त्यात असे दोग्न पण वाटत राहते , त्यातच दोघे पण स्वतंत्र विचाराने चालणारे असले कि मग सगळा आनंद च . भांडण , म्हणजे सो called diff ऑफ opinion होतात . खर तर भांडणच ते. मग इतके सारे असूनही टिकते ते काय तर "प्रेम" . एकमेकांसोबत रहायची सवय होत...