#लघुकथा #shortstory #tinytale गुलमोहर
#लघुकथा #shortstory #tinytale गुलमोहर गुलमोहरचे झाडांची रांग च रांग बघून , ती खुश झाली. निळया आकाशी रंगाच्या पडद्यावर, लाल केशरी रंगाची जादू पसरली होती. मधेच एखाद्या गुलमोहरामधून हलकिशी हिरवी छोटी छोटी पाने त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती. कुठे एखदया झाडानी, मातकट रंगाच्या शेंगा अंगभर खेळवल्या होत्या. या लाल पखरणी मधेच, एखादा एखादा पिवळा जर्द बहवा मन मोहवून घेत होता. तिला उगाचच वाटले , ही लाल पिवळी झाड़े म्हणजे जणू चैत्र महिन्यताले हळदी कुंकु. प्रत्येक सण म्हणजे जणू निसर्गशी एकरूप होणेच. ती कित्येक वर्षे मागे फिरली. कुमुद आणि तिच्या घरा मधे असाच एक गुलमोहर होता, एक बहवा पुढच्या वळणावर. दोन्ही घरांच्या परसात एकेक आंबा उभा होता. त्या झाडांच्या सावलित, यांचा दुपरचा खेळ अगदी रंगात येत असे. कुमुद आणि ती बरोबरीच्या अन तिचा दादा यांच्या पेक्षा दोन वर्षानि मोठा. आम्बाच्या त्या झाडांच्या सावलीत तिघांचे बालपण सुखात सरले. काही वर्षात कुमुद आणि दादाचे नाते सुद्धा फुलले अगदी त्या गुलमोहरा सारखे. तो गुलमोहर आणि ती साक्षीदार त्या प्रेमाचे. पण शिशिरात पान गळ होतेच. प...