बाल गंगांधर टिळक
आज १ ऑगस्ट, लो. बाल गंगांधर टिळक यांची पुण्यतिथी. आपण कडची विसरलो पण असू, एक तर आज सुट्टी नाही, आणि आता आपण शाळेत थोडी न आहोत अश्या गोष्टी लक्षात ठेवायला. शाळेत असताना, असायच्या वक्तृत्व किंवा कथाकथनाच्या स्पर्धा, म्हणून लक्षात राहायचे. म्हणूच आज वाटले कि थोडे से लिहावे. माझे स्वताच असे काहीच नाही लिहित आहे, केवळ ठावूक असलेली आणि विस्मृतीमध्ये गेलेल्या काही गोष्टीना उजाळा देणे आणि त्या निम्मिताने एका राष्ट्र भक्ताचे स्मरण करणे हाच केवळ उद्देश आहे . किती लिहावे तितकेच थोडे आहे, म्हणून केवळ काही महत्वाच्या घटना नमूद कराव्याश्या वाटतात, त्या अश्या, लोकमान्य बाल गंगाधर टिळक, यांचे नाव केश असे ठेवले होते पण बाल हेच नाव रूढ झाले. लोकमान्य अतिशय प्रज्ञावंत होते आणि गणितामध्ये त्यांचे विशेष प्राविण्य होते, इतके कि त्यांचे गुरुजन आश्चर्यचकित होत. संस्कृत मध्ये सुद्धा त्यांना विशेष गती होती त्यांची शाळेतील "टरफले उचलणार नाही" हि कथा तर सर्व श्रुत आहेच. गणित आणि संशोधना मध्ये विशेष रुची असून हे केवळ राष्ट्र सेवा करत यावी , आणि त्या साठीचे ज्ञान असावे म्हणून ...