गुरु पोर्णिमा
गुरु पोर्णिमा अर्थातच व्यास पोर्णिमा. व्यासकृत महाभारत लक्षात घेता, ते खर तर आद्य गुरूच. महाभारत मध्ये मनुष्य स्वभावाचे, नात्यांचे, गुण दोषांचे इतके कंगोरे दाखवले आहेत, कि असे म्हणावेसे वाटते कि त्याच्या पलीकडे काही उरतच नाही. प्रत्येक्ष गुरु शिष्यांचे नाते महाभारत मध्ये इतक्या प्रकारे दर्शवले आहे कि, मग ते कृष्ण -अर्जुन, एकलव्य - द्रोणाचार्य, अर्जुन- द्रोणाचार्य, कर्ण-द्रोणाचार्य, कर्ण - परशुराम, कर्ण -सूर्यदेव, अगदी अभिमन्यु- सुभद्रा आणि कृष्ण - राधा सुद्धा. गुरु शिष्य परंपरा इतकी मोठी आहे कि त्या बद्दल लिहावे तितके थोडेच. पहिला गुरु साक्षात आई वडील च असतात. असे म्हणतात कि " गुरुविण कोण दाखवील वाट", आणि योग्य मार्ग दाखवण्याचे पहिले मार्गदर्शक असतात ते आपले आई वडीलच. मला नेहमीच असे वाटत आले आहे कि आपण शालेय जीवना मध्ये जे घडतो ते आयुष्यभारासाठी शिदोरी असते. शाळे मधील शिक्षक अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. मला आज नक्की सांगावेसे वाटते कि मी इतकेइ सुदैवी आहे कि, खूप चांगल्या गुरूंचा सहवास लाभला. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे शिकवणे ...