Posts

Showing posts from June, 2015

पु ल पुन्हा न होणे !!!!!

पु ल पुन्हा न होणे !!!!! आज १२ जून, पु ल देशपांडेंचा चा स्मृती दिन. खर सांगायचे तर स्मृती दिन त्यांचा असतो जे विस्मृती मध्ये जातात. पण पु ल तर  घरातलेच कुटुंबा पैकी एज्क आहेत असच वाटते. पु ल तुम्ही आमचे जीवन पुलकित केलेत. तुमची पहिली भेट, अर्थात  तुमच्या  पुस्तकान  मधूनच ते नक्की आठवत नाही. तुम्ही खूप भरभरून दिलेत, आयुष्य छान आहे हे खूप लहान वयातच कळले, तुमच्या मुळेच. सकस साहित्य आणि निखळ विनोद  खळाळून  हसवातोच  पण जगणे किती सुंदर आहे हे हि शिकवतो. विनोदाला असलेली कारुण्याची झालर डोळ्यात पाणी आणतेच पण तरी हि मनाला प्रसन्न करते आणि जगायची उमेद वाढवते तुमचे किती उपकार आहेत ते आम्ही वाचकांनी कसे फेडावे, जसे आई वडिलांचे ऋण न फेदाण्यासार्खेच तसेच तुमचे हि व्यक्ती आणि वल्लीच्या प्रत्येक वल्ली नी माणूस  शोधायला शिकवले. तुज आहे तुजपाशी मध्ये काकाजी आणि आचार्यांनी ख्प्श्या प्रश्नाची उत्तरे दिली. सुंदर  मी होणार मुळे खरच सुंदर कसे जगावे हे शिकवले .   तुम्ही उपजीविका आणि आयुष्य यातला फरक सांगितलात तुम्ही जमिनीवर राहायला शिकवले. प्रसिद्धी आणि...